तसा तो एकदम 'बेस्ट' पोरगा, निदान आमच्या गँगमधल्या सगळया जणी आणि हो, जणसुध्दा त्याला तसंच म्हणतात. काय नाही आहे त्याच्याकडे? पैसा, रूप, चारित्र्य आणि आनंदी स्वभाव, कष्ट करायला त्याला आवडते. आणि, त्या कष्टाचं चीज झाल्यावर चीज पिझझा खात तो एखाद्या मॉलमध्ये मजादेखील करतो. थोडक्यात '' ए सो कूल यंग मॅन!''
हा, पण आजकाल त्याच थोडं बिनसलय, मला एकटयाला त्याचे कारण माहित आहे. मलाच का माहित बरे? असो, त्याने मला नाही सांगितलेले पण त्याच्या वागण्यातुन सारं पाण्यासारखे स्वच्छ दिसतयं. मग हातच्या कंकणाला आरसा कशाला? खरं तर, हा मॉर्डर्न पोरगा! प्रचंड बडबडया, वेगवेगळया विषयांवर नुसतं बोलत राहणार. पुणेरी जोक्स मारणार, जाता जाता काय ते लेक्चर वगैरे देणार, याला कोणताही विषय चालतो -अगदी मायकेल जॅक्सन ते विठ्ठलापर्यंत. पण, आजकाल तो कशावरच मत देत नाही. येतो, गप्पा मारतो, पण ती मजा येत नाही. पूर्वी 120 च्या खाली करिझ्मा यायची नाही. आता 60 च्या वर नेत नाही. गाडी आणतोही कमीच. खरतंर, हा रिसेशनचा परिणाम. ऑफिसातल्या 6 लोकांना लाथ मारून हाकलले ना मॅनेजमेंटने. त्यामुळे, बावचळलाय. पण त्याला हेदेखील माहित आहे की, त्याला मॅनेजमेंट काढणार नाही. गेली 3 वर्षे विशेष कामगिरीचे ऍवॉर्ड घेतलाय साल्यानं! मग का काढतील? पण तरी घाबरलाय तो. एखादी चूकदेखील महागात पडू शकते, याचं टेन्शन आलय त्याला. हे, I am a man .मी चुकणारच नां, चुकातुन शिकतो तो खरा शहाणा. हे त्याचच पेटंट वाक्य विसरलाय तोच.माणुस चुकु शकतो हेच आता विसरलाय तो! खरी गोची तिथं नाहीच आहे. हल्ली त्याला या नोकरीचाच कंटाळा येऊ लागला आहे. त्यात, तो 'अमेय'.. त्याने तर त्याच्या जखमेवरच मीठ चोळलयं. वेडा, नोकरी गेल्यावर डायरेक्ट आपल्या आवडत्या नाटकाच्या फिल्डमध्ये दाखल! आता त्याला वाटतयं. शी, काय उपयोग या लाखांच्या नोटांचा, दिवसभर नुसतं संगणकासमोर बोटं बडवायची, बॉससमोर ''हाँ जी, हॉजी'' करायची. बंदी असतानाही हळूच आर्कुटिंग, आणि फेसबुकींग करण्यात आनंद मानायचा पण, What about future? हे असं किती वर्ष? सकाळी 7 ला बाहेर पडले की रात्री 10 वाजता घरात. ना लग्ना, ना संसार. ग्रुपमधल्या पोरीकडे बघायला पण वेळ नाही, मग लग्नासाठी.... नको रे बाबा! बेण्याला नाटकाची फार आवड. ''रिप्लेसमेंट'' बसवायचचं, अस त्याने 10 वर्षापुर्वी ठरवलं होतं, पण गेली 10 वर्षे तोच रिप्लेसमेंट होऊन बसलाय. एक चेहरा नसणारा नोकरदार. मनात आलं तर तो आता राजीनामा देऊ शकतो. पण नाही देणार तो. करिझमा, 2 बीएचके फ्लॅट सगळे हप्ते तेथुनच तर येत आहेत. पाय मोठे म्हणून अंथरूण वाढवलं आहे त्याने.त्याचा मोबाईलचा वेल कम मेसेग होता.."मोठ्या पायांसाठी अंथरुण मोठे करावे". पण आता गर्तेत सापडलाय तो, आणि जर तो स्वत:च शांत नसेल तर गप्पा कसल्या मारणार, वाद कसले घालणार....
