आता सर्वांनी ट्रेडिंग स्टाइलची पुस्तक परत उघडली गेली....केडी आकांक्षा त्यावर लक्ष केंद्रित केले तर मी आणि सर मार्केट ट्रेडिंग स्टाइलवर लक्ष केंद्रित केल. आणि क्रुपाली मार्केट बघायला लागली....पण उपाय अजुन सापडत नव्हता...आता काय?
सर्व सुत्र हलवायला सुरुवात झाली होती. प्रत्येक जण आपले सोर्स वापरत होते. कधीच उलट हेजिंग होत नव्हत. म्हटली तर सिचुएशन गंभीर होणार होती जर आम्ही वेळेवर जर योग्य क्रुती केली नसतीतर. कोणीतरी आमचा प्रॉफीट खात होत आणि आम्ही काहीही न करता बसत होतो अस नाही तरी एक नैतिकतेच बंधन की आपण चांगल परफॉर्म करत नाही आहोत अस सगळ्यांच वाटत होत. पण काहीच पर्याय नव्हता. आम्ही लेट इट बी ...जरा वेळ जाउ दे म्हणुन...पोझिशन्स जैसे थे चा निर्णय घेतला.आहे ते राहु दे अजुन रिस्क नको अस सर्वांचच मत ठरल. म्हणुन फक्त येणारे कोन्ट्रॅक्ट खेळायच..जस झेपेल तस त्या कमॉडिटील ट्रीट करायच ठरल होत. हळुहळु आम्ही इन्वेस्टमेंट साठी दुसरे काही मार्ग शोधले आणि प्रॉफीट बुकींग करयाला सुरवात केली. तरी प्रश्न होताच की नक्की गाड कुठे आडत होत. माझा आणि सरांचा अभ्यास एकीकडे सुरु होताच.
आमच्या येथे हळुहळु सुरळीत झाला नॉर्मल ला आम्ही येवु लागलो होतो.घटना घडुन साधारण १ वर्ष उलटुन गेल होत. नुकसान बर्यापैकी आम्ही भरुन काढल होत. हळुहळु आम्ही पण रिलॅक्स मुडमध्ये गेलो..की चला एक संकट संपल.
दिवाळी आली.दिवाळीत आम्हा लोकांची चंगी होती. अनेक पार्टीज आणि गेट टु गेदरर्स होती. आमच्या अजुन एका ग्रुप कंपनीतल्या एकाने आम्हाला त्याच्या नविन घराच्या पार्टीला बोलवल होत. खर म्हणजे मी त्याला कधी बघितलसुद्धा नव्हत बाकीच्यानी नुसतच बघितल होत.जस्ट हाय हॅलो च्या वर बोलण झाल नव्हत. आता काय करायच? प्रश्न होता जनरली आम्ही आमची कंपनी सोडुन कोणाच्याही पार्टीज अटेंड करत नसू.अगदीच अनोन माणसाच्या तर अजिबात नाहीच. फक्त जर काही कॉर्पोरेट पार्टीज मात्र नक्की अटेंड करायचो. बर्याच ओळखी व्हायच्या अश्या ठिकाणी. म्हणुन सरांनी ह्या पार्ट्या कंपलसरी केल्या होत्या.
त्यामुळे हे डोमेस्टीक पार्टीच बोलावण तर कचर्यात गेल होत ऑलरेडी.कॉन्ट्री काढुन आम्ही केदार कडे दिल त्याने ते योग्य व्यकतीकडे गिफ्ट साठी दिल होत. सर मात्र ही पार्टी अटेंड करणार होते अस कळल .सकाळी सगळ्यांना ती पार्टी अटेंड करायचीच आहे अस प्रेमळ धमकी वजा आदेश दिला.. तिथे बरेच कॉरपोरेट डेलिगेट्स येणार आहेत अस सर म्हणाले. सो म्हणजेच बर्याच ओळखी होणार हे ओघानेच आले.सो पार्टी ला जायच अस ठरल.
आम्ही आणि अनेक कंपनी कलिग आम्ही सगळे त्यांच्याकडे गेलो. व्यवस्था एकदम झक्कास होती सगळे छान मस्तीच्या मुड मध्ये होते. कोणी खात होते, पित होते, काही नविन ओळखी करुन घेत होते. काहीच पक्षी निरीक्षण सुरु होत तर काही जण कोणी पटत आहे का .कुठे काही जुळत आहे का हे बघत होते. मार्केट बद्दल कुठे जोरात गप्पा चालु होत्या. आमचे सर मात्र आम्हाला ओळख करुन देत होते वेगवेगळ्या लोकांशी.
मस्त खायला..स्टार्टरस, रंगीबेरंगी मॉकटेल्स ह्यात आम्ही गुंग होतो..एकीकडे..मस्त मंद मुझिक.....खायला मस्त चटरपटर...आणि नव्या लोकांशी ओळखी..अजुन काय हव असत पार्टी मध्ये..ह्यात सुद्धा ते होत..!!
अचानक सर केडी जवळ आले आणि सांगितल..आपण ताबड्तोब..सगळ्याना एक एक करुन बाहेर जमा व्ह्यायला सांगितले....!
आम्ही सगळे बाहेर जमलो...सर म्हणाले आता कोणीही आत जाणार नाही..आपण आत्ताच्या आत्ता ऑफीस मध्ये निघत आहोत. घरी तस कळवा..नो मोर डिस्कशन्स...लेट्स मुव्ह गायीज...
