असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.
डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे...
=============
कल्पकता
======
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था!
आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते.
प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्यात येत नाही.
मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे.
रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे.
चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो.
मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला.
पण आता बातम्या येत आहेत की,
- परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत.
- आज ही बातमी वाचली
IMF lifts China's 2024 growth forecast to 5%
"China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures".
(https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...)
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...
===================
टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.
प्रतिक्रिया
28 Jan 2025 - 6:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हेराफेरीमधील डायलॉग उधार घेउन विचारते- तुम्हारा नक्की समस्या क्या है ? कल्पकता, रेशीमबाग की ए आय?
भारतात कल्पकता निर्माण होणे शक्य नाही म्हणता, मग सत्तेवर रेशीमबाग असो की लालबाग असो. बरोबर ना ?
28 Jan 2025 - 7:29 pm | श्रीगुरुजी
बरोबर ओळखलंस गं माईडे. खरी समस्या कल्पकता, कृत्रिम बुद्धिमत्ता, चीनची भरारी, अमेरिकेला दणका वगैरे नसून रेशीमबाग ही समस्या आहे व मनातील संघविरोधातील गरळ ओकण्यासाठीच लेखन केले आहे.
28 Jan 2025 - 6:39 pm | वामन देशमुख
इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता येण्यावरुन विद्वत्ता मोजण्याची कसोटी रोचक आपलं ते हे कल्पक आहे. बाकी चालू द्या.
---
जगाला पोखरणाऱ्या डाव्या वाळवीची आठवण झाली.
28 Jan 2025 - 7:25 pm | युयुत्सु
माझा सध्या प्रॉब्लेम एकच - बिलबाबा ची नवी भविष्यवाणी - https://economictimes.indiatimes.com/news/international/global-trends/an...
आजपासून ४-५ वर्षानी नवी महामारी येणार तेव्हा लोकसंख्या वाढलेली असेलच पण तेव्हाचं सरकार कसं असेल, याची चिंता जास्त...
29 Jan 2025 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे राम...!
बाय द वे, डीपसीक इन्स्टॉल केले. आज सर्वच दैनिकांनी चीनच्या डिपसीकबद्दल चर्चा केली आहे कौतुक केलं आहे. डीपसीकमुळे 'बाजार गडगडला' पासून ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या 'डीपसीक हा अमेरिकेतील कंपन्यांसाठी इशारा आहे' वगैरे पर्यंत गवगवा झाला आहे. डीपसीकच्या संस्थापकाचं कौतुक वाटलं. जगाशी भिडण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. व्हीजन सत्तेचाळीस आणि प्रयागातील डुबक्यांमुळे असं एखादं तरी, असं यश मिळावं अशी गंगा, यमुना, सरस्वतीकडे प्रार्थना करतो.
-दिलीप बिरुटे
29 Jan 2025 - 11:57 am | चौथा कोनाडा
अति सीक प्रतिमापुजक, मुर्ती पुजक यांनी या निमित्ताने आता गंगासंगमात डीप बुडी मारावी.
पुढील भविष्य फक्त कल्पक राष्ट्रजनांचेच आहे ... तेथे "हमारे पास पैलेसेही हैं" अश्या फुशारक्या मारणार्या पुजापाठहोमयज्ञमंत्रस्त्रोत्रपोर्णिमाअमावस्या असल्या लोकांचे काम नोहे !
29 Jan 2025 - 12:37 pm | वामन देशमुख
शाळा-कॉलेज-विद्यापीठांमध्ये भरती झालेली गोबरवादी शिक्षक मंडळी अध्ययन अध्यापन संशोधन हे सोडून भलतीच कामे करत असतील तर त्यांनी उत्पादन केलेले दुय्यम दर्जाचे विद्यार्थी पुढे जाऊन काय दिवे लावू शकणार?
आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार?
29 Jan 2025 - 12:46 pm | वामन देशमुख
अरेच्चा! इतक्यावरच थांबलात?
अच्छा, मनुवादी, फॅसिस्ट, पितृसत्ताक, सनातनी, बहुसंख्यवादी, अंध भक्त, मूक भक्त, बधीर भक्त, दिव्यांग भक्त हे सगळं प्रतिसादांमधून येणार आहे का?
29 Jan 2025 - 2:38 pm | धर्मराजमुटके
मुळात भारतात कल्पकतेची वानवा नाही. आता हा लेखच पहा, एक ए आय टूल आणि संघ यांचा किती कल्पकतेने मेळ घातला आहे. ते एक असोच.
मी डीपसिक ला प्रश्न विचारला की डीपसिक वर चीनी सरकारचे नियंत्रण आहे काय ? तर त्याने बराच वेळ लाऊन उत्तर दिले की ही एक चीनी कंपनी आहे. अधिक माहितीसाठी त्यांचे अधिकृत संकेतस्थळ पहा. म्हणजे प्रश्नाला बगल देण्याची जी कल्पकता आहे त्याने मी अगदी चाट पडलो.
:)
29 Jan 2025 - 3:16 pm | युयुत्सु
कल्पकतेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण म्ह० "वेगळा विचार" करायची क्षमता! ही क्षमता चिनी लोकांमध्ये पदोपदी अगदी साध्यासाध्या गोष्टीत दिसते. याला शतकानुशतके उत्तेजन मिळाल्याने आज त्यांच्याकडे ’गुणशाही’ (मेरीटोक्रसी) व्यवस्थित रुजली आहे.
आपल्याकडे वेगळा विचार करण्यास उत्तेजन देण्य़ाऐवजी व्यवस्थेशी जुळवून घेण्यास उत्तेजन दिले जाते. नवीन कल्पनांचे राजकीय परिणाम तपासून मग त्यांची योग्यता ठरते. २०१४ नंतर जे झालं आहे ते फारच जुजबी आहे. ते आवश्यक होते पण पुरेसे नाही. कल्पकतेच्या जागतिक क्रमवारीत आपण फक्त ४० व्या स्थानी आहोत (https://www.wipo.int/.../global.../en/gii-2024-results.html
)
कल्पकता जगात सर्वत्र आढळते, पण ती उपयोगात आणण्यासाठी काही केले जात आहे असे वाटत नाही. आफ्रिका कदाचित जगात सर्वात श्रीमंत प्रदेश असेल पण केव्हा? त्यांनी जमिनीखालचे सोने, जडजवाहिर बाहेर काढले तरच. भारतीयांनी पण त्यांचे अनावश्यक सोने जर विद्यापीठांच्या उत्कर्षासाठी वापरले तर इथे पण वेगळे चित्र दिसेल...
श्रेयलंपटपणा हे आपल्या पिछाडीचे आणखी एक कारण आहे.