तरी तो प्रयत्न करतो. गप्पा मारण्याचा. पण आपली साधी, साधी मतेदेखील मांडायला घाबरतो. भीती वाटते त्याला. कोण दुखावलं गेलं तर. राजकारणावर खूप बोलायचा तो, पण आता तो हा विषय टाळतो. मध्यंतरी Voting केलं त्यानं. शाई लावलेलं बोट दाखवून म्हणाला. मी यावेळी दिलेलं मत नक्की उपयोगी येईल. त्याचा उमेदवार जिंकला पण, तोहि त्यातलाच हे समजल्याने भ्रमनिरास झालायं. भारतात शरीराने, पण अमेरिकेत मनाने असणार्या सो कोल्ड युथचा तो प्रतिनिधी आहे. पण, ओबामाचा चेंजही त्याला मानवलेला नाही. अह! त्याने फक्त राजकारणच सोडलयं अस काही नाहीं. सगळेच मुद्दे सोडलेत. पुर्वी एखाद्या विषयांवर निखिल वागळेनं ''आजचा सवाल'' मध्ये झोडपलं की 2-3 दिवस त्याचीच टिमकी वाजवायचा. पण हल्ली त्याला तेही कृत्रिम वाटायला लागलंय. त्या चर्चेतुन निष्पन्न शुन्य होतयं. प्रत्यक्षात फरक काही पडत नाही. हे त्याला समजलयं. त्यामुळे, त्याच्या अंगातील वादविवादाची जिद्दच निघून गेली आहे. ही प्रसारमाध्यमे राजकारणांची माध्यमे तर होत नाहीत ना असं त्याला 'पेपर्स' वाचल्याने वाटत आहे. एकीकडे त्याला मराठी असल्याचा अभिमान आहे. पण, ऑफिसमध्ये तो हिंदीतच बोलतो. यु.पी. वाल्या मित्राशिवाय त्याचे गप्पाष्टक थांबत नाही. तो त्याच्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. मराठी वेबसाईट उघडायला त्याला लाज वाटते.का माहित नाही? पण मराठी टायपींगच त्याला आवडेना झाले आहे.मी येत नाही हे त्याला Mi yet nahi असेच वाचायला आवडते ...कारण ? माहित नाही पण he is so confused एवढे मात्र नक्की.
आणि हो, तुम्हाला म्हणून सांगतो, परवा, मी हळूच त्याची डायरी बघितली चोरून. Oh! My God! त्याने तर लिहिणेही बंद केलय आताशा. पुर्वी काय लिहायचा तो! प्रत्येक प्रश्न हिरिरीने मांडायचा पण,लोकांसमोर बोलता येत नाही ते डायरीत मांडायचा. आता तेही बंद . भीती बसली आहे त्याला सिस्टिमची. तो आवाज उठवेल खरा, पण नंतर त्याला त्रास दिला गेला तर? तो फार अभिमानाने सांगायचा मी प्रचंड बिझी असुनही, I do something for the society. पण, तो Hypothitical अभिमान गळलायं त्याचा. तो रोजचा पेपर वाचतो. एखाद्या गोष्टीने खुप म्हणजे खुपच चिडतो. पण, तो तिथच शांत होतो. तो राग लेखणीत उतरत नाही. फक्त मी, अहम भोवती फिरलो तर जगता येत नाही ही त्याची फिलॉसॉफी . याला विरोध केला की त्याला त्रास व्हायचा. तो अधिकच समाजात रमायचा. हल्ली त्याला त्याचापण त्रास होतो.
खरंतर, खूप कन्ट्रोल आहे त्यांचा स्वत: वर पण, तोही निसटतोय आता, थम्स अप ची जागा बिअर कधी घेईल, हे सांगणे कठिण झालय. बिचारा घुसमटतोय. पण बोलायला कोणी नाही आहे. त्याला ग्रुपमध्ये असं जवळच कोणीच नाही. बरं आजकालच्या लाईफमध्ये दुसऱ्याच्या जीवनात डोकावणं is crime. ना .हा आई - बाबा आहेत ना ,अगदी गावाकडे खुप मित्र आहेत त्याचे. आर्कुट वरचा आकडा लवकरच लवकर चार आकडी होईल. जी टॉक मॅनेज करताना हाल होतात त्याचे. पण तिथे हे कसे बोलणार आणि कोणत्या तोंडाने हा? जुन्या मित्रांशी संपर्क तुटलाय आणि तिथे अब्रु जायची भीती ! हा, सामाजिक प्रश्न वगैरेवर बोलतो तो वेगवेगळ्या कम्युनिटीवर कारण, तिथे त्याला स्वत:ची आयडिंटीटी नसते. पण, जिथे स्वत:ची ओळख नाही अशा जगात राहून काय उपयोग. आणि, चुकुन जरी आपली ओळख समाजाला कळाली, तर?
