आकाशवाणी

सुबक ठेंगणी's picture
सुबक ठेंगणी in जे न देखे रवी...
5 Sep 2009 - 8:48 am

अवलियाची 'जखम' आणि मग ब्रिटिशची 'दगड' वाचून जे सुचलं ते. ह्या कवितेचा रस खरं "गंभीर" आहे असं मला वाटतं.पण तसा ऑप्शनच नव्हता!
इथे मला देव म्हणजे (असेलच तर) खरा खरा देव असं अभिप्रेत आहे. मिपावरील सभासद नाही.

देवबिव साला सब झूट आहे...
वेठबिगार करून ठेवलंय मला...
काही लाखांच्या बदल्यात ह्यांच्या सात पिढयांची सोय करायची...
ह्यांच्या खुर्च्या धरून ठेवायच्या...
ह्यांच्या पापांचं ओझं डोक्यावर वागवीत ह्यांच्या मागे फिरायचं...
हमालासारखं...
मी कोण कुठचा माहित नाही हेच बरं...
नाहीतर माझीही निघाली असती एक...
नाडीपट्टी...

कोण मारतंय रे ते दगड...
म्हणून एक दगड तिरमिरीत त्याच्याच दिशेने भिरकवून दिला...
आणि त्या क्षणी वाटलं...
किती माणसासारखा वागतोय मी!
पण काय करणार...
लाच खायला तुमच्याच नवशागवश्यांनी शिकवलं मला...
आणि तुमच्यातलेच ते टोपीवाले, फेटेवाले, निशाणवाले, दाढीवाले प्रात्यक्षिक देतात दंगे करण्याचं..
“माणसातला देव शोधावा” असं तुमची संतमंडळी म्हणून गेली...
पण इथे तुम्ही माझ्यातलाच माणूस जागा केलाय!

पृथ्वीच्या कारभाराचे दोर तर
माझ्या हातातून कधीच पार निसटून गेले आहेत...
मरून जावं म्हटलं तर मरताही येत नाही हो मला...
त्याने टाकलेला दगड उशाला घेऊन...
बाल्याच्याच शेजारी पथारी पसरीन म्हणतो...

सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो...
तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही...

करुणमुक्तकसमाजराजकारण

प्रतिक्रिया

दशानन's picture

5 Sep 2009 - 8:51 am | दशानन

सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो...
तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही...

वाह !

सुंदर... आवडली !

मदनबाण's picture

5 Sep 2009 - 9:16 am | मदनबाण

सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो...
तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही...
ह्म्म... आसोसान सुप्त हालचाली करायला लागलेला दिसतोय !!!
बाकी राम या शब्दात बरीच पॉवर हाय...
ह्या सुंदर भजनाचा आनंद घ्या...

सकाळचे ९:१५ झालेत... ;)

(जय श्रीराम)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

दिपाली पाटिल's picture

6 Sep 2009 - 9:38 pm | दिपाली पाटिल

ह्म्म... आसोसान सुप्त हालचाली करायला लागलेला दिसतोय !!!
हे अगदी खरं वाटत आहे...
ठेंगणे अगदी भारी कविता केली आहेस...
दिपाली :)

श्रावण मोडक's picture

5 Sep 2009 - 9:19 am | श्रावण मोडक

छ्या... तरीही तो 'आहे'च. त्याशिवाय बोलला का?
गंभीर रचना आहे हे खरं.

सुबक ठेंगणी's picture

5 Sep 2009 - 10:06 am | सुबक ठेंगणी

लिहिली तेव्हा होता वाटतं "तो" आता GOD KNOWS!!! :)

प्रमोद देव's picture

5 Sep 2009 - 9:37 am | प्रमोद देव

:)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

अवलिया's picture

5 Sep 2009 - 10:03 am | अवलिया

गंभीर रचना !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रशांत उदय मनोहर's picture

5 Sep 2009 - 11:15 am | प्रशांत उदय मनोहर

आयला! आता तू कवितापण करतेस? छान.

कविता छान जमली आहे. विडंबन आहे हे इथे कळलं. त्यामुळे ओरिजिनल कविता वाचून सावकाश प्रतिक्रिया देईनच पुन्हा.
बाकी,

सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो...
तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही...

हे सही आहे.

बाय द वे, दु:खी नको होऊस इतकी. देवात राम नसेलही राहिला. पण इथे एका 'देवा'त राम आहे ;) हे या कवितेला 'चाल' लागल्यावर कळेल. /:)

देवकाका, वाचताय नं मी काय म्हणतोय? लावा की म पटापट चाल या कवितेला.. B)

आपला,
(आगलाव्या) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रमोद देव's picture

6 Sep 2009 - 9:23 am | प्रमोद देव

लोक बहिष्कार घालतील ह्या कवितेवर. ;)
तिच्या ’चाली’नेच चाललेय कविता तेच बरं आहे. :)
हल्ली श्रोत्यांबरोबर कवि/कवयित्रींनीही माझ्या चालींचा धसका घेतलाय. :D

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

प्रशांत उदय मनोहर's picture

6 Sep 2009 - 10:07 am | प्रशांत उदय मनोहर

लोक बहिष्कार घालतील ह्या कवितेवर. Wink
तिच्या ’चाली’नेच चाललेय कविता तेच बरं आहे. Smile
हल्ली श्रोत्यांबरोबर कवि/कवयित्रींनीही माझ्या चालींचा धसका घेतलाय.

असं कसं देवकाका? मग काय अर्थ आहे तुमच्या 'चाल'अस्त्राला?
अहो, तुमच्या 'चाल'अस्त्राचा धसका घेतलाय म्हणून तर 'देव'प्रुफ़ कविता करण्यातली आव्हानात्मक बाब एंजॉय करतात सगळे.
उगाच "घेनं न् देनं, फुक्कटचं कंदील लावनं" होईल नाहीतर.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

दशानन's picture

7 Sep 2009 - 9:30 am | दशानन

देव आजोबा,

चाल अस्त्राचा वापर करा , कविता लय मध्ये कशी वाटते हे पण पाहता येईल ना आम्हाला पण व कवयत्री (सुठेंला) ला पण ;)

अजुन कच्चाच आहे's picture

5 Sep 2009 - 4:19 pm | अजुन कच्चाच आहे

खरच सुंदर.....

असलाच देव तर त्याच्या मनात अगदी हेच असेल.

अवांतरः 'एक खराखुरा नास्तिक......" आठवली.
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

यशोधरा's picture

6 Sep 2009 - 9:27 am | यशोधरा

आवडली.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Sep 2009 - 4:23 pm | बिपिन कार्यकर्ते

आवडली कविता.

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

6 Sep 2009 - 4:52 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो

पारंबीचा भापू's picture

6 Sep 2009 - 11:05 am | पारंबीचा भापू

काय पन कल्ले न्हाय!

क्रान्ति's picture

7 Sep 2009 - 7:14 pm | क्रान्ति

पृथ्वीच्या कारभाराचे दोर तर
माझ्या हातातून कधीच पार निसटून गेले आहेत...
मरून जावं म्हटलं तर मरताही येत नाही हो मला...

सही आहे कविता. आवडली.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी