गौरी

बाकरवडी's picture
बाकरवडी in जनातलं, मनातलं
29 Aug 2009 - 9:45 pm

गणपती नंतर लगेचच गौरींचे आगमन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.
आमच्याकडेही गौरी बसवण्यात आल्या. परंपरेनुसार आम्ही शाडूच्या उभ्या गौरी बसवतो.सर्व सजावट मी आणि माझ्या भावाने केली.
तर पक्वान्नं आई आणि आत्या यांनी केली. रव्याचेलाडू,चकली,करंजी ,मोदक हे सगळे पहील्या दिवशी ! तर गौरीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होता.
आमच्यात गौरी आगमनाच्या वेळी अंगणातील तुळशी वृंदावनापासुन घरात स्वयंपाक खोलीपर्यंत रांगोळीची पाउले काढली जातात आणि त्यानंतर प्रत्येक पावलावर मुखवटे ठेवले जातात. गौरींना संपूर्ण घर दाखवायचे अशी त्यामागची संकल्पना आहे.
आपल्या मिपावरील बर्‍याच जणांकडे गौरी बसवल्या जात असतील्,त्यांची परंपरा,पद्धत काही वेगळी असेल तर ती जरूर सांगा.


आज गौरी-गणपतींचे विसर्जन झाले, वाईट वाटले पण या सणांतून मिळणारा आनंद महत्वाचा आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या !!

:B :B :B बाकरवडी :B :B :B

संस्कृतीधर्मप्रतिसाद

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

29 Aug 2009 - 9:50 pm | मदनबाण

बाक्रेश छान फोटो... :)

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या !!

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

अवलिया's picture

29 Aug 2009 - 10:03 pm | अवलिया

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

क्रान्ति's picture

29 Aug 2009 - 11:43 pm | क्रान्ति

आमच्यात गौरी आगमनाच्या वेळी अंगणातील तुळशी वृंदावनापासुन घरात स्वयंपाक खोलीपर्यंत रांगोळीची पाउले काढली जातात आणि त्यानंतर प्रत्येक पावलावर मुखवटे ठेवले जातात. गौरींना संपूर्ण घर दाखवायचे अशी त्यामागची संकल्पना आहे.

हो, आमच्याकडेही अशीच पद्धत आहे. [फक्त आता फ्लॅटमधे असल्याने दारातूनच काढावी लागतात पावलं.] मुखवट्यांचं सूप प्रत्येक पावलावर ठेवलं जातं, त्यावेळी मागे येणारे "लक्ष्मी कशानं आली?" असं विचारतात, आणि जिच्या हातात सूप असतं, ती "गाई-गुरांच्या पावलांनी, सोन्याचांदीच्या पावलांनी, लेकराबाळांच्या पावलांनी" अशी उत्तरं देते. उंबर्‍यावर माप ठेवलं जातं भरलेलं, गौरी घेऊन येणारी ते ओलांडून आत येते, त्यावेळी दुसरी तिला कुंकू लावून जेवणाचं आमंत्रण देते. पूजेच्या आधी पावलांच्या मधे कुंकवाच्या पाण्यानं हातवे पण द्यायचे असतात आणि जिथे गौरी मांडल्या जातात, त्यांच्या मागे भिंतीवरही हातवे द्यायचे असतात.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

बाकरवडी's picture

30 Aug 2009 - 2:04 pm | बाकरवडी

हो, आमच्याकडेही अशीच पद्धत आहे. [फक्त आता फ्लॅटमधे असल्याने दारातूनच काढावी लागतात पावलं.] मुखवट्यांचं सूप प्रत्येक पावलावर ठेवलं जातं, त्यावेळी मागे येणारे "लक्ष्मी कशानं आली?" असं विचारतात, आणि जिच्या हातात सूप असतं, ती "गाई-गुरांच्या पावलांनी, सोन्याचांदीच्या पावलांनी, लेकराबाळांच्या पावलांनी" अशी उत्तरं देते.

आमच्याकडेही असेच !

पूजेच्या आधी पावलांच्या मधे कुंकवाच्या पाण्यानं हातवे पण द्यायचे असतात आणि जिथे गौरी मांडल्या जातात, त्यांच्या मागे भिंतीवरही हातवे द्यायचे असतात

क्रान्ति, आपल्या धाग्यामधे फोटोत हातवे दिसत आहेत, तशी मात्र पद्धत नाही आमच्यात!
तसेच गौरींची पोटं भरणे ही पण एक पद्धत आहे, त्यात जे काही पदार्थ केलेले असतील ते एका डब्यात भरून पायाजवळ साडीच्या आत ठेवले जातात.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

मीनल's picture

30 Aug 2009 - 6:04 am | मीनल

मस्त फोटो
मीनल.

विसोबा खेचर's picture

30 Aug 2009 - 8:22 am | विसोबा खेचर

गौरी अगदी देखण्या आहेत...

तात्या.

दशानन's picture

30 Aug 2009 - 10:19 am | दशानन

मस्त फोटो

स्वाती दिनेश's picture

30 Aug 2009 - 10:55 am | स्वाती दिनेश

सुरेख फोटो! गौरींच्या मुखवट्यांवरचे सोज्ज्वळ भाव खूप छान वाटत आहेत.
स्वाती

पर्नल नेने मराठे's picture

30 Aug 2009 - 11:00 am | पर्नल नेने मराठे

बाक्र्या मस्त्च रे
चुचु

बाकरवडी's picture

30 Aug 2009 - 2:06 pm | बाकरवडी

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार ! :)

:B :B :B बाकरवडी :B :B :B

भाग्यश्री कुलकर्णी's picture

30 Aug 2009 - 5:29 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फार सुरेख आहेत फोटो.