मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) http://misalpav.com/node/8575
आसपासचे बहुतेक लोक माझ्यासारखेच विचारात गढलेले होते.
त्या मस्त वातानूकुलीत हॉलमध्ये आम्ही पन्नस एक लोक असू. खोलीत अन्धार झाला.
समोर प्रोजेक्टर स्क्रीन प्रकाशीत झाला. त्यावर कोणी एक वसन्त पंडीत नावाचा टाय अकोट घातलेला इसम सफाईदार इंग्रजीत बोलत होता.
हाय आय अॅम व्हॅसन्ट फॅन्डीट. व्हॉट वि आर गोइन्ग टू सी टुडे इज अ मिरॅखल ऑफ धिस सेन्च्युरी
तो वसन्त पंडीत बहुतेक मराठी असावा. पठ्ठ्या इंग्रजी मात्र एकदम फर्ड्या अमेरीकन अॅक्सेन्ट मध्ये बोलत होता.
त्याने अगोदर पृथ्वी ही कशी एक मोठे चुम्बक आहे ते सांगितले.
मग माणसाला शान्त झोप का आवश्यक आहे ते सांगितले.
त्यानन्तर मॅग्नेट म्हणजे काय ते सांगितले. मॅग्नेटचे मानवी शरीरावर कसे परीणाम होतात ते सांगितले.
मग अचानक मेग्नीटीझम मुळे शान्त झोप कशी येऊ शकते ते सांगितले.
त्यानन्तर त्याने एका स्लीपिंग सिस्टीम(याला गादी म्हणायचे नाही) बद्दल सांगितले.
त्या गादीमध्ये ( सॉरी ) स्लीपिंग सिसस्टीम मध्ये असणार्या ऑस्ट्रेलीयन गूज पक्ष्यांच्या पिसाम्बद्दल सांगितले. पोवर पॉइण्ट मध्ये एक प्रेझेन्टेशन रीव्होल्विन्ग मॅग्निटिझम बद्दल सांगितले.
रीव्होल्विन्ग मॅग्निटिझम बद्दल किंवा कोणतीही बाह्य प्रेरणा न मिळता मॅग्नेटचे धृव अचानक बदलतात हेमी आयूष्यात प्रथमच ऐकत होतो. माझ्या संपूर्ण इंजीनीयरींग ला असे काही असते हे कधीच ऐकले नव्हते ( ते तसे काही असते हे तिथे प्रथम आणि शेवटचेच ऐकले)
जपानी तंत्रज्ञानाबद्दल आपले ज्ञान्/अज्ञान उघडे पडेल म्हणून शान्त राहिलो.
ड्रीम्स आर दी मोस्ट पोवरफूल एनर्जी हे वाक्य म्हणत असताना स्क्रीनवर त्या व्हॅसॅन्ट फॅन्डीठ चा चेहेरा क्लोज अप होत होत पडदा व्यापून गेला आणि ती फिल्म संपली.
त्या नन्तर स्टेज वर अचान एक टाय वाला आला. तो स्वतःची गोष्ट सांगु लागला
मित्रानो तुम्ही हे जे पाहिले ती आमच्या प्रॉड्क्टस ची निम्मीच ओळख आहे. १० टक्केच म्हणाना
जपान लाईफ मॅग्नीटीक प्रॉडक्ट्स हे एक संशोधन आहे. याचा मला फायदा काय झाला ते सांगतो......असे सांगत त्याने त्याला झालेले बरेचसे फायदे सांगितले.
त्याचे झाल्यावर एक बाई आल्या त्यानी ती जपानी गादी ( सॉरी गादी म्हणायचे नाही ) स्लीपिंग सिसस्टीम वापरून त्यांचा डायबेटीस बरा झाला असेही सांगितले.
अशी अजुन सात आठ मंडळी ब्लडप्रेशर , मायग्रेन , अंगदुखी , पाठदुखी , सायनस वगैरे बरे झाले म्हणून म्हणाले . शेवटी तो सर्वात अगोदर बोललेला म्हणाला की बाकीचे तुमचे अपर लेव्हल चे लोक तुम्हाला सांगितील.
या सगळ्यात लोकेशला मी काय सल्ल देऊ शकणार होतो ते मलाच समजत नव्हते.
