बुमरँग २

राधा१'s picture
राधा१ in जनातलं, मनातलं
3 Sep 2009 - 1:26 pm

आधीचा दुवा

अखेर ऑफीस मध्ये आले...सर्व फॉरम्यालिटीज पुर्ण केल्या...आणि डिलींगरुममध्ये मला जाउन बसायला सांगीतल...माझा बॉस ला यायला अजुन बराच वेळ होता....

पुढे.....

मी उगीच येथे तेथे टाइमपास करत बसले होते...बघत होते कोण काय करत आहे ते. तस काही फारस समजत नव्हत पण लोकांच्या कडे बघुन कळत होते..की थोड आगाउ कॅटेगरी आहे म्हणुन....

टिम मध्ये ३जण होते एकुण आणि मी चौथी व आमचा बॉस आणि त्याची सेक्रेटरी. ही आमची कमॉडीटी ची टिम होती. अजुन एक इक्विटीची टिम सुद्धा बसायची ते फक्त दोघेच होते. आणि ते बराच काळ येथे काम करत असावेत अस वाटल आणि स्वता:ला ते जरा जादा समजत होते...तरी पण ते अध्यातमध्यात नसावेत अस वाटल. आमच्या टीम मधले दोघे जण रिसर्च करत होते तर १ जण कॉल टाकत होता. मला रिसर्च आणि कॉल दोन्ही सांभाळायच होत अस बॉस ने सांगितल होत.

बॉस आला त्याने फॉर्मल ओळ्ख करुन दिली. आणि अस जाणवल की पुर्ण भारत देशाचे आम्ही प्रतिनीधी आहोत.१ जण होता बंगालीबाबु त्याचे नाव केडी उर्फ केदार, २री क्रुपाली ती नॉर्थ ची होती, ३री आ़कांक्षा ती रहात जरी दिल्लीला असलीतरी ती साउथ इंडियन होती आणि मी अश्विनी महाराष्ट्रीयन. आमचा बॉस गुज्जु होता तर त्याची सेक्रेटरी नॅन्सी कॅथलिक होती. पुर्ण भारत सामावल्यासारखा जाणवत होता.

प्रोप्रायटरी असल्याने इन्डक्शन ची काही भानगड नव्हती. काही दिवस फक्त बॉस बरोबर बसुन काही बाही चर्चा करायच अस ठरल होता. त्याला सुद्धा माझा नॉलेज चेक करायच होत. मी कितपत डावपेच खेळु शकेन याचा बहुदा अंदाज तो घेत असावा अस मला वाटायच. नवनवीन कुट्प्रश्न सोडविणे. नविन कमॉडीटीचा अंदाज घेणे आणि कॉल टाकणे असे सुरु झाले होते.

अजुन बॉस सोडुन इतरांबरोबरसुद्धा हळुहळु मी मिसळत होते. वर वर दिसायला जरी चांगल असल तरी सुद्धा आतमध्ये काही गुप्त राजकारण चालु असायच पण मी माझ काम सुरु ठेवण हेच सध्या महत्वाच होत. एक टिम म्हणुन आम्ही सर्व छान मजा करत होतो.अचानक मार्केट मध्ये येणारे चढ उतार ह्याला आमची टिम छान उत्तर शोधत होती.

आमच्या कंपनी ओनर सुद्धा आता आमच्या बॉसवर पर्यायाने टिम वर जाम खुश होता. तो आमच्या डिलींग रुम मध्ये जास्तीत जास्त वेळ काढत असे. दरम्यान आमच्या कंपनीने एका सबकंपनी मध्ये सुद्धा नविन कमॉडीटीची टिम सुरु केली होती आणि जास्त प्रॉफिट काँपीटीशन साठी दुसर्या एका सी.इ.ओ. ला त्याचा हेड करणयात आला होता. थोडक्यात आमच्याकडे प्रॉफिट काँपीटीशन सुरु होणार होती आणि नविन नियमानुसार प्रॉफिट वर आमचे भत्ते ठरणार होते.

सगळ्याना थोड टेशंन होत पण प्रकरण गंभीर आहे अस वाटल नव्हत. दुसर्या टीमचा हेड हा नाकदुर्या काढणारा प्राणी होता...तसा तो ह्याच कामासाठी प्रसिद्ध होता. कंपनी ओनरच्या कानाशी कानापुज्जी करणे हा त्याचा पार्ट ऑफ जॉब आहे अस केडी म्हणायचा.

