हॅलो वेळ आहे कारे या रवीवारी.
का रे.
अरे आपल्याला एका कामासाठी कोल्हापूरला जायचे आहे. मला तुझी मदत लागेल.
रवीवारी.....बघतो
बघु नकोस मी गाडी काढतोय. आपण बरोबर जातोय हे नक्की. आता हे लक्षात ठेऊन तू पुढचे कार्यक्रम ठरव.
अरे पण काय आहे ते सांग ना
ते नन्तर सांगतो सविस्तर बोलु
तरी पण
फोनपेक्षा सविस्तर भेटून सांगु.....
बरेच दिवसानन्तर लोकेश चा अचानक फोन आला आणि कोल्हापूरला का जायचे आहे ते तो सांगायला तयार नव्हता. कसली मदत हवी आहे तेही साम्गत नव्हता. काही विचारले तर तुझा सल्ला हवा आहे एवढेच उत्तर देत होता
जुना मित्र असल्याने भीड मोडवली नाही आणि मी त्याला रवीवारी सोबत येतो म्हणून बसलो. कशात अडकला होता कोण जाणे. आपले काय सल्ला तर द्यायचा आहे एखादा दिवस मित्राच्या नावाने.
शनिवारी संध्याकाळी त्याचा पुन्हा फोन्.....अरे लक्षात आहे ना उद्या जायचे. गाडी सांगितली आहे.
गाडी कशाला सांगितली. मी काढले असती ना.
जाउ दे रे नेक्ष्ट टाईम तू. उद्या सकाळी ६ वाजता येतो तयार रहा
६ वाजता इतक्या पहाटे?
अरे कोल्हापूरला दहा च्या अगोदर पोहोचायचे आहे आपली अपॉइन्टमेन्ट १० ची आहे.
कसली अपॉइन्टमेन्ट?
ते गाडीत सांगतो.तू सकाळी तयार रहा
ओक्के डन
सकाळी ५:३० लाच लोकेश हजर झाला. आमचा दोघांचा चहा झाला.
आपण किती पर्यन्त परत येऊ रे.
संध्याकाळपर्यन्त येऊच रात्रीच्या जेवणाला घरी.
चल.......
आम्ही गाडीत बसलो
लोकेशच गाडी चालवत होता एका मित्राची गाडी त्याने आणली होती
काय रे कसला सल्ल हवाय तुला. कसल्या भानगडीत अडकला आहेस? बाई पैसे इतर काही
खरेतर लोकेश हा अगदी साधा सरळ सज्जन असल्या भानगडीत अडकणे सोडा तो असली चर्चा सुद्धा कधी करायचा नाही
भानगड नाहीरे
मग?
मी एक व्ययसाय सुरु करतोय.
व्यवसाय म्हणजे? तुझे आहे ते दुकान चांगले चाल्लेय की.
तसे नाही रे.
मग?
तू फार प्रश्न विचारतोस.
तू म्हणतोस की सल्ला हवाय आणि मला प्रश्न ही विचारु देत नाहीस. कसा सल्ला देउ मी.
ते नाही रे.
आपन तिकडे गेल्यावर बोलु.पठ्ठ्या काही बोलायलाच तयार नव्हता.
त्याच्या कडून काही माहिती मिळत नव्हती म्हणून मी ही आलीया भोगासी असावे सादरम्हणत ग्प्प बसलो
सांगता ही येत नाही आणि सहनही होत नाही असल्यापैकी काही नाही ना?
हा हा हा ......तसले प्रकार मला या जन्मी जमणार नाहीत. तुला माहीतच आहे ते.
हो रे मी असेच म्हणालो. आणि हे असले काही असले तर तू मला भेटण्यापेक्षा सरळ टाळलेच असतेस.
हो .
पण मग अचानक कोल्हापूर.
अरे हो बरेच दिवसात देवीला गेलो नव्हतो. आणि तुलाही निवान्त भेटलो नव्हतो. म्हणून म्हणालो की दोन्ही एकदमच करुयात.
वा हे बरे आहे रे तुझे. मला आज मेहुण्याला स्टेशनवर घ्यायला जायचे होते.
तो तुला तसाही घरी गेल्यावर भेटेलच की.
ते खरे रे पण .........