खरतरं, त्याने यावर खूप उपाय केले. निदान रिसेशनमधून बाहेर पडू, मग सुटतील प्रश्न? अशा विचाराने खूप बचत केली. हल्ली तो बस वापरतो. क्वचित पिझ्झाच्याऐवजी मेसमध्ये जेवतो. पण, आता त्याच पोटं इतकं हलक झालय, की त्याला तेही पचेना. त्याला पिझ्झाची आणि करिझ्माचीच सवय आहे. त्यामुळे, मनातला गुंता तर सुटत नाहीच आहे आणि शरीरातील गुंता पण वाढत चालला आहे. त्याने ओशो वाचला, You can win वाचले, सगळे केले पण त्याला अजुन काय चुकतय ते समजलेलच नाही आहे. Life is good, you have to enjoy वगैरे सगळे त्याला मान्य आहे पण, ते प्रत्यक्षात येत नाही आहे.
आणि हो, मलाही समजत नाही आहे की नक्की काय चाललय हे? त्याच्याकडे पैसा आहे. छान ऐषोरामी जीवन आहे. म्हटले तर त्याच्यावर सगळे जण फिदा आहेत. सारी सुखे हात जोडून उभी आहेत. इतकंच नाही, तर तो समाजाशी कनेक्टेड आहे. मग, आणखी काय पाहिजे? काय चुकतय त्याचं? त्याच्या बेसिक विचारातच घोळ तर नाही? का हया समाजानेच त्याला तसे बनवले आहे ? या बिघडलेल्या रचनेचा तो बळी ठरलाय का? का, त्याचंच मन कमकुवत झालं आहे का? मला काही समजत नाही आहे, फक्त प्रश्नांची वतुळे उभे राहत आहेत मनात. मी उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय.माझ्या मित्राला वाचवायचा प्रय्तन करतोय .तुम्ही मदत कराल का? कारण हा गुंता सोडवावाच लागेल अस वाटायला लागलय आता!
By the way त्याचं नाव सांगायचं विसरलो. राहू दे, कदाचित या जागी थोडयाफार फरकाने तुम्हीही असु शकता. मग हे त्याच्या माथी का घालायचे. आणि हो, मी कोण? या प्रश्नाचे उत्तर मी दिले असते. पण, सध्या मी अपयशी आहे, हे प्रश्न सोडवण्यात मला अपयश आले आहे. आणि या जगात अपयशी माणसाला ओळख नसते. There is no identity to losser त्यामुळेही मीही असाच गर्दीतला एक. पण, तेवढे मला उत्तर द्या. I am waiting for the answer…
प्रतिक्रिया
28 Sep 2009 - 12:29 pm | मिसळभोक्ता
मे डे, मे डे, कॉलिंग टार्या..
एसोएस एसोएस, कॉलिंग टार्या...
कोदा नॉट लिसनिंग, नॉट लिसनिंग, कॉलिंग टार्या..
टेक हिज बिहाईंड, मेक हिम स्टडी फॉर हिज ओन फ्युचर, कॉलिंग टार्या...
च्यायला, कसली जबरा इंग्रजी कविता जमली आहे ! राबर्ट लुईस स्टिवन्सनला कोल्हापुरी दादा ठरवणारी इंग्रजी कविता ! झका$$$स.
(ता. क. ही कविता "सुखहर्ता दुखहर्ता च्या चालीत म्हणता येते. त्यामुळे समचालानुवादक गोदांना विनंति आहे, की त्यांनी हिंदी चित्रपटगीतंचा नाद सोडून इंग्रजी कवितांकडे वळावे.)
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 12:31 pm | सखाराम_गटणे™
"सुखहर्ता दुखहर्ता??????
28 Sep 2009 - 12:44 pm | मिसळभोक्ता
आदरणीय गटणे,
आपल्या सुचवणीयुक्त प्रश्नाशी पूर्णपणे सहमत आहे.
आमचा कंपू समजत होता त्यापेक्षा आपली बुद्धिमत्ता ०.३१४% जास्त आहे हे उपरोर्लेखित प्रतिसादातून निर्देशित होते, हे स्पष्टच आहे. कृपया बोळा काढावा, म्हणजे पुन्हा जैसे थे होईल. धन्यवाद.
