लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
राम राम, मिपाकर.
श्रीगणेश लेखमाला पार पडली, की मिपाच्या पडद्यामागील मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपा दिवाळी अंकाचे. मराठी आंतरजालावर आणि छापील दिवाळी अंकांचे साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद अशी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी असतात, आपल्याही मिपाचा दिवाळी अंक प्रत्येक वर्षी असतो. मराठी अंकांची परंपरा डिजीटल युगात सुद्धा खंडीत झालेली नाही, माध्यमांचे बदललेले स्वरुप त्यात चढ उतार असतात पण दिवाळी अंकाचा उत्साह तसाच असतो, हे नमुद करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवाच्या लेखांना अर्थात गलेमाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दिवाळी अंकही धमाकेदार, बहारदार आणि मिपा परंपरेला अनसरुन जोरदार साजरा होणार.
तर, मिपाकरहो...! आता काय मागं राह्यचं काही कारण नाय बघा. घ्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर लेखन. यंदाचा मिसळपाव दिवाळी अंक असणार आहे 'पर्यटन विशेषांक'. पर्यटन- कोणतंही. प्रवास - कसलाही. भटकंती - कुठेही! सप्ताहांती केलेली स्थानिक भटकंती, परदेशवारीची नवलाई, फिरत्या नोकरीचे अनुभव, तीर्थक्षेत्रांना भेटी, किंवा नुसता भटकत केलेला प्रवास. प्रवास, टूर ऑपरेटर कंपन्या, त्याचे एकूण अर्थकारण, मार्केट यावरही लिहिता येईल.
अर्थात, दिवाळी अंक विशेष थीमपुरता मर्यादित नाही. लेख, कविता, कथा, पाककृती, भाषांतर, शशक, व्यंगचित्र, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता.
लेखन देण्याची मुदत आजपासून ०४ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. इतर भाषेतील लेखनावर आधारित असल्यास, तसा स्पष्ट उल्लेख लेखामध्ये असावा.
आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा.
किंवा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. ईमेल वर लेखन पाठवताना attachments फक्त word/docs फाईल्सच्या स्वरुपात पाठवाव्यात PDF फाईल्स स्वीकारल्या जाणार नाहीत
जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका.
काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय दिवाळी अंक समितीचा असेल. अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं...
आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत
- मिपा दिवाळी अंक समिती
प्रतिक्रिया
13 Oct 2023 - 6:38 am | प्रचेतस
व्वा. एकदम मस्त विषय.
विविध मान्यवर मिपाकरांच्या लेखनाची वाट पहात आहेच.
13 Oct 2023 - 10:34 am | मुक्त विहारि
+१
13 Oct 2023 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह ! आली का दिवाळी. उत्तमोत्तम लेखन वाचावयास मिळतील.
शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
13 Oct 2023 - 1:05 pm | Bhakti
भटकंती म्हटलं की खुप छान छान फोटो असणार..वाह!
13 Oct 2023 - 4:35 pm | टर्मीनेटर
थीम आवडीची आहे! अंक भारिच होणार!
दिवाळी अंक - २०२३ ची वाट पहात आहे...
13 Oct 2023 - 6:18 pm | सौंदाळा
मिपा अपग्रेड झाल्यामुळे यावेळी दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित व्हावा ही इच्छा.
संपादक मंडळावर पण आता खूपच ताण पडेल त्यामुळे त्यांना आधीच शुभेच्छा.
वाट बघतोय.
13 Oct 2023 - 7:14 pm | सरिता बांदेकर
* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)हल्ली माझ्या कथा कुणी वाचायला ओपन केल्या की हे स्क्रिप्ट दिसतं मग मला माझ्या जवळची कथा त्यांना पाठवावी लागते. त्यामुळे किती तरी कथा मी यावर डकवल्या नाहीत.
शिवाय आम्ही उभयतां छान पैकी अमेरिका फिरून आलो.दोन सिनीयर सिटीझन एकटेच फिरतानाच अनुभव शेअर करायचा होता पण या अनुभवामुळे काहीच केलं नाही.
