खरा तरुण !

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
23 Jan 2025 - 8:01 pm

(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका
सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . )
------------------------------

पंच्याऐंशीतला तरुण उभा माझ्या समोर ताजा !
पंचेचाळीशीतला बसलेला मी, अन् गुडघा दुखतो माझा !

त्या वेळचं हवा पाणि, अन् त्यांनी खाल्लेलं अन्न ताजं !
आणि प्रिझर्वेट पिझ्झा बर्गरवर फुगलेलं पोट माझं !

सांगा तुम्हीच आमच्या दोघातलं नक्की तरुण कोण ? त्यांनी मारलेली हाक सुद्धा दहा कोस जाते,
आणि मला लागतो स्पिकर फोन ?

तुम्ही म्हणाल काय आजोबांचं लई कौतुक करता ?
आणि आम्हाला हसवायला कविता लिहून जास्तीच स्वतःला धरता ?

पण खरंच सांगतो पिढी दर पिढी काही फरक पडत जातो !
नुसतच वय वाढलेलं नसेल, तर माणूस खरंच घडत जातो !

मग गाणारा असो माणूस किंवा एखाद्या माणसाचंच असो गाणं
आम्हाला शिकायला मिळतं अशांकडून
खऱ्या अर्थाचा जगणं !

प्रत्येक पिढी एकमेकाला काही ना काही देत असते !
आमच्याकडून घेतलीच तर एखादी कविता काढून घेत असते !

दोन शब्द बोलून माझे तोकडे गीत थांबवतो .
आणखी ऐकवायला लागलो तर म्हणाल हा फारच वेळ लांबवतो !
============
नंतर हीच कविता तिथे वाचून दाखवली . तिला हशा टाळ्यांचा छान प्रतिसाद मिळाला . त्याच्या व्हिडिओचा फेसबुक दुवा खाली चिकटवत आहे . ज्यांना ही गंमतशीर कविता लाईव्ह एन्जॉय करायची आहे, त्यांनी तिकडे येऊन तो जरूर पहा .
खरा तरुण
https://www.facebook.com/share/v/1Ckcee3zCn/

कविता माझीजिलबीहास्यकवितामौजमजा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

24 Jan 2025 - 6:33 pm | चांदणे संदीप

अशी बसल्याजागी एकहाती कविता लिहावी तर गुर्जींनीच. वाहवा. मस्त. :)
सादरीकरणही भन्नाट.

सं - दी - प

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2025 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद . __/\__

मुक्त विहारि's picture

24 Jan 2025 - 8:19 pm | मुक्त विहारि

सहमत आहे...