त्यामध्येच मार्केट पडणार अस दिसु लागल..आम्ही केलेले फ्युचर चे अंदाज आधिच कोणीतरी ओपन केले होते
त्यामुळे आम्ही करत असलेल हेजींग चा अंदाज चुकणार अस वाटु लागलेल होत. त्यातच एका बड्या कंपनीचा आय.पी.ओ. आला आणि आम्ही बरबाद होणार अस वाटु लागल.
जिथे जिथे आमच हेजींग होता तिथे तिथे अचानक आवक कमी जास्त होवु लागली. म्हणजेच सर्व अंदाज चुकत जाणार अस होत. म्हणजेच जबरदस्त लॉस. आमचा बॉस सुद्धा गोंधळला होता..हे अचानक बाय कोण करत आहे...कळत नव्हत आणि वर हाइट म्हणजे कंपनी ओनर रोज अपडेट्स साठी येत होता आणि चुकणारे अंदाज बघुन हैराण होत होता.
तर दुसरी टीम फॉर्म मध्ये होती. आता काय मोठा प्रश्न आ वासुन आमची वाट बघत होता. अंदाज एवढे कधीही चुकत नसतात हे तर पक्क ठाउक होता...पण नक्की काय होत आहे ते कळत नव्हत.
लूप होल्स मिळत नव्हते...सगळ चित्र धुसर झाल होत.
आता सर्वांनी ट्रेडिंग स्टाइलची पुस्तक परत उघडली गेली....केडी, आकांक्षा त्यावर लक्ष केंद्रित केले तर मी आणि सर मार्केट ट्रेडिंग स्टाइलवर लक्ष केंद्रित केल. आणि क्रुपाली मार्केट बघायला लागली....पण उपाय अजुन सापडत नव्हता...आता काय?

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

3 Sep 2009 - 1:40 pm | मदनबाण

कृपया आधिच्या भागाची लिंक या धाग्यात द्या . :)
वाचतोय...

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

राधा१'s picture

3 Sep 2009 - 3:53 pm | राधा१

धन्स. हे मला मि.पा. बरेच वेळा वाचुन पण सुचले नव्हते.

निखिल देशपांडे's picture

3 Sep 2009 - 1:41 pm | निखिल देशपांडे

वाचतोय... पुढचा भाग येवु दे लवकर...

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2009 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते

चालु द्या. उत्सुकता वाढते आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

3 Sep 2009 - 3:40 pm | धमाल मुलगा

भारी वाटतेय सुरुवात :)
आगे बढो!

बहुतेक अंतर्गत राजकारणाची काहीतरी खेळी मला दिसतेय समोर. आत्ता माझी शंका नाही बोलुन दाखवत...पण काहीतरी गेम आहे आणी तिचा वास येतोय मला :)

वाट पाहतो...

-(प्रायव्हेट डिटेक्टिव्ह) ध.

सुबक ठेंगणी's picture

3 Sep 2009 - 5:23 pm | सुबक ठेंगणी

छान उत्कंठावर्धक लिहित्येस...
बाकी कॅपिटल, फायनान्स, तेजी-मंदी ह्यात मी "धोंडो भिकाजी जोशी" असले तरी गोष्ट सही रंगते आहे.
(आताच विकिपिडियावर हेजिंग म्हणजे काय पाहिलं. पहिल्याच वाक्याला विकेट पडली. )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2009 - 9:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मार्केटातलं (खरंतर कशातलंच) काही कळत नाही. पण गोष्ट मस्त लिहीत आहेस.

अदिती

अवलिया's picture

3 Sep 2009 - 6:08 pm | अवलिया

छान आहे.. :)

थोडे मधले संदर्भ गाळुन लिहित असल्यामुळे बाजाराशी संबंधित नसलेल्या लोकांना कदाचित डोक्यावरुन जाईल. तरी असे संबंध खुलवुन देता आले तर बघा !

बाकी चालु द्या !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्राजु's picture

3 Sep 2009 - 6:56 pm | प्राजु

वाचते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

महेश हतोळकर's picture

8 Sep 2009 - 4:43 pm | महेश हतोळकर

छान सुरु आहे कथा.
फक्त एकच विनंती - पूर्ण करा. इथे मार्केटवाले कथा अपूर्ण सोडण्यात पटाइत आहेत.

विजुभाऊ's picture

8 Sep 2009 - 5:49 pm | विजुभाऊ

लु फॉल्स मिळत नव्हते
हा शब्द असाच आहे का ;)
याचा अर्थ अनर्थापर्यन्त नेतोय?
मला वाटते तो शब्द लूप होल्स असा असावा

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे