लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
5 Feb 2008 - 7:49 am

लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र

अ अ अनशापोटी
आ आ आवळा खाल्ला
इ ई इथे बसलाय्?
उ ऊ उड्या मारतोय्?
ए ए एकदा सांगून
ऐ ऐ ऐकत नाही!
ओ ओ ओरडतोय्
औ औ औषध द्याला -
अं आं आंबटशोक
अ: आहा आंगलट आला!

छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!

कविताबालगीतविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Feb 2008 - 7:55 am | विसोबा खेचर

छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!

मस्त! :)

'अ आ इ ई....' ची बाराखडी आवडली...

आपला,
(सहा महिने आवेचा त्रास सहन केलेला!) तात्या.

वरदा's picture

5 Feb 2008 - 9:18 pm | वरदा

तुम्हाला जास्त मिसळ खाऊन झाला की काय त्रास्? :-)

सुनील's picture

5 Feb 2008 - 11:28 pm | सुनील

वैद्य धनंजयपंत, असेच निरनिराळ्या व्याधींवरील मंत्र येऊद्यात!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

5 Feb 2008 - 11:51 pm | ऋषिकेश

बडबडगीत सदृश बालकविता आवडली

फक्त अं आं आंबटशोक चा अर्थ मुलं नक्की विचारतील असं वाटलं ;)

ऋषिकेश

हे मात्र खरे.. म्हणूनच पुण्यातील मुलांना बिघडण्यापासून दूर ठेवण्यासाठी शहराबाहेर काढलेली बावन्नखणी अनेकमुलांना उत्सुकतेपोटीच आपलीशी वाटू लागली आणि प्रसिद्ध पावली... :)

पुण्याचे पेशवे

धनंजय's picture

6 Feb 2008 - 10:02 pm | धनंजय

ती ओळ इथे ज्यादा लिंबू पिळल्यासारखी स्पेशल!

लहान मुलांसाठी :
> अं आं आंबटचिंबट
> अ: आहा आंगलट आले
असे म्हणता येईल.

"आंबटशोक" हा शब्द मी पहिल्यांदा किशोर मासिकात अशाच एका (मुलांना चालेल अशा) वात्रट कवितेत वाचला होता. (आमच्याकडे किशोर आणि चांदोबा येत असे, बहुतेक चांदोबा नसावा-चांदोबात कुठलीच कविता आठवत नाही.) आईने तेव्हा साळसूदपणे "आंबट-चिंबट आवडणे" असा अर्थ सांगितला. तेवढ्यावर माझे समाधान झाले, आणि कवितेतला एक अर्थही (दोनपैकी) बाळबुद्धीला लागला, विनोदी वाटला. चुकून वरचा मंत्र जसाचा तसा मुलांना म्हणून दाखवला तर माझ्या आईची युक्ती वापरता येईल... तसाही अर्थ लागतो.

बाकरवडी's picture

17 Aug 2009 - 8:47 am | बाकरवडी

वा वा !! क्या बात है !! :) :>

:B :B :B बाकरवडी :B :B :B

खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!

पाषाणभेद's picture

17 Aug 2009 - 9:08 am | पाषाणभेद

आणखी काही बालगीते येवू द्या. आजकालची मुले त्यातील निखळ आनंदाला पारखी झालीत हो.

बाकी आपले नाव वाचतांना धनंजय चा दिवाळीअंक हातात आहे असे का कोण जाणे वाटते.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

-निखळ बालगीतांचा चाहता- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्रकाश घाटपांडे's picture

17 Aug 2009 - 9:22 am | प्रकाश घाटपांडे

आता पुढील मंत्र हे क ख ग घ..... पासुन सुरु करावेत व ते मोठ्या माणसांसाठ संकट विमोचन म्हणुन वापरावेत चला सुरु करा मिपाकरांनो
समांतर - यासाठी पेशल धागा सुरु करण्यात यावा
अवांतर- इतरांचे चांगल चाललय म्हणुन एखाद्याला पोटशुळ झाल्यास कोणता मंत्र म्हणावा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मनीषा's picture

17 Aug 2009 - 1:09 pm | मनीषा

(रुपक कथे सारखे) हे रुपक काव्य वाटते आहे ..

रेवती's picture

17 Aug 2009 - 4:43 pm | रेवती

मस्त मंत्र आहे हो डॉक्टरसाहेब!
एकदम आवडला. मुलासाठी लगेच म्हणते.....त्याच्यासमोर.
रेवती

धनंजय's picture

17 Aug 2009 - 9:36 pm | धनंजय

बर्‍याच महिन्यांपूर्वीचा दुवा वर बघून गंमत वाटली.

येथे माझ्या काही अन्य बडबडगीतांचे/बालकवितांचे दुवे :

कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला
परीचे पशुधन
पोचलो का आपण?
विंचवाचे वर्‍हाड
(नाठाळ मुलांसाठी) बालकविता

(ते दुवे वरती आणण्याचा निर्लज्ज प्रयत्न!)

लिखाळ's picture

18 Aug 2009 - 7:05 pm | लिखाळ

वा .. मंत्र मस्त आहे. :)

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

संदीप चित्रे's picture

18 Aug 2009 - 7:33 pm | संदीप चित्रे

पुढच्या वेळी 'शाळेत बुट्टी मारण्यासाठी म्हणून' जो ठरवलेला पोटशूळ उठतो तेव्हा मंत्र म्हणून बघेन म्हणतोय :)