29 Jan 2025 - 2:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
जिज्ञासू व्रुत्ती आणि कल्पकतेचा अभाव भारतात प्रामुख्याने विज्ञान/गणित/अभियांत्रिकीत पुर्वापार आहे. प्रचलित,लोकप्रिय विचारधारेशी/राजकीय प्रणालीशी त्याचा संबंध नाही. गेले २५/३० वर्षे चीनकडुन सादर केल्या जाणार्या पेटंटची संख्या पाहिली तर चीन आपल्या खूप पुढे आहे.

आणी चीनमध्ये तर कम्युनिस्ट विचारधारा आहे. "गप्प बसा संस्कृती' मग कसे काय हे शक्य होते?
29 Jan 2025 - 3:07 pm | युयुत्सु
<आणी चीनमध्ये तर कम्युनिस्ट विचारधारा आहे. "गप्प बसा संस्कृती' मग कसे काय हे शक्य होते?>
कारण चीनमध्ये गुणशाही (मेरीटोक्रसी) आहे. त्यांच्याकडे लहानपणा पासून जीवनाच्या प्रत्येक कोप-यात गुणवत्ता रूजवली जाते यावर मला सविस्तर लिहायचे आहे. चीनी लोक जनुकीय दृष्ट्या एक श्रेष्ठ वंश म्हणून का उत्क्रांत झाले असावेत या बद्दल माझी मते लवकरच मांडेन
29 Jan 2025 - 3:27 pm | युयुत्सु
29 Jan 2025 - 3:28 pm | युयुत्सु
भारत चीनची बरोबरी का करू शकणार नाही याचे परखड विश्लेषण
https://www.youtube.com/watch?v=zrFWHAyI2W0
29 Jan 2025 - 6:25 pm | अमरेंद्र बाहुबली
लेख आवडला! प्रतिक्रियात काही लोकांचा असा होरा दिसतोय की भारत अप्रगत आहे मान्य पण आमच्या श्रद्धास्थानाना दोष देऊ नका! हे म्हणजे बकरी मरतेय मान्य पण खाटकाला दोष देऊ नका म्हणण्यासारखे आहे. असो. आपल्या देशाने बरीच संकटे झेललीत हे संकटही जाऊन चांगले सरकार येईल नी कल्पकतेला वाव मिळेल अशी अपेक्षा ठेऊयात.
29 Jan 2025 - 6:33 pm | श्रीगुरुजी
कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे कल्पकता नाही?
"भारतीय लोकांकडे कल्पकता नाही" ही मेलेली बकरी आणि संघ हा खाटीक ही अफाट कल्पनेची भरारी एका तरी चिन्याला सुचली असती का?
29 Jan 2025 - 6:46 pm | युयुत्सु
<कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे कल्पकता नाही?>
भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत, त्यावर संघाच्या एकाही चिंतन शिबिरात विचार होऊ शकला नाही आणि प्रभावी उपाय शोधला गेला नाही हे "कल्पकता नाही" याचे प्रातिनिधीक उदा० आहे.
29 Jan 2025 - 6:54 pm | श्रीगुरुजी
संघाच्या किती चिंतन शिबिरात उपस्थित होता आपण? इतर कोणत्या भारतीय सरकारी/असरकारी संस्थामध्ये हा विषय चर्चिला गेला आहे?
30 Jan 2025 - 9:28 am | युयुत्सु
संघ कार्यकर्ते दिशाभूल करणे आणि गोलपोस्ट सतत हलवत राहणे यात कसे हूशार असतात याचे हे नमूनेदार उदाहरण आहे.
मी चिंतन शिबीराला उपस्थित होतो की नाही याला महत्त्व नाही, संघाने ’सोन्यातील अनुत्पादक गुंतवणूक’ या गंभीर प्रश्नावर किती ठाम आणि जाहिर भूमिका घेतली, किती प्रबोधन केले याला महत्त्व आहे.
30 Jan 2025 - 9:57 am | श्रीगुरुजी
आपण संघशिबिरांचा उल्लेख केला म्हणून विचारले की आपण संघशिबिरात उपस्थित असता का?
सोन्यातील अनुत्पादक गुंतवणूक या विषयावर संघ वगळता इतर कोणी काय भूमिका घेतली आहे?
संघ का स्थापन झाला, संघाचे कार्य काय, संघ कोणत्या क्षेत्रात काम करतो याची आपणास माहिती आहे का?
30 Jan 2025 - 10:21 am | युयुत्सु
राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनं
अभ्युत्थानाय हिंदुनामयं पंथ: प्रवर्तित:।
असे कुठेतरी हेडगेवारांच्या छायाचित्राखाली वाचल्याचे स्मरते. सोन्यातील निर्बुद्ध गुंतवणुकीचा आणि हिंदुंच्या अभ्युत्थानाचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका असल्यास तसे जाहिर करावे.
30 Jan 2025 - 1:05 pm | श्रीगुरुजी
सोन्यातील गुंतवणूक निर्बुद्ध आहे व सोन्यातील गुंतवणूक काढून घेतल्यास हिंदूंचे अभ्युत्थान होईल हे दोन्ही मुद्दे सिद्ध करावे ही नम्र विनंती.
30 Jan 2025 - 3:23 pm | युयुत्सु
श्रीगुरुजी,
तुमच्या फोनवर व्हॉट्स अप मध्ये मेटा एआय असेल. त्यावर Why investment in gold is stupid? असा प्रश्न टंकावा. असे उत्तर मिळेल-
A provocative question! While gold has been a traditional store of value and a popular investment option, there are some arguments against investing in gold. Here are a few reasons why some people might consider investing in gold "stupid":
1. No dividends or interest: Unlike stocks or bonds, gold doesn't generate any income or dividends. You won't earn any interest on your gold investment, which means you're relying solely on price appreciation.
2. No growth potential: Gold is a commodity, and its value is largely driven by supply and demand. Unlike companies, which can grow and expand, gold's value is relatively static. You're not investing in a business or economy that can grow and compound over time.
3. High storage and maintenance costs: Physical gold requires secure storage, which can be expensive. You may need to pay for a safe deposit box, insurance, or other security measures to protect your investment.
4. Illiquidity: While gold is a widely recognized and traded commodity, it can be difficult to sell quickly or at a fair price, especially if you're holding physical gold.
5. No intrinsic value: Unlike some other investments, gold has no intrinsic value beyond its aesthetic appeal and industrial uses. Its value is largely driven by sentiment, speculation, and historical significance.
6. Volatility: Gold prices can be volatile, and market fluctuations can result in significant losses if you buy at the wrong time.
7. Opportunity cost: Investing in gold means tying up your money in a relatively unproductive asset. You might be missing out on other investment opportunities that could provide higher returns or growth potential.
8. Counterfeiting and authenticity risks: When buying physical gold, there's a risk of counterfeiting or authenticity issues, which can be difficult to verify.
