शोध

अजुन कच्चाच आहे's picture
अजुन कच्चाच आहे in जे न देखे रवी...
6 Sep 2009 - 8:51 am

हि "गझल" आहे का ते जाणकार सांगतीलच.
मी मात्र याला 'गझल सदृष्य' काव्य म्हणेन फारतर.

मिपावरील लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे.
(परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.)
...............

सकाळची सोनेरी किरणे माझ्याशी पोचलीच नाहीत
धुक्यात हरवला माझा मी गाव शोधीत राहीलो

शब्दा शब्दातले अनुबंध हृदयांतरी पोचलेच नाहीत
माझ्याच कवीतेसाठी मी नाव शोधीत राहीलो

झुकल्या नजरेतून सुटलेले तीर दिसलेच नाहीत
हृदयावर झाले ते मी घाव शोधीत राहीलो

कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत
ऐकल्या सुरांतील मी भाव शोधीत राहीलो

देहगंधाच्या नशेने श्वास भरून घेतलेच नाहीत
सोडावया नि:श्वास मी वाव शोधीत राहीलो

गुंफल्या हाताचे क्षण तेंव्हा गोंजारलेच नाहीत
तुझ्या माझ्या नात्याला मी नाव शोधीत राहीलो

गझल

प्रतिक्रिया

पक्या's picture

6 Sep 2009 - 9:30 am | पक्या

छान वाटला पहिला प्रयत्न.

गुंफल्या हाताचे क्षण तेंव्हा गोंजारलेच नाहीत
तुझ्या माझ्या नात्याला मी नाव शोधीत राहीलो

ह्या ओळी आवडल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2009 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दा शब्दातले अनुबंध हृदयांतरी पोचलेच नाहीत
माझ्याच कवीतेसाठी मी नाव शोधीत राहीलो
आणि
गुंफल्या हाताचे क्षण तेंव्हा गोंजारलेच नाहीत
तुझ्या माझ्या नात्याला मी नाव शोधीत राहीलो

लै भारी ओळी. अजून येऊ दे..!

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

6 Sep 2009 - 1:18 pm | मदनबाण

झुकल्या नजरेतून सुटलेले तीर दिसलेच नाहीत
हृदयावर झाले ते मी घाव शोधीत राहीलो
व्वा.
कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत
ऐकल्या सुरांतील मी भाव शोधीत राहीलो
मस्तच... :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

दशानन's picture

6 Sep 2009 - 1:19 pm | दशानन

सुंदर प्रयत्न !

आवडली गझल !

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Sep 2009 - 1:39 pm | बिपिन कार्यकर्ते

छान प्रयत्न वाटला... आंतरजालावर बरेच जाणकार आहेत. त्यांची मदत घ्या... लिहा अजून.

बिपिन कार्यकर्ते

मराठमोळा's picture

6 Sep 2009 - 2:50 pm | मराठमोळा

वा!!
तुमचा प्रयत्न फार छान आहे. आवडला!! :)

विशेषतः शेवटची दोन कडवी.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विनायक प्रभू's picture

6 Sep 2009 - 5:02 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो