बुमरँग४

राधा१'s picture
राधा१ in जनातलं, मनातलं
12 Jan 2010 - 4:45 pm

नमस्कार,
मला काही कारणांमुळे मिपा वर कथा टाकायला वेळ होत नव्हता.
बर्‍याच जणांनी व्यनि व खरडीद्वारे विचारणा केली होती.त्यासगळ्यांची मी मनापासुन आभारी आहे. तसेच माझ्या अनेक मिपा वरच्या मैत्रिणी व मित्रानी न कंटाळता मला कथेची आठवण करुन देत लिहायला उद्युक्त केला त्या सर्वांची मी मनापासुन आभारी आहे.

बुमरँग१
बुमरँग२
बुमरँग३

सर्व प्रश्नांची उकल आता ऑफीस मध्ये गेल्यावरच होणार होती.....तरी आमचे डिस्कशन्स मात्र जोरात सुरु झाले....काय नक्की होणार या वर..

हळू हळू डिस्कशन..चालु होता आणि प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता होती..या रात्री आम्ही नक्की काय करत आहोत...अचानक जेवण सोडुन आल्यामुळे तर जास्तच अस्वस्थ होतो..आणि सारांनी त्यातुन गुपचुप यायला सांगितल होत...नक्की काय होत कळत नव्हत..आणि हे अस कधी आमच्या बाबतीत न घडल्यामुळे त्याची सवय ही नव्हती....सगळच कस...अनिश्चित होत...तेवढ्यात सर आले आणि सगळ्यानां केबिन मध्ये बोलवल.
आणि काही फाइल्स चाळायला दिल्या. आणि सांगितल आजच्या आज याचा रिपोर्ट तयार करा. आम्ही सगळ्यांनी त्या फाइल्स चाळायला सुरवात केली..बघितल्यावर लक्षात आले की ह्या बर्‍याच जुन्या फाइल्स होत्या त्यात अनेक..टिप्स होत्या...कमॉडीटीची खरेदी विक्री कशी सुरु आहे याच त्या वेळेच्या टिप्स होत्या..कोणकोणते ट्रेडर्स काय ट्रेड करत आहेत याची माहिती त्यात होती..सुरु झाल संशोधन..अचानक बॉसने सांगितल की धुरंधरचे ट्रेडिंग स्टाइल बघा...साधारणपणे १५ वर्षापुर्वीचा तो आराखडा होता. काय काय ट्रेड केल होता, काय प्रगती केली होती याची सविस्तर माहिती त्या मध्ये होती.

