गेल्या आठवड्यात धावता नांदेड दौरा होता. अगदी थोडा वेळ काढूनही शहरा नजीकच्या प्राचीन मार्कंडेय शिव व ऋषी मंदिराला भेट दिली. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्त्याचे अर्धवट काम सुरू असल्याने प्रत्येक ठेचीला सोबतींच्या शिव्या खात गोदावरी किनारच्या या मंदिरात पोहोचलो. परिसर आणि बाह्य भागाचे सुशोभिकरण सुरू असल्याने प्रथमदर्शनी निराश होत मंदिरात प्रवेश केला. शिव मंदिराची संपूर्ण वास्तूचे दगड क्रमवार उतरवून ठेवले आहेत. होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर देखील अश्याच पद्धतीने पूर्णत नव्याने रचले आहे.
सध्याच्या वास्तूत कोणतेही कलाकुसर नसलेला मुख्य मंडप व गर्भगृह अद्यापि शाबुत आहे. मुख्य मंडपाला तिन्ही बाजूने प्रवेशद्वार आहेत. चार दगडी स्तंभ असून शिखर मात्र आढळत नाही. परिसरात अनेक शिल्प विखुरलेले आहे. भोकर, नांदेड येथील यादवकालीन शिवमंदिर नुकतेच उद्ध्वस्त केलं गेले. त्या पार्श्वभूमीवर मार्कंड येथील या मंदिराची पुनरुज्जीवन सुरू आहे याचा थोडासा दिलासा. . सोबत नांदेड जिल्ह्यातील अजून काही प्राचीन मंदिराची यादी व लोकेशन शेअर करत आहे. आपल्या माहितीनुसार या यादीत भर टाकावी.
१ नृसिंह मंदिर - राहेर ता. नायगाव बाजार
(इ.स. 1200 ते 1300) १३ शतकातील यादवकालीन दगडी शिल्पकला असलेले नृसिंह मंदिर गोदावरी नदीकाठापासून ४ कि.मी. अंतरावर आहे़. गावाच्या पुनर्वसनामुळे हे मंदिर एकाकी पडले आहे़.
https://maps.app.goo.gl/LrXDBzosmtYbWYze9
२. दाशरथेश्वर- मुखेड
नृत्य करणार्या सप्तमातृका, अलक्ष्मी शिल्प, श्रावणाला दशरथाचा बाण लागुन तो मरण पावल्याने पापक्षालनार्थ राजा दशरथाने या ठिकाणी यज्ञ केला व शिवलिंग स्थापण केले. म्हणुन याचे नाव दशरथेश्वर असे पडले.
https://maps.app.goo.gl/sHpdSfKpjYQauioS8
३. हेमाडपंथी महादेव मंदिर, - बाराहाळी, ता. मुखेड
https://maps.app.goo.gl/H8HFMjoo7uxMC3N39
४. महादेव मंदिर- येवती ता. धर्माबाद
XR83+FQG, Yeoti, Maharashtra 431808
५. सिध्देश्वर मंदिर- होट्टल, देगलूर (इ.स. 1000 ते इ.स. 1100) होट्टल गावात चालुक्यांनी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराला चालुक्य राजा विक्रमादित्य याने इसवीसन ११०१ मध्ये त्याच्या २६ व्या राज्यारोहण दिनानिमित्त दान दान दिल्याचा शिलालेख मंदिरात आहे. नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती बाह्यभिंतीवर पाहायला मिळते. या गणेशाच्या बाजूला एक दगडी घट बसवलेला आहे. त्यात पाणी ओतले असता ते थेट गर्भगृहातील पिंडीवर पडेल अशी व्यवस्था केलेली आहे
https://maps.app.goo.gl/Ayx4WS6xCSgZQYvh8
६. प्राचीन शिवालय - मन्सापुरी, कंधार
२०१७ मध्ये एका शेतकर्याला त्याच्या शेताचे सपाटीकरण करताना काही शिळा लागल्या आणि उत्खननातून एक अख्खा शिव मंदिर भूगर्भातून बाहेर आले. कंधार येथे राष्ट्रकुट वंशातील तिसरा कृष्ण राजा याने दहाव्या शतकात उभारलेला भुईकोट किल्ला आहे.
https://maps.app.goo.gl/FiWtQL65VWKhEcne7
७. काळम्मा- येरगी ता. देगलूर
https://maps.app.goo.gl/fZKjGbqDLdJj5Mwe9
८. नृसिंह मंदिर - शंखतीर्थ , मुदखेड . काही अभ्यासकाच्या मते दोन मंदीरे आहेत असे सुध्दा समजले जाते एक मंदीर नदीकाठावर आहे.
https://maps.app.goo.gl/THQ92QersCAMcfwYA
मार्कंडेश्वर शिवमंदिर -https://maps.app.goo.gl/xu1d5XuvfnnYmHRP6
डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे, नाशिक
प्रतिक्रिया
28 Feb 2025 - 4:50 pm | कर्नलतपस्वी
म्हणावे लागेल.
आजपर्यंत नांदेड फक्त गुरुद्वारा म्हणून माहीत होते.
खजुराहो येथील मंदिरे सुद्धा याच धाटणीची पण सॅण्डस्टोन मधे आहेत.
लेखकांचे मनापासून आभार.
28 Feb 2025 - 5:48 pm | कंजूस
तुम्ही स्थाने ( locations) दिली आहेत पण फोटो एकही दिला नाही.
2 Mar 2025 - 2:39 pm | चौथा कोनाडा
इथं फोटो खोचणं जिकिरीचं काम आहे म्हणुन प्रचि दिले नसावेत ?
1 Mar 2025 - 12:58 pm | चौथा कोनाडा
छान ओळख !
सुंदर मंदिरे आहेत !
गुनकाशास्थान दिल्याने तिथंच प्रचि सुद्धा पाहता आली !
धन्यवाद !
धन्यवाद !
1 Mar 2025 - 11:12 pm | अमरेंद्र बाहुबली
छान माहिती. फोटोही असते तर अजून रंगात आली असती.