पत्रास कारण की

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
18 Feb 2025 - 10:36 am

मा० राष्ट्रपती
मा० पंतप्रधान
मा० सरन्यायाधीश,

भारत सरकार

स० न० वि० वि०

या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.

माझ्या अल्पमती धारणेनुसार अस्मिता माणसाला एक प्रकारे मानसिक ताकद देते. त्या ताकदीतून आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसेच प्रगतीच्या प्रयत्नांना दिशा पण मिळू शकते.

पण टाचणी लागलेल्या फुग्याप्रमाणे किंवा काचेच्या वस्तू प्रमाणे अस्मिता फुटणार असेल तर ती अस्मिता किती खरी मानायची? अस्मितेची ऊर्जा दहशत निर्माण करण्यासाठी वापरायची की आपल्या प्रगतीसाठी याचे भान मोठ्या संविधानिक पदावरील पदांवरील व्यक्तीना नाही यासारखी शोचनीय गोष्ट दुसरी नाही.

मी माझ्या वैयक्तिक उत्सूकतेपोटी कुत्र्यांच्या मानवीकरणाचा अभ्यास करतो. त्यातून माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी की माणसे सहसा कुत्र्याच्या प्रत्येक ’योग्य’ वर्तनाला शाबासकी देतात, येताजाता त्याचे लाड करतात, पण माणसांच्या बाबतीत मात्र विरूद्ध वर्तन करतात. म्ह० माणसाच्या प्रत्येक ’योग्य’ वर्तनाला शाबासकी कधीही मिळत नाही. पण एखाद्या क्षुल्लक चुकीबद्दल उध्वस्त करणारी शिक्षा मिळू शकते. जी व्यक्ती १०० पैकी एकदा दोनदा चुकते त्याला लगेच शिक्षा आहे, पण जी १०० पैकी ९० वेळा जी चुकते ’तो/ती तशीच आहे’ म्हणुन दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरत नाही.

संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्‍या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे. कारण समाज घडनविण्यात त्यांची भूमिका अतिशय निर्णायक असते.

एक सामान्य (आणि ज्येष्ठ) नागरिक म्हणून मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो. प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी केवळ आपणच समर्थ आहात!

माझ्या लहानपणी वृत्तपत्रांमध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये आलेली पत्रे न्यायालये स्वत:हून अर्ज म्हणून दाखल करून घेत असत. तसं काही माझ्या या जाहिर पत्रामुळे घडलं तर मीच नाही तर असंख्य सामान्य भारतीय आपल्याला दुवा देतील, याची मला खात्री आहे.

-एक नागरिक

समाजविचार

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

18 Feb 2025 - 11:49 am | प्रसाद गोडबोले

हा हा हा

जबरदस्त .

मजा येणार इथे .

सुबोध खरे's picture

18 Feb 2025 - 11:55 am | सुबोध खरे

संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्‍या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे.

भाषा हिंसक आहे हे कुणी ठरवायचे?

कुराणात काफिरांना छळ करून देहदंड द्या असे तीन चार ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे.

कुराणावर बंदी घाला असा अर्ज का करत नाही आपण ?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2025 - 12:13 pm | अमरेंद्र बाहुबली

संदर्भ कळेल का?
बाकी सरन्यायाधीशाना पत्र लिहिलेत ते ठिकाय पण राष्ट्रपती नी पंतप्रधान ह्यांना कशाला? खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..

प्रसाद गोडबोले's picture

18 Feb 2025 - 2:53 pm | प्रसाद गोडबोले

उगी उगी

खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..

तेच की. कतले दुत्त दुत्त हाहेत ते.
आपन ना त्याचं गल उन्हात बांधू !

मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !

तो पलयंत गत्ती फू आहे मी त्यांच्याशी.

दुत्त कुतले !!

वामन देशमुख's picture

18 Feb 2025 - 3:06 pm | वामन देशमुख

काहीही हं, प्रगो!

मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !

हे वाचून पहिल्यांदा तर मला असेच काहीतरी वाटले!

fart

आम्ही असेच पांचट लोकं! काय करणार?

बाकी, तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे, इथे भरपूर मजा येणार आहे हे नक्की!

