दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात. जर दिल्लीत अल्पसंख्यक मतदार तेलंगना प्रमाणे कांग्रेसकडे वळविण्यात कांग्रेस नेतृत्व यशस्वी झाले असते तर आप पार्टीचे अस्तित्व बर्यापैकी संपविण्यास कांग्रेस यशस्वी झाली असती. पण तसा काही प्रयत्न काँग्रेसने गेल्या सहा महिन्यात केला नाही. या वेळी ही जास्तीस्जास्त 5 ते 10 जागांवर कांग्रेस लढताना दिसेल. बाकी जागांवर भाजपाची मते कापण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक यामुळेच माननीय केजरीवाल एका भाषणात म्हणाले दिल्ली निवडणूकीच्या काळात ते माननीय राहुल गांधींची निंदा करणार नाही.
आप पार्टीला दिल्लीत अल्पसंख्यक समुदायाचे समर्थन आहे. दुसर्या शब्दांत मतदान टक्का कितीही असला तरी मतदानपूर्वीच +10 मतांची लीड त्यांच्या पाशी आहे. दिल्लीत डीटीसी बसेस मध्ये महिलाना तिकीट घ्यायची गरज नाही. रोज किमान दहा ते पंधरा लाख महिला डीटीसी बसेस मधून प्रवास करतात. या शिवाय वीज, पाणी अनेक फ्री बी आहेत. एका वर एक बाटली फ्रीचा लाभ आप पक्षाला मिळणार. या शिवाय निवडणूकीची तैयारी कशी केली जाते हे आप पार्टी कडून शिकण्यासारखे आहे. विधानसभा निवडणूकीसाठी डिसेंबर महिन्यात आपने आपले उमेदवार जाहिर करून टाकले होते. पण अधिकान्श जागांवर तीन महीने आधीच अनौपचारिक रीतीने उमेदवार निश्चित झाले होते. त्यांनी प्रचार ही सुरू केला, विशेषकरून ज्या भागांत लोकसभेत आपला कमी मते मिळाली होती. निवडणूकीच्या घोषणे पूर्वी केलेली सेवा आचार संहितेत येत नाही. याचा लाभ आप पक्षाने पूर्णपणे घेतला. त्यात काहीही गैर नाही. बाकी आमच्या उत्तम नगर भागातील निवर्तमान विधायक बल्यान साहेब पुण्यकर्म करून तिहाड तीर्थ क्षेत्री विश्राम करत असल्याने त्यांच्या श्रीमतीला तिकीट मिळाले आहे आणि तिचा प्रचार जोरदार सुरू आहे.
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. सध्या तरी तीच परिस्थिति दिसत आहे. लोकसभा निवडणूकी नंतर एक भाजप कार्यकर्ता मला म्हणाला होता. जर भाजपने मुख्यमंत्री चेहरा देऊन दोन महीने आधी उमेदवार घोषित केले तर भाजप विधानसभा निवडणूक जिंकू शकते. पक्षाचा उमेदवारला विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागातील प्रधानांना, छूटभैये नेत्यांना पक्षाशी पुन्हा जोडायचे असेल तर एवढा वेळ पाहिजे. पण भाजप ने मुख्यमंत्रीचा चेहरा ही दिला नाही आणि नॉमिनेशन सुरू झाले तरीही भाजपचे सर्व उमेदवार निश्चित झाले नव्हते. अनेकांना वाटते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा दिल्ली जिंकण्याची नाही. बहुतेक विधानसभेत आप आणि लोकसभेत भाजपा हे समीकरण भाजप शीर्ष नेतृत्वाला जास्त योग्य वाटते. भाजप विधानसभा जिंकली तर कांग्रेस दिल्लीत पुन्हा प्रबळ होईल. बहुतेक भाजपला ते नको. भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल. भाजप नेतृत्वाला नाही.
प्रतिक्रिया
22 Jan 2025 - 5:24 pm | मुक्त विहारि
भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल... सहमत आहे...
माझ्या मते.. केजरीवाल यायची शक्यता जास्त आहे..
24 Jan 2025 - 9:15 am | तिता
काहीही झाले तरी भाजपाला मत देणारे पण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. हा भाजपाचा एकनिष्ठ एकगठ्ठा मतदार वर्ग आहे. बाकी Freeship तर प्रत्येक पक्ष offer करत आहे. मतदार सुजाण कमी आणि भावनिक जास्त आहेत.
24 Jan 2025 - 2:49 pm | श्रीगुरुजी
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार.
आआपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अवघड आहे. भाजपच्या जागा ७ वरून नक्की वाढतील, पण ३६ पर्यंत जाण्याची शक्यता खूप कमी वाटते. अर्थात आआप हरून भाजपला बहुमत मिळावे हीच इच्छा आहे.
भविष्यात रेवड्या वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षापेक्षा वर्तमानात रेवड्या वाटणारा पक्ष मतदारांना अधिक जवळचा वाटतो हे कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.
6 Feb 2025 - 7:36 pm | श्रीगुरुजी
बहुसंख्य संस्थांनी मतदानोत्तर चाचणी घेऊन भाजपला साधे बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकाद्वारे १२ लाखापर्यंत उत्पन्न असल्यास ते आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ भाजपला कितपत मिळाला हे परवा समजेल. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा भाजपला भरभरून लाभ मिळाला. तसाच लाभ दिल्लीतही मिळेल का हा विविध पक्षांचा औत्सुक्याचा विषय असणार.
6 Feb 2025 - 9:18 pm | विवेकपटाईत
दिल्लीत झालेल्या मतदानात. अल्पसंख्यक समुदायाने 80 टक्के मतदान केले आहे. दुसरीकडे 48% हिंदू घरातच बसून राहिला आहे. जर एक्सिट पोलवाल्यांनी अल्पसंख्यक मतांना २२-२५% वेटेज दिले नसेल तर सर्वांचे अंदाज चुकतील. निवडणूक जिंकण्यासाठी आप पार्टीला हिंदूंच्या तीन पैकी फक्त एका मताची गरज आहे. अल्पसंख्यक समुदाय किमान 65 जागांवर आप प्रति एकनिष्ठ आहे. काँग्रेस पार्टी भाजप चे मत खाणार.
बाकी केल्या दहा वर्षात दिल्लीत दारूची दुकाने दुप्पट झाली आहे. दिल्लीची जनसंख्या एक कोटी होऊन जास्त वाढली असली तरी सुद्धा दिल्लीत सरकारी शाळा पहिले पेक्षा कमी झाल्या आहेत. डीटीसी असो जलबोर्ड असो वीज कंपन्या असो सर्वच भयंकर तोट्यात आहे. आयुष्यमान योजना ही दिल्लीत नाही. शीला दीक्षित च्या काळात निर्मित झालेले हॉस्पिटल मध्ये आयपीडी अजूनही पूर्णपणे सुरू झाल्या नाही. नवीन बनविण्याचा प्रश्नच येत नाही. मध्यवर्ग मोठ्या प्रमाणात दिल्ली सोडून गुडगाव आणि नोयेदा नोयेडा येथे शिफ्ट होत आहे. माझे बहुतेक दिल्लीतले हे शेवटचे मतदान.