9. Tax inefficiency: In some countries, gold investments may be subject to capital gains taxes, which can reduce your returns.
10. Lack of transparency: The gold market can be opaque, making it difficult to determine the true value of your investment or the fees associated with buying and selling gold.
It's essential to note that these arguments don't necessarily mean investing in gold is always "stupid." Gold can still be a valuable addition to a diversified investment portfolio, particularly as a hedge against inflation, currency fluctuations, or market volatility.
Before making any investment decisions, it's crucial to assess your individual financial goals, risk tolerance, and circumstances. It's also essential to consult with a financial advisor or conduct your own research to determine the best investment strategy for your needs.
Would you like to discuss alternative investment options or explore the potential benefits of investing in gold?
30 Jan 2025 - 4:23 pm | श्रीगुरुजी
भारतात कल्पकता का नाही हा प्रश्न, तसेच संघासंबधी सर्व प्रश्न असेच AI ला विचारावे.
29 Jan 2025 - 7:46 pm | आग्या१९९०
संघाचे माहीत नाही, परंतु सरकारने ' सुवर्ण रोखे ' योजना सुरू करून ह्याबाबत आपण जागरूक आहोत हे दाखवून दिले. लेखातील मुद्यांवर सहमत.
30 Jan 2025 - 12:51 pm | टर्मीनेटर
तुमचा तो मंदबुद्धी संघोटा (माजी) मित्र, संघ, आणि त्यांची चिंतन शिबिरे वगैरे चुलीत जाऊ देत, त्यात मला स्वारस्य नाही, पण "भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत" ह्या आपल्या वरील मत / निष्कर्षावर आपण ठाम आहात का? हे तपासून घ्यायला आवडेल.
जर वरील मत / निष्कर्षावर तुमची अढळ श्रद्धा असेल तर तुमच्यासमोर मी (खालीलप्रमाणे) दोन प्रस्ताव ठेवतो. त्या दोनपैकी कुठलाही एक प्रस्ताव मान्य केलात तरी तुमच्यासाठी विन-विन सिच्युएशन आहे!
वरील दोनपैकी आपण कुठला प्रस्ताव स्वीकारताय हे जाणून घेण्यास अधीर झालो आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले उत्तर कळवावे अशी णम्र इनंती...
स्वगत: अन्नाऐवजी नियमितपणे सकाळी न्याहारीला 'दास कॅपिटल'ची चार पाने, दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनात अनुक्रमे १५-२० पाने छान चावून चावून खाल्ली कि मेंदू मस्तपैकी बधिर होऊन प्रत्यक्ष जीवनात आणि व्यावहारिक पातळीवर न टिकणाऱ्या एकसे एक भन्नाट अर्थशास्त्रीय कल्पना सुचायला लागलेला माणूस स्वतःला 'बुद्धीमंत', 'ज्ञानी' वगैरे समजायला लागतो म्हणे! सुचेनात का, अशा 'ज्ञानी' लोकांचे विचार पटून काही 'बकरे' स्वतःहून हलाल व्हायला तयार होणार असतील तर आमच्यासारख्या 'कॅपिटलिस्ट' लोकांच्या ते पथ्यावरच पडणार असल्याने प्रस्ताव द्यायला आपल्या बापाचे काय जाते? कुठलाही स्वीकारला तरी अपनी तो "पांचो उंगलीया घी में और सिर कढाईमे" ही होगा ना... 😂
30 Jan 2025 - 1:05 pm | कर्नलतपस्वी
आपल्याला ऑफर आली तर मलाही सांगा. मला नातीच्या लग्नासाठी थोडेफार सोने घ्यावे म्हणतो.
तसेच सरकारला पण सांगू की तुम्ही जो सोन्याचा साठा देशात व परदेशात साठवला आहे तो पण काढून टाका म्हण्जे सरकारचे,पर्यायाने करदात्यांचे बरेच पैसे वाचतील.
30 Jan 2025 - 2:36 pm | युयुत्सु
श्री० टर्मीनेटर यांस,
नमो नमः|
तुम्ही मला कोंडीत पकडण्यासाठी जी शक्कल लढवली आहे, ती कौतुकास्पद आहे. पण त्यात एक गोची झाली आहे-
आता बघा माझ्या सुदैवाने माझ्या आईवडीलांना सोन्याचे आकर्षण नव्हते, त्याशिवाय सोन्यातील गुंतवणुकीवर कोणताही परतावा (रीटर्न) मिळत नाही, हे सत्य त्यांना माहित असल्याने त्यांनी सोन्याचांदीत कधीच गुंतवणूक केली नाही. त्यांनी गुंतवणूक केली ती दूरदृष्टीने चांगल्या उद्योगांमध्ये ...
माझ्या पत्नीने दुबईत एका बॅंकेत "गोल्ड ब्रांच" मध्ये नोकरी केलेली असल्याने तिचे पण सोनं बघून डोळे विटलेले आहेत. साहजिक आमच्या मुलीला पण सोन्याचे आकर्षण नाही.
आता राहता राहिला मुद्दा आमच्याकडे जे काही किडूकमिडूक ठेवले आहे ते केवळ त्याचे ऐतिहासिक आणि भावनिक मूल्याबद्दल...
उदा० माझ्या कडे एक १किलो वजनाचे चांदीचे ताट आहे, ते ताट माझ्या आईने तिच्या स्वत:च्या पगारातून आजीआजोबांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला भेट दिले असा त्यावर उल्लेख आहे. माझ्या आजीला आईच्या भेटीचे खूप अप्रूप होते. आजीने ते ताट माझी आई निवर्तल्यावर त्याच्या आठवणींसह माझ्याकडे ते सन्मानपूर्वक दिले.
अशा भावनिक महत्त्व असलेल्या वस्तूना मी तुम्ही ठरवलेली किंमत लावून गमवायला मी मूर्ख नाही. तेव्हा पुढच्या वेळेला मला कोंडीत पकडताना दहा वेळा विचार करा...
30 Jan 2025 - 1:00 pm | विजुभाऊ
भारतीय लोकांच्या कल्पकतेमधे सर्वात मोठा अडसर असेल तर आपल्या युनिव्हर्सिट्या.
दर वर्षी किमान पाच सहा हजार लोक पी एच डी करत असतील. पण हे सर्व संशोधन रद्दीत जाते.
किंवा सिनिओरिटीच्या नावाखाली दडपले जाते
30 Jan 2025 - 3:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
खरे आहे पण विज्ञान्/गणित /अभियांत्रीकी ह्यांत आपण ७५ वर्षात नविन्/भरघोस अशी भर घातली नाही. अनेक कारणे आहेत. संशोधन करण्यासाठी लागणारी मानसिकता आपल्या समाजात नाही हे मुख्य कारण. पण कला,चित्रकला, पाकक्रुती,संगीत अशा अनेक शाखांमध्ये ती नक्कीच आहे.
