द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
30 Aug 2024 - 3:33 pm

*द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्-पुस्तकपरिचय
अ

जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेल ते दुसऱ्यांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही व्यवस्था कोलमडत नाही. कारण गरजेपेक्षा जास्त ओरबडणाऱ्या पासून इथे संरक्षण असते. गरजेपेक्षा जास्त घेणारा परतफेड करत नाही, त्याने अधिक घेतले तर तेही संपून जाते आणि तो स्वता: ही तग धरू शकत नाही.

पीटर वोह्ललेबेन या जर्मन वनरक्षकांनी जंगलातील झाडांचे, त्यातील परिसंस्थांचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यातूनच जगप्रसि‌द्ध पुस्तक - द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् लिहिले गेले. मराठीत याचा अनुवाद गुरुदास, नूलकर यांनी केला आहे पुस्तकाचे

झाडांच्या अबोल विश्वाचे बोलक दर्शन हे पुस्तकाचे ब्रीद खरोखर सार्थ आहे. लहानपणी झाडाच्या फांदया त्याचे हात, मूळ, खोड़ त्याचे पाय तर पानांचा वृक्षाचा डेरा त्याचे डोके असे चित्र सहज रेखाटायचो.. पण हे प्रत्यक्षात उलट आहे. जमिनीच्या काळोखात वाढणारे मूळं त्याच्या मेंदूसारखे काम करतात त्यांच्या / मूळांच्या टोकांना संवेदना असतात. जिकडे पाणी तिकडे ते वळतात. आणि हेच टोक उपयोगी बुरशीबरोबर मैत्री करून एक जाळ, जंगलाचे इंटरनेट संपूर्ण जंगलभर पसरवतात.(wood wide web-www.) या जाळयातून नायट्रोजन फॉस्फरस , पोषकद्रव्ये वाटप, एखाद्‌या -सर्व झाडांशी संपर्कात राहणे, पोषकद्रव्याचे आजारी, वठलेल्या झाडाला, झाडांच्या छोट्या पिलांना पोषकद्र‌व्ये पाठवणे हे करत राहतात, बुरशीला या बदल्यात भरघोस साखर झाडांकडून मिळते. तसेच सुगंध
पसरुन कीटकांना पराग धूळ उडवण्यासाठी आकर्षित करतात.
तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक उगाच जास्त पाने खात बसला की Phyto chemical सोडून त्यांची चव तर खराब करतातच पण कित्येक मैल फेरोमोन्स
या केमिकलचा गंध इतर झाडांना शत्रूपासून सावध राहायला संरक्षण होते. अशाच प्रक्रियेत निर्माण झालेले टॅनिन यामुळे ओकच्या लाकडाच्या पिपाचा वाईन मुरायला उपयोग होतो .झाडांनी दरवर्षी फुलून रुचकर बिया तयार केल्यातर डुक्कर आणि हरिण ते खाऊन पुष्ट होऊन जोमाने प्रजनन करतील,यांची खूप संख्या वाढेल. त्यामुळे बिया रूजणार कशा? तेव्हा दरवर्षी न फुलता वर्षाआड /ठराविक वर्षानंतर झाड फुलते. या प्राण्यांची संख्याही नियोजित होऊन डोकेदुखी होत नाही.
लॉटरी लागून लाखो लाखो बियांपैकी एखादेच बी 'पूर्ण वृक्षात रूपांतरीत होते. बी अवस्थेत हरिण इतर प्राण्यांपासून रक्षण पाहिज.मग जरा एखादे मोठे उंच झाड वठून जाऊन पडल्यावर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो मग त्याची वाढ जोमाने होते. मग हे झाड जंगलाच्या शिष्टचारानुसार समांतर फांद्या, मजबूत बुंधा, व्हि आकारातल्या फांदया, डेरेदार आकार घेत सौंद‌र्यवान होते, पुढच्या २००-किंवा ५०० वर्षांप‌र्यंतही तो राजा होतो.

निसर्गमात्र झाडांची ही कडक शिक्षकाप्रमाणे शाळा घेतो. कधी बर्फाचे वादळ अस्ताव्यस्त फांद्यांना बर्फाच्या ओझ्याने मोडून टाकतो .जखमी झाडांच्या वाकवून मोडून टाकतो आत बुरशी शिरतात त्यासी पोखरू लागतात. बार्क बीटल, अफीडच्या लोभाने वूडपीकर पक्षी झाडांच्या खोडांना टोची मारत अळ्या खाऊन टाकतो पण झाडाला इजा होते. पण एक झाड शहीद झाल्यामुळे इतर झाड या कीटकांपासून वाचते.

झाडांतून पाण्याचे पंप चालू असतात, टेस्थोस्कोप लावून पाहिल तर प्रवाहाचा आवाज ऐकू येतो?

झाड आपल्या वाढीने हवेचाही वेग नियंत्रित करतात, बाष्पीभवन कमी करून जास्त पाणी मिळवून वेगाने वाढतात.

अफिड लागल्यास झाडावर चिकट हनीड्यूवर मुंग्या, काही भ्रमर तुटून पडतात.
पान झाडांना वेळेचे, दिवसाच्या लांबीचे भान असते मुल त्यानुसार वसंताची चाहुल, शरदाचे आगमन त्यांना समजते.

जंगलात प्रकाशासाठी स्पर्धाच असते.सर्वांत करती ९७% तर बाकीची खालील पिलाना-रोपांना प्रकाशाची देवाण असते.
प्रकाशसंश्लेषण जोमाने होऊन ती अधिक अन्नसाठा करायची ही स्पर्धाच असते.

झाडांच्या बिया पक्षी जमिनीत खाण्यासाठी पुरतात नंतर विसरतात मग रूजून झाड येते, काही बियांना दूर जाता यावे म्हणून पंखही असतात, जणू त्या उडणाऱ्या बियाच!

*झाडांच्या स्वप्नातील स्वर्ग

त्यांना पोषणयुक्त, मोकळी, हवेशीर आणि आर्द्रता टिकवणारी माती आवडते. जमीन कोरड्या हवेतही ओलसर राहिली पाहिजे. उन्हाळ्यात फार तापू नये किंवा थंडीत गारठू नये. बेताचा हिमवर्षाव चालेल कारण त्यातून बर्फ वितळल्यावर जमिनीला पाणी मिळते. तिथे डोंगरामुळे वादळी वारे अडवले गेले पाहिजेत आणि बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव कमी असावा. "
पण याने जैवविविधता वाढणार नाही एकच शक्तिशाली प्रजाती अशा स्वर्गात जोमाने वाढेल.

माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल.
-भक्ती

मुक्तकप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

30 Aug 2024 - 3:52 pm | श्वेता२४

बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे.
माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल.
हे कशाच्या अनुषंगाने आहे ते नाही कळले. मला तर वाटते की मानवाचा नको इतका हस्तक्षेप आधिच होतो आहे जंगलात व त्यामुळे नैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या प्राणी व झाडे, वनस्पती यांना हानी निर्माण होत आहे.

जंगलतोड,जंगलातील झाडांचे ५०-६० वय हे तर बाल्यावस्था आहे.२०० वय वगैरे त्यांचे वार्धक्याकडे जाणारे वय असते.पण आता वनखाते ठरवून एकाच पद्धतीने या झाडांची, परदेशी झाडांची लागवड करतात.संसाधनासाठी त्यांची लवकरच तोड करतात.मग अशा जमिनीवरच्या , जमिनीखालील परिसंस्था कशा टिकणार ? शहरातील झाडं एकल असतात आपल्या बांधवांपासून दूर,बोलणार कोणाशी?

बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे

आहे खरी.पण खरं सांगते भाषांतर खुप जड झालंय, पुस्तक इतके सहज समजत नाही.

कदाचित पुस्तकात बीच,स्प्रुस,ओक,विलो हे कधीही न पाहिलेल्या झाडांविषयी हे पुस्तक असल्याने समजायला वेळ लागला.पण एकदा नक्की वाचा.

इंग्रजी पुस्तक वाचून झालं आहे.

पाऊस पडल्यावर गवताचे हिरवे गार गालीचे पसरतात. पण हे गवताचे बी मागच्या वर्षी आठ महिन्यांपूर्वी मातीत पडलेले मुंग्या, पक्षी यांच्यापासून वाचते कसे? तेरडा, टाकळा, आघाडा,कुरडू वगैरे छोट्या झुडुपांचंही तेच. यांचेही कंद नसतात, बियाच असतात.

Bhakti's picture

30 Aug 2024 - 7:43 pm | Bhakti

मुंग्या हे एकमेव प्रमुख कीटक बियाणे पसरवणारे आहेत. मुंग्यांच्या विखुरण्याशी जुळवून घेतलेल्या मायर्मेकोरस बियांमध्ये अनेकदा स्टार्च- किंवा लिपिड-युक्त शरीर असते ज्याला इलिओसोम म्हणतात ज्याला कठीण आणि गुळगुळीत बियाणे कोट जोडलेले असते जे मुंग्यांना क्रॅक करणे कठीण असते. मुंग्यांच्या निवडीमुळे बियांचा आकार देखील मर्यादित असतो - मोठ्या मुंग्या लहान मुंग्यांपेक्षा मोठ्या बिया वाहून नेतात.

पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेत मुंग्या फार दूर बिया वाहून नेत नाहीत. तरीसुद्धा, मुंग्या अनेक वनस्पतींसाठी महत्त्वपूर्ण विखुरणारे असू शकतात. मुंग्या एकतर घरट्यात बिया साठवून ठेवू शकतात किंवा इलिओसोम काढून टाकतात आणि नंतर घरट्याच्या प्रवेशद्वारावर किंवा वसाहतीतील कचरा ढिगाऱ्यावर बिया टाकून देतात. दोन्ही ठिकाणी चांगली वायूयुक्त, पोषक-समृद्ध माती असते जी वनस्पतींची वाढ सुधारू शकते. मुंग्यांद्वारे गोळा केलेल्या बियांना इतर बियांच्या भक्षकांपासून त्यांच्या सक्रिय मुंग्यांच्या घरट्यांसोबत काही प्रमाणात संरक्षण देखील मिळू शकते , जे सहसा इतर प्राणी टाळतात.

इरिडोमायरमेक्स ह्युमिलिस ), जे मायरमेकोरस बियाण्यांकडे जोरदारपणे आकर्षित होत नाहीत.
कधीकधी बिया मुंग्यांव्यतिरिक्त इतर कीटकांद्वारे विखुरल्या जातात. उदाहरणार्थ, स्कॅरॅब बीटल बिया शेणाने पुरू शकतात. गवताळ प्रदेशात दीमक गवताच्या बिया पसरवण्यास मदत करते

.

किल्लेदार's picture

31 Aug 2024 - 10:45 pm | किल्लेदार

नारायण धारपांचं साठे फायकस आठवलं :)

आग्या१९९०'s picture

1 Sep 2024 - 8:53 am | आग्या१९९०

तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक उगाच जास्त पाने खात बसला की Phyto chemical सोडून त्यांची चव तर खराब करतातच पण कित्येक मैल फेरोमोन्स
या केमिकलचा गंध इतर झाडांना शत्रूपासून सावध राहायला संरक्षण होते.

अशाच प्रकारची एक रहस्यमय माहिती
https://www.maayboli.com/node/81754

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2024 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारीच.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2024 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्स. चांगली माहिती ओळख. झाडं लावली पाहिजेत. वाढवली पाहिजेत.
काल अजिंठ्यांच्या डोंगररांगातील दाट जंगलात फिरलो.

निसर्ग किमया कळते.

-दिलीप बिरुटे