प्रेरणा - "अजून कच्चाच आहे" यांची शोध ही कविता
हे "पझल" आहे का ते जाणकार सांगतीलच.
मी मात्र यांना 'पझल सदृष्य' प्रश्न म्हणेन फारतर.
मिपावरील "विडंबन पझल" लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे.
(परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.)
...............
सकाळचा चहाचा माझ्यापर्यंत पोचलाच नाहीत
चहा संपला की गॅस? माझं मी शोधीत राहीलो
शब्दाशब्दांची ठिगळं की ठिगळा-ठिगळांचे शब्द?
माझ्या साहित्यासाठी मीच संकेतस्थळ शोधीत राहीलो
सडक्या अन्नाचे सुटलेले वास आलेच नाहीत
ट्रॅश कॅन रिकामी की सर्दी झाली? ते मी शोधीत राहीलो
कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत
त्यांचे षडयंत्र रचण्याचे मी डाव शोधीत राहीलो
मेर्लोतच्या नशेने ग्लास भरून घेतलेच नाहीत
खावया टोर्टियाचिप्स मी वाव शोधीत राहीलो
गुंत्यात कोंड्याचे कण तेंव्हा केस विंचरलेच नाहीत
(यमक जुळवायला मी ओळ शोधीत राहीलो)
प्रतिक्रिया
6 Sep 2009 - 4:49 pm | विनायक प्रभू
कविता
6 Sep 2009 - 4:52 pm | अजुन कच्चाच आहे
कायच्याबाय रे!
झकासच !!
प्रशांता, आहेस मनोहर खरा !!!
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)
(कसल्या पट्ट्या पाहाताय राव? हे तुमची नाडी सोडून र्हायले बगा)