Summer Job - last part
CORE 40 च्या तारखा जाहिर झाल्या. मुलं आभ्यासाला लागली. बरेच जण माझ्या मुलाकडे अभ्यासात मदत मागू लागले पण कोणी tutor म्हणून काम देत नव्हते. पालकांना परवडणारच नव्हते. त्यातच त्याच्या Y-Press च्या project ला NBC च्या लोकांकडून नकार आला. पण दोनच दिवसात टिम पुन्हा जोमाने नवे नेटवर्क शोधू लागली. त्या गोंधळात job hunting ला जरा विश्रांती मिळाली. त्याच्यासाठी ही विश्रांती आवश्यक होती.
मे च्या सुरुवातीला ESPN चा होकार आला. त्यातच Y-press च पत्रक आलं. IPS school 15 बरोबर प्रोजेक्ट होता. त्यात summer employment opportunity होती. पण या वेळेला हा काही उत्साहाने अर्ज करायला धावला नाही. दोन दिवस वाट पाहून मी परत विषय काढला.
"I don't know mom, those are IPS kids" चिरंजीव गुर्मीत उत्त्तरले.
"म्हणजे?" मी विचारलं.
"hello, inner city"
तो 'inner city' अशा काही टोनमधे बोलला की बस्स. आता माझा संयम संपला होता. "They are just kids. Don't label them. I thought you knew better."
माझा आवाज चढलेला बघून तो जरा वरमला. त्याने सारवासारव सुरु केली. "mom, those kids are tough."
"tough नसतील तर त्यांचा निभाव लागेल का? पण या प्रोजेक्ट मधे भाग घेणार आहेत म्हणजे त्यांना शिकायचय. तुला त्यांना शिकवायला जमणार नसेल तर तसं सांग. पण नेहमीचं stereotype नको."
दोन दिवस तसेच गेले. शनीवारी तो सांगत आला. "mom, this one girl on my team, she is applying." मी काहीच बोलले नाही.
"पण ती मोठी आहे. ती एकटी बसने जाते माहितेय" २५-३० स्पीड लिमिट असलेल्या गावातील मुलाच्या द्रुष्टीने ईंडियानापोलीसमधे एकटी बसने फिरणारी मुलगी धैर्याची परिसीमा होती. "and pay is not that great, but they will give lunch and snack" त्याची बडबड चालू होती.
"mom, मला जमेल?" त्याच्या प्रश्नाला पटकन 'हो. नक्की जमेल' म्हणायचा मोह झाला. पण आज हे उत्तर चालणार नव्हतं.
"try केल्याशिवाय कसं कळेल? आणि काही चुकलं तर इतर असतील ना ते करतील मदत. चुकत चुकत शिकशील."
माझं उत्तराने त्याच समाधान झालं असावं. अर्धा तास टि. व्ही. बघायची परवानगी मिळवून स्वारी हलली.
चार दिवसांनी त्याने अर्ज केला. एक जागा शिल्लक होती. ती याला मिळाली. १० दिवसाचे काम होते.
परीक्षा पार पडली. दोन दिवसांनी रिझल्ट लागला. हायस्कूलची २ क्रेडीत पदरात पडली होती. शाळा संपताच प्रोजेक्टची तयारी सुरू झाली. बघता बघता कामाचा पहीला दिवस उजाडला. देवाला नमस्कार करुन लेक निघाला. त्याला सोडून येताना इतपर्यंतचा प्रवास आठवत होता.
संध्याकाळी त्याला आणायला गेले. "mom, I am glad I took this job." खांद्यावरच ओझं उतरलं होतं.
आता त्याचं रुटिन सुरु झालं. रोज संध्याकाळी ती वस्ती, मुलं या बद्द्ल भरभरून बोलत होता. त्याच्या वाट्याला आलेल्या ३ मुलांचा उल्लेख आता "my kids" असा होऊ लागला. त्यांच्या छोट्या मोठ्या धडपडीचं कौतुक होऊ लागलं. त्यांची स्वप्न, त्यांच्या अडचणि तीही त्याला सांगू लागली. "most of the people living there are honest, hard working people like us" असं आता तोच आम्हाला सांगू लागला. त्याच्यातला हा बदल सुखावणारा होता. या सुखाची परिसीमा मात्र काल अनपेक्षितपणे झाली.
संध्याकाळी त्याला नेहमी प्रमाणे pickup केले.
"mom, it's nice that I am getting paid but it would have been better if this was a volunteer position" मागच्या सीट वरुन शब्द आले. माझा कानावर विश्वास बसत नव्हता. गाडीतलं पोर आपलच आहे ना म्हणून मी मागे वळून पाहीलं. तो आपल्याच तंद्रीत होता. "helping Izack reach his potential is the right thing to do, and I shouldn't be getting paid for doing the right thing."