भाषांचेच उदाहरण घ्या, ३०हुन अधिक अधिकृत भाषा भारतात आहेत. किती जण मातृभाषा/इंग्रजी पलिकडे नविन भारतिय भाषा शिकायचा प्रयत्न करतात ?
30 Jan 2025 - 3:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
२००३/२००४ च्या आसपास सोन्याचा दर ६५०० रुपये होता. आता ८०,००० च्या वर आहे. सोन्यात गुंतवणूक करा/गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणुक करा असे तज्ञच सांगत असतात.
"वर संघाच्या एकाही चिंतन शिबिरात विचार होऊ शकला नाही"
संघाने कशाला हे सांगायला हवे? ज्यांना सोन्यात गुंतवणुक फायदेशीर वाटत नाही त्यानी म्युच्युल फंड वगैरे ईतरत्र गुंतवणुक करावी.
ते डीप सीक हे एल एल एम आहे, विशाल भाषा प्रतिक्रुती म्हणजेच एक न्युरल नेटवर्क आहे एवढी माहिती मिळाली. जसे जी पी टी आहे. हळूहळू अभ्यास करत जाउया एकडेच.
30 Jan 2025 - 3:27 pm | युयुत्सु
A provocative question! While gold has been a traditional store of value and a popular investment option, there are some arguments against investing in gold. Here are a few reasons why some people might consider investing in gold "stupid":
1. No dividends or interest: Unlike stocks or bonds, gold doesn't generate any income or dividends. You won't earn any interest on your gold investment, which means you're relying solely on price appreciation.
2. No growth potential: Gold is a commodity, and its value is largely driven by supply and demand. Unlike companies, which can grow and expand, gold's value is relatively static. You're not investing in a business or economy that can grow and compound over time.
3. High storage and maintenance costs: Physical gold requires secure storage, which can be expensive. You may need to pay for a safe deposit box, insurance, or other security measures to protect your investment.
4. Illiquidity: While gold is a widely recognized and traded commodity, it can be difficult to sell quickly or at a fair price, especially if you're holding physical gold.
5. No intrinsic value: Unlike some other investments, gold has no intrinsic value beyond its aesthetic appeal and industrial uses. Its value is largely driven by sentiment, speculation, and historical significance.
6. Volatility: Gold prices can be volatile, and market fluctuations can result in significant losses if you buy at the wrong time.
7. Opportunity cost: Investing in gold means tying up your money in a relatively unproductive asset. You might be missing out on other investment opportunities that could provide higher returns or growth potential.
8. Counterfeiting and authenticity risks: When buying physical gold, there's a risk of counterfeiting or authenticity issues, which can be difficult to verify.
9. Tax inefficiency: In some countries, gold investments may be subject to capital gains taxes, which can reduce your returns.
10. Lack of transparency: The gold market can be opaque, making it difficult to determine the true value of your investment or the fees associated with buying and selling gold.
It's essential to note that these arguments don't necessarily mean investing in gold is always "stupid." Gold can still be a valuable addition to a diversified investment portfolio, particularly as a hedge against inflation, currency fluctuations, or market volatility.
Before making any investment decisions, it's crucial to assess your individual financial goals, risk tolerance, and circumstances. It's also essential to consult with a financial advisor or conduct your own research to determine the best investment strategy for your needs.
Would you like to discuss alternative investment options or explore the potential benefits of investing in gold?
30 Jan 2025 - 4:56 pm | अनन्त अवधुत
सोन्यात गुंतवणूक का करावी या बद्दल मेटा एआयचे मत खाली दिले आहे. ह्यातले काही मुद्दे तुम्हाला दिलेल्या उत्तराच्या विरोधी आहेत.
अर्थात प्रश्न विचारताना कल्पकता लागते. बाकी ज्याचे त्याचे दुराग्रह.
प्रश्नः Why to invest in gold?
Here are the top reasons to invest in gold:
# 1. Hedge Against Inflation and Currency Devaluation
Gold tends to increase in value when inflation rises or currencies depreciate.
# 2. Diversification and Risk Management
Gold's performance is often uncorrelated with other assets, making it an excellent addition to a diversified portfolio.
# 3. Store of Value and Wealth Preservation
Gold has historically maintained its purchasing power over time, making it a reliable store of value.
# 4. Safe-Haven Asset
Gold is often sought after during times of economic stress, geopolitical tensions, or market volatility.
# 5. Limited Supply and Increasing Demand
The total amount of gold in existence is limited, and demand from central banks, investors, and industries is increasing.
# 6. Tangible Asset with No Counterparty Risk
Gold is a physical asset that is not dependent on any institution or government, reducing counterparty risk.
# 7. Long-Term Growth Potential
Gold has historically provided long-term growth opportunities, making it a popular choice for investors.
# 8. Protection Against Market Volatility
Gold's value can help offset losses in other assets during market downturns.
# 9. Easy to Invest
Gold can be invested in through physical gold, ETFs, mining stocks, mutual funds, and more.
# 10. Liquidity
Gold is widely recognized and easily convertible to cash, making it a liquid asset.
Before investing in gold, consider your financial goals, risk tolerance, and overall investment strategy. It's essential to consult with a financial advisor or conduct your own research.
30 Jan 2025 - 6:06 pm | युयुत्सु
कोणताही शहाणा गुंतवणूक सल्लागार एकूण गुंतवणूकीच्या ५ ते १०% पेक्षा जास्त गुंतवणूक सोन्यात असू नये असं सांगतात. मला आता नाव आठवत नाही पण माझे एक आवडते ते आणि इतर अनेक गुंतवणूक तज्ञ असं नेहेमी म्हणतात की,
"सोन्यात पैसे टाकून तुम्हाला कधीही श्रीमंत होता येत नाही, पण तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला सोने विकत घेता येते."
याचा अर्थ ज्याला जेव्हा समजेला त्याला तेव्हा आर्थिक मोक्ष नक्की प्राप्त होतो.
31 Jan 2025 - 1:49 am | अनन्त अवधुत
मतितार्थ इतकाच कि एआय तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देते.
तुम्ही सोन्यातल्या गुंतवणूकीला मुर्खपणा म्हणालात, एआय ने तुमचा समज बळकट होईल असेच उत्तर दिले.
मी गरज विचारली तर मला तसे उत्तर मिळाले.
सोन्यातली वा इतर कोठलीही गुंतवणूक ही ज्याच्या त्याच्या जोखीम घेण्याची क्षमतेवर, उपलब्ध संधी, संसाधने, आणि लक्ष्य यावर अवलंबून असते.