बाकी दिल्लीची ७५ टक्के जनता आणि ती अनिधीकृत कॉलोनीच मध्ये राहते. अधिकांश कॉलनीमध्ये पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. साफसफाई खराब गल्या, नाले सफाई इत्यादीमुळे भाजपाचा काही जागा निश्चित वाढतो.
6 Feb 2025 - 10:56 pm | श्रीगुरुजी
Axis India Exit Poll
________________________________
Other exit polls
_________________________________
अजून काही अंदाज -
चाणक्य स्ट्रॅटेजी - भाजप (३९-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (२-३)
पोल डायरी - भाजप (४२-५०), आआप (१८-२५), कॉंग्रेस व इतर (०-२)
पीपल्स इनसाइट - भाजप (४०-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (०-१)
8 Feb 2025 - 6:02 pm | श्रीगुरुजी
Axis My India, Pmarq आणि Poll Diary यांचा अंदाज बरोबर ठरला. Axis My India चा जागांचा व मतांच्या टक्केवारीचाही अंदाज जवळपास बरोबर आला.
इतर काही जणांचा अंदाज जवळपास आला.
Matrize आणि Mind Brink चा अंदाज बऱ्याच प्रमाणात चुकला.
7 Feb 2025 - 10:31 pm | चंद्रसूर्यकुमार
उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल कसे लागतात याची उत्सुकता आहे. बर्याचशा एक्झिट पोलचा अंदाज आहे की भाजप सत्तेत परतेल. तसे झाल्यास ती एक ऐतिहासिक घटना असेल. भाजपने यापूर्वी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता नोव्हेंबर १९९३ मध्ये. उद्या परत विजय मिळविल्यास त्यानंतर तब्बल ३१ वर्षे आणि जवळपास अडीच महिन्यांनंतर भाजप दिल्लीत विजय मिळवेल. इतक्या वर्षांच्या खंडानंतर कोणत्याही पक्षाने पुनरागमन करून विजय मिळविणे हाच एक विक्रम असेल. काँग्रेसने २०१८ मध्ये २० वर्षांच्या खंडानंतर मध्य प्रदेशात जवळपास बहुमत मिळविले होते (त्यापूर्वी काँग्रेसने १९९८ मध्ये मध्य प्रदेशात बहुमत मिळवले होते). काँग्रेससाठी २० वर्षांच्या खंडानंतर सत्तेत परतणे हा विक्रम होता. २०१७ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपच्या नाकात दम आणला होता ही गोष्ट खरी आहे. समजा तेव्हा काँग्रेसचा गुजरातमध्ये विजय झाला असता तर तो मार्च १९८५ नंतर डिसेंबर २०१७ म्हणजे तब्बल ३२ वर्षे ९ महिन्यांच्या खंडानंतर विजय मिळाला असता. पण तसे झाले नाही. यापुढेही म्हणजे २०२७ किंवा २०३२ मध्ये काँग्रेसला गुजरातमध्ये विजय मिळाल्यात भाजपचा विक्रम मोडायची संधी काँग्रेसकडे असेल. पण भाजपचा उद्या विजय झाल्यास मात्र तो विक्रम सध्या तरी भाजपचाच. भाजपने १९९३ मध्ये ७० पैकी ४९ जागा जिंकल्या होत्या. आधी भाजप २०२५ मध्ये जिंकणार का आणि जिंकल्यास ४९ पेक्षा जास्त जागा जिंकणार का ते बघायचे.
दिल्लीतील तरूण मतदारांनी भाजपची सत्ता कधी बघितलेलीही नाही. यापूर्वी १९९३ मध्ये म्हणजे बहुतेक तरूण मतदारांचा जन्म व्हायच्या आधी भाजपने दिल्लीत विधानसभा निवडणुक जिंकली होती. १९९३ मध्ये भाजप जिंकल्यानंतर १९९८ मध्ये पराभव होणे हा एक दैवदुर्विलास होता. मधल्या काळात झालेल्या १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी अनुक्रमे ५ आणि ६ जागा जिंकल्या होत्या. अगदी फेब्रुवारी १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ६ जागा जिंकल्यानंतर ९ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपचा धुव्वा उडाला होता. ९ महिन्यात इतके वातावरण कसे बदलले? तर त्याचे मुख्य कारण होते कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. दिल्लीत आणि उत्तर भारतातच प्रत्येक जेवणात कांद्याचा वापर उदंड प्रमाणात होतो. १९९८ च्या सुरवातीला ४ रूपये किलो असलेला कांदा एकदम ६० रूपये किलो पर्यंत गेला. त्याचे कारण पावसामुळे कांद्याचे पीक गेले होते आणि आधीच करार केले होते त्याप्रमाणे कांद्याची निर्यात केली गेली होती. त्याला नक्की कोण जबाबदार होते? नक्की माहित नाही. भाजप समर्थकांचा दावा होता की नाफेडने वेळेत निर्यात रोखली नाही आणि तेव्हा नाफेडचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते बलराम जाखड होते. तर काँग्रेस समर्थक त्याचा सगळा दोष वाजपेयी सरकारला देत होते. त्यावेळेस निर्यातीचे निर्णय फक्त नाफेडच घेत असेल असे वाटत नाही त्यामुळे वाजपेयी सरकारचीही यात चूक असलीच पाहिजे. जे काही असेल ते असेल पण कांदा प्रकरण भाजपला जड गेले. इतकेच नाही तर आणखी एक कारणही या पराभवाला होते. त्यावेळेस रॉकेलवर चालणारे स्टोव्ह मोठ्या प्रमाणावर वापरले जायचे. त्या रॉकेलमध्ये भेसळ झाल्याने दिल्लीत अनेक ठिकाणी स्टोव्हचे स्फोट झाले होते आणि बरेच- मला वाटते ५० पेक्षा जास्त लोक त्यात जखमी झाले होते. अशा सगळ्या कारणांमुळे आपले कठीण आहे हे लक्षात आल्यावर भाजपने मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मांना हटवून त्यांच्या जागी सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री म्हणून नेमले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे भाजपने दिल्लीत सत्ता गमावली. वातावरण इतके भाजपविरोधात गेले होते की काँग्रेसने शिला दिक्षित या त्यामानाने तेव्हा अपरिचित असलेल्या आणि स्वतःच्या लोकप्रियतेच्या आधारावर फारशी मते फिरवू न शकणार्या नेत्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले तरीही भाजपचा धुव्वा उडाला.
त्यानंतर दिल्लीत शिला दिक्षित यांनी दिल्लीत नक्कीच चांगले काम केले. आज दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी चांगले आहे. मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची सुरवात शीला दिक्षितांच्या पहिल्या कार्यकाळात झाली होती. त्यामुळे २००३ मध्ये भाजपचा पराभव झाला. २००८ च्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान २६/११ नंतर झाले होते तेव्हा दिल्ली हा शहरी भाग असल्याने मुंबईतील हल्ल्याचा परिणाम होईल आणि काँग्रेस हरेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. २०१३ पासून पुढे काय झाले हे परत वेगळे लिहायलाच नको.
उद्या काय होते याची उत्सुकता आहे. बघू काय होते ते.
