रोबोट्सनी जग जिंकले होते
माणूस इतिहास जमा झाला होता.
पण रोबोट्सना
पोट नव्हते, त्वचा
झाकण्याची गरज नव्हती
आकांक्षा नव्हत्या
त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले
आता पुढे काय असा प्रश्न पडला
जेव्हा त्यांना मिसळपावच्या
अर्काईव्हमध्ये माहितगारची
एक जुनी कविता आढळली
मग त्यांनी पोट असणारे
त्वचा झाकाविशी वाटणारे
आकांक्षा असणारे
जन्म मृत्यू असणारे
रोबोट बनवले
असा लावला रोबोटमय जगाने
माणसाचा पुर्नशोध
प्रतिक्रिया
9 May 2024 - 5:39 pm | चांदणे संदीप
कविता आवडली.
सं - दी - प
9 May 2024 - 6:44 pm | Bhakti
छान, मस्तच
शीर्षक थोडं छोटं पाहिजे होतं..
माणसाचा शोध!
9 May 2024 - 7:30 pm | अहिरावण
भारी. सध्या माहितगारी सोडून काव्यात मुशाफिरी चालू आहे :)
10 May 2024 - 8:45 am | माहितगार
@ चांदणे संदीप, भक्ती, अहिरावण प्रतिसादांसाठी अनेक धन्यवाद. भक्तींनी शीर्षका बद्दल केलेली रास्त सुचवणी साठीही आभार
10 May 2024 - 9:13 am | गवि
चांगली कविता