बाकी धाग्याचा विषय (टायटल) कल्पकता आहे, त्यामुळे अवांतर प्रतिसाद आवरतो.
31 Jan 2025 - 9:19 am | युयुत्सु
मिपावरच्या अशा चर्चातून लोकमानसात ए०आय० सारख्या तंत्रज्ञानाबद्दलची मते काय आहेत, हे समजायला मदत होते. "ए०आय० तुम्हाला हवं तसं सांगतो" या समजूती मागचं खरं वास्तव "ए०आय० तुम्हाला सर्व बाजूनी मुद्देसूद उत्तरे देतो" हे आहे. या गुणाला लोक अवगुण मानत असतील तर या तंत्रज्ञानामुळे नवविषमता का निर्माण होईल हे समजते.
Where does gold stand in different investment options for a common man? असा प्रश्न विचारून बघा. सोन्याचे गुंतवणूकीतले नेमके स्थान कळेल.
जाता जाता: चीनने ए०आय० सार्वजनिक केल्याने भारत सरकार खडबडून जागे झाल्याने अंमळ मौज वाटली आणि २७ वर्षांपूर्वी रविवार सकाळ मध्ये मीच लिहिलेल्या कथेची आठवण झाली.
https://www.misalpav.com/node/9295
31 Jan 2025 - 9:43 am | श्रीगुरुजी
हा लेख एआय संदर्भात होता का?
31 Jan 2025 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डीपसीक वरील गर्दी आणि कुंभमेळ्यातील गर्दी यांचा तुलनात्मक अभ्यासाचा होता.
लागा कामाला आता. =))
-दिलीप बिरुटे
31 Jan 2025 - 10:21 am | युयुत्सु
हा हा हा हा!
31 Jan 2025 - 10:36 am | अमरेंद्र बाहुबली
डीपसीक वरील गर्दी आणि कुंभमेळ्यातील गर्दी यांचा तुलनात्मक अभ्यासाचा होता.
:)31 Jan 2025 - 1:10 pm | श्रीगुरुजी
आणलाच कुंभमेळा शेवटी. अर्थात हे अपेक्षितच आहे. इतकी अफाट कल्पनाशक्ती दुसऱ्या कोणाकडे असणार. चालू दे.
1 Feb 2025 - 9:25 am | अनन्त अवधुत
गणित आणि विज्ञान ऑप्शनला टा़कले की अशी तुलना अॅप्पल अँड ऑरेंजेस तुलना सुचते.
31 Jan 2025 - 11:20 am | अनन्त अवधुत
तुम्ही एआय ला विचारलेला प्रश्न तुमच्या पूर्वग्रहाला अनुसरून होता. मी त्याच्या विरोधातला प्रश्न विचारून विरुद्ध उत्तर त्याच एआय मॉडेल कडून मिळवले. आपण दोघांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली कि "ए०आय० तुम्हाला हवं तसं सांगतो" ह्याचा योग्य अर्थ कळेल.
"Where does gold stand in different investment options for a common man?" इतके अवघड न करता, "टेल मी प्रोज अँड कॉन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड" असे विचारले तरी आपल्याला सोन्यातल्या गुंतवणूकीचा विचार करावा लागेल इतके मुद्देसूद उत्तर (दोन्ही बाजुने) मिळते.
एआयकडून योग्य उत्तर मिळण्यासाठी कसे प्रश्न विचारावे हा एक कल्पक विषय आहे, त्याला प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग असे म्हणतात.
31 Jan 2025 - 11:29 am | युयुत्सु
मी जो प्रश्न विचारला आहे तो अतिशय विचारपूर्वक विचारला आहे. त्याच्या उत्तरात मला सोने या गुंतवणूक पर्यायाच्या श्रेणी विषयी माहिती मिळते. मला फक्त फायदे आणि तोट्यांची चर्चा अपेक्षित नाही.
31 Jan 2025 - 12:10 pm | अनन्त अवधुत
इथे डकवता का?
31 Jan 2025 - 12:36 pm | युयुत्सु
As a common man, you have various investment options to choose from, each with its unique characteristics, benefits, and risks. Here's a simplified ranking of investment options, considering factors like risk, return, liquidity, and ease of investment:
*Low-Risk Investments*
1. *High-Yield Savings Account*: Liquid, low-risk, and easily accessible.
2. *Fixed Deposits (FDs)*: Low-risk, fixed returns, and relatively liquid.
3. *Government Bonds*: Low-risk, fixed returns, and relatively liquid.
*Moderate-Risk Investments*
1. *Gold*: Relatively low-risk, potential for long-term appreciation, and easily investible through gold ETFs or physical gold.
2. *Debt Mutual Funds*: Moderate risk, relatively stable returns, and easy to invest.
3. *Real Estate Investment Trusts (REITs)*: Moderate risk, potential for rental income and capital appreciation.
*Higher-Risk Investments*
1. *Stocks*: Higher risk, potential for high returns, and relatively liquid.
2. *Equity Mutual Funds*: Higher risk, potential for high returns, and easy to invest.
3. *Peer-to-Peer Lending*: Higher risk, potential for high returns, but relatively illiquid.
*Alternative Investments*
1. *Cryptocurrencies*: High-risk, high-potential returns, but highly volatile.
2. *Commodities*: High-risk, potential for high returns, but subject to market fluctuations.
Considering these options, gold stands out as a relatively low-risk investment with potential for long-term appreciation. It's easily investible through gold ETFs or physical gold, making it accessible to common investors.
When allocating your investment portfolio, consider the following:
1. *Diversification*: Spread your investments across different asset classes to minimize risk.
2. *Risk tolerance*: Invest according to your comfort level with risk.
3. *Financial goals*: Align your investments with your short-term and long-term goals.
4. *Time horizon*: Invest for the long-term to ride out market fluctuations.
Remember, investing always involves some level of risk. It's essential to educate yourself, set clear financial goals, and consult with a financial advisor if needed.
31 Jan 2025 - 12:57 pm | अनन्त अवधुत
हा तुमचा प्रश्न, पण उत्तरात सोन्याला मॉडरेट जोखीम म्हणून एकाच शब्दात बोळवण केली आहे एआयने. जेव्हा कि तुमच्याच म्हणण्यानुसार "ए०आय० तुम्हाला सर्व बाजूनी मुद्देसूद उत्तरे देतो" पण इथे एआय सोन्यातल्या गुंतवणूकीला मूर्खपणा म्हटले नाही, तोटे सांगितले नाहीत. उलट गुंतवणूक का करावी असे सांगितले आहे.
प्रश्न पाहिला तर सोन्याच्या गुंतवणूकी संदर्भात अधिकची चर्चा अपेक्षित होती. फायदे, तोटे, गुंतवणूकिचे पर्याय वगैरे तपशिल पण असायला हवा होता.