8 Feb 2025 - 8:43 am | चंद्रसूर्यकुमार
१० फेब्रुवारी २०१५ रोजी आपटर्ड जे करत होते तो उन्माद नव्हता पण आज भाजप जिंकल्यास भाजप समर्थक (त्यांच्या भाषेत भक्त) जे काही करतील तो उन्माद असेल. काय समजलात?
8 Feb 2025 - 9:13 am | श्रीगुरुजी
आताची स्थिती -
आआप २४, भाजप ४५, कॉंग्रेस १
मनीष सिसोदिया, केजरीवाल व आतिशी हे तिघेही मागे आहेत.
8 Feb 2025 - 10:15 am | श्रीगुरुजी
आताची स्थिती -
आआप २८, भाजप ४२, कॉंग्रेस ०
केजरीवाल आता पुढे, मनीष सिसोदिया १३००+ व आतिशी १०००+ मतांनी अजूनही मागे.
8 Feb 2025 - 11:22 am | गवि
बरोबर ३५-३५ असे झाले तर काय होईल ? काँग्रेस आणि इतर हे प्रत्येकी शून्य शून्य जागा असल्याने फोडाफोडी करण्याचा स्कोप शून्य दिसतो.
8 Feb 2025 - 11:53 am | चंद्रसूर्यकुमार
१९८९ मध्ये गोव्यात या परिस्थितीच्या एकदम जवळ अशी परिस्थिती आली होती. ४० पैकी काँग्रेस आणि म.गो.पक्षाला प्रत्येकी १९ जागा होत्या तर दोन जागा अपक्षांना होत्या. त्यापैकी एक अपक्ष काँग्रेसच्या बाजूचा तर दुसरा म.गो.पक्षाच्या बाजूचा होता. त्यामुळे २०-२० अशी बरोबरी होत होती. तेव्हा कोणतेही सरकार बनत नव्हते. नोव्हेंबर १९८९ च्या शेवटी मतमोजणी झाली तेव्हा ही परिस्थिती होती. मग त्या दोन्ही अपक्षांनी राजीनामा दिला आणि जानेवारी १९९० मध्ये त्या दोन जागांवर पोटनिवडणुक झाली होती. त्या दोन्ही जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि मग प्रतापसिंग राणे जानेवारी १९९० च्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री झाले होते.
ती एक परिस्थिती वगळता इतर कोणत्याही राज्यात तसे झालेले नाही. त्यामुळे त्या परिस्थितीत काय होईल सांगता येणार नाही. मला वाटते अशा परिस्थितीत कोणाला सरकार बनवायला पाचारण करायचे की राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे राज्यपाल ठरवतील. छत्तिसगडमध्ये २००३, २००८ आणि २०१३ या तिनही विधानसभा निवडणुका एकदम चुरशीच्या होत्या. तिन्ही निवडणुकांमध्ये कधी भाजप पुढे होता तर कधी काँग्रेस. पण शेवटी ९० पैकी ४९-५० जागा जिंकून तिन्ही वेळा भाजप जिंकला. त्यावेळेसही ४५-४५ असे झाले तर काय करायचे असा प्रश्न टीव्हीवरील चर्चांमध्ये यायचा.
हे लिहित असताना दिल्लीत भाजप ४६ आणि आप २४ अशी स्थिती आहे. काही वेळापूर्वी ३९-३१ असे आकडे होते. त्यामुळे ३५-३५ अशी बरोबरी व्हायची शक्यता त्यामानाने कमी दिसते.
8 Feb 2025 - 12:06 pm | गवि
धन्यवाद. नीट लक्षात आले.
गोव्यात लोकसभा निवडणुकीत अगदी कमी संख्या असल्याने एका व्यक्तीला देखील अतोनात महत्व प्राप्त होत असते.
8 Feb 2025 - 11:54 am | रात्रीचे चांदणे
बरोबर ३५-३५ अस होताना दिसत नाही पण समजा झालाच आसत तर फोडफोडीसाठी लागणारे सगळे रिसोर्सेस भाजपकडे आहेत.
8 Feb 2025 - 12:05 pm | गवि
आप मधल्यांना फोडणे हा एकमेव उपाय राहिला असता. वर चंद्रसूर्यकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे शंका दूर झाली.
8 Feb 2025 - 12:20 pm | श्रीगुरुजी
आताची स्थिती -
आआप २४, भाजप ४६, कॉंग्रेस ०
केजरीवाल १८०० मतांनी मागे, मनीष सिसोदिया पुढे, आतिशी ३२००+ मतांनी अजूनही मागे.
आता जवळपास हेच चित्र शेवटपर्यंत राहील असं दिसतंय.
8 Feb 2025 - 12:24 pm | श्रीगुरुजी
सिसोदिया पराभूत झाल्याची अधिकृत घोषणा झाली. केजरू १८०० मतांनी मागे.
8 Feb 2025 - 12:40 pm | श्रीगुरुजी
६०० मतांच्या अंतराने सिसोदिया व १८४४ मतांच्या अंतराने केजरीवाल पराभूत झाले.
8 Feb 2025 - 12:59 pm | श्रीगुरुजी
आतिशी विजयी.
8 Feb 2025 - 1:15 pm | श्रीगुरुजी
आआपचा सत्येंद्र जैन पराभूत.
आताची स्थिती -
आआप २३ (६३% मते), भाजप ४७ (४७% मते), कॉंग्रेस ० (७% मते)
8 Feb 2025 - 1:43 pm | चंद्रसूर्यकुमार
आजच्या निकालामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आतिशी आणि गोपाळ राय वगळता आपचे बहुतेक सगळे मोठे नेते हरले आहेत/ हरत आहेत. स्वतः केजरू हरल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
आता पाताळविजयन या मद्रासी चित्रपटातील त्या राक्षसाप्रमाणे मी हा हा असे हसणार :)
8 Feb 2025 - 4:13 pm | यश राज
अगदी सहमत
कर्म काय ते म्हणतात ते हेच. केजरु स्वतःला दिल्लिचा मालक समजु लागला होता. आज मात्र स्वतःची लायकी कळाली असेल.
आता पंजाब राजकारणात काय ऊलथापालथ होतेय ते बघणे मजेशीर असेल.
8 Feb 2025 - 1:52 pm | अमरेंद्र बाहुबली
दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी आहे, अतिशय चांगली आरोग्यव्यवस्था नी अतिशय चांगल्या सरकारी शाळा आता तश्या राहणार नाहीत, त्यांच्यावर होणारा खर्च आता भाजप नेत्यांच्या खिशात जाणार. थोडक्यात चांगल्या दिल्लीचा आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश होणार, भ्रष्टाचार आणी गुन्हेगारीने बजबजपुरी येणार! केजरीवाल मनीष सिसोदिया असे दिग्गज पराभूत होऊ शकत नाही, त्याना पराभूत केले गेले म्हणजे बहुतेक महाराष्ट्र पॅटर्न तिकडेही राबवण्यात आलाय. लोकशाहीला श्रद्धांजली. दिल्लीतील गोबरयुगाला शुभेच्छा !
8 Feb 2025 - 2:10 pm | सुक्या
ईवीएम हो ईवीएम. सगळे ईवीएम अगोदरच फिक्स होते.
8 Feb 2025 - 2:19 pm | अथांग आकाश
+१ हेच रडगाणे गातील आता :)
8 Feb 2025 - 4:44 pm | मुक्त विहारि
मोहल्ला क्लिनिक बद्दल माहिती घ्या.
