या मंगळवारी अचानक तुळापुरास जाण्याचा योग आला. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व छंदोगामात्य कवी कलश यांच्या धर्म-बलिदानाच्या आठवाने ऊर भरुन येत होता.
ईतिहासकारांनी दुर्लक्षलिले, काही अगम्य चुका (की थोरल्या छत्रपतींच्या राजकारणातील अतर्क्य खेळ्या व जबाबदार्या वयाच्या ८व्या वर्षापासुन शंभर टक्के यशस्वी करणारे), आप्तांच्या रोशाला फशी पडलेले आणि पराक्रमासोबत कवित्वाचे बहुमोल लेणे घेऊन जन्माला आलेल्या त्या महान योध्याचा जीवनपट डोळ्यापुढे सरकत होता. थोरल्या महाराजांच्या अवकाळी मृत्युनंतर घरातील भेदी, स्वकीय शत्रु आणि औरंग्याचे आक्रमण ह्या तीनही आघाडींवर हा रुद्र अविरत लढला. उण्यापुर्या ८ वर्षाच्या राजेपणात त्यांनी स्वराज्य दुपटीने वाढविले, रक्षिले, पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच त्यांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते. मात्र केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला. पापी औरंग्याने शिवाजी राजांपासुनच्या पराभवाचे उट्टे काढत या नरशार्दुलाचे अविरत हाल केले, कल्पनातीत अत्याचार केले आणी शेवटी वधु-तुळापुर येथे तुकडे-तुकडे करुन मारुन टाकले. या सर्व प्रवासात त्यांच्या साथीला होते, छंदोगामात्य कवी कलश. त्यांनी पण तेवढाच छळ सहन केला परी ब्राम्हण्याला बट्टा नाही लावला, त्यांचेही बलिदान ईतिहासकारांनी दुर्लक्षिले.
या दोहोंच्या समाधीचे दर्शन, संगमावरील पावन स्नान आणि निसर्गाने दोहो हाताने भरभरुन दिलेल्या या परीसराचे छायाचित्रण असा मनसुबा धरुन अस्मादिकांनी येथे आगमन केले. ईश्वरिच्छेने तो मनसुबा फळास पावला, आणि आयुष्यातला अजुन एक दिवस आठवणिंच्या सोनेरी कोंदणात जाऊन बसला.
भीमा - भामा - इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम :
संगमावरील घाट :
घाटावरील पुरातन शिव- गणेश :
एक आजी सांगत होत्या, इथे पाण्यात १२ आणि जमिनिवर १२ अशी २४ पिंडी पुर्वापार पासुन आहेत. सध्या निरगुडकर फाऊंडेशनतर्फे त्याचे पुर्नवसन \ जीर्णोध्दाराचे काम चालु आहे.
गर्द झाडीत लपलेला संगमेश्वराचा कळस :
संगमेश्वराचा परीसर :
श्री संगमेश्वर :
गणेशाची सुंदर मुर्ती :
असेच काही :
हे कोण?
संपुर्ण संग्रहासाठी इथे पहा.
प्रतिक्रिया
28 Aug 2009 - 7:06 am | रेवती
चांगले फोटो!
वर आपण दिलेली माहिती वाचून अंगावर काटा आला. संध्याकाळ होताहोता काढलेला शेवटून सातवा फोटो कृष्णधवल मराठी सिनेमातला असावा इतका छान आलाय.
रेवती
28 Aug 2009 - 7:31 pm | प्राजु
वर आपण दिलेली माहिती वाचून अंगावर काटा आला. संध्याकाळ होताहोता काढलेला शेवटून सातवा फोटो कृष्णधवल मराठी सिनेमातला असावा इतका छान आलाय.
+१
मात्र ते घाटावर उभे असलेले गृहस्थ कोण?? आपणच का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Aug 2009 - 7:40 am | बिपिन कार्यकर्ते
हर्षद, लेख आणि फोटो दोन्हीही छानच. धाकट्या राजांचे चरित्र नेहमीच अचाट वाटत आले आहे. काही तरी वेगळेच रसायन होता हा माणूस. झंझावातासारखा आला आणि गेला. पण या महान छत्रपतींची समाधी मात्र त्यांच्या इतमामाला साजेशी नाहीये असेच वाटले. असो.
