मिपाकर मंडळींना रामराम,
काही कारणाने पूढचा आठवडा रत्नांग्रीस जाण्याचे होत आहे, तरी रत्नांग्रीमधील प्रसिध्द \ अप्रसिध्द खवैय्येगिरीची ठिकाणे त्यांच्या वैशिष्ट्यासह देऊन पोटापाण्याची सोय लावण्यास मदत करा.
रत्नांग्रीसह संगमेश्वर, चिपळुण इथली माहिती सुध्दा स्वागतार्ह..
सर्व प्रकार आनंदाने खाणारा
हर्षद आनंदी
:W :W :W :W :W :W :W :W
मासे नि मिसळ पेश्शल हाय काय?
प्रतिक्रिया
2 Sep 2009 - 9:07 am | चिरोटा
मारुती मंदीरला उतरल्यावर डाव्या हाताला एक/दोन चांगली हॉटेल्स आहेत. बटाटेवड्यासाठी 'खाली' १९५२ पासुनचे विहार हॉटेल.गोखले नाक्याजवळ भिडे उपहार ग्रुह. ही शाकाहारी आहेत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
2 Sep 2009 - 10:19 am | दिपक
इथे काही माहिती मिळेल.
2 Sep 2009 - 2:39 pm | सुबक ठेंगणी
खालच्या आळीतल्या विहार लॉज जवळची सतीशकाकाची खाणावळ्..तिचं नाव कधीच नाही विचाराची वेळ नाही आली. पण "सतिश खानोलकराची खाणावळ" असं तिथे जाऊन विचारता येईल. (मला वाटतं प्रशांत लंच होम आहे नाव्..पण गॅरेंटी नाही :( ) ताजं फडफडीत पापलेट खावं तर इथेच.
2 Sep 2009 - 5:35 pm | संताजी धनाजी
वरील माहीती घेउन http://www.misalpav.com/node/4731 अद्ययावत केले आहे.
- संताजी धनाजी
2 Sep 2009 - 6:17 pm | प्रदीप
सदर धागा अद्ययावत केल्याबद्दल संताजी धनाजी ह्यांचे आभार.
तात्यांना विनंति आहे की त्या धाग्याचा दुवा मुखपृष्ठावर कायम स्वरूपात देण्यात यावा, जेणेकरून त्यातील महत्वाची माहिती वाचकांना सहजपणे उपलब्ध असेल.