बस्स! मला आता economy कुठे जाईल याची काळजी नव्हती. या सुट्टीत माझ्या लेकाने केलेली कमाई त्याला आयुष्यभर पुरणार होती.
प्रतिक्रिया
26 Jun 2009 - 2:01 am | चतुरंग
जगाच्या शाळेत तुमच्या मुलाला खर्या शिक्षणाचे बाळकडू मिळाले!
ज्योतीने ज्योती लावायचा मोबदला कसला घ्यायचा!
तुमचा मुलगा मोठा होणार, खर्या अर्थाने मोठा, हे नक्की!
हॅट्स ऑफ!!
(इनरसिटीकिड)चतुरंग
26 Jun 2009 - 2:10 am | प्राजु
सुंदर!!
अभिनंदन!!! तुमचे आणि तुमच्या लेकाचेही!!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jun 2009 - 3:05 am | भाग्यश्री
वॉव.. कसलं समजुतदार आणि शहाणं बाळ आहे तुमचे!!
माझा काही संबंध नसताना नुसतं वाचून जीव भरून आला.. तुमची काय हालत झाली असेल?
सहीच!
आवडली ही लेखमाला!
http://www.bhagyashree.co.cc/
26 Jun 2009 - 4:11 am | सखी
मला आता economy कुठे जाईल याची काळजी नव्हती. या सुट्टीत माझ्या लेकाने केलेली कमाई त्याला आयुष्यभर पुरणार होती.
हे पटले आणि आवडले.
26 Jun 2009 - 4:38 am | सहज
तुमच्या मुलाला अनेकोत्तम शुभेच्छा.
26 Jun 2009 - 7:32 am | रेवती
सगळे भाग छान, प्रामाणिकपणे मांडले आहेत.
आपला मुलगा एक चांगला माणूस आहे, हे संस्कार आत कुठेतरी त्याच्या लहानपणी आपणच रुजवले असतील्.......समर जॉबच्या निमित्ताने ते व्यवहारी जगातही कधी कुठे चालू शकतात हे त्याला समजले. इकॉनॉमी काय दर काही वर्षांनी खाली वर होणार पण अनुभवातून आलेलं शहाणपण कायमसाठी असतं.
आपल्या पेशंसबद्दल दाद द्यावीशी वाटते.
मुलाला शुभेच्छा!
रेवती
26 Jun 2009 - 7:59 am | क्रान्ति
यालाच मुलं मोठी होणं म्हणायला हवं! माय-लेक दोघांचही अभिनंदन! =D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
26 Jun 2009 - 8:31 am | विंजिनेर
उत्तम संस्कार हीच जगाच्या पाठीवर खरी शिदोरी ठरते...
पैसा काय कसाही मिळतो...
छोटेखानी लेखमाला आवडली.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
26 Jun 2009 - 10:35 am | मनिष
सहमत! :)
मस्त वाटले हे वाचून....
26 Jun 2009 - 11:13 am | दिपाली पाटिल
अगदी खरं. खुप च छान वाटलं.
दिपाली :)
26 Jun 2009 - 2:01 pm | यशोधरा
अभिनंदन! तुमचे आणि लेकाचेही. ह्या अशा जाणीवा त्याला आयुष्यभर योग्य मार्ग निवडायचे बळ देतील हे नक्की.
26 Jun 2009 - 2:10 pm | विसोबा खेचर
वा! छानच..
अवांतर : तुम्ही दोघं मायलेकरं नेहमी एकमेकांशी विंग्रजीतच बोलता का हो?
तात्या.
26 Jun 2009 - 7:00 pm | स्वाती२
सर्व मिमाकरांचे आभार.
प्रभू सरांचे विशेष आभार. शाळेत मराठीच्या पेपरात निबंध option ला टाकणारी मी. मला लिहीते केलेत.
26 Jun 2009 - 7:02 pm | स्वाती२
तात्या, तुमचे मिसळ्पाव आणि ते मायबोली सोडले तर ६-६ महिने मराठीशी संबंध नसतो. मुलगा दिवसाचे ९-१० तास अमेरीकन लोकांत. त्यामुळे आईबाप मराठीत पोर अर्ध मराठी, अर्ध इंग्रजीत असं बोलणं चालत. आईबापच गोंधळलेले त्यामुळे मुलेही. पण मन मात्र मराठी आहे. बाहेर ६ इंच स्नो पडला की लेक मिसळीची फर्माईश करतो. घरी आलेल्या मित्राला महाराजांचे चित्र दाखवत "this is our Shivaji Maharaj. You won't find anybody like him in the history" असं अभिमानाने सांगतो. आर्याच्या गाण्याला दाद दिली जाते. कट्यारची गाणी सुरु असली की algebra चे problem पटपट सुटतात असा दावा होतो. मात्र अजारी पडला की गुरगुट्या भाता ऐवजी मॅश पोटॅटो लागतो. इथल्या सर्वच मुलांची थोड्या फार फरकाने अशी परिस्थीती आहे.