फोटो अतिशय छान आहेत. मंदिराचा कळस मात्र जरा वेगळ्या धाटणीचा वाटतो आहे. म्हणजे गोल घुमटाकार आहे असे वाटते. मुस्लिम स्थापत्यशास्त्राचा परिणाम असावा का? शेवटचा फोटो एखाद्या सतीच्या वृंदावनाचा असावा का?
सूचना: या ठिकाणी जायचे कसे? नक्की कुठे आहे हे स्थान? इत्यादी माहिती दिल्यास अजून बरे.
बिपिन कार्यकर्ते
28 Aug 2009 - 8:23 am | sujay
सगळे फोटो सुंदर आले आहेत.
शेवटुन ७ वा फोटो विशेष आवड्ला.
३ वर्षा पुर्वी १का संध्याकाळी तुळापुर ला मी काढलेला हा फोटो-
बिपिन साहेब,
हे ठिकाण पुण्याहुन अंदाजे ३० की.मी. दुर आहे आणी पोचायला साधारण ४० मी. लागतात.
पुण्यातुन ह्या ठिकाणी जायला नगर रोड ला वाघोली नंतर डाव्या हाताला १ फाटा जातो जो पुढे तुळापुर ला जातो.
तुळापुर हुन आळंदी जेमतेम १५ मीनीटाच्या अंतरावर आहे.
28 Aug 2009 - 8:41 am | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद !!!
बिपिन कार्यकर्ते
28 Aug 2009 - 5:56 pm | चतुरंग
रत्यावर वाघोलीनंतर तुळापूरला जायचा फाटा आहे डावीकडे.
तिथे 'धर्मवीर संभाजी राजांच्या समाधीकडे' असा मोठा फलकही लावलेला आहे. वाहने, इतर फलक आणी इमारतींची गर्दी ह्यात जरा काळजीपूर्वक बघावा लागतो पण तरीही नजरेत येण्याजोगा मोठा आहे.
(मलाही अजून तुळापूरला जायचा योग आलेला नाही. :( )
चतुरंग
28 Aug 2009 - 8:57 am | दशानन
सुंदर फोटो !
28 Aug 2009 - 9:31 am | अवलिया
सुरेख फोटो !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Aug 2009 - 10:29 am | मदनबाण
व्वा. सुरेख फोटो... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
28 Aug 2009 - 11:25 am | झकासराव
मी गेलोय तुळापुरला. आळंदीवरुनच गेलो होतो. रस्ता त्यावेळी तरी रस्ता म्हणावा ह्या लायकीचा नव्हता.
चांगल ठिकाण आहे.
तिथे गेल्यावर औरंगजेबने केलेल्या अत्याचाराची वाचलेली सगळी वर्णन आठवत राहिली. अंगावर काटा येत राहिला.
फोटो चांगले आहेत हर्षद आनंदी.
28 Aug 2009 - 11:42 am | विमुक्त
सही लिहीलय एकदम...
आणि फोटो पण उत्तम... जातो एकदा तीथे...
28 Aug 2009 - 11:51 am | निखिल देशपांडे
तुळापुर मस्त जागा आहे...
मागे एकदा भर उन्हाळयात तिथे गेलो होतो... तरीही संगमात पाणी होते.
जागा एकदम शांत आहे...
निखिल
================================
28 Aug 2009 - 11:51 am | ऋषिकेश
छान फोटो आहेत. प्रस्तावना देखील मस्त!
वडाच्या झाडाचे चित्र खूपच आवडले
बिका,
पूर्वी मुघल आक्रमणातून वाचण्यासाठी घुमटाकार मंदीरे बांधली जात असत. हे बघा
ऋषिकेश
------------------
सकाळचे ११ वाजून ४९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या..."