एआय ने तुम्हाला गंडवले आहे,
31 Jan 2025 - 2:10 pm | चंद्रसूर्यकुमार
कुठच्याही प्रकारची गुंतवणुक सदासर्वकाळ चांगली किंवा सदासर्वकाळ वाईट नसते. आपण कोणत्या वेळेस विकत घेतो यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात. उदाहरणार्थ बजाज फायनान्सच्या शेअरने २०१५ ते २०२१ या काळात चांगला २० पटींनी परतावा दिला पण गेले साडेतीन वर्षे तो साईडवेज जात आहे. २०१५ मध्ये त्या शेअरमध्ये शिरणे हा खूपच शहाणपणाचा निर्णय होता पण २०२२-२३ मध्ये शिरल्यास फारसा परतावा मिळणार नाही- कदाचित नुकसानच होईल.

तीच गोष्ट सोन्याची. २००० मध्ये २६० डॉलर/औंस असलेले सोने आता २८०० च्या घरात आहे. त्यातही २०११ ते २०२२ या काळात सोन्यात शिरणे हा फारसा शहाणपणाचा निर्णय नव्हता- कदाचित २०१५ च्या सगळ्यात खालच्या पातळीला शिरणे ठीक होते पण त्या दशकात नंतर कधी शिरणे हा शहाणपणाचा निर्णय नव्हता. पण २०२२ च्या शेवटापासून आतापर्यंत सोन्यानेही चांगलाच परतावा दिला आहे.

अगदी डाऊनट्रेंड मध्ये असलेले गधे शेअर्ससुध्दा योग्य वेळेला आत शिरल्यास भरपूर परतावा देऊ शकतात. रिलायन्स पॉवर हा भारतीय शेअरबाजारातील एक मोठा गधा होता/आहे. पण कोविडकाळात मे २०२० मध्ये अगदी दोन-अडीच रूपयांना मिळणारा तो शेअर ऑक्टोबर २०२४ मध्ये ५० पार करून गेला होता.

मुळात कोणत्याही गुंतवणुकीच्या पर्यायाला मूर्खपणा म्हणणे हाच मूर्खपणा आहे. It's all about timing. एवढी साधी गोष्ट न कळणारे लोक स्वतःला सर्वज्ञ समजून इतर लोक कसे मूर्ख आहेत यावर भाष्य करायला लागतात तेव्हा कीवही करावीशी वाटत नाही. असो.
31 Jan 2025 - 2:26 pm | हणमंतअण्णा शंकर...
जे लोक ग्राफ पाहताना लॉगरिथमिक स्केल वापरत नाहीत ते लोक प्रचंड गंडलेले असतात
31 Jan 2025 - 3:42 pm | अनन्त अवधुत
सोन्याच्या गुंतवणूकीला मी मूर्खपणा म्हणालो नाहिय. तसे हे तुमच्या लक्षात आले असेलच, पण तरीही सांगितले.
ज्याला जिथे हवी तिथे त्यांनी गुंतवणूक करावी. ज्याचा त्याचा पैसा, ज्याची त्याची जोखीम. I ain't no judge to them.
31 Jan 2025 - 2:13 pm | श्रीगुरुजी
या धाग्याचा विषय एआय, सोन्यातील गुंतवणूक, कल्पकता वगैरे नाही हे अजून लक्षात आले नाही का?
30 Jan 2025 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या शेठची कल्पकता...हमारे यहा बच्चा मा को AI कहता है. AI ची कल्पकता दूवा =))
-दिलीप बिरुटे
30 Jan 2025 - 5:05 pm | अनन्त अवधुत
अजुन ५ वर्षे तरी तुम्हाला प्रत्येक धाग्यावर असे विषयाला अनुसरून नसलेल्या प्रतिक्रिया देता येतील.
प्रतिक्रिया देण्यात कल्पकता दाखवा म्हणजे वाचकांना पण मजा येईल.
30 Jan 2025 - 5:16 pm | श्रीगुरुजी
ते अत्यंत कल्पक आहेत. कोणत्याही विषयाचा संबंध (अमेरिकेत लागलेले वणवे किंवा विश्वचषक सॉकर स्पर्धा किंवा इतर कोणताही विषय) मोदींंशी जोडून दाखविण्याची अविश्वसनीय कल्पकता त्यांच्याकडे आहे.
31 Jan 2025 - 1:52 am | अनन्त अवधुत
प्रतिसाद ठराविक साच्याचा होतो. त्यामुळे प्रतिसाद वाचनात अर्थ रहात नाही. असो.
30 Jan 2025 - 5:51 pm | अमरेंद्र बाहुबली
हमारे यहा बच्चा मा को AI कहता है.
खिक्क!30 Jan 2025 - 6:30 pm | वामन देशमुख
१
२
संघ स्वयंसेवक हे मंदबुद्धी आहेत की हुशार आहेत हे काय ते एक ठरवा. दिशाभूल करु नका आणि गोलपोस्ट सतत हलवत राहू नका.
---
या डाव्या वाळवीला धड आपला शत्रू (तो त्यांनीच ठरवलेला!) हुशार आहे की मंदबुद्धी आहे हेही नीट ठरवता येत नाही आणि निघालेत AI, सोने, बुद्धी, जनुकीय दृष्ट्या वंश श्रेष्ठता वगैरे कल्पक तीर मारायला!
30 Jan 2025 - 6:37 pm | श्रीगुरुजी
कल्पकता, एआय वगैरे या धाग्याचा विषयच नाही. संघाला शिव्या देणे हा धाग्याचा विषय आहे. धागा वाचून काही मूर्ख संघद्वेष्ट्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि ते सुद्धा आता हिरिरीने संघद्वेषाची गरळ टाकत आहेत.
30 Jan 2025 - 7:02 pm | टर्मीनेटर
😀
एवढंच नाही! धाग्यात आणि प्रतिसादांत नक्की काय म्हणायचंय हेच त्यांना स्वतःला अजुन समजलेले नाहीये. त्यांनी नुसते गोलपोस्टच बदलले नाहीत तर आपणच मांडलेल्या मुद्द्यांना छेद देणारे प्रतिसादही दिले आहेत. त्यातुन मस्त करमणुक झाली 😂 अत्ता प्रवासात आहे, मोबाईलवर मला जास्त टंकायला जमत नाही, त्यामुळे घरी पोचल्यावर येतो थोड्याच वेळात त्या मुद्द्यांचाही समाचार घ्यायला 😂
'दुरात्मा' गांधी वरही एक लेख अर्धवट लिहुन झालाय, तो ही आजच पुर्ण करुन इथे टाकायचा आहे, लैच कामं बाकी आहेत राव.... 😀
30 Jan 2025 - 10:02 pm | चित्रगुप्त
--- तो 'मंदबुद्धी संघोटा' सुद्धा जर मिपाकर (किंवा आणखीकाहीतरी 'कर') असेल तर हीच घटना कशी सांगेल ?
