अमृताच्या धारा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
24 Jun 2009 - 6:55 pm

झाली शांत तृप्त धरा
अशा बरसल्या धारा
सांगे गंधाचा निरोप
तुझ्या अंगणीचा वारा

गर्द सावळे आभाळ
राशी रुप्याच्या सांडते
सौदामिनी उजळते
तुझा गगनगाभारा

झेलताना तनूवर
हिरेमोती आनंदाने
लाख डोळ्यांनी फुलतो
मनमोराचा पिसारा

तुझ्या करुणेचा मेघ
माझ्या दारी झरताना
जागेपणी पापण्यांत
स्वप्न येतसे आकारा

माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अनामिक's picture

24 Jun 2009 - 7:12 pm | अनामिक

आहाहा.. सुरेख!

माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा

क्लास!!

-अनामिक

चतुरंग's picture

28 Jun 2009 - 7:00 am | चतुरंग

वा वा अतिशय हृद्य कल्पना तुमच्या कवितातून वरचेवर दिसतात!
जियो!!

(रसिक)चतुरंग

विशाल कुलकर्णी's picture

13 Jul 2009 - 12:08 pm | विशाल कुलकर्णी

सहमत, तृप्त जाहलो ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

मनीषा's picture

25 Jun 2009 - 9:44 am | मनीषा

कविता खूप आवडली ..

सांगे गंधाचा निरोप
तुझ्या अंगणीचा वारा ...

माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा

सुरेखच ..

दत्ता काळे's picture

25 Jun 2009 - 10:00 am | दत्ता काळे

माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा

. . . हे कडवं फार आवडलं.

पाषाणभेद's picture

25 Jun 2009 - 6:26 pm | पाषाणभेद

"माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा"

अवांतरः अहो पण पाऊस काहीच नाही हो.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

श्रावण मोडक's picture

25 Jun 2009 - 10:36 pm | श्रावण मोडक

माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा
उत्तम.

राघव's picture

26 Jun 2009 - 12:00 am | राघव

शेवटचे कडवे क्लास! :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 2:47 pm | विसोबा खेचर

गर्द सावळे आभाळ
राशी रुप्याच्या सांडते
सौदामिनी उजळते
तुझा गगनगाभारा

अप्रतीम कविता...!

आपला,
(फ्यॅन) तात्या.

अवलिया's picture

26 Jun 2009 - 7:12 pm | अवलिया

वा! मस्त कविता !!

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jun 2009 - 7:15 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा वाह !
स्पेशल क्रांतीतै टच.
मनापासुन आवडली कवीता.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चन्द्रशेखर गोखले's picture

27 Jun 2009 - 8:35 am | चन्द्रशेखर गोखले

आपल्या काव्याने पावसात न्हायल्याचा आनंद मिळाला ! शेवटच्या कडव्याने रचनेला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे !! नेहमीप्रमाणेच सुंदर रचना !!

ऋषिकेश's picture

27 Jun 2009 - 3:46 pm | ऋषिकेश

वाह!.. खूप छान कविता! आवडली

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

लवंगी's picture

28 Jun 2009 - 6:21 am | लवंगी

खूप आवडली

नानबा's picture

28 Jun 2009 - 12:27 pm | नानबा

एकदम भन्नाट कविता आहे.... लई आवडली.....

सुवर्णमयी's picture

11 Jul 2009 - 8:20 am | सुवर्णमयी

कविता अतिशय आवडली. कवितेचा शेवटही विशेष आवडला.
सोनाली

मदनबाण's picture

11 Jul 2009 - 1:33 pm | मदनबाण

माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा

क्लासच... :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

प्राजु's picture

11 Jul 2009 - 8:10 pm | प्राजु

ख ल्ला स!!!
दुसरा शब्द नाही.
पावसात मनमुराद भिजल्याचा प्रत्यय आला. :) शब्द रचना अतिशय सुंदर. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पद्मश्री चित्रे's picture

12 Jul 2009 - 7:04 pm | पद्मश्री चित्रे

...माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा

खूप छान.

लिखाळ's picture

13 Jul 2009 - 3:12 pm | लिखाळ

वा !
छान कविता :)
शेवटचे कडवे विशेष !
-- लिखाळ.

पॅपिलॉन's picture

13 Jul 2009 - 3:21 pm | पॅपिलॉन

अतिशय सुंदर कविता.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

दशानन's picture

13 Jul 2009 - 6:40 pm | दशानन

सुंदर !

उत्खनक's picture

22 Apr 2013 - 10:16 pm | उत्खनक

अप्रतीम असे शेवटचे कडवे! :)

यशोधरा's picture

23 Apr 2013 - 11:08 am | यशोधरा

वा! किती सुरेख!

निशिगंध's picture

24 Apr 2013 - 12:00 am | निशिगंध

अप्रतीम !!!

निशिगंध's picture

24 Apr 2013 - 12:01 am | निशिगंध

अप्रतीम !!!

निशिगंध's picture

24 Apr 2013 - 12:02 am | निशिगंध

अप्रतीम !!!