मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा)

युयुत्सु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा) ==================================== युयुत्सु-नेटचे १लेच जाहिर भाकीत अचूक ठरले त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे आणि म्हणून मी केरास साठी हायपर पॅरामिटर-ट्युनिंग करून बघायचे ठरवले. त्यातून अधिक चांगली भाकीते मिळतील अशी आशा करूया. पुढच्या पाच दिवसांचे भाकीत करण्याचे एकंदर २ टप्पे आहेत. १. पुढील ५ दिवसांसाठी वेगवेगळी दैनिक (डेली) मॉडेल्स तयार करून त्यांचा एकत्रित स्क्यूनेस तपासणे. हा अभ्यास केल्या नंतर बाजारात अनिश्चितता दिसते.  २. ५ दिवस पिरीऑडीसिटी स्वीकारून निफ्टीचे भाकीत करणे. असे केले तरी बाजारात मोठी नकारात्मक दिसते. तेव्हा निर्णायक दिशा परिवर्तन होण्यासाठी वाट बघणे श्रेयस्कर.  डिस्क्लेमर : सदरील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं असून त्याच्या फायदा अथवा होणा-या कोणत्याही नुकसानीस 'मिपा व्यवस्थापन' जवाबदार असणार नाही.

वाचने 3970 वाचनखूण प्रतिक्रिया 18

धन्यवाद. काल खेळता खेळता चुकून २२५०० चा पुट पावणे ३ वाजता घेतल्या गेल्या! बाजारा सोबत माझा बीपी देखील खालीवर होत होता! शेवटी ४५० रुपये प्रॉफिट देऊन तो गेला!

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 11:46
 वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच ! पाच दिवस - पिरीअडॉसिटीच्या निफ्टीचा आलेख तपासला तर कदाचित बारीक रॅली येऊ शकते पण टिकेल की नाही ते आत्ता सांगता येत नाही. तेव्हा वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच ! जरा धीर धरा!

वामन देशमुख Sat, 02/15/2025 - 12:42
@युयुत्सु धागे फॉलो करत आहे.‌ मागच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे, मंदीमध्येही चांदी करता येते. तेव्हा अनुभवी व्यापाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. #BearBanoBewakoofNahi ---

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 15:22
चांदी तेव्हा करता येते जेव्हा तेजी अथवा मंदीची निश्चिती असते. येत्या आठवड्यासाठी असे निश्चित विधान वरील मॉडेल वापरून करता येत नाही.

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 15:19
प्रिय संपादक कृपया डिस्क्लेमर मध्ये खालील दुरुस्ती माझ्यावतीने पण करावी. डिस्क्लेमर : सदरील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं असून त्याच्या फायदा अथवा होणा-या कोणत्याही नुकसानीस 'मिपा व्यवस्थापन' आणि लेखक जवाबदार असणार नाहीत.

युयुत्सु Mon, 02/17/2025 - 15:56
युयुत्सुनेट मध्ये आता बरेच ट्युनिंग केले असल्याने ( अचूकतेला धक्का न लावता ट्रेनिंग टाईम १० मि वरून ६-७ मि० वर आणला आहे) दैनिक कालऔकटीवर (टाईमफ्रेम) काय सांगते याची उत्सुकता असते. फक्त दैनिक भाकीत अगोदरअनेक कारणांसाठी जाहिर करत नाही. विश्वासार्हतेसाठी कालमोहर (टाईमस्टॅम्प) पहावी. पुढील भाकितात अचूकता आणण्यासाठी १० ऐवजी १५ मॉडेल तयार केली (हे म्ह० चॅट्जीपिटीकडे १५ वेगवेगळे पर्याय मागण्यासारखे आहे.)  न्युरलनेट नेट इण्ट्राडे साठी आणि डोळे बंद करून वापरण्यामधला एक सर्वात मोठा धोका - न्युरल नेट विश्वास बसणार नाही अशी भाकीते करते आणि तुम्ही पैसे पण कमावता. पण सगळं व्यवस्थित चालू असताना मार्केट एकच झटका असा देते की आतापर्यंत मिळवलेले तुम्ही एका ट्रेडमध्ये गमावता. न्युरल नेट वरचा विश्वास तुम्हाला मार्केट उलटे फिरले आहे हे वास्तव स्वीकारू देत नाही.

सुबोध खरे गुरुवार, 02/20/2025 - 11:55
DE HUSKED PIGEON PEA LEGUME from the family Fabaceae COOKED ON SLOW HEAT TO PERFECTION ADDED TO SLOW COOKED STEAMING ORGANIC ORYZA SATIVA SPECIALLY PICKED UP FROM MAVAL REGION OF PUNE DISTRICT FOR ITS OLFACTORY GRANDEUR. साध्या शब्दात वरण भात