" माझ्या एका अहंमन्य, आक्रस्ताळ्या, स्वतः ला अतिहुशार, सर्वज्ञ समजणार्या 'पढतमूर्ख' माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला, आणि मला हाकलून लावले ...
31 Jan 2025 - 10:46 am | विवेकपटाईत
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या
एक मंदबुद्धी संघोट्या सत्तेत आला 2014 आधी देशात 2500 किमी Optic फायबर केबल होत्या. आज 41 लाख किमीच्या वर आहे. भारतीय अर्थव्यवस्था करोंना काळात वाचली त्याचे कारण दुर्गम परदेशातून ही लोकांनी वर्क फ्रॉम होम केले जे अमेरिकेत ही शक्य नव्हते.
देशात २०१३ मध्ये ४२२७ पेटेन्त दिल्या गेले आणि 2024 मध्ये 1 लक्ष.
देशात सर्वांना बँक खाते मिळाले. सर्व सबसिडी डिजिटल असल्याने खर्या गरजू लोकांना पोहचतात. 100 पैकी 100 रुपये.
आज प्रधानमंत्री आपल्या कार्यालत बसून ही प्रोजेक्टस संबंधित सर्व पक्षांशी संवाद साधून कार्य तीव्र गतीने संपादित करतात.
मंदबुद्धी संघोट्यानी देशाच्या विकासात भूतो न भविष्याती प्रगति घडवून आणली आहे. हे वेगळे जे अज्ञानी आणि अशिक्षित आहेत त्यांना प्रगति दिसणार नाही. बाकी काही लोकांच्या मते बुद्धिमता म्हणजे अङ्ग्रेजी स्पेलिंग पाठ करणे.
31 Jan 2025 - 12:39 pm | कर्नलतपस्वी
संघोट्याने इतरांच्या लंगोट्या धोक्यात आणल्या मुळे....
31 Jan 2025 - 12:53 pm | आग्या१९९०
बाकी काही लोकांच्या मते बुद्धिमता म्हणजे अङ्ग्रेजी स्पेलिंग पाठ करणे.
काहींची तर टेलेप्रॉम्प्टर बंद पडला तर ' बोलती ' बंद होते. आता बोला !
31 Jan 2025 - 11:33 am | आंद्रे वडापाव
अमेरिकेने चिप तंत्रज्ञानावर बंदी घातल्याने, चीन च्या शास्त्रज्ञानी कमी ताकतीचे चिप वापरून ९५% कमी खर्चात ,
जवळजवळ ओपन ए आय च्या जवळपास जाणारे तंत्रज्ञान केले ... भारताने सुद्धा यातून बोध घेऊन चीनच्याही पेक्षा जास्त कुशल पण चीन पेक्षा कमी खर्चात ए आय तयार करावे ... ही काशिनाथा चरणी प्रार्थना ..
चीन आता खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणून पुढे आला आहे तंत्रज्ञानात ...
31 Jan 2025 - 1:12 pm | श्रीगुरुजी
वॉशिंग्टन डी सी येथे झालेला अपघात संघोट्यांमुळेच कसा झाला या विषयावर एक नवीन धागा येऊ दे. धागा आला रे आला की नेहमीचेच यशस्वी कलाकार अनुमोदन द्यायला धावत येतीलच.
31 Jan 2025 - 3:37 pm | वामन देशमुख
पूर्वी केवळ भारतापुरत्या मर्यादित असलेली पण २०१४ नंतर पंचखंडांत पोहोचलेली मनुवादी विचारधाराच या अपघाताला जबाबदार आहेत यात काही शंकाच नाही.
त्या संघप्रणीत मनुवादी विचारधारेचा बिमोड करणे हे ट्रम्प, मोदी, पुतीन व नेत्यानाहू यांना जमणार नाही. त्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन लढा उभारायला हवा.
31 Jan 2025 - 3:43 pm | श्रीगुरुजी
मंदबुद्धी मनुवादी असे लिहा. नुसते मनुवादी नको.
31 Jan 2025 - 6:13 pm | विजुभाऊ
पुरोगामी शक्ती म्हणजे फुशाअं चा जप करणारे बारामतीचे काका , एम आय एम , रा गा, सुसू ताई. उबाठा , आणि त्यांचे सर्वेसर्वा बोलके संपादक .
31 Jan 2025 - 2:30 pm | श्रीगुरुजी
सोन्यामुळेच १९९१ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला आधार मिळाला होता.
31 Jan 2025 - 2:37 pm | चंद्रसूर्यकुमार
मानवी संस्कृती पैसा वापरायला लागल्यावर सुरवातीच्या काळात शंख-शिंपले वगैरे गोष्टी वापरल्या जात असल्या तरी काही काळात सोने-चांदीची नाणी वापरली जात नव्हती का? कागदी नोटा वापरायला जायला लागल्यापासूनही अगदी १९७० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत त्या कागदी नोटा सोन्यावर 'बेस' केलेल्या होत्या. पहिले महायुध्द, अमेरिकन यादवी युध्द वगैरे काही काळ वगळला तर कागदी नोटा सोन्यावरच बेस केलेल्या होत्या- १९७० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत. म्हणजे मानवी संस्कृतीच्या अर्थकारणात इतकी महत्वाची भूमिका बजावलेला धातू अगदी निरूपयोगीच होता असे या महाशयांचे म्हणणे दिसते.
31 Jan 2025 - 2:55 pm | विजुभाऊ
आत्ताही चलनात नोटा वापरणे कमी झालेले आहे. बाजारात दुकानदाराकडे ५०० रुपये सुट्टे नसतात.
भाजीवालेही , रिक्षावाले हीए युपीआय ने पैसे देतात , घेतात, अजून दोन तीन वर्षानी कागदी चलन दिसणे आणखी कमी कमी होईल.
31 Jan 2025 - 3:08 pm | युयुत्सु
हा धागा आता टिळक श्रेष्ठ की आगरकर श्रेष्ठ या वळणावर लवकरच येऊन स्थिरावेल अशी दाट शक्यता दिसते
31 Jan 2025 - 3:28 pm | श्रीगुरुजी
हे होणारच होते कारण मुळात धाग्याचा हेतूच खोडसाळ होता. गांभीर्याने धागा लिहिला असता तर प्रगल्भ प्रतिसाद आले असते. परंतु संघाला शिव्या देण्यासाठी एआयचा बुरखा पांघरून धागा काढला तेव्हाच तो भरकटणार हे नक्की होते. संघाला शिव्या द्यायच्या असतील तर काही आक्षेप नाही, परंतु धाग्याचा विषय आणि आतील गाभा संघनिंदा हाच असू द्या. नाहीतर विषय असायचा अमेरिकेतील विमान अपघात आणि गाभ्यात संघाला शिव्या.
