सुप्रिया, एक मध्यम वर्गिय कुटुंबातील एकुलती एक मुलगी. चांगले संस्कार असल्यामुळे लाडाचे दुष्परीणाम हिच्या गुणांवर आदळले नव्हते. स्वभावाने शांत, वर्णाने सावळी पण सुबक. आई घरी लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची आणि वडील एका नामांकीत कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते. त्यांनी सुप्रियाला संस्कार, लाडाबरोबर भरपुर मायाही दिली होती.
सुप्रिया ग्रॅज्युवेट झाली. कॉलेज मध्ये असताना फक्त कॉलेजचे लेक्चर अटेंड करायचे आणि सरळ घरचा रस्ता गाठायचा हेच तिचे कॉलेज विश्व त्यामुळे तिच्या स्वभावानुसार तिच्या मोजक्याच अभ्यासू मैत्रीणी होत्या. कॉलेजच्या ग्रुप मध्ये नसल्याने मुलांशीही केवळ अभ्यासापुरतीच ओळख होती.
सुप्रिया ग्रॅज्युएट झाली आणि तिच्या वडीलांनी तिला त्यांच्याच कंपनीत एक्झीक्युटीव ची नोकरी मिळवून दिली.
सुप्रिया नोकरीला लागताच तिच्यासाठी लग्नासाठीच्या स्थळांची गर्दी वाढू लागली. तिच्या सरळ, शांत स्वभाव ओळखत असल्याने तिच्याच कंपनीतील काही कुटुंबानीही तिला मागणी घातली होती. पण सुप्रियाच्या वडीलांना काही जणांची माहीती होती तर कुणाची वर्तणूक सुप्रियाला आवडत नव्हती म्हणून तिने नकार दिला.
एक दिवस सतिशच स्थळ सुप्रियाला सांगुन आल. सतिश स्वभावाने बोलका, सुस्वभावी, लाघवी होता. दिसायला सुप्रियाला अनुरुप म्हणजे सावळा व सुंदर. सतिशचे आई वडील गावी शेती करत असत. सतिशला शेतीची आवड नव्हती व मुंबईत मामाकडे शिक्षणानिमित्त राहील्याने त्याला मुंबईशी जवळीक निर्माण झाली होती. म्हणुन त्याने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने एक ट्रॅव्हल एजंसी काढली. त्याचा व्यवसायात चांगला जम बसला होता. त्यासाठी तो भरपुर परिश्रमही करत होता. वेळोवेळी त्याला टुरवरही जायला लागत होत. त्याने आता स्वतःचा प्लॅटही घेतला होता. त्यात तो एकटाच राहत असे. फ्लॅट मामाच्या बाजूलाच असल्यामुळे मामी कामवालीच्या सहाय्याने फ्लॅटची देखभाल करत असे. त्याच्या स्वभावामुळे व वेळोवेळी मामा-मामीला मदत करत असल्याने मामा मामी सतिशवर खुष होती.
सतिशच्या लागवी स्वभावाला सुप्रिया आकर्षली व तिने सतिशच्या स्थळाला मान्यता दिली. आई वडीलांची एकुलती एक मुलगी असल्याने सुप्रियाच्या वडीलांनी आत्तापर्यंत जमवलेल्या पुंजीतुन सुप्रियासाठी बरेचसे दागिने व संसार उपयोगी वस्तू घेतल्या. सतिशला सोन्याची अंगठी, चेन घेतली. सुप्रियाच्या वडीलांनी लग्नातही वराकडील सर्व मंडळिंचा मानपान करुन आपल्या मुलीची साश्रु नयनांनी पाठवणी केली.
सुप्रियाची लक्ष्मीची पावले सतिशच्या घरात पडली. सतिशच्या आईवडीलांची सतिशच्या एकटेपणाची काळजी मिटली. त्या दोघांनी व मामा मामिंनी सुप्रिया व सतिशला भावी आयुष्या साठी भरभरुन आशिर्वाद दिले. अशा प्रकारे सुप्रिया व सतिशचे वैवाहीक जीवन चालू झाले.
क्रमश....
प्रतिक्रिया
24 Jun 2009 - 3:10 pm | अश्विनि३३७९
परत क्रमश....
निषेधाला बळी पडाल ..
अश्विनि .... :S
24 Jun 2009 - 3:19 pm | चिरोटा
चांगली वाटतेय. पुढे काय घडणार हे गेस करतोय. बघुया कथेला किती कलाटणी मिळते ते.पुढचा भाग लवकर टाका.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
24 Jun 2009 - 3:26 pm | जागु
माफ करा पण निशेधाचा लेख मी कथा टाकल्यावर वाचला. कधी कधी एकदम टाईप करण शक्य नसत. कारण बॉस टेबलवर काम आदळ्तो मध्येच. मग अशी अर्धवट ठेवावी लागते. इथे प्रकाशीत न करता सेव्ह करण्याची सोय आहे का ?
