( वर्दी )

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
18 Sep 2024 - 10:48 am

अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली
"ती",येत आहे याची अवचित वर्दी आली

हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता
मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता

वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे
पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे

झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली
पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली

नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज
उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज

नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी
उघडता नयन, तया कळाले ,

उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.

आठवणीउकळीप्रेमकाव्यविडंबनगझल

प्रतिक्रिया

रा मे= राजेंद्र मेहेंदळे.

आयुष्यात कधी "ती",भेटली नाही म्हणून असा बदला घेतला.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Sep 2024 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. भारी.