(अनुवादीत . कवी...योगेश)
ती....
बरसतो श्रावण रिम-झिम रिम-झिम
आनंदे उल्हासित होते माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन
बरसत होता घन हा असाच जेव्हा
भिजला होता पदर हा असाच तेव्हा
सांगशील सजणा का होते असे अजून
होते आनंदे उल्हासित माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
अशाचवेळी श्रावण देई दाह निराळा
अशाचवेळी आसमंत दिसे फार वेगळा
तृप्त वारा वाहे मदमस्ती पिऊन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन
तो....
थेंबामधूनी वाजती तुझे घुंघरू जेव्हा
आशा मनातल्या न जावो विरूनी तेव्हा
कसे झाले स्वप्नाळू माझे दोन्ही नयन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन
मैफिलीमधे सांगू ते कसे कुणाला
हृदय आमुचे दिले कुणा अनोळखीला
हाय आता काय करावे जतन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
28 Sep 2009 - 10:03 am | शेखर
केवळ अप्रतिम....
29 Sep 2009 - 8:37 am | क्रान्ति
खास!">वा!
अतिशय सुरेख, समर्पक अनुवाद!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
29 Sep 2009 - 8:39 am | लवंगी
क्रांतिताई अचुक ओळखलत गाणं!
29 Sep 2009 - 9:04 am | मिसळभोक्ता
थेंबामधूनी वाजती तुझे घुंघरू जेव्हा
(जब घुंगरुओंसी बजतीहै बूंदे !)
क्रांतीताई,
प्लीज तूच थांबवू शकतेस हे आता...
प्लीज..
काही तरी अनाघ्रात (व्हर्जिन) सोडा रे आजोबांनो !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
29 Sep 2009 - 9:01 am | मिसळभोक्ता
मंझिल, हा आम्चा आवडता सिनेमा.
रिमझिम गिरे सावन, हे आमचे अत्यंत आवडते गाणे..
ह्या गाण्याचा कायमस्वरूपी राडा केल्याबद्दल सामंत आजोबांचा तीव्र निषेध !
लोकहो, आपल्या आदरस्थानांच्या चींधड्या झालेल्या तुम्हाला कशा काय आवडतात बॉ ?
ते तिकडे गोळे काका आमच्या आवडत्या गाण्यंची चीरफाड करतात, आणि आता हे दुसरे सामंतकाका..
दोन्ही आजोबांनो, माझी आपल्याला विनम्र विनंती अहे, नव्हे आग्रहच म्हणा, प्लीज स्टॉप धिस.
प्लीज.. प्लीज...
नाहीतर तुमच्याशी कट्टी..
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
29 Sep 2009 - 9:08 am | मिसळभोक्ता
मैफिलीमधे सांगू ते कसे कुणाला
हृदय आमुचे दिले कुणा अनोळखीला
आजोबा, अहो, 'अजनबी' चा अर्थ शब्दकोशात 'अनोळखी' होत असेल हो, पण प्रत्यक्षात तो तसा नाही. 'मैफल' चा अर्थही तुम्ही 'मैफिल' असा निवडलात. पण त्याचा प्रत्यक्ष अर्थाशी काही संबंध आहे का ?
अहे, मैफिल म्हणजे एक जण गातो/ते, नाचतो/ते, इतर जण बघतात/ऐकतात.
मैफल ही एकट्याने देखील होते.
उगाच असे शब्दांवर/गाण्यावर/कलेवर बलात्कार करू नका बॉ.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
29 Sep 2009 - 11:08 pm | श्रीकृष्ण सामंत
रे माझ्या नातवा,
तू खरो कोण तां आतां माझ्या लक्षात ईलां!
"आता माझ्या लक्षात ईलां!"
हो माझो लेख मिपावर तू जरूर वाच.
धागो वर येण्यासाठी व्ह्यवेळांक तुझे आभार नाय मानले हां!
नातवाचो आजोबा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
29 Sep 2009 - 9:11 am | llपुण्याचे पेशवेll
वा वा सामंतकाका छान. भाषांतर छान जमलं आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
29 Sep 2009 - 10:02 am | विसोबा खेचर
म्हातार्या, छान रे! सुंदर अनुवाद...
मिभोकडे लक्ष देऊ नकोस.. तो एक नंबरचा भिकारचोट माणूस आहे! :)
तुझा,
तात्या गोळे.