शाहीनबाग मध्ये काय झाले? ह्याची पण माहिती घ्या.
शीशमहल बद्दल माहिती घ्या.
दारू घोटाळ्या बद्दल माहिती घ्या.
अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना नंतर पाठिंबा का दिला नाही? ह्या बद्दल माहिती घ्या.
8 Feb 2025 - 6:46 pm | सुबोध खरे
https://www.newindianexpress.com/cities/delhi/2024/Oct/01/aaps-flagship-...
A visit to several clinics across Delhi reveals a range of operational challenges, including untimely closures and acute staff shortages, which have left many clinics non-functional.
An additional concern is the suspension of laboratory tests. These tests, which were previously free for patients and conducted by private labs reimbursed by the government, have been halted.
The stoppage followed an Anti-Corruption Branch (ACB) investigation that revealed that nearly 65,000 fictitious patients were prescribed tests between February and December last year. The tests, performed by two private labs, led to ₹4.63 crore being disbursed from government funds for fraudulent services.
The ACB inquiry, initiated after a complaint from Special Secretary (Vigilance) Y.V.V.J. Rajasekhar on January 10, uncovered significant discrepancies. According to the report, 63% of patients’ contact numbers were either invalid or belonged to individuals who had never visited the clinics.
हे मोदी विरोधकांना दिसत नसले तरी सामान्य जनतेला दिसत असते. आणि तेच मतपेटीतून/ इ व्ही एम मधून प्रतिबिंबित होतं.
8 Feb 2025 - 8:56 pm | मुक्त विहारि
अशी लोकं एकतर व्यक्तीपूजा तरी करत असतात किंवा पराकोटीचा व्यक्तीद्वेष... आणि दोन्ही गोष्टी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी घातकच असतात, हे पण त्यांना कळत नाही.
इतर जनांत, अशी माणसे फक्त, इतरांसाठी विदूषकाचे काम करतात.
अभ्यास करून, प्रकटावे.....
10 Feb 2025 - 5:29 pm | विवेकपटाईत
पक्या इमारतीत कमी भाड्यावर असलेल्या पन्नास पन्नास वर्ष जुने दवाखाने बंद केले. रस्त्याच्या कडेला कार्डबोर्डच्या कोंटेनर सारखे मोहल्ला क्लिनिक उघडले. तिथे पाणी आणि टॉयलेटची सुविधा नाही. हे क्लिनिक सकाळी नऊ ते 1 वाजेपर्यंत उघडे राहतात.प्रत्येक क्लिनिकांत एक डॉक्टर रुग्ण तपासाला रहात असे. रुग्ण रस्त्यावर बाहेर उभे राहतात. अनेक क्लिनिक केंव्हाच तुटून नष्ट झाले आहे. नागल पुला जवळ एक क्लिनिक रस्त्यात दिसायचे. क्लिनिक मला तरी नेहमीच रिकामे दिसत होते. बहुतेक हीच अवस्था अधिकान्श क्लिनिकची होती. तरी देखील कागदांवर मोहल्ला क्लिनिकांत चार तासांत शेकडो रुग्ण तपासले जात होते. अधिक काही बोलत नाही. सत्य पुढील काही दिवसांत जनतेसमोर येईलच.
10 Feb 2025 - 5:20 pm | विवेकपटाईत
दिल्लीत आले असते तर सत्य दिसले असते. गेल्या दहा वर्षांत दिल्लीची जनसंख्या दीड कोटी वाढली त्यात निम्न वर्ग जास्त वाढली. हजार एक नवीन शाळा उघडण्या एवजी आधीचा शाळा बंद झाल्या. (आरटीआय करून तपासू शकता) बाकी अटल योजनेत जवळपास सर्व शाळांना लॅब मिळाली. सरकारी शाळा सोडून मोठ्या प्रमाणात निजी शाळेत गरीबांना ही जावे लागत आहे. आरटीआय करून तथ्य तपासू शकता.
शीला दीक्षितच्या काळात सहा नवे हॉस्पिटल उभारले. त्यात आमच्या जनकपुरी येथील 200 बेडचे एक होते. 2013 पर्यन्त opd ही सुरू झाल्या होत्या. आज 2025 सुरू झाले अजूनही चतुर्थांश आयपीडी पूर्ण सुरू नाही झाल्या. आरटीआय करून तपासू शकता. बाकी मोहल्ला क्लिनिक हे चार तास उघडते तिथे पाणी टॉयलेटची सुविधा ही नाही. औषधी नाहीत. बाहेरून रिकामे दिसत असले तरी चार तासांत चारशे पाचशे रोगी एक डॉक्टर तपासतो.
पराजयाचे मुख्य कारण दिल्ली जळबोर्ड जे नाले सफाई, सिवर आणि पाणी पुरवठा करते. कमाई अभावी 70000 कोटींच्या तोट्यात असल्याने पगार द्यायला पैसा नाही. पाण्याच्या लाइन दुरुस्त होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून आमच्या भागात घाण पाणी येत आहे. पूर्ण पश्चिम दिल्लीची हीच परिस्थिति. गेल्या वेळी 10 पैकी दहा जागा आपला मिळाल्या होत्या. फक्त घाण पाण्यामुळे 9 जागा हातातून गेल्या. सर्व नाले तुडुंब वाहत आहे, सर्व गल्ल्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.
आत्ताची परिस्थिति गेल्या दहा वर्षांत डीटीसीला 25000 कोटींचा तोटा करून दाखविला. प्रती यात्री 30 रु हून जास्त तोटा. बसेस संख्या 2013 पेक्षा कमी झाल्या आहे. हे वेगळे केंद्र सरकारने दिल्ली वर कृपा करत 2000 इलेक्ट्रिक बसेस फ्री दिल्या. बाकी सर्व महिलांना तिकीट घेण्याची गरज नाही. 10 लक्ष महिला बस ने प्रवास करतात. केजरीला विश्वास होता त्यातल्या अर्ध्या निश्चित त्याला मत देतील.
गुन्हेगारी म्हणाल तर आमच्या उत्तम नगरचा पूर्व विधायक बाल्यान गुन्हेगारीतच जेल मध्ये गेला आहे. त्याच्या बायकोला तिकीट दिले. तिचा पराजय झाला. दंग्यांच्या ओरोपीन्ंना तिकीट दिले. तो जिंकला ही. केजरी सहित सर्वच मोठे नेता भ्रष्टाचार करून आत किंवा जमानत वर आहेत.
खरे म्हणाल तर देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आपची होती. पण दिल्लीतील 18 टक्के मुस्लिम जनसंख्या त्यात अर्धी बंगलादेशी आहे आणि ते 80 टक्के मतदान करतात. बाकी लोकांचे तृतीयांश मत मिळाले तरी आप जिंकू शकते त्यामुळे केजरीवाल निश्चिंत होता. पण नळांना येणारे घाण पानी आणि एका वर एक बाटली फ्री असल्याने मध्यम वर्गीय आप समर्थक आणि छोटे दुकानदार, ऑटो चालक आप पासून दूर गेले.