31 Jan 2025 - 7:06 pm | आग्या१९९०
सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशातील नागरिकांनी धातुरुपी सोन्यात गुंतवणूक करणे हे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. एकतर टणावरी सोने हे दागिन्यांच्या रूपात असते किंवा देवस्थानात पडून असते ज्यातून उत्पादन होत नाही. परंतु सोने आयातीमुळे व्यापारी तूट वाढते, परदेशी चलनाचा साठा कमी झाल्याने रुपयावर दबाव येऊन त्याची किंमत कमी होते, आयात महाग झाल्याने अनेक वस्तू महाग होतात, लोकांची क्रयशक्ती कमी होते. ह्या सगळ्याला धातुरूपी सोन्यातील बिनडोक गुंतवणूक जबाबदार आहे. सोन्यामध्येच गुंतवणूक करायची असेल तर gold ETF किंवा gold bond मध्ये करावी. अर्थात ज्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेची काही देणेघेणे नाही त्याच्या करता धातूरुपी सोने गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे . मंदिराचे कळस, बाबाचे आसन, देवांचे दागिने हे तर अजून चांगले पर्याय आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेला तारायला.
31 Jan 2025 - 7:20 pm | श्रीगुरुजी
हे ठीक आहे हो, पण यात लेखकाने संघ कशासाठी आणला?
31 Jan 2025 - 8:45 pm | आग्या१९९०
केली अपेक्षा संघाकडून तर काय बिघडले? तीन अपत्य जन्माला घालायचा सल्ला जे देऊ शकतात त्यांनी जनतेला सोन्याबद्दल सल्ला दिला तर काय बिघडेल? उलट सरकारला फायदाच होईल. इथले मिपाकर सोने गुंतवणुकीचे समर्थन करताना दिसत आहेत. संघ हे निमित्त आहे .
31 Jan 2025 - 8:52 pm | श्रीगुरुजी
फक्त संघाकडून अपेक्षा? इतरांकडून नाही?
1 Feb 2025 - 9:16 am | युयुत्सु
ही महत्त्वाची बाजू उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन! पण हे किती लोकाना समजेल याची शंका आहेच. हिंदूच्या हितावर गस्त घालणारी संघटना हिंदूच्या हिताच्या अर्थशास्त्राची दखल घेऊ शकत यासारखा दैवदूर्विलास नाही. सोन्यातील गुंतवणूकीचे समर्थन करणार-यांकडून फिजिकल सोने आणि डिमॅट सोने यातील फरकाची मी अपेक्षा ठेवली, ही माझीच चूक झाली!
1 Feb 2025 - 9:18 am | युयुत्सु
छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका झाल्या त्या लक्षात आल्याने परत ...
ही महत्त्वाची बाजू उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन! पण हे किती लोकाना समजेल याची शंका आहेच. हिंदूच्या हितावर गस्त घालणारी संघटना हिंदूच्या हिताच्या अर्थशास्त्राची दखल घेऊ शकत नाही यासारखा दैवदूर्विलास नाही. सोन्यातील गुंतवणूकीचे समर्थन करणार-यांकडून फिजिकल सोने आणि डिमॅट सोने यातील फरक कळवा ही मी अपेक्षा ठेवली, ही माझीच चूक झाली!
1 Feb 2025 - 10:02 am | श्रीगुरुजी
संघनिंदा या मूळ विषयावर धागा परत आणल्यासाठी धन्यवाद! येऊ दे अजून.
5 Feb 2025 - 8:16 am | आग्या१९९०
https://www.moneycontrol.com/news/business/personal-finance/sgbs-discont...
कधी नव्हे ते ह्या योजनेचे कौतुक केले होते, पण शेवटी सरकारने माती खाल्लीच. ह्याच कारणामुळे ह्या सरकारवर विश्वास नाही. योजना कशी असावी तर मनरेगासारखी.विरोधी पक्षही सत्तेत आला तरी बंद करू शकणार नाही अशी दोषमुक्त.
5 Feb 2025 - 9:23 am | वामन देशमुख
सुवर्णरोखे योजना अकल्पक हिंदूंची होती, मनरेगा योजना कल्पक चिन्यांची होती, असे काही म्हणायचे आहे का?
मूळ लेखाचा आशय तसाच काहीसा आहे, नाही का?
5 Feb 2025 - 7:44 pm | आग्या१९९०
सुवर्णरोखे योजना अकल्पक हिंदूंची होती, मनरेगा योजना कल्पक चिन्यांची होती, असे काही म्हणायचे आहे का?
मनरेगा काँग्रेसचे अपत्य, काँग्रेस= पुरोगामी/डावे= देशद्रोही. त्यांना चीनी म्हणू शकता, कारण अशी कल्पकता त्यांच्याकडेच आहे. मूळ लेखाचा आशय तसाच काहीसा आहे ना?
5 Feb 2025 - 10:05 am | सुबोध खरे
the central government has discontinued the Sovereign Gold Bond (SGB) scheme, citing the high cost of borrowing associated with the instrument.
5 Feb 2025 - 2:11 pm | आग्या१९९०
citing the high cost of borrowing associated with the instrument.
हा अचानक साक्षात्कार सरकारला आताच कसा काय झाला? व्याज दरात तर काहीच वाढ केली नाही. मग borrowing कशी काय महाग वाटू लागली? तुम्हाला समजले असेल तर आम्हालाही सांगा.
22 Feb 2025 - 11:42 am | आग्या१९९०
citing the high cost of borrowing associated with the instrument.
ह्यावर अद्याप खुलासा केला नाही तुम्ही. नसेल समजले तर तसं सांगा.
22 Feb 2025 - 11:54 am | सुबोध खरे
A senior government official had earlier highlighted the high returns that investors have received on SGBs. “We have given 9-11% return per annum, and on top of that an interest of 2.5%,” the official said.
https://www.moneycontrol.com/budget/centre-discontinues-sovereign-gold-b...
31 Jan 2025 - 6:27 pm | स्वधर्म
त्या निमित्ताने 'संघ समजून घेताना' या पुस्तकाचे ले़खक दत्तप्रसाद दाभोळकर यांची मुलाखत
https://youtu.be/hPs1OIyze7Q?si=Hs_58edXT4al8w-5
31 Jan 2025 - 6:39 pm | श्रीगुरुजी
लेख व चर्चा कल्पकता या विषयावर नव्हतीच. संघ हाच विषय होता. त्यामुळे चर्चा घसरली असे म्हणता येत नाही.
1 Feb 2025 - 10:51 am | युयुत्सु
धन्यवाद!
इल्युमिनेटींग आणि मर्मभेदक