सगळे कोणा न कोणाबरोबर पांगल्याबरोबर लोकेश मला एका कदे घेऊन गेला. डेरे त्याचा अपर लेव्हल होता.
त्या माणसाने सांगायला सुरुवात केली.
साहेब तुम्ही सर्व लोकांचे अनुभव ऐकले. तुम्हाला काय वाटले प्रॉडक्टबद्दल?
मी म्हणालो बरे आहे
नुसते बरे की एकदम फॅन्टास्टीक?
फॅन्टास्टीक
मग तुम्हाला घ्यायला आवडेल?
हो आवडेल
का?
माझ्या वडीलांचे हाय ब्लडप्रेशर नॉर्मलवर आले तर बरेच आहे की.
त्यामुळे काय होईल.
त्याना बरे वाटेल. त्यांची चिडचीड कमी होईल.
त्यामुळे काय होईल?
घरातले वातावरण चांगले होईल.
असे तुम्हाला का वाटते?
का म्हणजे त्याना हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो. काळजी वाटते.
बरोबर आहे.
साहेब एक शन्का आहे? त्या बाई म्हणाल्या तसे डायबेटीस कसा बरा होऊ शकतो?
त्याचे काय आहे साहेब्......अं.....अं.....त्याना से म्हणायचे होते की डायबेटीस बरा नाही पण शुगर कन्ट्रोलमध्ये आली असेल
हो .....
साहेब त्या गादीची किम्मत काय असेल हो?
गादी नाही हो ती स्लीपिंग सिस्टीम म्हणा...गादी म्हंतले की कसे एकदम गावठी प्रॉडक्ट वाटते.
बर स्लीपिंग सिस्टीम ची काय किम्मत असेल
यात पाच मॉडेल्स आहेत. तुम्हाला काय वाटते काय असेल किम्मत?
साधी गादीमिळते अगदी कर्लऑनची घेतली तरीदोन हजारपर्यन्त मिळते ही फारतर पाच सहा हजार असेल
तो हलके हसला...माझ्या शेजारी बसलेला लोकेशही तसाच हसला.
साहेब आपल्या लोकांचे हेच चुकते. आपण मध्यमवर्गीय लोक चांगल्या गोष्टींची किम्मतच करु शकत नाही.
नाही म्हंटले तरी मी थोडासा खजील झालो.
साहेब या स्लीपिंग सिस्टीम चे एन्ट्री लेवल्चे मॉडेल आहे फक्त ९८ हजार अधीक टॅक्सेस. म्हणजे साधारण एक लाख दहा हजार समजाना
अरे बापरे मी एकदम आवंढा गिळला........आमचे जुने घर अवघ्या दीडलाखात बांधून झाले होते..
ओके....ओके ....ओके किमती बद्दल साहेब आपण नन्तर बोलू. पन तुम्ही बोललाच आहात तर विचारतो...मला सांगा बायपास सर्जरीला किती खर्च येतो साधारण दीड दोन लाख?
हो...
आणि सर्जरी नन्तर जी काळजी घेऊ औषधे घेऊ त्याला काय खर्च येईल्....वर्षाला साधारण तीस हजार.... शिवाय पथ्य पाणी करावे लागेल.... तब्येत नाजूक होईल ते वेगळेच. त्यानन्तर ब्लडप्रेशर पुन्हा वाढणार नाही याची खात्री नाहीच
हो.
मग ही सिस्टीम घेऊन ती सगळी काळजी संपवली तर....औषधपाण्यावर खर्च केला असे समजा ना.
मला त्याच्या म्हणण्यात तथ्य वाटायला लागले.
तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे.
साहेब थोडे जरा विषयान्तर करतो...पण मला सांगा की आयुष्यात तुम्हाला जे काही हवे ते जर तुम्हाला कोणी देतो असेम्हणाले तर....
मी त्या माणसाला ठार वेडा म्हणेन्.......अहो हे शक्य आहे का? आयूष्यात जे काही हवे ते इतक्या सहजी मिळत असते तर लोकानी काम कशाला केले असते.
मी सहजी कष्ट न करता मिळेल असे म्हणालो नाही..मी म्हणालो की जे काही हवे ते देतो असे कोणी म्हणाले तर.......
अहो पण ते कसे शक्य आहे?
आहे का शक्य नाही?
