दिल्ली विधानसभा निवडणूक

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
22 Jan 2025 - 12:04 pm

दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात. जर दिल्लीत अल्पसंख्यक मतदार तेलंगना प्रमाणे कांग्रेसकडे वळविण्यात कांग्रेस नेतृत्व यशस्वी झाले असते तर आप पार्टीचे अस्तित्व बर्‍यापैकी संपविण्यास कांग्रेस यशस्वी झाली असती. पण तसा काही प्रयत्न काँग्रेसने गेल्या सहा महिन्यात केला नाही. या वेळी ही जास्तीस्जास्त 5 ते 10 जागांवर कांग्रेस लढताना दिसेल. बाकी जागांवर भाजपाची मते कापण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक यामुळेच माननीय केजरीवाल एका भाषणात म्हणाले दिल्ली निवडणूकीच्या काळात ते माननीय राहुल गांधींची निंदा करणार नाही.

आप पार्टीला दिल्लीत अल्पसंख्यक समुदायाचे समर्थन आहे. दुसर्‍या शब्दांत मतदान टक्का कितीही असला तरी मतदानपूर्वीच +10 मतांची लीड त्यांच्या पाशी आहे. दिल्लीत डीटीसी बसेस मध्ये महिलाना तिकीट घ्यायची गरज नाही. रोज किमान दहा ते पंधरा लाख महिला डीटीसी बसेस मधून प्रवास करतात. या शिवाय वीज, पाणी अनेक फ्री बी आहेत. एका वर एक बाटली फ्रीचा लाभ आप पक्षाला मिळणार. या शिवाय निवडणूकीची तैयारी कशी केली जाते हे आप पार्टी कडून शिकण्यासारखे आहे. विधानसभा निवडणूकीसाठी डिसेंबर महिन्यात आपने आपले उमेदवार जाहिर करून टाकले होते. पण अधिकान्श जागांवर तीन महीने आधीच अनौपचारिक रीतीने उमेदवार निश्चित झाले होते. त्यांनी प्रचार ही सुरू केला, विशेषकरून ज्या भागांत लोकसभेत आपला कमी मते मिळाली होती. निवडणूकीच्या घोषणे पूर्वी केलेली सेवा आचार संहितेत येत नाही. याचा लाभ आप पक्षाने पूर्णपणे घेतला. त्यात काहीही गैर नाही. बाकी आमच्या उत्तम नगर भागातील निवर्तमान विधायक बल्यान साहेब पुण्यकर्म करून तिहाड तीर्थ क्षेत्री विश्राम करत असल्याने त्यांच्या श्रीमतीला तिकीट मिळाले आहे आणि तिचा प्रचार जोरदार सुरू आहे.

भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. सध्या तरी तीच परिस्थिति दिसत आहे. लोकसभा निवडणूकी नंतर एक भाजप कार्यकर्ता मला म्हणाला होता. जर भाजपने मुख्यमंत्री चेहरा देऊन दोन महीने आधी उमेदवार घोषित केले तर भाजप विधानसभा निवडणूक जिंकू शकते. पक्षाचा उमेदवारला विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागातील प्रधानांना, छूटभैये नेत्यांना पक्षाशी पुन्हा जोडायचे असेल तर एवढा वेळ पाहिजे. पण भाजप ने मुख्यमंत्रीचा चेहरा ही दिला नाही आणि नॉमिनेशन सुरू झाले तरीही भाजपचे सर्व उमेदवार निश्चित झाले नव्हते. अनेकांना वाटते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा दिल्ली जिंकण्याची नाही. बहुतेक विधानसभेत आप आणि लोकसभेत भाजपा हे समीकरण भाजप शीर्ष नेतृत्वाला जास्त योग्य वाटते. भाजप विधानसभा जिंकली तर कांग्रेस दिल्लीत पुन्हा प्रबळ होईल. बहुतेक भाजपला ते नको. भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल. भाजप नेतृत्वाला नाही.

समाजविचार

प्रतिक्रिया

भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल... सहमत आहे...