त्यामुळे कथा पाठवावी का हा विचार करतेय.
जवळपास सगळ्या दिवाळी अंकातल्या माझ्या कथांबाबत हा अनुभव आहे.
शिवाय खाली कथा शेअर करण्यासाठी खाली जे ॲाप्शन यायचे ते पण येत नाहीयत.
14 Oct 2023 - 7:19 am | तुषार काळभोर
फक्त दिवाळी अंक - २०२२ मधील लेखांना दिसतोय. दिवाळी अंकात असलेल्या सजावटीमुळे काही गडबड झाली असावी.
तुमचे (आणि सर्वांचेच) इतर लेख व्यवस्थित पाहता येताहेत.
15 Oct 2023 - 11:32 am | सरिता बांदेकर
फक्त २०२३ च्या नाही तर आधीच्या दिवाळी अंकांच्या कथांना पण हीच समस्या आहे.
असू देत, काही हरकत नाही.
माझ्या इतर दिवाळी अंकातील कथा वाचून मला फोन, पत्रं,मेल येतात त्यांनी विचारणा केल्यावर मी सांगितले तेव्हा मला कळले.
होय या काळातसुद्धा मला अंतर्देशी पत्रं आली आहेत.
त्यांना माझं सगळं लेखन वाचायचं असतं.
तशा दोन कथा मिसळपावसाठी राखून ठेवल्या आहेत , सवयीप्रमाणे. कदाचित नंतर टाकीन.
13 Oct 2023 - 8:40 pm | रंगीला रतन
दिवाळी अंकाच्या प्रतीक्षेत.
14 Oct 2023 - 7:24 am | तुषार काळभोर
विषय सुचवणाऱ्या मान्यवरांचे आभार.. आणि दिवाळी अंकाला शुभेच्छा!!
14 Oct 2023 - 11:07 am | राजेंद्र मेहेंदळे
भटकंती म्हणजे मेजवानीच. मग ती स्वतः केलेली असो कि ईतरांनी. दिवाळी अंक जोरदार होण्यासाठी शुभेच्छा. जमल्यास मीही एखादी जिलबी टाकीन म्हणतो.
14 Oct 2023 - 1:14 pm | अमरेंद्र बाहुबली
आपण पन्हाळगड ते विशाळगड गेलथो त्याची टाका की. किंवा कुठंतरी ट्रेक काढा तिथे फिरून येऊ मग त्ये टाकू.
26 Oct 2023 - 7:54 pm | राजेंद्र मेहेंदळे
त्यापेक्षा असे करा तुमच्या युरोपवारी बद्दल लिहा :)
14 Oct 2023 - 2:31 pm | चौथा कोनाडा
पर्यटन / भटकंती आणि भटकंती वृतांत वाचन हा आवडीचा विषय !
माझ्या साठी मेजवानीच असेल !
आता दिवाळी अंकाच्या प्रतिक्षेत !
15 Oct 2023 - 9:13 pm | अथांग आकाश
+१
आता दिवाळी अंकाच्या प्रतिक्षेत !
15 Oct 2023 - 8:57 am | भागो
"भटकंती" हे मिपाचे खास लेणे आहे. दिवाळी अंकाच्या प्रतिक्षेत!
15 Oct 2023 - 11:27 pm | पर्णिका
अरे व्वा, भटकंती म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ! या वर्षीचा दिवाळी अंक खास असणार हे निश्चित ! :)
संपादक मंडळास शुभेच्छा !!!
16 Oct 2023 - 9:48 am | श्वेता व्यास
सर्वांना शुभेच्छा, दिवाळी अंकाच्या प्रतिक्षेत!
21 Oct 2023 - 9:59 am | बिपीन सुरेश सांगळे
दिवाळी अंकासाठी मिपा , मालक , सर्व सदस्य , लेखक, वाचक आणि संपादक मंडळ या साऱ्यांना खूप खूप शुभेच्छा !
