(चेप राजसा..)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Jul 2009 - 5:27 pm

प्राजूची 'थांब राजसा..' ही कविता वाचली आणी काही वेगळेच दृश्य डोळ्यांसमोर तरळून गेले! इर्शाद! ;)

भात सागुती, कांदा संगती
चेप राजसा भिऊ नको..
तर्रि अमृती, रे वाटी रिती
कमी उगा तू जेवू नको..

मांडिस अलगद, दोंद टेकले
गळा जाडशा-वळ्या गुंफिले
घर्मबिंदू अन नयनी गंगा
तोंड माखले , तवंग रंगा

दंग भोजनी उरकू नको..
चेप राजसा भिऊ नको..

चटचट वाजे पुन्हा पाऊल
नवा वाढपी नवीन चाहूल
आर्त भुकेने पोट पुकारे
जिलबी दिसता, लाळ पाझरे

पंचकडी तू सोडू नको..
चेप राजसा भिऊ नको..

ओठी ओल्या, भजी राहु दे
पापडकुर्डी, जरा खाऊ दे
वामदिशेची चटणी चाखू दे
शेवटचाही भात येऊ दे

काही बाकी ठेऊ नको
चेप राजसा भिऊ नको..

चतुरंग

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

21 Jul 2009 - 5:45 pm | कपिल काळे

हे हे हे उद्या ग्रहण आहे. कल्जी घेने. उपास करणे. इतके न चेपणे.

प्राजुची कविता वाचून हे एक चांगले रॉ मटेरिअल आहे हे समजले होतेच.

विडंबन लय भारी, तुडुंब !!

(तुडुंब चेपलेला) कपिल

लिखाळ's picture

21 Jul 2009 - 6:51 pm | लिखाळ

हा हा हा .. एकदम मस्त :)

मांडिस अलगद, दोंद टेकले
गळा जाडशा-वळ्या गुंफिले
घर्मबिंदू अन नयनी गंगा
तोंड माखले , तवंग रंगा

मजा आली.

चटचट वाजे पुन्हा पाऊल
नवा वाढपी नवीन चाहूल

मस्त मस्त :)

आता 'ढोस राजसा' असे दारूसंबंधी विडंबन यायला नको.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

विनायक प्रभू's picture

21 Jul 2009 - 6:54 pm | विनायक प्रभू

राजसा चे विडंबन टाकु का?
नको, लगेच उडेल.

अवलिया's picture

21 Jul 2009 - 6:56 pm | अवलिया

म्हणुनच मी पण नाय टाकले :$

--अवलिया

प्राजु's picture

21 Jul 2009 - 7:21 pm | प्राजु

___/\___

दंडवत!! झ्याक्क जमले आहे.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आशिष सुर्वे's picture

21 Jul 2009 - 8:06 pm | आशिष सुर्वे

झकास!

फेटा उडवून दाद दिली बर्र का राव!!

-
कोकणी फणस

टुकुल's picture

21 Jul 2009 - 9:28 pm | टुकुल

--टुकुल

ऋषिकेश's picture

21 Jul 2009 - 8:53 pm | ऋषिकेश

हा हा हा
मस्त!

ऋषिकेश
------------------
साहेब म्हणतो चेपेन चेपेन.. पोलिस म्हणतो चेपेन चेपेन
कविता झाली कच्चा माल.. राजसही म्हणतो चेपेन चेपेन!! ;)

सुबक ठेंगणी's picture

22 Jul 2009 - 4:19 pm | सुबक ठेंगणी

बेष्ट... :))
एवढ्या सगळ्या मेजवानीवर ऋषिकेशची चारोळीपण आहेच! पोट हसून दुखतंय की तुडुंब जेवून दुखतंय कळायला मार्ग नाही!

तर्री's picture

21 Jul 2009 - 9:56 pm | तर्री

झक्कास विडंबन...

बेसनलाडू's picture

21 Jul 2009 - 10:13 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

21 Jul 2009 - 10:03 pm | श्रावण मोडक

काही बाकी ठेऊ नको
लिही चतुरंगा थांबू नको...
(स्वगत: इतर अनेकांच्या बाबतीत मात्र असं म्हणता येणार नाही. :( )

केशवसुमार's picture

21 Jul 2009 - 10:09 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
मांडिस अलगद, दोंद टेकले
गळा जाडशा-वळ्या गुंफिले
हा हा हा..झकास चित्रमय विडंबन..
(आस्वादक)केशवसुमार
(स्वगतः अरशात पाहिल्यागत वाटलं असं कोण म्हणालं रे)

पाषाणभेद's picture

22 Jul 2009 - 10:31 am | पाषाणभेद

मस्तच आहे.

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड