गेल्या आठवड्यात माझ्या मुलाचा summer job चा पहिला दिवस होता. इथे १४ वर्ष पूर्ण झाली कि मुलं part-time job करू शकतात. बरीच मुलं १०-११ वर्षापासून छोटी-मोठी कामं करून कमाई करु लागतात. मुलाला पहील्या दिवशी कामावर सोडुन येताना मला त्याने कमाईसाठी केलेल्या उचापती आठवत होत्या.
तो नुकताच सहावीत गेला होता. एक दिवस शाळेतून आला तो ५० सेंट खुळखुळवत. "mom मी मोनिकाला ५० सेंटला चित्र विकलं. मला अजुन ४ चित्र करायचेत." हे ऐकून मी उडालेच. मग ले़काने खुलासा केला. मोनिकाने तिच्या boyfriend ला देण्यासाठी corvette च चित्र काढून घेतलं होतं. ते पाहून तिच्या सख्यांनीही आपापल्या BF च्या आवडीच्या गाड्या खरेदी केल्या होत्या. टेबलावर पडलेल्या ५० सेंटमध्ये १५-२० तर पेनीच होते. अक्षरशा पै पै गोळा केली होती पोरीने. मला preschool मधली मोनिका आठवली. त्यानंतर ८-१० दिवस चिरंजिव गाड्या विकत होते.
लवकरच गाडीचे खुळ कमी झाले. लेक आता middleschool मधे चांगला रुळला होता. त्याच्या math च्या वर्गात एक cubicle होते. त्यात बसण्यासाठी मुलं रोज भांडत. ह्याने सरळ teacher ला विचारले "how about renting it for 25 cents? you keep 20 cents and I will keep 5 as your agent. you can buy stuff for class room." teacher तयार झाली आणि cubicle चे booking जोरात सुरु झाले. सुदैवाने १५ दिवसांनी custodian ते cubicle घेऊन गेले व धंदा बंद झाला. त्याच्या उचापती पाहता त्याच्या गुणांना वळण लागावे म्हणून त्याला Y-Press ला पाठवायचे ठरले. सर्व सोपस्कार पूर्ण करुन तो Y-Press मधे reporter म्हणून जावू लागला.
महिना जरा शांत गेला आणि परत लेकाने नवा धंदा काढला. यावेळेला अजुन एक मुलगा partner होता. mech. pencil ची शिशाची छोटी पेटी आणुन शाळेत हे दोघे शिसे विकू लागले. २-३ महिन्यांनी भांडाभांडी होउन हा धंदा बंद झाला. आता Y-Press चे काम वाढले होते. तसेच सायन्स च्या क्रेडीटसाठी science fair project करावा लागणार होता. उरलेल्या वर्ष कसलाही धंदा न करता पार पडले.
सातवीचे वर्ष सुरू झाले आणि इथे निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. Y-Press मुळे मुलाची जाण वाढली होती त्यात ओबामांची उमेदवारी. चिरंजिव आता अमेरिकन लोकशाहीचे धडे गिरवू लागले. हिवाळ्यात snow ऐवजी ice च जास्त पडल्याने त्याला snow काढायचेही काम मिळाले नाही. शाळेला सुट्टी लागेपर्यंत इथली economy बिकट झाली होती. त्याचे वरच्या वर्गातले मित्र summer job साठी धडपडत होते. ती सुट्टी काही कमाई न होता गेली. नाही म्हणायला त्याला शाळा सुरु झाल्यावर Democratic National Convention साठी Y-Press मुळे Denver ला जायला मिळाले. तिथून आल्यावर मात्र त्याने काम शोधायला सुरुवात केली.
क्रमश:
प्रतिक्रिया
23 Jun 2009 - 1:11 am | मनिष
तुमचा लेक मोठा बिझनेसमन/उद्योजक होणार, लिहून घ्या! :)
23 Jun 2009 - 7:55 am | क्रान्ति
१००% सहमत! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात! भावी उद्योजकाला हार्दिक शुभेच्छा.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
23 Jun 2009 - 11:21 pm | संदीप चित्रे
शिकताना कमवा हे जरी विद्यार्थ्यांचे सूत्र असले तरी तुझ्या मुलाकडे 'एन्टरप्रायजिंग डोकं' आहे हे नक्की ... क्युबिकल रेन्ट करण्याची आयडिया झकास :)
त्या खूप शुभेच्छा !
23 Jun 2009 - 11:31 pm | चतुरंग
लेक भारी आहे. पैशाचं महत्त्व त्यानं फारच लवकर ओळखलं आहेन असं दिसतं. त्याला शुभेच्छा! :)
(लाला)चतुरंग
23 Jun 2009 - 3:23 am | शाहरुख
रिचर्ड ब्रॅन्सनच्या "हाऊ आय लॉस्ट व्हर्जिनिटी" या आत्मचरित्राची आठवण झाली.
त्याला जे हवे ते करू द्यावे फक्त (लहान असल्याने) त्याच्या पॅसे खर्च करण्यावर लक्ष ठेवावे असे वाटते.
23 Jun 2009 - 7:55 am | सहज
लेख भारी व लेक देखील :-)
पुढीला भाग वाचण्यास उत्सुक.
अनेकोत्तम शुभेच्छा!
23 Jun 2009 - 1:04 pm | विनायक प्रभू
स्वाती तै
मस्त लेख
23 Jun 2009 - 6:16 pm | स्वाती२
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. प्रभू सरांनी सुचवले म्हणुन लेख लिहायचे धाडस केले. माझ्या मुलासारखी इथे सर्वच मुलं धडपडत असतात. माझा मुलगा काही विशेष करत नाहिये. This is a way of life here. साधे लिंबू सरबत विकण्यापासुन ते county fair साठी वळू वाढवण्यापर्यंत अनेक प्रकारचे उद्योग ही मुलं करत असतात. जोडीला bake sale, car wash वगैरे करुन दूर कुठल्यातरी गरीब देशातील मुलांसाठी पुस्तकं, रंगित खडू , खेळणी पाठवतात. baseball सारखेच हे ही अमेरिकन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. This is a part of growing up.
23 Jun 2009 - 7:59 pm | अभिरत भिरभि-या
आम्ही आमच्या लहानपणी फक्त व्यापार "खेळलो". त्यामुळे व्यापार "करणार्यांचे" कौतुक वाटते.
फुडचा भाग वाईच म्होटा टाका की :)
24 Jun 2009 - 11:38 am | पक्या
स्वाती ताई , सुंदर लेख. पुढच्या भागाची वाट पहातोय.
अवांतरः माझ्या बघण्यात आलेल्या एक दोन ८ वी तल्या मुली समर जॉब म्हणून बेबी सिटिंग चे काम करीत होत्या.