मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव दिवाळी अंक - २०२३ - आवाहन

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं

लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

राम राम, मिपाकर. श्रीगणेश लेखमाला पार पडली, की मिपाच्या पडद्यामागील मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपा दिवाळी अंकाचे. मराठी आंतरजालावर आणि छापील दिवाळी अंकांचे साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद अशी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी असतात, आपल्याही मिपाचा दिवाळी अंक प्रत्येक वर्षी असतो. मराठी अंकांची परंपरा डिजीटल युगात सुद्धा खंडीत झालेली नाही, माध्यमांचे बदललेले स्वरुप त्यात चढ उतार असतात पण दिवाळी अंकाचा उत्साह तसाच असतो, हे नमुद करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या लेखांना अर्थात गलेमाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दिवाळी अंकही धमाकेदार, बहारदार आणि मिपा परंपरेला अनसरुन जोरदार साजरा होणार. तर, मिपाकरहो...! आता काय मागं राह्यचं काही कारण नाय बघा. घ्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर लेखन. यंदाचा मिसळपाव दिवाळी अंक असणार आहे 'पर्यटन विशेषांक'. पर्यटन- कोणतंही. प्रवास - कसलाही. भटकंती - कुठेही! सप्ताहांती केलेली स्थानिक भटकंती, परदेशवारीची नवलाई, फिरत्या नोकरीचे अनुभव, तीर्थक्षेत्रांना भेटी, किंवा नुसता भटकत केलेला प्रवास. प्रवास, टूर ऑपरेटर कंपन्या, त्याचे एकूण अर्थकारण, मार्केट यावरही लिहिता येईल. अर्थात, दिवाळी अंक विशेष थीमपुरता मर्यादित नाही. लेख, कविता, कथा, पाककृती, भाषांतर, शशक, व्यंगचित्र, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत आजपासून ०४ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. इतर भाषेतील लेखनावर आधारित असल्यास, तसा स्पष्ट उल्लेख लेखामध्ये असावा. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. ईमेल वर लेखन पाठवताना attachments फक्त word/docs फाईल्सच्या स्वरुपात पाठवाव्यात PDF फाईल्स स्वीकारल्या जाणार नाहीत जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय दिवाळी अंक समितीचा असेल. अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत - मिपा दिवाळी अंक समिती

वाचन 9307 प्रतिक्रिया 0