बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा)

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
15 Feb 2025 - 10:24 am

बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा)
====================================

युयुत्सु-नेटचे १लेच जाहिर भाकीत अचूक ठरले त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे आणि म्हणून मी केरास साठी हायपर पॅरामिटर-ट्युनिंग करून बघायचे ठरवले. त्यातून अधिक चांगली भाकीते मिळतील अशी आशा करूया.

पुढच्या पाच दिवसांचे भाकीत करण्याचे एकंदर २ टप्पे आहेत.

१. पुढील ५ दिवसांसाठी वेगवेगळी दैनिक (डेली) मॉडेल्स तयार करून त्यांचा एकत्रित स्क्यूनेस तपासणे. हा अभ्यास केल्या नंतर बाजारात अनिश्चितता दिसते.

२. ५ दिवस पिरीऑडीसिटी स्वीकारून निफ्टीचे भाकीत करणे. असे केले तरी बाजारात मोठी नकारात्मक दिसते. तेव्हा निर्णायक दिशा परिवर्तन होण्यासाठी वाट बघणे श्रेयस्कर.

डिस्क्लेमर : सदरील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं असून त्याच्या फायदा अथवा होणा-या कोणत्याही नुकसानीस 'मिपा व्यवस्थापन' जवाबदार असणार नाही.

अर्थव्यवहारविचार

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2025 - 11:16 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. काल खेळता खेळता चुकून २२५०० चा पुट पावणे ३ वाजता घेतल्या गेल्या! बाजारा सोबत माझा बीपी देखील खालीवर होत होता! शेवटी ४५० रुपये प्रॉफिट देऊन तो गेला!

युयुत्सु's picture

15 Feb 2025 - 11:36 am | युयुत्सु

ट्रांझॅक्शन कॉस्ट वसूल झाली का? असेल तर चहा पाजा!

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2025 - 11:55 am | अमरेंद्र बाहुबली

ग्रो चे ४० रुपये, १८ टॅक्स, ५८ रुपये काढून ४२५ हाती आले!

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2025 - 11:56 am | अमरेंद्र बाहुबली

चहा काय मिसळ हानुयात!

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2025 - 11:37 am | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे पुढचा आठवडाही लालम लालच नाही?
लाल सलाम!

युयुत्सु's picture

15 Feb 2025 - 11:46 am | युयुत्सु

वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच !

पाच दिवस - पिरीअडॉसिटीच्या निफ्टीचा आलेख तपासला तर कदाचित बारीक रॅली येऊ शकते पण टिकेल की नाही ते आत्ता सांगता येत नाही. तेव्हा

वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच ! जरा धीर धरा!

युयुत्सु's picture

15 Feb 2025 - 12:32 pm | युयुत्सु

युयुत्सु's picture

15 Feb 2025 - 12:33 pm | युयुत्सु
वामन देशमुख's picture

15 Feb 2025 - 12:42 pm | वामन देशमुख

@युयुत्सु

धागे फॉलो करत आहे.‌

मागच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे, मंदीमध्येही चांदी करता येते. तेव्हा अनुभवी व्यापाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही.

#BearBanoBewakoofNahi

---

चांदी तेव्हा करता येते जेव्हा तेजी अथवा मंदीची निश्चिती असते. येत्या आठवड्यासाठी असे निश्चित विधान वरील मॉडेल वापरून करता येत नाही.

वामन देशमुख's picture

15 Feb 2025 - 3:43 pm | वामन देशमुख

पुढच्या आठवड्यामध्ये sideways ते bearish कल राहील असे माझे अनुमान आहे.

आंद्रे वडापाव's picture

15 Feb 2025 - 1:26 pm | आंद्रे वडापाव

हायला कसं शक्य आहे ... आम्हाला निफ्टी डेथ क्रॉस झालेला दिसतोय...
तुमच्या कडे ५० हा २०० वर कसा आहे म्हणे???

वरच्या आलेखात दर पाच दिवसांची एक मेणबत्ती बनलेली आहे.

युयुत्सु's picture

15 Feb 2025 - 3:19 pm | युयुत्सु

प्रिय संपादक

कृपया डिस्क्लेमर मध्ये खालील दुरुस्ती माझ्यावतीने पण करावी.

डिस्क्लेमर : सदरील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं असून त्याच्या फायदा अथवा होणा-या कोणत्याही नुकसानीस 'मिपा व्यवस्थापन' आणि लेखक जवाबदार असणार नाहीत.

युयुत्सु's picture

15 Feb 2025 - 3:44 pm | युयुत्सु

युयुत्सु's picture

17 Feb 2025 - 3:56 pm | युयुत्सु

युयुत्सुनेट मध्ये आता बरेच ट्युनिंग केले असल्याने ( अचूकतेला धक्का न लावता ट्रेनिंग टाईम १० मि वरून ६-७ मि० वर आणला आहे) दैनिक कालऔकटीवर (टाईमफ्रेम) काय सांगते याची उत्सुकता असते. फक्त दैनिक भाकीत अगोदरअनेक कारणांसाठी जाहिर करत नाही. विश्वासार्हतेसाठी कालमोहर (टाईमस्टॅम्प) पहावी. पुढील भाकितात अचूकता आणण्यासाठी १० ऐवजी १५ मॉडेल तयार केली (हे म्ह० चॅट्जीपिटीकडे १५ वेगवेगळे पर्याय मागण्यासारखे आहे.)

न्युरलनेट नेट इण्ट्राडे साठी आणि डोळे बंद करून वापरण्यामधला एक सर्वात मोठा धोका - न्युरल नेट विश्वास बसणार नाही अशी भाकीते करते आणि तुम्ही पैसे पण कमावता. पण सगळं व्यवस्थित चालू असताना मार्केट एकच झटका असा देते की आतापर्यंत मिळवलेले तुम्ही एका ट्रेडमध्ये गमावता. न्युरल नेट वरचा विश्वास तुम्हाला मार्केट उलटे फिरले आहे हे वास्तव स्वीकारू देत नाही.

सुबोध खरे's picture

20 Feb 2025 - 11:55 am | सुबोध खरे

DE HUSKED PIGEON PEA LEGUME from the family Fabaceae COOKED ON SLOW HEAT TO PERFECTION ADDED TO SLOW COOKED STEAMING ORGANIC ORYZA SATIVA SPECIALLY PICKED UP FROM MAVAL REGION OF PUNE DISTRICT FOR ITS OLFACTORY GRANDEUR.

साध्या शब्दात वरण भात

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Feb 2025 - 2:10 pm | अमरेंद्र बाहुबली

कालच ग्रो एप डिलीट केले. काय होवो तिकडे मार्केटचे.