8 Feb 2025 - 2:32 pm | श्रीगुरुजी
आआपची बंद दाराआड बैठक सुरू आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. मतयंत्रात गडबड, बनावट मतदार, आमच्या समर्थकांना मत देण्यासाठी जाऊन दिले नाही, मतदारांना पैसेवाटप केले यापैकी कोणकोणती कारणे पराभवासाठी द्यायची यावर बैठकीत उहापोह सुरू आहे.
8 Feb 2025 - 3:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिल्ली निवडणूकीत भाजपने घेतलेली आघाडी पाहता भाजपाने सत्ता मिळवलेली दिसत आहे. जवळ जवळ सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत बदल होत आहेत, लोकशाहीत सत्तेत बदल होत राहीले पाहिजेत. साचलेपण आलं की त्याचं गटार होतं आणि माजही यायला लागतो. उदाहरण आपल्याला केंद्रातलं सरकार डोळ्यासमोर आहेच. दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे.
तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो. भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन. स्वच्छ यमुना , दिल्ली प्रदुषण, सुशासन, आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही भाजपाची प्राथमिकता असेल.
दिल्लीतलं राजकारण पाहता भाजपा दिल्लीत सत्तेसाठी आसूसलेली होती. सर्वप्रकारचे जुमले वापरणे सुरु होते. राज्यपाल आणि आप सरकारचा संघर्ष, इडी, आयकर यांची दडपशाही, आपच्या उमेदवारांना जेलात पाठविण्याची झालेली घाई, खोटेनाटे आरोप करुन आपच्या सरकारचे कंबरडे केंद्रीय सरकारने मोडलेले होते. आपचा संघर्ष आत आणि बाहेर असा दोन्ही ठिकाणी गेली अनेक वर्ष बघायला मिळाला.
गल्ली-मोहल्ल्यातल्या आरोग्यसुविधा, सरकारी शाळांचा कायापालट, बीजली हाफ पाणी माफ, वेगवान प्रशासन या आणि अशा लोकप्रिय घोषणांनी केजरीवाल सरकारने आपली एक वेगळी छबी निर्माण केली. काही राज्यांमधे देशभर राजकारणांचा प्रवास सुरुही केला. श्री अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशभर कॉंग्रेस सरकार हटविण्यासाठी जी मोहीम सुरु केली त्याचं यश भाजपाला जसे मिळाले तसे, केजरीवाल सरकारलाही त्याचा फायदा झाला. एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला. येत्या काळात आप विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी करतील त्यांनाही शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
8 Feb 2025 - 6:39 pm | सुबोध खरे
काय बिरुटे सर?
आता किती दिवसांचे सुतक?
बाकी सर्व आरोप करून झाले. आता फक्त दिल्लीच्या मतदारांची अक्कल काढायची राहिली आहे.
तेच इ व्ही एम, इ डी, सीबी आय, पैशाचा खेळ, धमक्या, दडपशाही,लोकशाहीची हत्या हि तुणतुणी ऐकून दिल्लीचे मतदार कंटाळले आणि दिलं केजरीवालांना हाकलून.
तुम्ही वाजवा तेच तुणतुणं-- पुढची पाच वर्षे दिल्लीत आणि महाराष्ट्रात सुद्धा.
8 Feb 2025 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर साहेब, सुतक वगैरे सर्व गोबरभक्तांना असतं.
आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं.
-दिलीप बिरुटे
8 Feb 2025 - 7:00 pm | सुबोध खरे
आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं.
हो लढा ना आणि भिडा ना.
पण अन्याय नक्की कुठे होतोय आणि कोण करतंय हे निदान समजून तरी घ्या?
आरामखुर्चीत बसलेल्या विचारवंतांच्या नादाला लागल्यास निराशाच पदरात येते एवढे समजून चला.
दिल्लीतील परिस्थिती मी खूप जवळून पाहिली आहे आणि पाहतो आहे.
सुरुवातीला लोकांच्या केजरीवाल यांच्याबद्दल प्रचंड अपेक्षा होत्या.
मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी शाळा या दोन गोष्टी त त्यांनी सुरुवातीला केलेल्या सुधारणा नेत्रदीपक होत्या. पण जसा काळ गेला तसा आप ला सुद्धा भ्रष्टाचाराची कीड लागली आणि केजरीवाल यांचा प्रचंड अहंकार त्याला उपाय करायला संपूर्ण अपयशी ठरला.
बहुतांश मोहल्ला क्लिनिक बंद पडली आहेत किंवा जेमतेम चालत आहेत.
बाकी त्यांनी वाटलेल्या रेवड्यांमुळे दिल्ली वीज मंडळ फायद्यातून तोट्यात आले आहे.
डीटीसीच्या बसेस मध्ये बायकांना फुकट प्रवास देण्यापेक्षा स्त्रियांसाठी वेगळ्या बसेस किंवा आहे त्याच बस मध्ये स्त्रियांसाठी वेगळे दार केले असते तर त्यात प्रवास करणाऱ्या स्त्रियांना जास्त सुविधा झाल्या असत्या.
अशा अनेक गोष्टी आहेत.
पण जाऊ द्या
तुम्ही वातानुकूलित खोलीत आरामखुर्चीत बसून कळफलक बडवा
8 Feb 2025 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. :)
-दिलीप बिरुटे
8 Feb 2025 - 7:03 pm | सुबोध खरे
आपल्या कडून हीच अपेक्षा होती
8 Feb 2025 - 7:10 pm | सुबोध खरे
Delhi discoms in crisis: Debt and regulatory gaps
the discoms continue to report a substantial shortfall in their revenue from the sale of electricity which is manifest in cumulative monumental RAs of Rs 27,200 crore.
discoms will leave no stone unturned in recovering the money say by getting sanction of a steep hike in tariff to make up for the entire cumulative deficit in revenue. Indeed, the matter had gone right up to the Supreme Court (SC) which in an order given in early 2023 had directed the DERC to let discoms recover their RAs. This could lead to a 100 per cent hike in tariff.
केजरीवालांच्या रेवड्या आता दिल्लीकरांच्या बोकांडी बसणार
8 Feb 2025 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. दिल्लीतील महिलांना २,५०० रुपये.
२. दिल्लीतील पहिल्या प्रसुतीनंतर महिलेला ५,००० रुपये व दुसऱ्या प्रसुतीनंतर ६,००० रुपये.
३. सिलेंडरवर गरीब महिलांना ५०० रुपयांचं अनुदान.
४. होळी व दिवाळीला एकेक सिलिंडर मोफत.
५. नवजात बाळासाठी सहा पोषण किट्स.
६. गर्भवती महिलेला २१,००० रुपये.
७. अटल कँटीन योजनेअंतर्गत ५ रुपयांमध्ये भोजन.
८. पन्नास हजार सरकारी नोक-या.
९. दिल्लीत पाच लाख रुपयांचे मोफत उपचार.
डॉक्टरसाहेब, या रेवड्यांसाठी किती कर भर लागेल आपल्याला.
किती किती जीएसटी द्यावा लागेल.
किती आश्वासने पूर्ण होतील. =))
-दिलीप बिरुटे
8 Feb 2025 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हमारे देश मे मुफ्त की रेवडी बाटकर वोट बटोरने का कल्चर की कोशीश हो रही है,
रेवडी कल्चर देश के विकास के लिये बहोत घातक है,
रेवडी कल्चर को देश से हटाना है - आदरणीय मोदीजी यांचे अमुल्य विचार.