सरांनी ती फाइल अभ्यासायला सांगितली. तसच क्रुपाली, आ़कांक्षा व मला धुरंदरशेठ ची सगळी रिसेन्ट माहिती गोळा करायला सांगितली तर केडी ला काही टेक्निकल माहिती शोधायला बसवल.व अश्या रितीने आमचा अभ्यास सुरु झाला तर सर स्वता: काही जुन्या डायर्‍या शोधत होते. काय होत आहे याचा स्पष्टसा अंदाज नव्हता आणि सर ही काही सांगत नव्हते. आम्ही सुद्धा अंधरात तीर मारत होतो. काहीतरी इंट्रेस्टींग घडणार आहे अस कळत होत काय ते मात्र कळत नव्हत..सगळच वातावरण मस्त थ्रिलींग होत.
> > आमचा डेटा शोधण्याच काम ऑलमोस्ट पुर्ण होत आल. आणि त्यातुन काही आम्ही काढलेले निष्कर्ष असे होते की धुरंदर हा आमच्याच कंपनीमध्ये काही वर्षापुर्वी काम करत होता. सध्या त्याच नाव मार्केट मध्ये आयडल म्हणुन होता. फारस या माणसाच अस्तित्व मार्केट मध्ये दिसत नव्हत. तसेच हा माणुस कोणासाठी तरी म्हणुन काम करत होता त्याच काहीतरी विचित्र नाव होत तस्मातशेठ म्हणुन.
> तस्मातशेठ बद्दल आम्हाला तशी काहीच माहिती नव्ह्ती रादर आम्ही सगळ्यानींच हे नाव सरांकडुन प्रथमच ऐकल होत. तसेच हा माणुस कधीही मीटस अथवा पार्टीमधुन कधीही दिसला नव्हता, ना त्याची कधी आर्टिकलस कोणत्या जर्नल मध्ये वाचली होती. आम्हा अ‍ॅनालिस्ट वा डिलरसना जर्नल वाचणे खुप गरजेचे असते. नवनवीन येणार्‍या माहित्या, कंपनी तसेच कॉरपोरेट अ‍ॅक्शनसाठी ह्या गोष्टी अतिशय आवश्यक असतात. त्यामुळे साधरण एका फिल्ड मध्ये काम करणार्‍या व्यक्ती माहित असतात. मार्केट पोझिशन घेताना सुद्धा या अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जसे आपल्याला किती महिन्यांसाठी पोझिशन घ्यायची आहे, समोर कोण आपल्या विरुद्ध उभा आहे किंवा पोझिशन घेत आहे. तसेच किती स्ट्राँग आहे की जेणे करुन त्याचा कमॉडीटी च्या किंमतीवर फरक पडु शकेल किंवा त्याचा मार्केट शेअर किती आहे ह्या सगळ्यांची पुर्ण माहिती असणं आवश्यक असत. विविध इन्फॉरमेशन सोर्स मधुन तसेच तुमच्या कॉनटॅक्ट्स मधुन ही माहित मिळत असते. आणि ती माहिती पुर्ण असणे खुप आवश्यक असते .
ह्या महितींचा उपयोग हा नेहमी रोजच्या ट्रेडिंग बरोबरच क्रुशियल दिवशी सुद्धा होतो.पण हा माणुस आमच्यासाठी नविन होता. आता काय? आणि हा आमच्या मागेच का लागला आहे याच सर्वांना जामच आश्चर्य वाटत होते.
ह्याच्यामुळे आमचा नाव खराब होतच पण आमची मार्केट व्हॅल्यु सुद्धा कमी होत होती.
आम्ही सर्व डिस्कशन करत होतो पण सर मात्र शांतपणे विचार करत होते. सरांनी अचानक सांगतो हा काय प्रकार आहे ते.. अस सांगितल. ते सांगितल्यावर एकदम शांतता पसरली. मग सर म्हणले की आज पासुन एक महिना मी पोझिशन घेणार..भले तुमचा रिसर्च आणि मी घेत असलेल्या पोझिशन मॅच होणार नाहीत पण आत्ता हा केयोस करण गरजेच आहे. सरांनी पोझिशन समजवुन सांगितल्या कोणी कुठे कसली पोझिशन घ्यायची. आमच्या रिसर्च इन्फोरमेशन पेक्षा पोझिशन खुपच वेगळ्या असणार होत्या तरी सुद्धा त्या घ्यायच्या होत्या.

सरांनी त्या माणसाबद्दल माहिती सांगितली.धुरंधर हा आमच्या ऑफीस मध्ये होता. एकदा कंपनीचा डेटा चोरल्यामुळे त्याला काढुन टाकण्यात आले होते.
त्याचे डेटा चोरण्याचे काम बरेच दिवस विनासायास सुरु होते. पण सरांना त्याचे वागणे संशयादस्पद वाटे. सरांनी सहज अंधारात दगड मारला होता. तेव्हा हे महाशय पकडले गेले होते. एका मुलीच्या सेक्शुल हरासमेंट च्या केस संदर्भात सर व्हिडिओ एव्हिडंस बघता बघता ही केस अचानक पणे पुढे आली होती. नंतर लक्षात आले की ह्याने बरीच माहिती बाहेर विकली आहे. खर तर तो जाम हाता पाया पडला होता पण कंपनी ओनर मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने सरांना पण काही वाटा द्यायचा कबुल केला होता. पण सर बधले नव्हते.
आणि त्याला कंपनी सोडुन द्यावी लागली होती.
दुसरा म्हणजे तस्मातशेठ. हे महाशय सरांचे बॅचमेट होते आणि तेव्हाचे सरांचे स्पर्धकसुद्धा. ह्या दोघांनी करियर एकत्र सुरु केला होत. पण ह्या तस्मातशेठला सगळी व्यसन होती तसेच काममध्ये सुद्धा तो प्रामाणिक नव्हता. सरांनी अनेक वेळा त्याच्या चुका नजरेस आणल्या होत्या. त्यामुळे त्याला तिथुन लवकरच निघुन जावे लागले होते. व व्यसनिपणाचा फारच गवगवा झाल्यमुळे त्याला बाजरात कोणीही नोकरी देत नव्हते. बहुदा त्याचा राग ह्या माणसाने मनात ठेवला आहे अस वाटत होत.

