जपान लाईफ (२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Jul 2009 - 11:19 am

मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488

गाडी वळून कोल्हापुरात शिरली. व्हीनस कॉर्नर आल्यावर लोकेशने गाडी थांबवली
खिशातून टाय काढून गळ्यात चढवला आणि एकदम वेगळाच हसला.
डेरे साहेब टाय नसेल तर मला भेटणार नाहीत.
चल ती कोपर्‍यावरची इमारत तेच त्यांचे ऑफीस.
आम्ही एका पॉश इमारतीच्या बाहेर थांबलो....
इमारतीत प्रवेश करताना का कोण जाणे मला एका वेगळ्याच दुनीयेत पाय ठेवतो आहोत असे वाटत होते

कोल्हापूरच्या वातावरणाशी ती इमारत आतून एकदमच विसंगत वाटत होती .दुसर्‍या मजल्यावर जातान बरोबर अनेक जण टाय लावत होते. काही टाय नीट करत होते. माझ्याकडे टाय नव्हता. मी लोकेश कडे पाहिले
असू देत. तू टाय नाही घातलात तरी चालेल
अरे पण.
पहिल्यांदा येताना मी सुद्धा टाय नव्हता घातला.
दुसर्‍या मजल्यावर आम्ही पोहोचलो. बरेच लोक असूनही तिथे एकदम हॉस्पिटलच्या आय सी यू मध्ये असते तशी शान्तता होती. कोणीच एकमेकांशी बोलत नव्हते. कोणीतरी मला एका हॉल मध्ये जाण्यास सांगितले. लोकेश म्हणाला मी बाहेरच थांबतो.
मी आत गेलो.
समोर भिन्तीवर एक वाक्य मोठ्या ठळक अक्षरात लिहिले होते
"ड्रीम्स इज द मोस्ट पॉवरफूल इनर्जी इन द वर्ल्ड"

त्या वाक्याने नक्की काय परीणाम केला ते कळाले नाही पण आतून काहितरी जबरदस्त हलवले हे नक्की.ते वाक्य वाचून मी विचार करायला लागलो. खरेच स्वप्नांत एवढी ताकद असते?
मग आठवले माझे एक सर म्हणायचे ते वाक्य...अरे माणसाने स्वप्ने पहावीत तरच ती साकार कराविशी वाटतात. माणसाने हवेत उडण्याचे स्वप्न पाहिले नसते तर विमानाचा शोध लागलाच नसता.
खरेच. आपण स्वप्ने पाहिली नसती तर ती साकार करता आलीच नसती.
कोणी हक्कच्याघराची स्वप्ने बघतात. कोणी मुलांच्या शिक्षणाची /लग्नाची स्वप्ने बघतात . कोणी उत्तम नोकरीची स्वप्ने बघतात. आणि ती स्वप्ने साकार व्हावीत म्हणून प्रयत्नशील होतात. आपण त्यालास्वप्ने म्हणतो खरेतर त्या आपल्या गरजा असतात. पण मग स्वप्ने आणि गरजा यात फरक काय असतो ?गरजा जेंव्हा अप्राप्य होतात तेंव्हा त्यांची स्वप्ने होतात?
मग मला आठवले शेजारची सीमा इंजीनीयरींची फी जास्त असते म्हणून तीला प्रवेशमिळूनही शिक्षण घेता आले नव्हते.
सोनालीच्या वडिलाना आजारपणात आवश्यक ट्रीटमेन्ट मिळाली नाही. डोळ्यादेखत त्याना यातनामय मृत्यु आला.
गुढग्याचे ऑपरेशनकरायचे पण पैसे नाहीत म्हणून जनुचे वडील वेदना सहन करत कसेबसे चालात होते.
ट्रीपला जायला पुरेसे पैसे नाहीत म्हणून मीही बरेच दिवस बाहेर जायचे टाळत होतो.
ही सुद्धा तिच्या छोट्यामोठ्या आवडीनिवडी टाळत होती.
मी आणि माझ्या भोवतालचे सगळेच केवळ जवळ पुरेसे पैसे नाहीत म्हस्णून नाईलाजास्तव कसेबसे रडतखडत जगत होतो.
आम्ही जगत असलेल्या जीवन शैलीला उगाचच साधी रहाणी उच्च विचारसरणी असे काहितरी बरळत असतो.
स्वतःच्या इच्छा मारणे याला समाधान म्हणत असतो.................
आपण नक्की जगणे जगत असतो का जगण्याची तयारी करण्यासाठी खपत असतो?
आनन्दात / स्वतःच्याच मस्तीत जगणे असू शकते हे स्वप्नही पहायला आपण नालायक आहोत?
आसपासचे बहुतेक लोक माझ्यासारखेच विचारात गढलेले होते.
त्या मस्त वातानूकुलीत हॉलमध्ये आम्ही पन्नस एक लोक असू. खोलीत अन्धार झाला.
समोर प्रोजेक्टर स्क्रीन प्रकाशीत झाला. त्यावर कोणी एक वसन्त पंडीत नावाचा टाय अकोट घातलेला इसम सफाईदार इंग्रजीत बोलत होता.
हाय आय अ‍ॅम व्हॅसन्ट फॅन्डीट. व्हॉट वि आर गोइन्ग टू सी टुडे इज अ मिरॅखल ऑफ धिस सेन्च्युरी
(क्रमशः)