दुवा. =))
-दिलीप बिरुटे
8 Feb 2025 - 7:39 pm | सुबोध खरे
रेवड्या हा रोग च आहे. मग तो महाराष्ट्रात असो कि इतर कोणत्या राज्यात आणि कोणता पक्ष देतो ते सुद्धा महत्त्वाचे नाही.
हा रोग केवळ दाक्षिणात्य राज्यापुरता मर्यादित होता आणि केजरीवालांनी तो मुख्य प्रवाहात आणला हाच सर्वात वाईट मुद्दा आहे.
विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडळ कमिशन द्वारे आरक्षणाची बाटली उघडलूयवर तिला बूच घालणे कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेलं नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयाने ५० % चा प्रतिबंध घातल्यामुळे आरक्षण नियंत्रणात आहे
आता रेवड्या देऊन निवडणूक जिंकता येतात हा प्रघात त्यांनी दिल्लीत आणि पंजाबात पाडल्यावर इतर राज्यांना आणि पक्षांचा निरुपाय झाला.
फडणवीस हुशार असले तरी रेवड्यांशिवाय तरणोपाय नाही हे लक्षातआल्यामुळे महाराष्टात पण लाडकी बहीण सारखी रेवडी वाटून त्यांनी सत्ता मिळवली.
कारण सत्ता हातात नसली तर साधन शुचितेला कुत्रं विचारत नाही एवढे समजण्याइतके फडणवीस आणि मोदी धूर्त नक्कीच आहेत आणि साधनशुचितेसाठी सत्ता हातातून घालवण्याइतके मूर्ख हि नाहीत.
दुर्दैवाने या रेवड्यांवर सर्वोच्च न्यायालय सुद्धा नक्की निर्णय देऊ शकलेले नाही.
विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जितके देशाचे नुकसान केले आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान केजरीवाल यांनी केले आहे
8 Feb 2025 - 7:05 pm | श्रीगुरुजी
बरोबर आहे. रोज मरे त्याला कोण रडज? किती दिवस सुतक पाळणार? दरवर्षी अनेक निवडणुका आणि प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर सुतक पाळायचे असेल तर वर्षातले ८-१० महिने सुतकातच जाणार.
8 Feb 2025 - 6:50 pm | श्रीगुरुजी
दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे
समजा कॉंग्रेसचे उमेदवार नसते तरीही भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळाला असे म्हणता येणार नाही असे म्हणता आले असते कारण अपक्ष, एमआयएम वगैरेंनी घेतलेल्या मतांचा फटका आआपला बसला असे म्हणता आले असते.
तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो.
२०१३ ते २०२५ या वर्षात फुकट वीज, फुकट पाणी या
रेवड्यांना दिल्लीकर भुलला नव्हता का?
8 Feb 2025 - 8:58 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
10 Feb 2025 - 5:40 pm | विवेकपटाईत
एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला.
डॉक्टर साहेब हा तुम्ही मस्त जोक केला. कारण याहून भ्रष्ट शासन देशात कधीच आले नसेल. उच्च शिक्षणाच्या 20 कोटी पैकी 19.43 कोटी विज्ञापन वर खर्च करणारी सरकार होती. आरोग्य सुविधा सुविधा तर रसातळवर पोहचली होती. दीड कोटी आबादी वाढली त्यात अधिकान्श निम्न वर्ग होता. तरी सकारी शाळा 2013 पेक्षा कमी होणारे हे एकमेव राज्य असेल. बाकी अनेक मंत्री विधायक, भ्रष्टाचार गुंडागर्दी दंगा आरोपात जमनात वर किंवा जेलं मध्ये आहे. आमच्या उत्तम नगर भागातील आता पूर्व विधायक बल्यान तुमच्या भाषेत शांतिपूर्ण कार्यामुळे जेल मध्ये आहे. त्याची बायको निवणूक हरली. गेल्या वेळी प. दिल्ली 10 पैकी 10 जागा आपला मिळाल्या होत्या. पण गेल्या दोन वर्षांपासून नळांना घाण पाणी येत असल्याने 9 जागा आपच्या हातून गेल्या. आता फ्री पाण्यामुळे जळबोर्ड 70000 कोटींच्या तोट्यात आला. जिथे पगार देण्यासाठी पैसा नाही तिथे पाईपलाईन दुरूस्ती नाले सफाई, सिवर लाइन दुरूस्ती कुठून होणार. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी 30 ते 80 रुपये 20 लीटर RO पाण्यासाठी खर्च करावे लागत आहे. डीटीसी ही 30000 कोटींपेक्षा जास्त तोट्यात आहे. 25000 कोटींचा तोटा गेल्या दहावर्षांतला आहे. भयंकर भ्रष्टाचार आणि 2007 पासून भाडे न वाढविल्याचा परिणाम.
देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार ही आपची होती.
8 Feb 2025 - 8:20 pm | श्रीगुरुजी
9 Feb 2025 - 12:34 am | मुक्त विहारि
https://youtu.be/ZodvABuDUa4?si=U1yKmnqH-xiaimA6
------
9 Feb 2025 - 1:58 am | मुक्त विहारि
Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले...
https://marathi.abplive.com/elections/anna-hazare-on-arvind-kejriwal-del...
-------
10 Feb 2025 - 7:08 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा
मी अशा धाग्यांवर केवळ बिरुटे सरांच्या प्रतिक्रिया पहायाला येतो ! मिपाकर असल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते !
२०२९ पर्यंत अशीच मजा मजा राहणार मिपावर ह्या विचाराने अगदी गुदगुल्या होतात !
=))))
11 Feb 2025 - 7:32 pm | सुबोध खरे
तुम्ही भुजबळांना विसरलात.
त्यांच्या इतके मनोरंजक प्रतिसाद तर बिरुटे सरांचे सुद्धा नसतात
11 Feb 2025 - 8:14 pm | रात्रीचे चांदणे
मोदी विरोधकांची खरंच कीव येते. २०१४ पासून एक गोष्ट मनापासून घडत नाही. मध्यंतरी उभाटा सरकार उन्हाळ्यातील थंड वाऱ्याच्या झुळके सारखे आले आणि तसच निघूनही गेले. मग २०२४ ला मोदी सरकार जिंकूनही हरलय अस स्वत ची समजूत करून घेऊन खोटा का असेना पण आनंद व्यक्त करता येत होता. पण महाराष्ट्र निवडणुकीने तो आनंदही हिसकावून घेतला. केजरी कसे का असेना पण मोदी विरोधक आहेत ते काहीतरी करतील वाटत असतानाच ते पाचोळ्या सारखे उडून गेले. त्यात त्यांनी EVM ला दोषही दिला नाही. आत्ता शेवटची आशा म्हणजे बंगालची वाघीण. पण त्यालाही भरपूर वेळ आहे.
11 Feb 2025 - 9:30 pm | आग्या१९९०
चंदिगड महापौर निवडणुकीत बीजेपीने दाखवून दिले ,मतदान कोणत्याही पद्धतीने घ्या, आम्ही त्यात फेरफार करू शकतो. EVM हॅक करून झाले , खोटे मतदार वाढवून झाले, मतदार यादीतून नावे कमी करून झाले. इतकेही करून निवडून आले नाही तर ED चा धाक दाखवून पूर्ण पक्ष फोडून झाले. आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही.