28 Aug 2009 - 12:09 pm | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद रे ऋषि. मला वाटले ते बरोबर होते.
बिपिन कार्यकर्ते
28 Aug 2009 - 11:37 pm | हर्षद आनंदी
हे देवस्थान सुध्दा मुसलमानी आक्रमणांत उध्द्वस्त झाले होते. नंतर अदिलशहाचा वझीर "मुरार जगदेव" यांने योगी रुद्रनाथांच्या आज्ञेवरुन याचा जीर्णोध्दार केला.
मुसलमानी राजवाटीतील हिंदू देवळाचे बांधकामही मुसलमानी पध्दतीचे.... धर्म बुडाला तर देवळाचे काय घेऊन बसलात?
याच तुळापुरच्या संगमात, शहाजी राजांनी बोटीवर हत्ती चढवुन हत्तीचे वजन अचुक केले होते. ती कथा फार रोचक आहे.
च्यामारी, हे आधी प्रसिध्द पावले असते, तर बिचार्या आर्कीमिडीजला रस्त्यावरुन नागवे नसते पळावे लागले.
It is most famously attributed to the ancient Greek scholar Archimedes; he reportedly proclaimed "Eureka!" when he stepped into a bath and noticed that the water level rose — he suddenly understood that the volume of water displaced must be equal to the volume of the part of his body he had submerged. This meant that the volume of irregular objects could be calculated with precision, a previously intractable problem. He is said to have been so eager to share his realisation that he leapt out of his bathtub and ran through the streets of Syracuse naked.
28 Aug 2009 - 6:05 pm | चतुरंग
संभाजीराजांबद्दल फारसे वाचनात आलेले नाही जितके शिवाजीराजांबद्दल आले आहे. असामान्य पराक्रमी योद्ध्याची इतिहासानेही म्हणावी तशी दखल घेतली नसावी असे राहून राहून वाटते.
तू लिहिलेले वाचूनही अंगावर काटा आला, संतापाने अंग थरथरले!
वडाच्या झाडाचा फोटो फारच सुरेख दिसतोय. त्यावरचे नदी-मंदीर आणी घाटावर उभा असलेला माणूस हे दोन्ही एखाद्या सिनेमातले असावेत इतके सुरेख आलेत. धन्यवाद! :)
(अवांतर - एकूण महानलोकांच्या समाधी स्थानांकडे म्हणावे तसे नीट लक्ष आपण अजूनही देत नाही असे चित्रात माजलेली झुडुपे, खचलेले चिरे बघून वाटते. वेदना होतात मनाला. :( )
चतुरंग
2 Sep 2009 - 3:24 pm | नंदन
- असेच म्हणतो, रंगरावांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Aug 2009 - 6:15 pm | शाल्मली
सुंदर फोटो. घाटावर उभ्या असलेल्या माणसाचा फोटो तर फारच खास!
तुळापूर एकदम सुंदर स्थळ आहे. माझं तिथे अनेकदा जाणं झालं आहे. १९९३ साली निरगुडकर फाऊंडेशनतर्फे त्या मंदिराचा आणि त्या पूर्ण परिसराचा जीर्णोद्धार झाला होता. तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला जाण्याचाही मला योग आला होता.
आवर्जून जाऊन यावे असे ठिकाण!
--शाल्मली.
28 Aug 2009 - 11:22 pm | हर्षद आनंदी
घाटावर उभा असलेला माणुस हा माझा मामा, मी नाही. त्याच्या नकळत तो फोटो काढला आहे.
छत्रपती संभाजी महाराज : यांच्या बद्दल मी काय बोलणार?