अहो साधे रेल्वेने फस्ट्क्लासने जायचे म्हंटले तर आपण ते टाळतो..
का?
साधे उत्तर आहे....पैसे वाचतात म्हणून. फस्ट्क्लासने प्रवास करणे म्हणजे पैसे उधळणे.
मग मोठे मोठे लोक का जातात फस्ट्क्लासने?
त्याना परवडते म्हणून जात असतील.
तो पुन्हा एकदा मघासारखाच हसला.....
बरोबर आहे साहेब ऐकयला वाईट वाटते पण खरे आहे " आपल्याला ते परवडते नाही"..."आपली ऐपत नसते म्हणून आपण त्याला उधळपट्टी वगैरे म्हणतो"
हम्.....
खरे सांगा तुमच्या मनात आपणही फस्टक्लासने प्रवास करावा असे कधीच आले नाही?
आले की बर्याचदा आले. वेस्टर्न रेल्वेच्या डब्यातली चेंगराचेंगरी बरीच वर्षे सहन केली आहे . ते धक्के अंग चिपडाप्रमाणे पिळवटून टाकणारा तो प्रवास.....विरार लोकल मधून एकदा बोरीवलीला उतरायचा प्रयत्न केला होता तेंव्हा प्रकर्षाने वाटले.
मग करायचा आहे असा प्रयत्न?
कसला प्रयत्न?
आयुष्यात तुम्हाला जे काही हवे ते मिळवायचा.....
अहो परत तेच्.......ते कसे शक्य आहे?
शक्य आहे.........मला ते शक्य झाले आहे. तीन वर्षापुर्वी मी देखील तुमच्याच सारखा होतो. मुलून्डहून बोरीवलीला रोज अपडाउन करायचो. आयूष्याला कंटाळलो होतो...... आज मी म्हणु शकतो की मला जे हवे ते मी आज मिळवू शकतो.
तो इतक्या आत्मविष्वासाने बोलत होता .......की त्याचे म्हणणे खोटे आहे म्हणणेच शक्य नव्हते.
त्याने त्याची ब्रीफकेस उघडली.. हे बघा म्नाझे या महिन्याचे ब्यान्केचे पासबूक्.....माझे सर्व व्यवहार व्हाईट मध्ये आहेत. एकदम कायदेशीर व्यवसाय करतो.
त्या पासबुकातल्या नोन्दी पाहून डोळे विस्फारले........एकेक नोन्दी काही किमान सत्तावीस हजाराच्या.......एकून शिल्लक काही लाखात....... हा इतका किरकोळ दिसणारा इसम असला लक्षाधीश.....
साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक?
साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक?
साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक? माझ्या कानात हे वाक्य मी त्या एका क्षणात कित्येक वेळा ऐकले ......कानात शब्द घुमत होते.....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
23 Jul 2009 - 1:03 am | टुकुल
एक गादी ( सॉरी गादी म्हणायचे नाही ) स्लीपिंग सिसस्टीम वापरून तब्येत खुष आणि असले भरलेले पासबुक पण मिळते ;) .. येवुद्या अजुन, बघु देत गादी पुढे काय काय करते..
एक सुचना (विनंती): भाग जरा मोठे येवु द्या कि राव !!
-- टुकुल.
23 Jul 2009 - 3:49 am | पिवळा डांबिस
एक लाख दहा हजाराच्या गादीवर पडल्यावर शान्त झोप येईल की झोप उडेल?
हां, गादीबरोबर ते एखादी चुंबकीय तरूणीही देत असतील तर गोष्ट वेगळी....
निदान जागरणाचा त्रास तरी होणार नाही....
:)
विजुभाऊ, तुम्ही ही गादी घ्याच! मग आम्ही मिपाकर तुमच्याकडेच झोपायला येतो!!!!
अवांतरः चुंबकीय गादीमधेही ढेकूण होतात का हो?
:)
23 Jul 2009 - 4:14 am | Nile
=))
आता नक्की का येउ म्हणताहेत कुणास ठावुक. :$
23 Jul 2009 - 6:01 am | चतुरंग
मी चुकून 'चुंबनीय तरुणी' वाचले! ;)
(कवडीचुंबक)चतुरंग
23 Jul 2009 - 6:48 am | छोटा डॉन
डांबिसकाकाम्च्या पहिल्या परिच्छेदाशी सहमत ...
