खेड्यातला आणि शहरी मुलगा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
21 May 2009 - 6:07 pm

खेड्यातला आणि शहरी मुलगा

असशील बघत टिव्ही जरी तू
विटीदांडू कधी खेळलास काय? खेळलास काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खॉत असशील ऑईस्क्रीम तू
बांधॉवरची बोरं तू खॉल्लीस कॉय? खॉल्लीस कॉय?

नाय बॉ नाय नाय बॉ नाय

खेळत असशील बुध्दिबळ तू
कब्बड्डी कधी खेळलास काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

येत असशील कराटे तूला तरी
कुस्ती माझ्याशी खेळतोस काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

असशील स्विमींग करत जरी
नदीच्या डोहात डुंबला काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खातो आंबे मंडईतले जरी
चोरून जांभळे पाडली काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

पितोस दुध पिशवीतले
त्याला ताज्या दुधाची चव काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

दिमाख दाखवतोस शहराचा मोठा
खेड्यात एकदा राहतोस काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

- पाषाणभेद

कविताबालगीतआस्वाद

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

21 May 2009 - 6:14 pm | क्रान्ति

सही!
:H
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

अवलिया's picture

21 May 2009 - 6:15 pm | अवलिया

मस्तच रे :)

--अवलिया

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 6:38 pm | नितिन थत्ते

मस्तच.

खराटा
(रंग माझा वेगळा)

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 8:39 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!!!

बिपिन कार्यकर्ते

बाकरवडी's picture

21 May 2009 - 6:40 pm | बाकरवडी

जबराट ! मस्तच ओ!

:B :B :B बाकरवडी :B :B :B

परिकथेतील राजकुमार's picture

21 May 2009 - 6:44 pm | परिकथेतील राजकुमार

हाण तिच्यायला !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चिरोटा's picture

21 May 2009 - 7:11 pm | चिरोटा

आहे.आवडली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2009 - 8:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडली तुलना. ही घ्या आमची पावती!

जृंभणश्वान's picture

21 May 2009 - 8:30 pm | जृंभणश्वान

मस्त आहे कविता. आवडली

प्राजु's picture

21 May 2009 - 8:41 pm | प्राजु

कविता आवडली!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

21 May 2009 - 10:58 pm | लिखाळ

वा !
कविता छान आहे.. आवडली.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

भडकमकर मास्तर's picture

21 May 2009 - 11:50 pm | भडकमकर मास्तर

पाषाणभेदा,
कवितेचा फॉर्म आवडला..
कन्टेन्टशी अजिबात सहमत नाही...
शहरात राहूनही मी सर्व गोष्टी केल्या...( विटीदांडू, कबड्डी, कुस्ती, बोरे,नदी, जांभळे इ.इ.)... शहरात पुष्कळ त्रास असला तरी खेड्यात त्यापेक्षा जास्त त्रास आहेत...
हे सारे सुट्टीला चार दिवस राहून एन्जॉय करायला ठीक... ;)

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

सहज's picture

22 May 2009 - 7:12 am | सहज

हेच म्हणतो.

चन्द्रशेखर गोखले's picture

22 May 2009 - 7:08 am | चन्द्रशेखर गोखले

शहरातील आणि खेड्यातील जीवनपद्धतीची तूलना आवडली . सहज सुंदर काव्य मनाला भिडलं !!

मराठी_माणूस's picture

22 May 2009 - 8:38 am | मराठी_माणूस

मस्त

सँडी's picture

22 May 2009 - 8:51 am | सँडी

एकदम मस्त!
असं जीवन अनुभवायला हवं एकदा.

मदनबाण's picture

22 May 2009 - 8:58 am | मदनबाण

असशील स्विमींग करत जरी
नदीच्या डोहात डुंबला काय?
पाषाणराव आपली कविता तर आवडलीच पण या ओळी फार आवडल्या... :)

(नदीत मनसोक्त डुंबणारा)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

दशानन's picture

22 May 2009 - 9:12 am | दशानन
मराठमोळा's picture

22 May 2009 - 9:28 am | मराठमोळा

मस्तच रे :)
येऊ द्या अजुन.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

दिपक's picture

22 May 2009 - 9:32 am | दिपक

छान कविता ! आवडली

जयवी's picture

22 May 2009 - 2:54 pm | जयवी

सुरेखच :)

जागु's picture

22 May 2009 - 3:02 pm | जागु

लय भारी. =D>