वहिनींची मी समजूत मी काढेन.
लोकेश माझीच समजूत काढत होता.
बोलताबोलता कराड मागे पडले. मलकापूर आले तसे लोकेश अस्वस्थ दिसू लागला.
लोकेश खरे सांग तू अस्वस्थ दिसतोस. काही जमिनीची भानगड? मागे तुझ्या चुलत्याने केले होते तसे काही?
नाही रे आपण दहाच्या अगोदर पोहोचायला हवे.
आत्ताशी कुठे साडे सात होताहेत . कितीही गर्दी असली तरी नऊ पर्यन्त सहज पोहोचु की. कशाला अस्वस्थ होतोस. काहीतरी वेगळे कारण आहे मी तुला आज ओळखत नाही.
विजय मला श्रीमन्त व्हायचे आहे.............................. बोलावे की न बोलावे या विचारार बराच वेळ गप्प राहून लोकेश बोलला.
स्वतःशीच बोलत असावा त्याप्रमाणे. तो बोलत राहीला.
बघ ना मी इतकी वर्षे दुकानात राबराब राबतो. काय मिळतं मला.
थोडे फार पैसे हातात असतात गरजेपुरते एवढेच. एखादा बॅन्केतला नोकरदार असतो सरकारी किंवा कारखान्यात नोकरीअसती तर रीटायरमेन्ट्च्या दिवशी थोडीथोडकी का होईना शिल्लक असती. माझ्या कडे काय असणार आहे ? दुकानासाठी काढलेल्या सी सी चे कर्ज!
आणि ते मी मुलांच्या डोक्यावर टाकायचे. त्याचेही आयुष्य माझ्यासारखेच बान्धून टाकायचे .
लोकेश अगदी मनातून बोलत होता. तोच काय त्याच्या सारख्या असंख्य छोट्या दुकानदाराची व्यथाच त्याने मांडली होती. वस्तुस्थिती खरी होती.
धन्दा अगदी ओसंडून वाहीला तर महिनाकाठी आठदहा हजार निव्वळ प्राप्ती . लोकेश ची ही परीस्थिती मला माहीत होती. जास्त प्राप्ती हवी जास्त भांडवल गुंतवा. जास्त भांडवल गुंतवले की विक्री जास्त करा. त्यासाठी विक्री व्यवस्थापनावर जास्त खर्च करा. माल उधार द्या. तो वसुलीत वेळ घालवा. उधारीत माला विकला की ब्यान्केत सीसी वर व्याज चढायचे तेच सगळा प्रॉफीट खाऊन टाकायचे. व्यापारात ज्या न टाळाण्याजोग्या व्यथा असतात त्या चक्रात लोक्केश पूर्ण अडकला होता.
धन्दा हा एखाद्या चक्रव्यूहाप्रमाणे आहे यात येता येतं बाहेर पडता येत नाही. तुम्हाला एखादा योगेश्वर कृष्ण एखादा पार्थ भांडवल देणारा असेल तर त्यातून सुटका. छोटा काय मोठा काय सगळ्यांचीच वाघावर स्वार झाल्यासारखी गत.
लोकेश बोलत होता हे सगळे आम्ही या पूर्वी एकदा बोललो होतो.
मी यातून बाहेर पडायचे ठरवलय.
मग काय करणार आहेस तू त्या साठी?
तोच सल्ला हवा आहे तुझ्या कडून.
पण मग हे आपण सातारला बोलु शकलो असतो की
नाही रे घरी निवान्तपणा मिळत नाही. कोणी ना कोणी सतत काहितरी डिस्टर्ब करत असते.
पन मग कोल्हापूरात कुठे.
माझे एक मित्र आहेत डेरे म्हणून त्यांच्या ऑफिसात चाललोय.
काय करतात ते?
हे काय येईलच त्यांचे ऑफीस
लोकेश ने माझा प्रश्न टाळला.
गाडी वळून कोल्हापुरात शिरली. व्हीनस कॉर्नर आल्यावर लोकेशने गाडी थांबवली
खिशातून टाय काढून गळ्यात चढवला आणि एकदम वेगळाच हसला.
डेरे साहेब टाय नसेल तर मला भेटणार नाहीत.
चल ती कोपर्यावरची इमारत तेच त्यांचे ऑफीस.
