कल्पकता

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
28 Jan 2025 - 9:54 am

असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.

डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे...

=============

कल्पकता
======

माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था!

आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते.

प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्‍यात येत नाही.
मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्‍यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे.

रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे.

चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो.

मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला.

पण आता बातम्या येत आहेत की,
- परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत.
- आज ही बातमी वाचली
IMF lifts China's 2024 growth forecast to 5%
"China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures".
(https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...)

सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...

===================

टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

4 Feb 2025 - 7:27 pm | सुबोध खरे

जगातले सर्व ज्ञान हुशारी आणि कल्पकता केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे आणि जगातील बाकी सर्व मूर्खच आहेत असे समजणाऱ्या सर्वज्ञ माणसांनी लिहिलेला लेख असावा तसाच आहे.

आपला एकांगी द्वेष अशा लेखात दिसू नये इतकी मूलभूत काळजी सुद्धा घेतलेलीच नाही.

आता हेच विधान पहा.

चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही.

According to historical estimates, during the 16th century, India generally had a larger GDP than China, with some sources indicating that India's economy was significantly bigger in the early part of the century before China gradually overtook it towards the end; however, both economies remained relatively close in size throughout the period.

सोळाव्या शतकाच्या अखेर पर्यंत भारत जवळ जवळ सर्वत्र मुघलांच्या अधिपत्याखाली आला होता यानंतर चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे गेली असे इतिहास सांगतो.
मग १६ व्य शतकापर्यंत कल्पकताशून्य भारत चीनच्या पुढे कसा काय होता?

आणि १६ व्य शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत रा स्व संघ हा शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता. मग भारताची कल्पकता कुणाच्या मुळे लयास गेली ( अर्थात मुळात अस्तित्वातच नव्हती तर लयास कशी जाणार हि मल्लिनाथी येईलच.

अर्थात याचे उत्तर या महाशयांना देता येणार नाही मग शब्दांचा डोंगर रचून आपणच किती शहाणे आणि इतर लोक कसे मूर्ख आहेत हेच पालुपद चालू राहील.

बाकी दर महा १० टक्के चक्रवाढ व्याजाने परतावा देणारा अल्गोरिदम ची मी चातकासारखी वाट पाहतो आहे. ( गेल्या सहा महिन्यात बाजाराने बहुतेकांना दरमहा एक टक्का सुद्धा परतावा दिलेला नाही) पण तो मोदींचा दोष आहे.

चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते.

हे त्यांना कसे काय शक्य झाले?

युयुत्सु's picture

5 Feb 2025 - 11:26 am | युयुत्सु

हे त्यांना कसे काय शक्य झाले?
चीन मध्ये गुणशाही (मेरीटोक्रसी) आहे. आपल्याकडे नाही.

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2025 - 2:23 pm | श्रीगुरुजी

आपल्याकडे जातशाही (कास्टोक्रसी) आहे.

युयुत्सु's picture

5 Feb 2025 - 7:59 pm | युयुत्सु

चीनमध्ये गुणशाही का रूजली याचे उत्तर हवे असेल तर त्यासाठी चीनमधल्या इंपिरीयल एक्झामिनेशन सिस्टीमची माहिती मिळवावी.

https://www.youtube.com/watch?v=f8qaxnBXo4g