माझ्या मते.. केजरीवाल यायची शक्यता जास्त आहे..

काहीही झाले तरी भाजपाला मत देणारे पण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. हा भाजपाचा एकनिष्ठ एकगठ्ठा मतदार वर्ग आहे. बाकी Freeship तर प्रत्येक पक्ष offer करत आहे. मतदार सुजाण कमी आणि भावनिक जास्त आहेत.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2025 - 2:49 pm | श्रीगुरुजी

भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार.

आआपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अवघड आहे. भाजपच्या जागा ७ वरून नक्की वाढतील, पण ३६ पर्यंत जाण्याची शक्यता खूप कमी वाटते. अर्थात आआप हरून भाजपला बहुमत मिळावे हीच इच्छा आहे.

भविष्यात रेवड्या वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षापेक्षा वर्तमानात रेवड्या वाटणारा पक्ष मतदारांना अधिक जवळचा वाटतो हे कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2025 - 7:36 pm | श्रीगुरुजी

बहुसंख्य संस्थांनी मतदानोत्तर चाचणी घेऊन भाजपला साधे बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकाद्वारे १२ लाखापर्यंत उत्पन्न असल्यास ते आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ भाजपला कितपत मिळाला हे परवा समजेल. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा भाजपला भरभरून लाभ मिळाला. तसाच लाभ दिल्लीतही मिळेल का हा विविध पक्षांचा औत्सुक्याचा विषय असणार.

विवेकपटाईत's picture

6 Feb 2025 - 9:18 pm | विवेकपटाईत

दिल्लीत झालेल्या मतदानात. अल्पसंख्यक समुदायाने 80 टक्के मतदान केले आहे. दुसरीकडे 48% हिंदू घरातच बसून राहिला आहे. जर एक्सिट पोलवाल्यांनी अल्पसंख्यक मतांना २२-२५% वेटेज दिले नसेल तर सर्वांचे अंदाज चुकतील. निवडणूक जिंकण्यासाठी आप पार्टीला हिंदूंच्या तीन पैकी फक्त एका मताची गरज आहे. अल्पसंख्यक समुदाय किमान 65 जागांवर आप प्रति एकनिष्ठ आहे. काँग्रेस पार्टी भाजप चे मत खाणार.
बाकी केल्या दहा वर्षात दिल्लीत दारूची दुकाने दुप्पट झाली आहे. दिल्लीची जनसंख्या एक कोटी होऊन जास्त वाढली असली तरी सुद्धा दिल्लीत सरकारी शाळा पहिले पेक्षा कमी झाल्या आहेत. डीटीसी असो जलबोर्ड असो वीज कंपन्या असो सर्वच भयंकर तोट्यात आहे. आयुष्यमान योजना ही दिल्लीत नाही. शीला दीक्षित च्या काळात निर्मित झालेले हॉस्पिटल मध्ये आयपीडी अजूनही पूर्णपणे सुरू झाल्या नाही. नवीन बनविण्याचा प्रश्नच येत नाही. मध्यवर्ग मोठ्या प्रमाणात दिल्ली सोडून गुडगाव आणि नोयेदा नोयेडा येथे शिफ्ट होत आहे. माझे बहुतेक दिल्लीतले हे शेवटचे मतदान.

बाकी दिल्लीची ७५ टक्के जनता आणि ती अनिधीकृत कॉलोनीच मध्ये राहते. अधिकांश कॉलनीमध्ये पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. साफसफाई खराब गल्या, नाले सफाई इत्यादीमुळे भाजपाचा काही जागा निश्चित वाढतो.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2025 - 10:56 pm | श्रीगुरुजी

Axis India exit poll
Axis India Exit Poll
________________________________

Other exit polls
Other exit polls
_________________________________

अजून काही अंदाज -

चाणक्य स्ट्रॅटेजी - भाजप (३९-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (२-३)

पोल डायरी - भाजप (४२-५०), आआप (१८-२५), कॉंग्रेस व इतर (०-२)

पीपल्स इनसाइट - भाजप (४०-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (०-१)