वावरलेख

प्रतिक्रिया

leo nardo di caprio's picture

17 Jul 2009 - 11:32 am | leo nardo di caprio

"खरेच. आपण स्वप्ने पाहिली नसती तर ती साकार करता आलीच नसती.
कोणी हक्कच्याघराची स्वप्ने बघतात. कोणी मुलांच्या शिक्षणाची /लग्नाची स्वप्ने बघतात . कोणी उत्तम नोकरीची स्वप्ने बघतात. आणि ती स्वप्ने साकार व्हावीत म्हणून प्रयत्नशील होतात. आपण त्यालास्वप्ने म्हणतो खरेतर त्या आपल्या गरजा असतात. पण मग स्वप्ने आणि गरजा यात फरक काय असतो ?गरजा जेंव्हा अप्राप्य होतात तेंव्हा त्यांची स्वप्ने होतात?"
फारच सुंदर लिहीले आहे.
पण, लेखातली आवड्लेली बाब म्हणजे स्वप्न आणि गरजांमधला फरक.
गरजा जेंव्हा अप्राप्य होतात तेंव्हा त्यांची स्वप्ने होतात?"

प्रशु's picture

17 Jul 2009 - 12:02 pm | प्रशु

मी सुद्धा जाऊन आलोय या सेमिनार ला...

अभिज्ञ's picture

17 Jul 2009 - 12:19 pm | अभिज्ञ

विजुभाऊ,
लवकर पुढचे भाग द्या.
एवढे लहानसे भाग चालणार नाहीत.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

ऋषिकेश's picture

17 Jul 2009 - 12:34 pm | ऋषिकेश

हा भाग ठिक.. कथा सरकवा की जरा पुढे

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

कपिल काळे's picture

17 Jul 2009 - 1:01 pm | कपिल काळे

हे एकदम मालिकेच्या एपिसोडसारखं चाललंय. कॅमेरा खाली, वर, उजवीकडे ,डावीकडे, झूम इन, झूम आउट. पण कथानक तिथेच.

ते जरा पुढे सरकवा की राव.
बाकी भाग छान.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jul 2009 - 2:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अय्या, असं झालं का हो विजुभाऊ? अय्या, मग पुढे काय हो होणार? (पुढे काही होणार का असंच दळण सुरू रहाणार?)

अवांतरः ते एका रात्रीत दोन-अडीच किलो वजन कमी करायचं काय झालं?
अतिअवांतर: वजन किलोत नाही मोजत!

नितिन थत्ते's picture

17 Jul 2009 - 1:08 pm | नितिन थत्ते

छान वर्णन शैली. म्हणजे वातावरण एकदम झ्याक उभं केलंय. पण जरा वेग येऊ द्या. म्हणजे एका एपिसोडमध्ये एवढच व्हायचं तर एपिसोड लवकर लवकर हवे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

योगी९००'s picture

17 Jul 2009 - 2:00 pm | योगी९००

विजूभाऊ,

लिवा..लिवा.. असे वाटायला लागलयं की तुम्ही आम्हाला जपानी गादी विकणारच..एकता कपूर स्टाईल चाललयं ..पण उत्सुकता चांगली टिकवली आहे. पण एक लक्षात घ्या की एकता कपूर दिवसाला एक भाग टाकते. तुम्ही आठवडा लावू नका पुढच्या भागासाठी..

खादाडमाऊ

योगी९००'s picture

17 Jul 2009 - 2:00 pm | योगी९००

विजूभाऊ,

लिवा..लिवा.. असे वाटायला लागलयं की तुम्ही आम्हाला जपानी गादी विकणारच..एकता कपूर स्टाईल चाललयं ..पण उत्सुकता चांगली टिकवली आहे. पण एक लक्षात घ्या की एकता कपूर दिवसाला एक भाग टाकते. तुम्ही आठवडा लावू नका पुढच्या भागासाठी..

खादाडमाऊ

योगी९००'s picture

17 Jul 2009 - 2:00 pm | योगी९००

विजूभाऊ,

लिवा..लिवा.. असे वाटायला लागलयं की तुम्ही आम्हाला जपानी गादी विकणारच..एकता कपूर स्टाईल चाललयं ..पण उत्सुकता चांगली टिकवली आहे. पण एक लक्षात घ्या की एकता कपूर दिवसाला एक भाग टाकते. तुम्ही आठवडा लावू नका पुढच्या भागासाठी..

खादाडमाऊ

अभिज्ञ's picture

17 Jul 2009 - 2:58 pm | अभिज्ञ

आयला,
विजुभाउ तुम्ही वातावरण निर्मिती तर लै भारी केलीय.
जपान लाईफ चे मार्केटिंग करताय कि काय?
ते कसे भारी आहे वगैरे सांगुन इथले ५-१० मासे गळाला लावताय कि काय अशी शंका मनाला चाटून गेली हो.

अभिज्ञ.

क्रान्ति's picture

19 Jul 2009 - 7:50 pm | क्रान्ति

समाधान, स्वप्नांचं आणि गरजांचं विश्लेषण खूप आवडलं आणि पटलं.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Jul 2009 - 9:06 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझेही एक नातेवाईक ह्या जपान लाईफच्या नादी लागून एक लाख रूपये मातीत घालून आता केस उपटत बसलेत.
शंका: विजूभाऊंचे डोक्यावरचे केसही त्याच भानगडीत गेले काय?:)