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2025 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली

मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! २०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :)

वामन देशमुख's picture

18 Feb 2025 - 3:07 pm | वामन देशमुख

मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.

नेमकं कुठे काय घडलं ते तरी सांगा.

विजुभाऊ's picture

18 Feb 2025 - 4:56 pm | विजुभाऊ

नेमके कुठे घडले ते सांगतो
त्यासाठी काही उदाहरणे

• 3 charges under IPC Section-506 related to Punishment for criminal intimidation
• 1 charge under IPC Section-409 related to Criminal breach of trust by a public servant, or by banker, merchant or agent
• 1 charge under IPC Section-363 related to Punishment for kidnapping
• 1 charge under IPC Section-365 related to Kidnapping or abducting with intent secretly and wrongfully to confine a person
• 1 charge under IPC Section-368 related to Wrongfully concealing or keeping in confinement, a kidnapped or abducted person
• 1 charge under IPC Section-324 related to Voluntarily causing hurt by dangerous weapons or means
• 1 charge under IPC Section-420 related to Cheating and dishonestly inducing delivery of property
• 9 charges under IPC Section-143 related to Punishment for Being a member of an unlawful assembly
• 6 charges under IPC Section-149 related to Every member of unlawful assembly guilty of an offence committed in prosecution of a common object
• 5 charges under IPC Section-147 related to Punishment for Rioting
• 4 charges under IPC Section-341 related to Punishment for wrongful restraint
• 4 charges under IPC Section-145 related to Joining or continuing in unlawful assembly, knowing it has been commanded to disperse
• 3 charges under IPC Section-144 related to Joining unlawful assembly armed with a deadly weapon
• 3 charges under IPC Section-188 related to Disobedience to order duly promulgated by a public servant
• 2 charges under IPC Section-290 related to Punishment for public nuisance in cases not otherwise provided for
• 2 charges under IPC Section-291 related to Continuance of nuisance after injunction to discontinue
• 2 charges under IPC Section-146 related to Rioting
• 2 charges under IPC Section-148 related to Rioting, armed with a deadly weapon
• 2 charges under IPC Section-323 related to Punishment for voluntarily causing hurt
• 2 charges under IPC Section-504 related to Intentional insult with intent to provoke breach of the peace
• 2 charges under IPC Section-427 related to Mischief causing damage to the amount of fifty rupees
• 1 charge under IPC Section-109 related to Punishment of abetment, if the act abetted, is committed in consequence, and where no express provision is made for its punishment
• 1 charge under IPC Section-447 related to Punishment for criminal trespass
• 1 charge under IPC Section-336 related to an Act endangering the life or personal safety of others
• 1 charge under IPC Section-153 related to Wantonly giving provocation with intent to cause riot-if rioting to be committed-if not committed
• 1 charge under IPC Section-186 related to Obstructing public servants in the discharge of public functions
• 1 charge under IPC Section-141 related to Unlawful assembly

या सगळ्या केसेस एकाच व्यक्तीवर आहेत.
या व्कतीबाबत आणखी एक क्लू देतो
या माणसाने अनंत करमुसे या व्यक्तीला पोलीस आणि आपले खाजगी अंगरक्षकांकरवी मारहाण केली.
आणखी एक विश्वप्रवक्ते आणि सर्वविषयातले जाणकार सामना या जगद्विख्यात दैनीकाचे संपादक.यांचे कर्तृत्व सर्वच जण जाणतात. स्वप्ना पाटकर या स्त्रीला अश्लाघ्य भाषेत शिव्या देणे वगैरे , किंवा कंगना राणावतचे घर तोडणे इत्यादी अश्राप बाललीला यांसाठी प्रसिद्ध आहेत.
फक्त काही वानगीदाखल हे लिहिलेय

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 5:15 pm | श्रीगुरुजी

इतके गंभीर गुन्हे असूनही हे गुंड कोणत्याही कारवाईविना मोकळे का आहेत? या तक्षकांना कोणत्या इंद्राने संरक्षण दिले आहे?