तशी काय आफर असल्यास जरा बरे पडेल.
>>अवांतरः चुंबकीय गादीमधेही ढेकूण होतात का हो?
काय सांगता येतेय ? ते ही चुंबकीय ढेकुण असतील ...
अरे हो, त्यांना ढेकुन नाही तर ... मॅग्नेटिक ब्लड रिसायकलिंग सिस्टिम म्हणावे काय आता ? ;)
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
23 Jul 2009 - 6:06 pm | योगी९००
अरे हो, त्यांना ढेकुन नाही तर ... मॅग्नेटिक ब्लड रिसायकलिंग सिस्टिम म्हणावे काय आता ?
हॅ हॅ हॅ
मग तरूणीला काय म्हणावे बरे?
(मा. संपादक मंडळी हा प्रतिसाद २ वेळा उडवला गेला आहे. परत जर उडवणार असाल तर क्रुपा करून उडवण्याचे कारण व्य नि. करा.)
खादाडमाऊ
23 Jul 2009 - 9:34 am | अवलिया
या गादीवर टाकायची चादर त्यांच्या कडुन मिळते की ती वेगळी घ्यावी लागते ?
--अवलिया
23 Jul 2009 - 10:05 am | वेताळ
ऑस्ट्रेलियन गुज पक्षाच्या पिसाचा काय फायदा?
वेताळ
25 Jul 2009 - 12:33 am | डॉ.प्रसाद दाढे
ऑस्ट्रेलियन गुज पक्षाच्या पिसाचा काय फायदा?
'हितगूज ' आणि चुंबन दोन्ही साधण्यासाठी :)
25 Jul 2009 - 8:36 am | प्रकाश घाटपांडे
त्यांच्या या बौद्धिका ला आमी बी गेल्तो. अरोरा टॉवर मदी हा सेशन झाल्ता. शेम ष्टोरी
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
27 Jul 2009 - 1:00 am | विजुभाऊ
त्यांचे प्रेझेन्टेशन मात्र खरोखरीच वाखाणण्याजोगे असते
22 Jun 2017 - 12:49 pm | अत्रे
जपान लाइफ चालवणाऱ्या वसंत पंडित (Vasant Raj Pandit) ला २००५ साली अटक झाली होती
http://www.rediff.com/money/2005/mar/31bail.htm
http://www.financialexpress.com/archive/multi-levels-and-the-manna-from-...
(http://www.livemint.com/Home-Page/38DNvo5n1rjBl0AuyPNT3K/Lax-Indian-laws...)
जपान लाइफ वर बऱ्याच केसेस सुरु आहेत (https://indiankanoon.org/search/?formInput=japan+life)
वसंत पंडित चे नाव या जुन्या प्रकरणात दिसते. त्यांचा समता पक्षाशी संबंध आहे असे दिसते.
पंडित यांचा मुलगा वसंत हा जपान लाईफ नावाची कंपनी चालवितो. देणगी देण्याचा व्यवहार खासगी स्वरुपाचा असल्याचे सांगून तो म्हणाला की, माझे वडील जॉर्ज फर्नांडिस व जया जेटली यांना दीर्घकाळापासून ओळखतात
http://archive.is/g39j1 (लोकसत्ता)
या व्यक्तीबद्दल गुगल केले असता "वसंत राज पंडित" हे नाव सारखे दिसते. वरच्या लोकसत्तेच्या लेखानुसार "आर. व्ही. पंडित" हे या वसंत पंडित चे पिताश्री आहेत. या दोघांपैकी एकजण (नक्की कोण ते माहित नाही) दिन दयाळ शोध संस्थान / Deen Dayal Research इन्स्टिटयूट, चित्रकूट या संस्थेचे सेक्रेटरी आहेत. (https://twitter.com/mulani2001/status/614873609727684609?lang=en )
खालचा फोटो बघून तुम्हाला भेटलेला वसंत पंडित हा माणूस हाच होता का हे सांगू शकता का? (फोटोचा सोर्स: https://www.pinterest.com/pin/639089003341975701/ कॅप्शन Bandaru Dattatreya:
Delighted to meet Shri Vasant Raj Pandit, Secretary, Pt. Deendayal Shodh Sansthan. )