१ला धक्का आम्ही द्यायचा ठरविला तो क्रुड ऑइला व नॅचरल गॅसला. कोणालाही अपेक्षा नसलेल्या पोझिशन्स घेवुन ठेवल्या. त्यामुळे सगळीकडे गोंधळ उडविला. त्या गोंधळाचा फायदा घेवुन आम्ही चांगलाच प्रॉफिट कमवला होता. प्रॉफीट एवढा झाला की आमचे झालेले सर्व नुकसान तर भरुन निघालेच पण अजुन काही ज्यादाचा नफा सुद्धा आम्ही कमवला होता.
आता शत्रुंचा अंदाज आल्यामुळे आम्ही त्यांना धडा शिकवायचे ठरविले. त्यांच्याविरुद्ध आता"मिर्‍याचा" उपयोग करण्याचे ठरले. मिर्‍याचे भाव आम्ही जास्तीत जास्त खरेदी करुन वाढवुन ठेवले. पण त्यांच लक्ष मात्र क्रुड ऑइला व नॅचरल गॅसला होत त्यामुळे त्यांना आमचा होणार बाईंग कळलच नाही. त्यांच्या लक्षात आल्यावर त्याने बाईंग सुरु केला. आणि तेव्हा पुर्ण हाय रेट्स होते. आणि अचानक आम्ही पोझिशन मध्ये बदल करुन सगळ मिर विकुन टाकल आणि त्याला सर्व माल घेवुन बसाव लागल. त्यात त्यांच एवढ नुकसान झाल की ऑफीस पासुन घरापर्यंत सर्व गोष्टींचा लिलाव झाला.
अश्या रितीने आमच्यावर आलेल्या संकटला आम्ही बुमरँग ने त्यांच्यावरच परत पाठविले होते.

कथा

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

12 Jan 2010 - 5:00 pm | महेश हतोळकर

छान कथा. पण शेवट आजून थोडा रंगवायला पहिजे होता. आगदीच थोडक्यात आटोपल्यासारखा वाटतो. पण तरीसुद्धा मस्त कथा.
पुलेशु.

आणि हो, कथा पूर्ण केल्याबद्दल आभार.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2010 - 6:02 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

प्रियाली's picture

12 Jan 2010 - 5:29 pm | प्रियाली

एकदा कंपनीचा डेटा चोरल्यामुळे त्याला विलंबित करण्यात आले होते.

गोष्ट वाचली नाही फक्त उघडली तर हे वाक्य चटकन नजरेत आले. निलंबित म्हणायचे असावे बहुधा.

असो. गोष्ट वाचल्यावर इतर अभिप्राय देईन.

प्राजु's picture

13 Jan 2010 - 12:50 am | प्राजु

पोझिशन्स बदलल्या.. वगैर.. गोष्टी निट नाही समजल्या.
प्रियाली ने जे सांगितले, तसे ते"विलंबित" नसून निलंबित असे हवे.
पु ले शु.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

स्वप्नाली's picture

15 Jan 2010 - 2:20 pm | स्वप्नाली

फारच छान
पण शेवट थोडा अजुन वाडवायला हवा होतास :)

मदनबाण's picture

15 Jan 2010 - 4:02 pm | मदनबाण

बरेच दिवस वाट पाहावी लागली... :W
छान लिहले आहे. :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato