ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
28 Nov 2024 - 9:15 pm

सर्वांना नमस्कार.

नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे. ह्या वर्षीच्या शिबिराचे अनुभव- "क्रिया" से "शुक्रिया" तक की यात्रा: ध्यान शिविर

मागच्या वर्षीही मळवलीला असंच दोन दिवसीय सुंदर शिबिर केलं होतं. त्यावेळीही खूप छान अनुभव आले होते. सक्रिय ध्यान, ध्यानाला पूरक अशी सुंदर गाणी, नृत्य- मौन ध्यान असा खूप छान तो अनुभव होता. त्याबद्दलही तेव्हा लगेच हिन्दीत ब्लॉग लिहीला होता. तोही इथे शेअर करतो. मागच्या वर्षीच्या शिबिराचे अनुभव- ओशो के प्रेमी आए, गाना तो होगा हसना हंसाना होगा रोना भी होगा

इथे जे ओशोप्रेमी व ध्यानप्रेमी असतील त्यांच्या माहितीसाठी. त्यातील आनंद त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी.

धन्यवाद.

- निरंजन वेलणकर. 09422108376.

मुक्तककृष्णमुर्तीलेखअनुभव

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2024 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा. इंजॉय.

बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत
आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना. तपशीलवार मराठीत इकडे लिहा.

वेळ मिळाला की वाचत राहीन.

-दिलीप बिरुटे
( मन-मौजी )

आंतरजालीय प्रतिक्रियांवरुन माणूस प्रेमाने विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की खवचटपणाने विचारतोय, काही म्हणता काही कळत नाही. आता खालील वाक्यच बघा ना..

बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना.

म्हणजे हे तुम्ही उत्सुकतेने विचारताय की जर पहिल्या पानावरच येत असेल तर कशाला नसते उपद्व्याप करा या अर्थाने लिहिले याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून मला समोरासमोरचा वार्तालाप आवडतो. (अर्थात तिथेही मी माणसे ओळखण्यात कमी पडतो म्हणा).

अवांतर :
निवडणूकीच्या कामातून मोकळे झाला असाल तर त्याविषयी फर्स्ट हँड रिपोर्ट दुसर्‍ञा एका लेखात येऊ द्यात. ही विनंती करायची ही जागा नव्हे हे मान्य !

काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत
आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना

अर्थात मन पहिल्या पानावर येणारच. पण जगण्या-मरण्याच्या धावपळीत तेच मन कसं ताळ्यावर ठेवायचं याची जाणीव ध्यानामुळे झालेली असते, त्यामुळे जरी पहिल्या पानावर मन आलं तरीही ते पहिल्याप्रमाणेच अवखळ न राहता किंचीत ताब्यात येऊ शकतं!

- (पहिल्या पानावर असणारा) सोकाजी

शाम भागवत's picture

1 Dec 2024 - 4:14 pm | शाम भागवत

सहमत.
अशी शिबीरं म्हणजे नेटप्रॅक्टीस. जास्तीत जास्त अनुकूल परिस्थितीत मनावर ताबा मिळवण्याचा केलेला प्रयत्न.

नेहमाचं जिवन जगणं ही जणू प्रत्यक्ष मॅच.

धर्मराजमुटके's picture

29 Nov 2024 - 12:58 pm | धर्मराजमुटके

छान !
ध्यानाचा अनुभव न घेताही मला त्याचे महत्त्व पटते आहे पण कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. असो.

सुबोध खरे's picture

29 Nov 2024 - 7:09 pm | सुबोध खरे

कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे

प्राणायामाचा आणि ध्यान धारणेचा, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावावर उत्तम उपयोग होतो असे अनेक वैद्यकीय शोध निबंधात सिद्ध झालेले आहे.

परंतु अजूनही मला त्यात अजिबात रस वाटत नाही.

आपली पट्टी काळी २, त्यामुळे हे पांढरी पाच मध्ये गाणे झेपत नाही हेच खरं.

सक्रीय ध्यानाबद्दल माहिती शोधताना ओशोंच हे व्याख्यान मिळालं. ते प्राणायामातील भस्त्रिकेच ओशोकरण केलेलं रूप आहे हे कळल.
पण त्यानंतर काय करावं हे जे त्यांनी सांगितलंय ते महत्वाच वाटलं.

व्याख्यानाची लिंकः
https://youtu.be/msZ4gc3bqK0?si=mvSM0LHgWP6gW_i5

- (सक्रीय) सोकाजी

मार्गी's picture

1 Dec 2024 - 11:47 am | मार्गी

कळतंय पण वळत नाही म्हणजे राग- संताप- लोभ हानीकारक आहे हे कळतं, पण ते बदलवता येत नाही हा जो फरक आहे त्यासाठीच सक्रिय ध्यान उपयोगी असतं. कॉन्शस पातळीवर- बुद्धीच्या पातळीवर आपल्याला सगळं कळतं, पण आणीबाणीच्या ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता येत नाही. कारण अवचेतन मनामध्ये तो संताप/ लोभ साठलेला असतो. सक्रिय ध्यान खोलवर ही समज नेण्यासाठी उपयोगी पडतं.

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! ध्यानाचा कोणताही प्रकार/ पद्धत असली तरी त्यामध्ये "जागरूकता" महत्त्वाची‌ असते. शिबिरात एक- दोन दिवस करून फक्त ती टेक्निक कळते. पुढे ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.

@ सो त्रि जी, सक्रिय ध्यान केवळ भस्त्रिका नाहीय. केवळ त्याबद्दल ऐकून किंवा त्याचे व्हिडिओज/ ऑडिओज ऐकून पूर्ण कल्पना येणार नाही. तो एक खरंच वेगळा अनुभव आहे. धन्यवाद.

ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.

डीट्टो!!!

- (सातत्य साधण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

चौथा कोनाडा's picture

2 Dec 2024 - 11:35 am | चौथा कोनाडा

छान माहिती मिळाली.
चर्चा ही उत्तम.
हें करायलाच हवे या मताचा मी आहे.
मागे २२-२५ वर्षांपूर्वी जवळच्या विवेकानंद केंद्रात उबव्यायाम, सूर्य नमस्कार, आसने चा १० दिवसांचा एक तासाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तेव्हा सर्व फायदे कळालेच. पण हळूहळू त्यात खंड पडला. आता जेमतेम करतो. संकल्प शक्ती कमी पडते. थोडा वेळ लागेल, पण पुढे मागे करणार हे नक्की.
हेच आद्य आहे, हेच अभिजात आहे, बाकी सगळं प्रासंगिक ट्रेंड्स आहेत. याची मनोमन खात्री पटलेली आहे.

योगानंदांनी स्थापन केलेली YSS क्रियायोगातुन ध्यान शिकवते हे माहित होतं.. त्यात बहुतेक शक्तीपात दिक्षा पण असते. ओशो सुद्ध त्याच मार्गातले आहेत का ?? ओशोंबद्दल जे काहि थोडंफार वाचलं / ऐकलं त्यात क्रियायोग संप्रदायाचा उल्लेख आल्याचं आठवत नाहि. ज्ञानगंज संबंधी साधक मात्र ओशोंचा उल्लेख करतात.