![](http://lh5.ggpht.com/_AlWQ5FiIpzg/SpbIxQAVc0I/AAAAAAAABNY/bNYEbQGpTGI/s800/Tulapur%20%2866%29.jpg)
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" या ऊक्तीला सदैव जागले ते महाराज. त्यांना अजुन थोडे आयुष्य लाभता इंग्रज, पोर्तुगीज, मुगल, हशबी आणि कोण कोण यांची पार धुलाई करीत, साता समुद्रापार त्यांना पोचवले असते. त्यांच्या विषयी पुर्ण माहीती फार कमी ऊपलब्ध आहे. पण श्री. विश्वास पाटील यांची 'संभाजी' नामक कादंबरी त्यांच्या जीवनावर बर्यापैकी प्रकाश टाकते. बालपणी लाभलेला जिजाऊंचा सहवास, त्यांच्याकडुन घेतलेले संस्कार व शिक्षण या पायावर ही कर्तुत्वाची विशाल ईमारत ऊभी राहीली. छत्रपतींनी पुरंदरच्या तहात त्यांना राजकारणात ओढले तेव्हा त्यांची उमर ८ वर्षांची, त्या वयात दिलेरखानाशी शाब्दीक चकमक करण्याचे चातुर्य, अभ्यास आणि धाडस त्यांच्यात होते. आग्र्यात बादशहाशी चतुर संभाषण, रायगडावरुन भरधाव घोडा फेकणे, भाल्याने वाघाची शिकार करणे, वडीलांच्या आज्ञेला अनुसरुन लाखो लोकांच्या रोषाला कारणीभुत ठरणे आणि मोगलांना मिळणे, पोर्तुगीजाच्या मागावर जाऊन संगमेश्वराच्या खाडीत भर प्रवाहात घोडा घालणे, जंजिर्यासमोर पद्मदुर्ग बांधणे आणि तिथुन जंजिर्यावर मारा करणे असे अनेक रोमहर्षक प्रसंग ह्या लढवय्याने जगले.
ह्या सार्या धामधुमीत सुध्दा त्यांचे कवीत्व जाग्रुत होते, संस्कृत (देवबोली) चा अभ्यास अव्याहत चालु होता. कवी कलश आणि महाराज यांचे फार घनिष्ट संबंध होते, अगदी शेवटच्या घटके पर्यंत हा माणुस राजांजवळ होता. त्या रुद्राच्या धर्म-बलिदानाचा एकमेव स्वाभिमानी साक्षिदार!!
कैदेत बादशहाच्या समोर अश्या प्रकारे ह्या कवीची जिव्हा तळपली आणि लगोलग छाटण्यात आली !!!
छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी साधर्म्य सांगणारी अजुन एक व्यक्ती १८ व्या शतकात होऊन गेली तीचे नाव "बंदा सिंग बहादुर" ह्या माणसाचा अंत ज्या पध्दतीने करण्यात आला ते वाचावयास फार फार धाडस लागते.
28 Aug 2009 - 11:42 pm | टारझन
बालपणापासूनच तुळापूरला येणं जाणं राहिलं आहे :)
अंमळ सुंदर परिसर आहे तो !!
-(तुळापुरप्रेमी) टारोबा ट्रॅव्हलर
29 Aug 2009 - 12:09 am | विकास
फोटो छानच आहेत आणि त्याहूनही माहीती ज्या पद्धतीने सांगितली ते आवडले. नक्कीच जायला हवे असे ठिकाण आहे.
29 Aug 2009 - 4:44 pm | क्रान्ति
मस्त सुरेख फोटो. माहिती पण आवडली.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
29 Aug 2009 - 4:49 pm | सुनील
फोटो आणि माहिती छान.
संभाजी महाराजांना जेथे पकडले गेले त्या संगमेश्वरी काही वर्षांपूर्वी जाणे झाले होते पण दुर्दैवाने फोटो काढता आले नाहीत.
गोव्यात फोंड्याजवळ फर्मागुडी येथे संभाजी महाराजांचा सुरेख पुतळा आहे (दुर्दैवाने तो फोटो आता माझ्याकडे नाही).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Sep 2009 - 2:16 pm | अभिजा
छान माहिती लिहिली आहे. प्रकाशचित्रण सुद्धा मस्त झालंय! तुळापूर परिसर फारच अप्रतिम आहे!
30 Oct 2009 - 5:26 pm | संदीप शल्हाळकर
खुपच छान वर्णन केलं आहे. या शनिवारी नक्की जाण्याचा बेत आहे.