11 Feb 2025 - 9:32 pm | अमरेंद्र बाहुबली
आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही.
जो पर्यंत भारतात पुन्हा प्रामाणिक निवडणूक यंत्रणा येत नाही तो पर्यंत हीच लोक सत्तेत राहणार! आपण फक्त लोकशाहीला श्रद्धांजली वाहू शकतो.12 Feb 2025 - 6:34 am | मुक्त विहारि
आपण कोर्टात जाऊ शकता.
इथे बोंबाबोंब करून काय फायदा?
11 Feb 2025 - 9:34 pm | श्रीगुरुजी
कालच उठा म्हणाले की दिल्लीत व महाराष्ट्रात भाजप जिंकला हे मी मानतच नाही. शिक्षण, आरोग्य अश्या क्षेत्रात प्रचंड काम केलेले केजरीवाल हरतीलच कसे? रूग्णवाहिका, रक्तदान अशी अनेक लोकोपयोगी कामे केलेली शिवसेना हरेलच कशी? विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव आहे. काहीतरी गडबड घोटाळा आहे.
11 Feb 2025 - 9:52 pm | आग्या१९९०
गेल्यावर्षी चंदीगड महापौर निवडणुकीत बीजेपीने गडबड केली तेव्हापासून खात्रीच झाली ह्यांनी निवडणूक जिंकण्याचे तंत्र अवगत केले आहे. त्यामुळे शंका येणे साहजिकच आहे. निवडणूक आयोग फक्त दावे फेटाळण्यासाठी बसले आहे.
11 Feb 2025 - 10:27 pm | श्रीगुरुजी
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. मतपत्रिका पद्धत असताना गडबड झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. तसेच न्यायालयाने ती निवडणूक रद्द केली होती.
दिल्ली व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतयंत्राद्वारे झाल्याने गडबडीची शक्यताच नाही. तरीही विश्वास नसल्यास न्यायालयात दाद मागता येईल व मतयंत्रात गडबड केली हे न्यायालयाने मान्य केले तर निवडणूक रद्द होईल.
11 Feb 2025 - 11:14 pm | आग्या१९९०
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच.
कसं बोललात? अशी गरज का पडली बीजेपीला? ह्याचा अर्थ निवडणूक जिंकण्यासाठी ते अनेक गैरप्रकार करण्यास मागेपुढे करत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या किंवा निवडणूक आयोगाच्या EVM तक्रारीच्या अटी बघितल्या तर त्यांना ह्यातील अनेक तांत्रिक माहिती आहे की नाही ह्याची शंका येते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकांचाच उमेदवार तक्रार करू शकतो ही अटच हास्यास्पद आहे. पुढच्या क्रमांकाची मते वळवली की नाही हे कसे कळणार? निवडणूक आयोग मतदार आणि मतदानाची संख्या आकडेवारीत द्यायला का टाळते आहे? कुठलेही इलेक्ट्रॉनिक मशीन अंतर्गत प्रोग्राम करून किंवा दुरूनही रिमोट द्वारे नियंत्रित करता येऊ शकते.
11 Feb 2025 - 11:33 pm | श्रीगुरुजी
महापौर निवडणूक, राज्यसभा निवडणूक, विधानपरीषद निवडणूक मतपत्रिकांवरच असते.
मतयंत्रात गडबड करून दाखवा हे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारण्यास एकही पक्ष पुढे आला नव्हता.
12 Feb 2025 - 12:12 am | आग्या१९९०
मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार आत काय गडबड केली ते, ज्यास निवडणूक आयोग तयार नाही.
ह्यापेक्षा मतदार संख्या आणि प्रत्यक्ष मतदान, मतदानाचे ( मतदार रांगेचे ) व्हिडिओ ,१००% VVPAT मोजणी,निवडणूक आयोगाने ह्या मागण्या मान्य कराव्यात , जे सहज शक्य आहे.
12 Feb 2025 - 1:48 am | राघव
अरे जर समजतच नसेल की गडबड कशी केली.. तर नक्की काय केल्यानं गडबड होते हेच माहीत नाही असा अर्थ होत नाही का? तसं जर असेल तर कुणालाही गडबड करताच कशी येणार? अन् भाजपवर जर एवढी शंका असेल की त्यांना मशीन उघडायला दिली असेल.. तर जावं की तात्पुरतं भाजपमधे आणि लावावा जोर मशीन हाताळायला मिळावी म्हणून..!
अरे ज्याला इंटरनेट कनेक्शन नाही, वायर्ड नेटवर्क कनेक्शन नाही, अगदी सिमकार्ड सुद्धा नाही.. ते स्टँडअलोन डेटाबेस वर आहे हे उघड आहे. केवळ दोन वायर्स त्याला जोडता येतात, एक पॉवर केबल आणि एक प्रिंटर केबल. मतमोजणीच्या दरम्यान सर्व पक्षप्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्या समोर जर गैरप्रकार झालेत तर ते बोंब मारणार नाहीत काय?
विरोधी पक्षाचा दावा हा आहे की ईव्हीएम हॅक होतात.. निवडणूक आयोग म्हणतंय कसं होईल?
मी म्हणतो की हे प्रश्नच चुकीचे आहेत. प्रश्न आयोगानं विचारले पाहिजेत.. की बॅलेट पेपरनं गैरप्रकार कसे रोखता येतील ते सिद्ध करावं विरोधी पक्षांनी. सोबत बॅलेटपेपरचा वापर जास्त सोपा हे देखील सिद्ध करावं. आणिकही अनेक प्रश्न आणि उपप्रश्न आहेत.. चांगला घोळ घालावा ४०-५० वर्ष.. तोवर कदाचित आणिक उजवं एखादं तंत्रज्ञान आलेलं असेल ईव्हीएम पेक्षा!
12 Feb 2025 - 8:30 am | अमरेंद्र बाहुबली
+१
अचानक वाढलेले मतदार? मुस्लिम एरियातून भाजपला बहुमत,जितके मुस्लिम वोटर नाहीत त्याहून जास्त mim ला मतदान, निवडणूक आयोगाची लपवा छपवी, एखाद्या जिल्ह्यात एकसारखी मते पडणे उदा. १lakh १५ हजार ७८०, बाजूच्याच मतदार संघात १ लाख १५ हजार ८६४ वगैरे, मतदान यंत्राच्या आत काय हे पाहू ना देता नी मतदान यंत्राला हात न लावता हॅक करून दाखवा म्हणून छाती पिटणे, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजप नेत्यांनी सारवा सारव करणे, निवडणूक आयोगात आपली लोक बसवणे, चंदीगड पॅटर्न राबवणे, मतदान यंत्रे गुजरात मधूनच आणणे, मतदान यंत्र बनवणाऱ्या कंपनीत चार भाजपेयी गुजराथी डायरेक्टर म्हणून घुसणे. (मतदान यंत्रात गडबड करता येत नाही तर हे भाजपेयी मतदान यंत्रे बनवणाऱ्या कंपनीत का घुसले? ) एवढं सगळं उघ उघड होत असताना देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणाऱ्या भाजपेयींवर हसू येते.