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 12:34 pm | सखाराम_गटणे™
हि मस्ट बी सोफ्तवर एन्गिनर
28 Sep 2009 - 2:19 pm | विनायक पाचलग
सांगायचे विसरलो
सदरचा लेख हा पुर्णत: काल्पनिक आहे ,मात्र या लेखाचे कोणा व्यक्तीशी वा घटनांशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग नाही.
विनायक
28 Sep 2009 - 1:16 pm | प्रसन्न केसकर
लिहिलय प्रकटन! आवडलं!!
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
28 Sep 2009 - 1:26 pm | पर्नल नेने मराठे
कोको 8|
चुचु
28 Sep 2009 - 1:42 pm | पर्नल नेने मराठे
परवा, मी हळूच त्याची डायरी बघितली चोरून.
बॅड मॅनर्स >:P
चुचु
29 Sep 2009 - 6:08 am | लवंगी
असच म्हणते!! बॅड मॅनर्स 8|
28 Sep 2009 - 2:25 pm | अवलिया
त्याने ओशो वाचला, You can win वाचले, सगळे केले पण त्याला अजुन काय चुकतय ते समजलेलच नाही आहे
मिपावर असेच सतत लेखन १२वीचा अभ्यास सोडुन करत राह्यलास तर तुझेही असेच होईल.
सकाळवाल्यांकडे प्युनची नोकरी करुन फावल्या वेळेत लेख लिहावे लागतील. हरकत नाही उत्तेजनार्थ बक्षीस मिळेल, तिथेच काम करतोस म्हणुन.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Sep 2009 - 2:42 pm | दशानन
=))
=))
=))
***
राज दरबार.....
28 Sep 2009 - 2:54 pm | टारझन
व्वा !! आपल्या लेखात मला "ष्रीकृष्ण सामंत" दिसले
प्रतिसादांसाठी न लिहीणारा एक जण म्हणतो
पण, तेवढे मला उत्तर द्या. I am waiting for the answer…
आणि हो ,
सांगायचे विसरलो
हॅहॅहॅ से सांगायची गरज वाटलीच नाही .. आम्ही तर दहा अँगलने संदर्भ लाऊन वाचण्याचा प्रयत्न केला .. .पण काही केल्या कुठेच संदर्भ लागले नाहीत .
-बाकी चुचे .. कोको म्हणजे कोदाचे कोडे काय गं ?
28 Sep 2009 - 3:19 pm | गोगोल
मी चर्चा पुढे नेत म्हणालो..
28 Sep 2009 - 7:41 pm | अवलिया
तळ्यात की मळ्यात
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Sep 2009 - 8:41 pm | गोगोल
प्रा फेसाई याना विचारून सान्गतो.
28 Sep 2009 - 3:23 pm | पर्नल नेने मराठे
हुशार आहेस =))
चुचु
28 Sep 2009 - 3:36 pm | JAGOMOHANPYARE
बिचारा... चार दिवसांपूर्वी मी डिजायनर झालो म्हणून पेढे वाटत होता... नव्याचे नऊ दिवस सरले वाटतं.
:)
28 Sep 2009 - 7:55 pm | वेताळ
त्या कष्टाचं चीज झाल्यावर चीज पिझझा खात तो एखाद्या मॉलमध्ये मजादेखील करतो. थोडक्यात '' ए सो कूल यंग मॅन!''
हे वाक्य मनाला भिडलं. बाकी लेखाचा अर्थ कंसात लिहला असता तर लेख पण कळाला असता.
असो पुन्हा पुन्हा वाचेन.
वेताळ
28 Sep 2009 - 7:58 pm | मिसळभोक्ता
अर्थ कळण्यासाठी नाना टेलरचा प्रतिबिंब हा वैचारिक लेख वाचणे आवश्यक आहे. (अथवा सामंतकाकांचा ३००वा लेख.)
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 10:07 pm | अवलिया
किंवा विरजणवाल्या मिभोचा आकसलेला प्रतिसाद.. !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Sep 2009 - 8:45 pm | चतुरंग
बरा की रे होतास एवढे दिवस! असो तुझं लक्ष एवढं विचलित झालं असेल असं वाटलं नव्हतं. ;)
एक सांगू? हे सगळं सोड. गप गुमान अभ्यासाला जुंपून घे. ते पहिलं महत्वाचं, तिथं विचलित झालास तर काही खरं नाहीये! :)
बेस्ट ऑफ लक!!