आम्ही सर्व कन्फुज...आत्ताच का? खर तर जेवण पण व्ह्यायच होत...गाड्या निघाल्या..प्रश्न होते...!!
पण उत्तर मात्र सर देत नव्हते..आता अजुन काय तेही कळत नव्हत..!!
सर्व प्रश्नांची उकल आता ऑफीस मध्ये गेल्यावरच होणार होती.....तरी आमचे डिस्कशन्स मात्र जोरात सुरु झाले....काय नक्की होणार या वर..
क्रमशः
प्रतिक्रिया
5 Oct 2009 - 1:16 pm | अवलिया
हम्म. पुढचा भाग लवकर येवु दे.. !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
5 Oct 2009 - 1:19 pm | राधा१
येणार...कधी ते मला ही माहित नाही...!!
5 Oct 2009 - 1:33 pm | सुबक ठेंगणी
असं नको करूस गं...किती लटकवशील ;)
आणि जरा मोठे टाकता आले तर बघ नां...
तोपर्यंत वाचते आहेच...
5 Oct 2009 - 1:59 pm | धमाल मुलगा
परफेक्ट जागा सापडली हो क्रमशः टाकायला!
केला ना आमचा चक्का? आता बसतो खुंटीवर टांगुन घेऊन... :)
पु.भा.प्र.
-ध
5 Oct 2009 - 2:05 pm | महेश हतोळकर
असेच म्हणतो.
5 Oct 2009 - 2:05 pm | श्रावण मोडक
+१
5 Oct 2009 - 2:23 pm | निखिल देशपांडे
काय परफेक्ट टायमिंग आहे क्रमशः चा...
असेच म्हणतो..
असो अजुन जास्त मोठे भाग टाकता आले तर बरे होईलच
पुढचा भाग लवकरच टाका!!!!
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
5 Oct 2009 - 4:23 pm | दशानन
आम्ही तर बॉ निखिलशी सहमत... बाय डिफॉल्ट ;)
हो की नाही निखिल :)
*
छान लिहीत आहात.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
5 Oct 2009 - 7:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढच्या भागाची वाट पहात आहे.
(खुंटीवरची) अदिती
5 Oct 2009 - 2:36 pm | ऍडीजोशी (not verified)
आधीचा भाग विसरूनही गेलो होतो. असं महिन्या महिन्या ने एक एक पान टाकण्यापेक्षा सगळं लिहून मग जरा मोठे भाग पाठोपाठ टाकले तर बरं होईल.
5 Oct 2009 - 9:11 pm | रेवती
जरा लवकर पुढचा भाग टाकशील का? फार वाट पहायला लावतेस आणि छोटे भाग टाकतेस. आता परत जीव टांगणीला लागलाय. हा भाग मात्र मस्त!
रेवती
5 Oct 2009 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते
लवकर....
(श्वास रोखून) बिपिन कार्यकर्ते
5 Oct 2009 - 10:36 pm | स्वाती२
श्या! पुन्हा क्रमशः! पण मस्त झालाय हा भागही.
6 Oct 2009 - 12:17 pm | राधा१
अवलिया, सुबक ,धमु दादा,मी, श्रावण, निखिल्,राजे, आदिती ताई, आदित्य,रेवती, बिपिन काका,स्वाती तै, कर्क.. प्रतिसादसाठी धन्स....!!!
@ सुबक...प्रयत्न करणार लवकर लिहायचा...बाकी सर्व बॉसच्या हातात आहे ना...तो नाही आला तर लिहिता येइल..!!
@ धमु...तुम्ही कथानक लवकर पुर्ण करेन..
स्वता:ला "खुंटीवर टांगुन घेऊन." अस काही करु नका.
@मी, श्रावण,..कथानक पुर्ण नक्की होणार...पण क्रमशः माझ्या हातात नाही...
@निखील. : मनपासुन धन्यवाद.. :-)
@ राजे: धन्स...निखिल ला अनुमोदन दिल्यमुळे...तुम्हाला परत एकदा...खास शुभेच्छा..!!! :-P
@ आदित्यः धन्यवाद...आपण बोरिवलीला होतात ना?...तुमच म्हणण खर आहे पण...मला कथा लिहुन.ठेवुन मग भाग टाकायला हवे होते..पुढच्या वेळेला नक्की असच करेन..!!
@ रेवती ताई : मनापसुन धन्यवाद...अहो टंकायला..पुरेसा वेळ नाही मिळत..सो जेवढा मिळतो तेवढच टंकते..आता नक्की मोठ्ठा भाग टाकेन.
@ बिपीन काका: येइल..भाग लवकर.. :-)
@ स्वाती२ तै: धन्यवाद....मला माहित आहे क्रमशः वाचण किती कंटाळवाण असत ते!!
@ कर्कः अहो सो माझ्या सवयी चा भाग आहे...मुद्दाम नाही पण चुकुन येतोच तो...पुढच्या वेळेला नक्की काळजी घेईन..
सर्वाना...एकदा मनापासुन धन्स....!!
7 Oct 2009 - 12:20 am | संदीप चित्रे
मस्त वेग आहे कथेला... शेवटचा क्रमशः तर अगदी पर्फेक्ट जागी आहे.
वाट बघतोय.
पहिलाच प्रयत्न आहे पण कथा चांगली जमतीय.