12 Feb 2025 - 8:35 am | अमरेंद्र बाहुबली
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच.
गिरीष बापट वारल्यानंतर पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीने निवडणूक आयोगाने वर्षभर पुण्यात लोकसभेची निवडणूकच घेतली नाही. त्याचवेळी पंजाबात मात्र लोकसभा निवडणूक घेतली होती. निवडणूक आयोग भाजपसाठी असा खुलेआम काम करत असताना निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणे हास्यास्पद आहे.12 Feb 2025 - 9:10 am | श्रीगुरुजी
मग निवडणूक आयोगाविरूद्ध जा न्यायालयात. ते जमत नसेल तर २०११ मधील देशव्यापी आंदोलनासारखे आंदोलन करा.
12 Feb 2025 - 9:16 am | अमरेंद्र बाहुबली
न्यायमूर्ती लोया ह्यांचे नाव ऐकले आहे का?
12 Feb 2025 - 9:23 am | रात्रीचे चांदणे
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे. पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही. महाराष्ट्रात आणि दिल्लीत राहुल गांधींनी ४ - ४ सभा घेतल्या. मोदी पंतप्रधान असून जास्त घेतल्या असतील. म्हणजे काहीही कष्ट न करता सत्ता पाहिजे. चुकून मिळाली तर लोकशाही जिंकली हरलो तर EVM आहेच.
12 Feb 2025 - 9:30 am | अमरेंद्र बाहुबली
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे.
चला, इथपर्यंत प्रगती झाली हेही नसे थोडके.
पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही.
ईव्हीएम हॅकच करावे असे गरजेचे नाही. मनुपुलेत ही करता येते किंवा बदलताही येते यंत्रणा आणी अधिकारी हाताशी असेल तर. आता निवडणूक आयोगच सोबत असल्यावर भीती ती कुणाची विधानसभेला जितेंद्र आव्हाड ह्यांनी पदोपदी ईव्हीएम वर लक्ष ठेवले त्यांचा निकाल पहा कसा लागलाय. (त्यांनी ट्विट करून
ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली) पण सगळेच असे करू शकतात का? आणी का करावे? आणी केले तरी आयोग नी भाजप मिळून काहीतरी नवा मार्ग शोधतील. नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर म्हणून ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत घुसवून ठेवलेत ते कशासाठी?
सो देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे रडगाणे भाजपेयींनी आता बंद करायला हवे!
12 Feb 2025 - 9:41 am | श्रीगुरुजी
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे
तसे असेल तर कॉंग्रेस काळात आयोग तटस्थ होता का? मी खाली एक उदाहरण दिले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
12 Feb 2025 - 10:11 am | रात्रीचे चांदणे
मुळात ज्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारी नियंत्रण आहे आस कोणताही सरकारी खात तटस्थ नसणारच. आयोग घटनात्मक संस्था असूनही सरकारच्या कलानेच काम करणार.त्यात निवडणूक आयुक्तांची निवड कमिटी मध्येच सरकारी पक्षच बहुमत आहे. त्यामुळे लहान सहान बाबतीत सरकारी पक्षाला साजेशी भूमिका घेणारच. ह्यात सत्तेत काँग्रेस असो की भाजपा ह्याने काहीही फरक पडणार नाही. आव्हाडच मताधिक्य २०१९ च्या तुलनेत घटलेले आहे. आणि असेच हवेत राहिले तर २०२९ साली हरतील आणि त्यावेळी तेच EVM ला दोष देत बसतील. उभाटा असेच हवेत राहिले होते आणि आपटले. मुळात आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते.
12 Feb 2025 - 10:47 am | अमरेंद्र बाहुबली
आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते.
मोदीना सोनिया गांधीनी वाचवले नहीतर ते आता जेल मधे पाहिजे होते.12 Feb 2025 - 7:26 am | मुक्त विहारि
मुस्तफाबाद का नाम बदलकर शिव पुरी या शिव विहार रखेंगे…’, दिल्ली में चुनाव जीतते ही BJP के दिग्गज विधायक का बड़ा बयान
https://www.jansatta.com/rajya/will-rename-mustafabad-to-shiv-puri-delhi...
------
12 Feb 2025 - 9:39 am | श्रीगुरुजी
२००९ मध्ये नवीन चावला नामक मुख्य निवडणूक आयुक्त होते. तेव्हा महाराष्ट्रातील ३ राज्यसभा खासदारांची व झारखंडमधील २ राज्यसभा खासदारांची निवडणूक होती. संख्याबळाप्रमाणे महाराष्ट्रात भाजन-सेना युतीचा १ व कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीचे २ खासदार आरामात निवडून येऊ शकत होते. झारखंडमध्ये सुद्धा भाजपचा १ व झामुमो-कॉंग्रेस युतीचा १ खासदार आरामात निवडून येऊ शकत नव्हता.
पण नवीन चावलांनी महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी ३ वेगळ्या अधिसूचना काढल्या व झारखंडसाठी २ वेगळ्या अधिसूचना काढल्या. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक जागेसाठी एकदा अशी ३ वेळा निवडणूक झाली व झारखंडमध्ये २ वेळा निवडणूक झाली. परिणामी महाराष्ट्रातील तीनही जागांवर व झारखंडमध्ये दोनही जागांवर भाजपचा उमेदवार हरलो.
एकच अधिसूचना असती तर भाजपचे २ खासदार राज्यसभेत निवडून आले असते. पण नवीन चावला या गांधीघराणेनिष्ठ निवडणूक आयुक्तामुळे भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही.
12 Feb 2025 - 9:47 am | आग्या१९९०
निवडणूक आयोगाने भविष्यात तटस्थ रहावे असे वाटणे चुकीचे आहे का? त्यासाठी सर्वांनी प्रयत्न का करू नये?
12 Feb 2025 - 12:22 pm | श्रीगुरुजी
नक्कीच. सर्वच यंत्रणा (निवडणूक आयोग, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व संसदीय व विधिमंडळाचे सभापती व उपसभापती, . . .) तटस्थ हव्या. परंतु आजवर कधीही तसे झाले नाही. कोणत्याही पक्षाच्या राजवटीत या यंत्रणा तटस्थ नव्हत्या.
12 Feb 2025 - 12:52 pm | अमरेंद्र बाहुबली
आधी कुठल्या राज्यपालाने “हिंदुत्व सोडले का? वगैरे फुसकुल्या सोडल्या होत्या?
कोणता राष्ट्रपती फॉर्म भरायच्या वेळेस उभा होता? नी पंतप्रधान बसून होता?
कोणत्या राष्ट्रपतीने विशिष्ट पक्षाची सत्ता यावी म्हणून रात्री २ वाजता उठून सह्या करून राष्ट्रपती राजवट उठवली होती?
alआधी निदान जनाची नाहियात्र मनाची लाक तरी होती
आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!
12 Feb 2025 - 2:56 pm | मुक्त विहारि
आणीबाणी आठवा....
आणि
"आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!"
हा तर प्रचंड मनोरंजक प्रतिसाद आहे...
मग आत्ता दिल्लीत काय झाले होते? लिलाव होता की निवडणूक?