विजुभाऊ's picture

18 Feb 2025 - 6:37 pm | विजुभाऊ

ते स्वतःला लोक त्यांचे सांगाती आहेत असे सांगतात

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 7:12 pm | श्रीगुरुजी

त्यांना अधिकार नाही. अधिकार असलेला इंद्र वेगळा आहे. त्याने अश्या सर्व तक्षकांना संरक्षण दिलंय.

वामन देशमुख's picture

18 Feb 2025 - 5:15 pm | वामन देशमुख

सुस्पष्ट संदर्भासाठी धन्यवाद!

_/\_

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2025 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या नेत्यांविरुद्ध धागा काढलाय तर. अनंत करमुसे हा काही साधू महात्मा होता का? तसेच कंगना रानवताचे घर अतिक्रमणात होते. सरन्यायाधीशांनी ह्या पत्राची दखल घेऊन ह्याना चांगला जबर दंड ठोकावा नि जमेल तर चार दोन महिने आई सहाल घडवून आणावी! म्हणजे सरन्यायाधीश नी मीपकरांचा वेळ वाचेल!

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2025 - 8:36 pm | अमरेंद्र बाहुबली

धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, विजूभाऊ, भाजप नेत्यांवर किती केसेस आहे यादी देऊ का? चांगल्या कामासाठी नाही बर का! तोडीपणी, भ्रष्टाचार गुंडगिरी ह्यासाठीचे?

विजुभाऊ's picture

19 Feb 2025 - 10:34 am | विजुभाऊ

राऊत आणि जितुद्दीन हे अत्यंत सालस आणि सोज्वल प्रवृत्तीचे नेते आहेत असे म्हणयचे आहे का?
दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल तर तुम्ही त्या भाषेचे आणि वृत्तीचे समर्थन करताय असेच म्हणावे लागेल.
असो.
मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो.

सुबोध खरे's picture

19 Feb 2025 - 11:40 am | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादी लागताय?

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2025 - 2:11 pm | अमरेंद्र बाहुबली

मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो. वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे?

दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल अनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2025 - 4:23 am | मुक्त विहारि

लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...

चित्रगुप्त's picture

18 Feb 2025 - 3:27 pm | चित्रगुप्त

संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.

--- संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

युयुत्सु's picture

18 Feb 2025 - 3:42 pm | युयुत्सु

मुळात कोणताही धर्म देशाच्या संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही, त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. अशा वक्तव्याचा प्रत्यक्ष परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असतो.

रणवीर अलाहाबदियाचे विधान कितीही चूकीचे असले तरी त्याला शिक्षा करायचा अधिकार फक्त सक्षम यंत्रणाना आहे. त्याला मारण्याची धमकी देण्या इतका हा गंभीर गुन्हा आहे का? वि० त्याने बिनशर्त माफी मागितलेली असताना...माणसाचा विवेक २४/७ १००% जागा राहू शकत नाही. ते जैविकदृष्ट्या अशक्य आहे.

आउट ऑफ कॉटेक्स्ट म्ह० संदर्भ सोडून वाचायची सध्या सर्वत्र साथ असल्याने जास्त तपशीलात जाऊ शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -

"गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 3:56 pm | श्रीगुरुजी

त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते.

सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी.

ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -

कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

युयुत्सु's picture

18 Feb 2025 - 3:59 pm | युयुत्सु

कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

हिंदु लॉसाठी स्मृती महत्त्वाचा आधार मानल्या गेल्या आहेत. मला मनुस्मृती टिळक विद्यापिठात विशारद्च्या दुस-या वर्षाला अभ्यासाला होती. सध्याचे माहित नाही.

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 4:20 pm | श्रीगुरुजी

हिंदू लॉ मधील कोणते कायदे मनुस्मृतीवर आधारीत आहेत?

कोणत्या पदवीसाठी मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

युयुत्सु's picture

18 Feb 2025 - 4:30 pm | युयुत्सु

हे प्रश्न कृपया ए० आय० ला विचारायची सवय लावावी.