26 Jun 2009 - 7:10 pm | चतुरंग
पण मनाला लावून घेऊ नका. आम्हाला सवय झाली आहे!
अहो भाषेचं काय, जिथे वाढणार तिथलीच भाषा मुलं बोलणार त्यात वावगं काही नाही! संस्कारांशी नाळ जुळणं महत्त्वाचं. मायभूमीपासून दूर असताना काय काय ओढाताण असते ते ज्याचंत्यालाच माहीत? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!!
(खुद के साथ बातां : पुण्या-मुंबईत राहून अर्ध मराठी अर्ध इंग्लिश बोललं तर चालतं का रे रंगा?)
(सज्जड)चतुरंग
28 Jun 2009 - 6:04 pm | विंजिनेर
अहो हे वाक्य परदेशात राहून लिहिणे मिपावर जरा जपूनच.
नाहीतर "स्वदेश श्रेष्ठ की परदेश? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या" लगेच सुरू होईल इथे.
"ज्वलनशील पदार्थांना बंदी आहे" ;)
(धेडगुजरी भाषांतरकार) विंजिनेर.
26 Jun 2009 - 10:20 pm | स्वाती२
तात्यांचे बोलणे त्यांच्या परीने बरोबरच आहे. राग कसला? मी इथे आले तेव्हा इथली मुलं ' I want modak, varan bhat and that crunchy thing(पापड)' असे बोलताना ऐकून ऐटीत म्हणाले होते ' आपल्याबाबतीत नाही असं होऊ देणार' . साऊथ डाकोटात दिवस काढलेला नवरा फक्त हसला होता.
27 Jun 2009 - 12:06 am | अनामिक
तुमचा लेख खूप आवडला. मुलावर योग्य ते संस्कार करण्यात तुम्ही यशस्वी झालात.... तुमचे अभिनंदन आणि तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्याकरता शुभेच्छा!
-अनामिक
28 Jun 2009 - 5:46 pm | मृदुला
लेखमाला अत्यंत आवडली. मुलाचे आणि तुम्हा आईबाबांचेही खूप कौतुक वाटले. विशेष याचे की हे सारे नेहमीचे (रूटीन) म्हणून चालले आहे. आपण काही मोठे करतो आहोत असा सूर कुठेच नाही.
29 Jun 2009 - 1:52 am | लवंगी
खूप कौतूक वाटल
29 Jun 2009 - 9:40 pm | ऋषिकेश
वा! वाचून छान वाटले.. तुम्ही स्वतःच्याबाहेर-पलिकडे-समाजाकडे बघायला शिकवु शकतात त्यातच सारं यश आलं
अभिनंदन! आणि हे सगळं शेअर केल्याबद्दल आभार
ऋषिकेश
------------------
29 Jun 2009 - 10:10 pm | लिखाळ
वा ! फारच छान .. मुलाचे खरेच कौतुक वाटले. लेखमाला छान आहे.
खरेतर रोमन लिपीमध्ये लिहिलेले नाव, इंग्रजी शब्दांची आणि वाक्यांची भरमार पाहून पहिल्या भागानंतर वाचावे असे वाटले नव्हते. पण तरी छोटेखानी आणि ओघवते लेखन असल्याने वाचत राहिलो. वातावरण नीर्मितीसाठी इंग्रजी संवाद जसेच्या तसे लिहिले असावेत पण ते अनुवादित करुन इंग्रजीचा बाज राखला तरी दर्जा आणि वातावरण अबाधित राहू शकते असे मला वाटते. अनेकानेक अनुवादित पुस्तके अशीच असतात.
पहिले दोन भाग तर अमेरिकेत राहिलेल्या लोकांसाठीच आहेत की काय अशी शंका यावी इतक्या स्थानिक तपशीलांनी आणि संकल्पनांनी भरले आहेत. पण शेवटच्या भागातला शेवटचा परिच्छेद वाचला आणि लेखमाला वाचल्याचे खरेच बरे वाटले.
तुमच्या प्रतिसादात तुम्ही लिहिले आहेच की तुम्ही नुकत्याच लिहित्या झाल्या आहात. तुम्हाला पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा !
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)