24 Jun 2009 - 6:04 pm | अनामिक
तुम्ही जे लिहिता ते स्वतःलाच व्यनी करा आणि सगळे लिखाण झाले की एकदम प्रकाशीत करा.
-अनामिक
24 Jun 2009 - 3:36 pm | अवलिया
वा! मस्त !!
सुरेख लेखन !
पटकन येवु द्या पुढचा भाग!
आणि हो, कुणी क्रमशः बद्दल निषेध केला तर मला सांगा.. :)
--अवलिया
24 Jun 2009 - 3:40 pm | ब्रिटिश टिंग्या
वा! मस्त !!
सुरेख लेखन !
पटकन येवु द्या पुढचा भाग!
आणि हो, अवलियाचा निषेध!
24 Jun 2009 - 3:53 pm | सूहास (not verified)
<<लग्नातही वराकडील सर्व मंडळिंचा "मानपान" करुन >>
चुकुन मद्यपान वाचल्या गेल॑...म्हणतात ना .."सावन के अ॑धे को सब जगह हरियाली दिखती है"
<<<सतिशच्या लागवी स्वभावाला सुप्रिया आकर्षली व तिने सतिशच्या स्थळाला मान्यता दिली.>>>
स्त्रि॑याना नेमका कसा पुरुष आवडतो हे कळले तर काय मजा येईल!!!
बाकी सुरुवातीने ऊच्छुकता चाळविली गेली...सगळ काही व्यवस्थित चाललेल असल की कुठे तरी काही तरी चुकतेय अशी श॑का येतेच.....
सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे.
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.
सौजन्य : प्राजुताई
24 Jun 2009 - 10:59 pm | जागु
सुहास तुम्ही माझ्या कवितेला सौजन्य प्राजुताई दिलय.
सगळ्यांचे धन्यवाद. मी लवकरच पुर्ण कथा टाकेन.
24 Jun 2009 - 11:21 pm | टारझन
सुहास तुम्ही माझ्या कवितेला सौजन्य प्राजुताई दिलय.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
मेलो ... पोपट ऑण दि स्पॉट .. काय पण कमाल आहे ह्या सूहास ची !! त्या दिवशीची बियर उतरली नाही का रे बाबा अजुन ?
अवघड आहे ... बाकी लेख छोटे लिहावे ते एवढे छोटे का हो ? कथेतलं शब्दांकन फारंच गुळमिळीत , बहुदा बर्याच मासिकांन ह्याच प्रकारची वाक्य वाचली असावीत म्हणून असेल .. एकंदरीत लेख वाचून समाधानी नाही !!!
- (सुस्पष्ट) टारझन
24 Jun 2009 - 4:38 pm | ऍडीजोशी (not verified)
आरे यार वैताग आला या क्रमश: मुळे.
इतकं २ बोट लिहून टाकायची घाई करण्यापेक्षा थोडं जास्त लिहा यार. नाहीतर कथा पूर्ण झाल्याशिवाय टाकूच नका. मिपा वर अमुक दिवसात अमुक लेख टाकलेच पाहिजे असा काही नियम नसल्याने हे करता येणं शक्य आहे. मोजून ७ परिच्छेद आहेत त्यातला १ तर १ ओळीचा. काय चाललय यार??????????????? बाकीचे पण (एक अपवाद वगळता) २-३ २-३ ओळींचे. डोक्याला शॉट. चूक झाली नी वाचायला आलो.
मिपा वर झालेलं लिखाण प्रकाशीत न करता साठवून ठेवायची सोय आहे. अथव वर्ड फाईल मधे सेव करा. पण दया करा आणि असले २ ओळींचे क्रमश: वाले भाग टाकू नका.
25 Jun 2009 - 12:34 pm | पक्या
जोशी बुवा , शिर्षकातच लिहीले आहे ना भाग १ असे. वाचले नाही वाटते?
जागुताई तुम्ही लिहा , वाचणारे वाचतायेत. (आत्तापर्यंत ३८६ वाचने झाली आहेत.)
24 Jun 2009 - 6:21 pm | यशोधरा
एड्या, उगीच वैतागू नकोस, शांत रहा :)
जागू, लिही गं तू.. छान लिहिते आहेस.
25 Jun 2009 - 11:37 am | ऍडीजोशी (not verified)
बरं
अवांतर - बरं न म्हणून सांगतोय कुणाला, बँगलोर मधे रहायचंय मला :)
25 Jun 2009 - 12:12 am | रेवती
जागु, आम्ही वाचतोय.
तुला जमेल तसच लिहि गं!
रेवती