आम्ही एका पॉश इमारतीच्या बाहेर थांबलो....
इमारतीत प्रवेश करताना का कोण जाणे मला एका वेगळ्याच दुनीयेत पाय ठेवतो आहोत असे वाटत होते
(क्रमशः)
प्रतिक्रिया
10 Jul 2009 - 2:56 pm | अवलिया
हम्म... वाचतोय.... येवु द्या पुढचा भाग लवकर.
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
10 Jul 2009 - 3:26 pm | वेताळ
पुढचा भाग लवकर येवु दे विजुभाऊ.....आम्हाला पण श्रीमंत व्हायच आहे.
वेताळ
10 Jul 2009 - 3:30 pm | महेश हतोळकर
येऊद्या!
---------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
---------------------------------------------------
10 Jul 2009 - 3:38 pm | सहज
वाचतोय. सुरवात छान आहे.
विजुभौ किती भाग आहेत व नक्की नियमीत टाकणार का? आता हा प्रश्न प्रत्येक क्रमशः धारकाला विचारला पाहीजे.
10 Jul 2009 - 3:41 pm | श्रावण मोडक
गाद्यांचा उद्योग की काय? वाचतोय.
10 Jul 2009 - 3:46 pm | अश्विनि३३७९
हो हो तोच तो ...
चुंबकीय गादीच ..
10 Jul 2009 - 3:50 pm | योगी९००
असेच माझ्या मित्राने मला जपान लाईफ मध्ये नेऊन एक दिवस बरबाद केला होता. आता तो माझा मित्र राहीला नाही.
येवु द्या पुढचा भाग लवकर...सुरवात मस्त झाली आहे.
खादाडमाऊ
13 Jul 2009 - 11:06 am | विजुभाऊ
धन्यवाद !
जपान लाईफ ने लोकांना काय अन कसे कसे श्रीमन्त केले ते लवकरच लिहितोय.
13 Jul 2009 - 11:22 am | आशिष सुर्वे
उत्कंठा वाढली आहे बर्यापेकी... येऊदेत
-
कोकणी फणस
13 Jul 2009 - 11:29 am | पर्नल नेने मराठे
माझ्या न्ण्देने खुप पैसे कमावले :D
चुचु
14 Jul 2009 - 6:49 am | मदनबाण
जपान लाईफ ने लोकांना काय अन कसे कसे श्रीमन्त केले ते लवकरच लिहितोय.
लवकर लिहा...
या बद्धल बरेच ऐकले आहे, नक्की झोल काय आहे ते मात्र कळले पाहिजे.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
15 Jul 2009 - 2:11 am | धनंजय
कसे श्रीमंत केले ते वाचतो आहे. क्रमशः किती आहेत ते लिहा. :-)
15 Jul 2009 - 3:38 am | पक्या
वा..छान आहे सुरवात.
पुढचाही भाग टाका लवकर.
15 Jul 2009 - 9:43 am | शिशिर
गाद्यांचा उद्योग की काय?
माझ्या माहितीतही बरेच लोक आहेत. पैसे कमावणारे कमी पण गमावणारे अधिक आहेत.
15 Jul 2009 - 9:51 am | विसोबा खेचर
सहमत आहे. त्या जपान लाईफच्या गाद्या म्हणजे लोकांना चुत्त्या बनवायचे धंदे आहेत.
साला, आम्ही गेली कित्येक वर्ष जपान लाईफ गादी तर सोडाच, साध्या गादीवरही न झोपता चक्क जमिनीवर, साध्या सतरंजीवर झोपतो आहोत. ठणठणीत तब्येत आहे आमची!
तात्या.
15 Jul 2009 - 12:43 pm | विनायक प्रभू
असेच बोल्तो.
शाकाहार पाळा
द्व्यर्थी वाक्य टाळा
विप्र्संहिता
15 Jul 2009 - 9:50 am | शैलेन्द्र
"माझ्या न्ण्देने खुप पैसे कमावले"
असे तिने तुम्हांला सांगितले?
यात सरासरी २० पैकी १ पैसे कमवतो.
15 Jul 2009 - 12:28 pm | ज्ञानेश...
"न्ण्देने" म्हणजे काय? :/
"Great Power Comes With Great Responssibilities"