21 Oct 2023 - 10:01 am | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
कथा पाठवण्याचा प्रयत्न करतो.
एक विनंती -
कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? अर्थात , दीर्घकथा नाही .
आणि दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ?
कृपया कळावे .
21 Oct 2023 - 11:26 am | साहित्य संपादक
>>कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ?
चालेल.
>>दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ?
चालेल. दोन किंवा तीन दिवसांची मुदतवाढ दरवर्षी दिली जाते. परंतू दिवाळी अंकासाठी आलेल्या लेखनावर मुद्रितशोधनादी संस्कार करण्यात येत असल्या कारणाने जाहिर केलेल्या मुदतवाढीनंतर आलेले लेखन स्वीकारणे अडचणीचे होते.
4 Nov 2023 - 4:09 pm | साहित्य संपादक
लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे.
21 Oct 2023 - 2:10 pm | किसन शिंदे
दिवाळी अंकाला भरघोस शुभेच्छा !!
21 Oct 2023 - 8:21 pm | सविता००१
दिवाळी अंकाला खूप शुभेच्छा
23 Oct 2023 - 4:08 pm | गोरगावलेकर
दिवाळी अंक खासच असणार आहे. सर्व लेखकांना शुभेच्छा .
25 Oct 2023 - 5:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
फोटो सकट लेख कसा पाठवायचा?
25 Oct 2023 - 6:23 pm | साहित्य संपादक
तुम्ही मिपावर ज्याप्रमाणे लिहिता तसेच व्यनित लिहुन पाठवु शकता,
25 Oct 2023 - 8:24 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेख व्य नि केला आहे.
4 Nov 2023 - 12:46 pm | चौथा कोनाडा
लेखन देण्याची मुदत ०४ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत.
अरे च्या .. बघता बघता शेवटची मुदत आजच येऊन ठेपली की !
दीर्घ लेखन असल्यामुळे एखाद दिवस मुदत वाढवून मिळेल ना ?
(लेखनात कमीत कमी मुद्रितशोधनादी संस्कार करावे लागतील या साठी काळजी घेत आहे !)
4 Nov 2023 - 3:53 pm | साहित्य संपादक
लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
5 Nov 2023 - 12:36 pm | चौथा कोनाडा
व्वा, दिलासा देणारी बातमी !
धन्यवादम, मिपा !
7 Nov 2023 - 6:14 am | विजुभाऊ
व्यनी केला आहे.
पण व्यनीवर
"Unable to send e-mail. Contact the site administrator if the problem persists.
आणि
साहित्य संपादक यांना संदेश पाठवला आहे
असे दोन्ही मेसेज एकाच वेळेस येत आहेत
कन्फ्यूजन होतंय त्यामुळे.
लेख ईमेलवरही पाठवलाय
8 Nov 2023 - 9:59 am | चौथा कोनाडा
असा मेसेज सर्वच व्यनिना येत आहे.
अर्थात साहित्य संपादकांची पोहोच मिळाल्याचा प्रतिसाद मिळाला की आपला लेख तिथे पर्यंत पोहोचला हे स्पष्ट होते.
5 Nov 2023 - 11:21 pm | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
मिपा दिवाळी अंक २०२३.
सस्नेह नमस्कार .
सगळ्यात आधी तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांस सलाम !
तुमच्यामुळे हा दिवाळी अंक साकार होतो आणि रसिकांपर्यंत पोचतो .
यात माझंही थोडंसं योगदान . अंकासाठी मी ' इज्जत ' ही कथा पाठवीत आहे .
कृपया ती स्वीकारावी ही विनंती .
धन्यवाद आणि शुभेच्छा !
बिपीन सांगळे
या आय डी वर पाठवली आहे - sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com .
कळावे .
7 Nov 2023 - 8:41 pm | एक_वात्रट
एक लेख पाठवला आहे. दुसरा लिहितो आहे, आज रात्री बारापर्यंत पाठवायचा प्रयत्न करतो.