(हितचिंतक)चतुरंग
28 Sep 2009 - 10:59 pm | विनायक पाचलग
लक्ष विचलित झालेले नाही हो
हा फक्त काही निरिक्षणानंतर लिहिलेला लेख आहे.
मी कोठेही विचलित झालेलो नाही आणि होणार नाही.
आभारी आहे
आपला,
(कृतज्ञ) विनायक
जाता जाता- ३९ लेख,२५६०१ वाचने, ५५१ प्रतिसाद...
मनापासुन आभार...
आणि हो नॉट सो बॅड ना !!
28 Sep 2009 - 11:17 pm | बिपिन कार्यकर्ते
जाता जाता- ३९ लेख,२५६०१ वाचने, ५५१ प्रतिसाद...
बरं, मग?
बिपिन कार्यकर्ते
28 Sep 2009 - 11:23 pm | चतुरंग
(नळी फुंकणारा)चतुरंग
28 Sep 2009 - 11:54 pm | टारझन
तरी सांगत होतो .. गेले ना इकडून तिकडे ?
बाकी बिपीनचा प्रतिसाद म्हणजे कहर होता =))
-(माजी नळ्या फुंके) टारझन सोनार
28 Sep 2009 - 11:25 pm | श्रावण मोडक
जाता जाता- ३९ लेख,२५६०१ वाचने, ५५१ प्रतिसाद...
#o
28 Sep 2009 - 11:48 pm | शेखर
जाता जाता- ३९ लेख,२५६०१ वाचने, ५५१ प्रतिसाद...
२५६०१ लोकांच्या डोक्याला शॉट
29 Sep 2009 - 12:07 am | टारझन
काय ? कोदाला एकट्यालाच २५००० डोकी आहेत ? =))
(६०१ पैकी १) टारझन
29 Sep 2009 - 12:25 am | शाहरुख
तिच्यायला, पब्लिक हे आकडे काढतंय तरी कुठून ???
प्रसवलेल्या प्रत्येक धाग्यावर जाऊन आकडे गोळा करून बेरजा करतात की काय ?
आम्ही फक्त उत्सुकता म्हणून विचारतोय हां..आम्ही एकही लेख पाडलेला नाहीय आणि येवढ्या मोठ्या बेरीज-वजाबाक्याही आम्हाला येत नाहीत.
29 Sep 2009 - 12:35 am | टारझन
आरे माझ्या मित्रा ,
जो प्रतिसादांसाठी लिहीत नाही , त्याला हे आकडे तोंडपाठ असतात ! असे आकडे तोंडपाठ असणारेही केवळ दोनच महाज्ञानी आहेत मिपावर
- सलमान
29 Sep 2009 - 1:42 am | सुहास
विनायकराव,
याचा रेसेशन शी काहीही संबंध नाही.. तुमच्या मित्राला म्हणावे लग्न करून टाक :) वाढलेल्या पांघरूणाला मदतच होईल आणि जमा पण वाढेल..
बाकी तुमचा लेख अम्मळ मजेशीरच आहे हो.. पण आजकाल त्याच थोडं बिनसलय, मला एकटयाला त्याचे कारण माहित आहे. असे तुम्ही सुरवातीला म्हणता आणि आणि हो, मलाही समजत नाही आहे की नक्की काय चाललय हे? असे ही तुम्ही शेवटी म्हणता..! परवा, मी हळूच त्याची डायरी बघितली चोरून. ही कबूली बरं आजकालच्या लाईफमध्ये दुसऱ्याच्या जीवनात डोकावणं is crime. ना . हे माहीत असताना दिलीय याचे आश्चर्य वाटते...
तुम्ही बारावीला आहेत असे कळले.. अभ्यास करा.. जगाचे प्रश्न सोडवायला आणि लेख-प्रतिसाद लिहायला बाकी आयुष्य आहेच..
--सुहास
तात्यांना मिपा सदस्यत्वासाठी कमीत कमी १८ वर्षे वयाची अट लागू करावी असे सुचवावे काय? :?
29 Sep 2009 - 6:49 am | अवलिया
तात्यांना मिपा सदस्यत्वासाठी कमीत कमी १८ वर्षे वयाची अट लागू करावी असे सुचवावे काय?
नको नको.. मग माझे काय होईल.. ???
(बालक) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Sep 2009 - 8:16 am | लवंगी
ते १८ म्हणताहेत ८१ नाही..
29 Sep 2009 - 10:29 am | पर्नल नेने मराठे
सही ग =))
चुचु
29 Sep 2009 - 2:51 am | गणपा
बोळा अडकला असेल का रे त्याचा :?
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश