डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!
प्रतिक्रिया
6 Dec 2023 - 2:13 pm | अमरेंद्र बाहुबली
शाहु फुले आंबेडकर ह्या पुरोगामी विचारांच्या त्रयीतील सनातनींचा चातुर्वर्ण व्यवस्थेला सुरूंग लावून सनातनी जातीवाद्यांना सळो की पळो करून सोडनारे, दलित दिनदुबळ्यांना जातीवादातून ाहेर काढनारे, आधुनीक पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते, भारतीय संविधानाचे जनक आदरणीय बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिवादन.
6 Dec 2023 - 2:54 pm | Bhakti
माझ्या लेकीने हे चित्र मागच्या वर्षी बनवलं होतं(वयं ७) ,उत्स्फूर्तपणे आणि मला दाखवलं होतं .अजूनपर्यंत ती बाबासाहेबांविषयी अनेक गोष्टी आनंदाने सांगते.मराठी माध्यमातून ती शिकतेय ह्यामुळेच हे घडलं :)
6 Dec 2023 - 4:06 pm | स्वधर्म
पण तुमची मुलगी मराठी माध्यमातून शिकते आहे, हे वाचून आनंद झाला. माझी मुलेही मराठी माध्यमातूनच शिकली आणि त्यांना आणि मलाही त्याचा कसलाही तोटा जाणवलेला नाही.
6 Dec 2023 - 7:31 pm | अमरेंद्र बाहुबली
खुप छान चित्र काढलंय छोट्या भक्तीने.
7 Dec 2023 - 1:40 pm | अहिरावण
चित्र चांगले काढले आहे.
मराठी माध्यमाबद्दल अभिनंदन.
6 Dec 2023 - 4:15 pm | स्वधर्म
यांच्याविषयी नेहमी दलितांचे उध्दारकर्ते असे म्हटले जाते, पण खरे पाहता ते सगळ्या भारतीय नागरिकांचेच उध्दारकर्ते आहेत. कामगारांच्या हिताचे अनेक कायदे, शेतीबाबतचे कायदे (खोती पध्दत), स्त्रियांबाबतचे अनेक कायदे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रूपयाच्या परिवर्तनियतेबाबतचा त्यांचा पी एचडीचा निबंध हा सुध्दा देशाच्या अर्थशास्त्राला दिशा देणार होता. त्यांनी इतरांच्या भावनेचा वापर करून आपल्या मनासारखे करून घेतले नाही. अंतरी अपार करूणा होती पण नेहमी बुध्दीवादाचा आधार घेतला. एवढा मोठा माणूस आपल्या देशात झाला याचा अभिमान वाटतो.
6 Dec 2023 - 9:37 pm | Trump
+१
7 Dec 2023 - 11:29 am | चौकस२१२
कोणीतरी पूरोगाम्यांची व्याख्या विचारली होती
एक सुचलेली
- जे बाबासाहेबांच्या आरक्षण आणि मुस्लिमांबद्दलचं काही परखड वक्तव्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात
https://www.firstpost.com/opinion/how-br-ambedkars-idea-of-islam-exposes...
https://www.quora.com/What-were-Dr-Ambedkars-views-on-Islam
- जे सावरकरांचच्या जातीनिर्मुलासाठी/ पतितपावन मंदिर सारखया प्रयत नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात
ते पुरोगामी
कारण अशांना दोन्ही पचणारे नसते
7 Dec 2023 - 1:38 pm | अहिरावण
सहमत आहे. वरील व्याख्येत "लोका सांगे ब्रह्मज्ञान. स्वतः मात्र कोरडे पाषाण" ही उक्ती सार्थ करणारे ही टीप सुद्धा जोडा असे सुचवतो.