प्र० Which part of Hindu law is borrowed from Smriti literarture?
उ० The part of Hindu law that is borrowed from Smriti literature is the concept of "Dharma" and the rules governing social and familial relationships, such as:

- Laws of inheritance (Dayabhaga and Mitakshara)
- Laws of marriage (types of marriages, rules of marriage, etc.)
- Laws of adoption
- Laws of partition and joint family property
- Rules of caste and social hierarchy

Smriti literature, which includes texts like the Manusmriti, Yajnavalkyasmriti, and Naradasmriti, provides guidance on these aspects of Hindu law. These texts are considered authoritative and have been influential in shaping Hindu law and customs.

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 4:36 pm | श्रीगुरुजी

तुम्ही दावा केलाय म्हणून तुम्हाला विचारतोय. मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे.

वामन देशमुख's picture

18 Feb 2025 - 4:16 pm | वामन देशमुख

मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -

हा नेहमीचाच डावा डाव आहे.

आधी खाजवून खरूज काढायचे आणि मग victim blaming करायची. संबंध नसताना मनुस्मृती आणायची मग हिंदूंना झोडायचे.

जगाला पोखरणारी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे.

विजुभाऊ's picture

18 Feb 2025 - 6:38 pm | विजुभाऊ

बरोबर आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 7:14 pm | श्रीगुरुजी

उजव्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्राला, भारताला पोखरणारी वाळवी आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2025 - 8:00 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
मनुस्मृतीनुसारच इंग्रजानी हिंदू कायदे बनवले होते म्हणतात!

सुबोध खरे's picture

19 Feb 2025 - 11:47 am | सुबोध खरे

मनुस्मृती मधील पुढील श्लोक ....

मनुस्मृती आणि कुराण दोन्ही वर बंदी घालण्यासाठी अर्ज करा.

सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कडे

आहे का हिम्मत?

असले मुळमुळीत अर्ज केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मिपा वर लिहिण्यात काय हशील आहे?

कॉमी's picture

19 Feb 2025 - 1:35 pm | कॉमी

सर
"अमुक पुस्तकात आक्षेपार्ह गोष्ट आहे म्हणून त्या पुस्तकावरच सरसकट बंदी घाला"
आणि
"संसदिय पदावर आणि इतर जबाबदारीच्या पब्लिक ऑफिस मध्ये असलेल्या लोकांनी तारतम्य बाळगावे, हिंसेला खतपाणी घालणारी वक्तव्ये करू नयेत. तसे होत असेल तर त्यांच्या वरिष्ठ व्यक्तीने समज द्यावी"
हया दोन्ही अत्यंत वेगळ्या गोष्टी नाहीत का?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2025 - 8:03 pm | अमरेंद्र बाहुबली

मनुवादी स्वतला उजवे समजतात खर तर ते डाव्यांपेक्षा जास्त धोकेदायक आहेत,
भारताला पोखरणारी मनुवादी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे.
बाकी युयुत्सु सरांवर आता मनुवादी तोंडसुख घेतील.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2025 - 4:22 am | मुक्त विहारि

लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 8:50 pm | श्रीगुरुजी

दिसला खांब आणि केली तंगडी वर.

सुबोध खरे's picture

19 Feb 2025 - 11:41 am | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादी लागताय?

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2025 - 1:15 pm | श्रीगुरुजी

कोणत्याही विषयावर धागा असो, खफ असो . . . हे तेथे जाऊन घाण करतातच. बरं त्या विषयातलं काही समजत असतं, काही विश्वसनीय माहिती दिली असती, काही विचारी प्रतिसाद दिले असते तर विरूद्ध लिहिलेले सुद्धा चाललं असतं. पण कोणत्याही विषयातील कणभरही माहिती नाही, विषय अजिबात समजत नाही पण तरीही सातत्याने पिंका टाकून धाग्याचा सत्यानाश करण्याचे घाणेरडे व्यसन जाणार तरी कधी?

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2025 - 2:14 pm | अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी, विद ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही नि तुमच्या सारखे अनेक जाणकार मीपावर आहेत. प्रत्येक वेळी माहिती असेल तरच लिहायचे का? काही वेळा माहिती मिळवायला किंवा चुकीची माहिती दुरुस्त करून घ्यायला देखील प्रतिसाद दिला जातो ह्याचा अर्थ असा नाही की धाग्याचा सत्यानाश करतो. भावना समजून घ्याल अशी अपेक्षा! _/\_