७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.
एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.
१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.
अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.
अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!
इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.
परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]
इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.
हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.
नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.
आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)
१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)
'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.
२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?
रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...
३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)
'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...
४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.
५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
प्रतिक्रिया
12 Oct 2023 - 6:12 pm | अमरेंद्र बाहुबली
४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं.
गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.
12 Oct 2023 - 8:35 pm | टर्मीनेटर
अ.बा. आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद 🙏
तितकं सोपं नाहीये हो ते...
तथाकथित 'मानवाधिकार' संघटना, संयुक्त राष्ट्रसंघ, अरब लीग आणि संपूर्ण इस्लामिक जगत असे अनेक अडथळे आहेत त्यात. इस्रायल संरक्षणात्मकदृष्ट्या कितीही ताकदवान असला आणि त्याच्या बलाढ्य पाश्चिमात्य देशांचा त्याला कितीही पाठिंबा असला तरी त्या देशाची भौगोलिक स्थिती पहाता सर्व बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी घेरलेल्या इस्रायलच्या सर्व शत्रुंनी एकजुटीने त्याच्यावर चहूबाजूंनी आक्रमण केल्यास त्यापुढे इस्त्रायल फारकाळ टिकाव नाही धरू शकणार. पॅलेस्टाईनची राखरांगोळी करणे हा खरंच त्यांच्यासाठी पोरखेळ असला तरी त्याच्या परिणामी इस्रायल पण जगाच्या नकाशावरून गायब होईल हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे.
सौदी अरेबिया आणि यु.ए.ई. शी अगदी मैत्रीपूर्ण झाले नसले तरी थोडेफार का होइना पण बऱ्यापैकी व्यापारी-धोरणात्मक संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली असताना इस्त्रायल असला मूर्खपणा करण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यात आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताविषयी तो देश किती संवेदनशील आहे हे देखील सर्वश्रुत आहे!
८ ऑक्टोबरला इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी लष्कराकडून गाझा पट्टीचे 'निर्जन बेटात' रूपांतर केले जाण्यापूर्वी तिथल्या सुमारे २३ लाख नागरिकांना तिथून निघून जाण्याचा इशारा दिला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे कि २००७ पासून इस्त्रायलने गाझा पट्टीची 'जमिन, हवाई आणि समुद्र' अशा सर्वबाजूंनी अशी काही नाकेबंदी केली आहे कि त्यांना तिथून बाहेर पाडण्यासाठी मार्गच ठेवला नाहीये. खालची दोन चित्रे पाहून ह्या नाकाबंदीची बऱ्यापैकी कल्पना येईल.
गाझा पट्टीच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील इस्रायलच्या सीमेवर 'गाझा-इस्राएल बॅरिअर' हि तटबंदी आहे आणि पश्चिमेकडील बाजूला भूमध्य समुद्र आहे आणि त्या समुद्रावर आणि गाझा पट्टीच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण आहे.
नाही म्हणायला गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील बाजूला इजिप्तने आपल्या आणि गाझा पट्टीच्या सीमेवर बांधलेल्या कुंपणातून ते इजिप्त मध्ये प्रवेश करू शकतात पण त्यासाठी इजिप्तने ह्या निर्वासितांच्या लोंढ्यांसाठी कुंपणाचा दरवाजा उघडला पाहिजे. गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या ह्या चक्रम पॅलेस्टिनी रहिवास्यांना आपल्या देशात प्रवेश देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा गाढवपणा इजिप्त करेल असे वाटत नसल्याने तसे होण्याची शक्यता कमीच आहे.
15 Oct 2023 - 4:44 pm | टर्मीनेटर
गाझा पट्टीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना तिथुन बाहेर पडण्यासाठी इजिप्तच्या सीमेवरील 'राफा क्रॉसींग पॉईंट' खुला करण्यावर इजिप्त, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये एकमत झाले आहे, ह्या वाटाघाटीमध्ये कतारचाही सहभाग होता. परंतु गाझा पट्टीतुन बाहेर पडण्यास उत्सुक असलेल्या पॅलेस्टीनी लोकांसाठी हा दरवाजा उघडण्याची संयुक्त राष्ट्र संघाची विनंती इजिप्तने फेटाळुन लावली आहे. हे अपेक्षीतच असले तरी हे युद्ध चिघळत गेल्यास पुढे वाढत जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे इजिप्त सरकार झुकते कि आपल्या नागरीकांची सुरक्षितता जपण्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम रहाते हे बघणे रोचक ठरेल!
गाझा पट्टीची आणि इस्त्रायलची सीमा इजिप्तच्या सिनाई प्रांताला (द्वीपकल्पाला) लागुन आहेत. १९६७ च्या युद्धात (सिक्स डे वॉर) इजिप्तचा पराभव झाल्यावर हा प्रदेश इस्त्रायलच्या ताब्यात गेला होता. इस्रायलव्याप्त सिनाईमध्ये इस्रायलने सुमारे १८ नागरी वसाहती, दोन वायुदलाचे तळ आणि एक नौदलाचा तळ स्थापन केला होता. इजिप्तसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या सुवेझ कालव्याचा पश्चिम किनारा इस्रायलव्याप्त सिनाई प्रदेशात असल्याने युद्धात झालेल्या पराभवापेक्षाही हा प्रदेश गमवावा लागणे इजिप्तच्या जिव्हारी लागले होते. शेवटी इजिप्तने इस्त्रायलला 'सर्वभौम राष्ट्र' म्हणुन मान्यता देण्याच्या अटीवर इजिप्त आणि इस्त्रायलमध्ये १९७९ साली शांतता करार झाल्यावर इस्त्रायलने टप्प्या टप्प्याने आपल्या ज्युईश वसाहती बंद करत १९८२ साली सिनाईमधुन संपुर्ण माघार घेत हा प्रदेश पुन्हा इजिप्तच्या हवाली केला.
आज पाकव्याप्त काश्मिर परत मिळवणे हा विषय भारतीयांसाठी जितका जिव्हाळ्याचा आहे, तशाच किंबहुना त्यापेक्षाही तीव्र भावना सिनाईच्या बाबतीत त्याकाळी इजिप्शियन लोकांच्या होत्या आणि ह्या लोकभावनेला प्राधान्य देत, समस्त इस्लामिक जगताच्या रोषाची पर्वा न करता २६ मार्च १९७९ रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत, इस्त्रायलचे पंतप्रधान मनाहेम बिगिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जिमि कार्टर अशा तत्कालीन नेत्यांनी ह्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
इजिप्तचा बहुतांश भाग हा उत्तर आफ्रिकेत आहे पण तांबड्या समुद्रातील सिनाई द्वीपकल्प मात्र आशिया खंडात येतो. इस्त्रायलकडुन हा प्रदेश परत मिळाला असला तरी इजिप्तसाठी अद्याप ते एक अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. जवळपास १२-१५ वर्षे इस्त्रायलच्या अधिपत्याखाली अनिच्छेने रहावे लागल्यामुळे आणि गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या लोकांबरोबर जवळीक निर्माण झाल्या कारणाने तिथल्या सिनाई स्थानिक इजिप्शियन लोकांच्या विचारसरणीत अमुलाग्र बदल झाला. इस्त्रायलने आपल्या सीमेवर कडेकोट तटबंदी उभारुन गाझा पट्टीला अपल्यापासुन वेगळे ठेवले असले तरी ह्या सिनाई प्रांतातुन गाझा पट्टीत जमिनीखाली बोगदे / भुयारे खणुन त्यातुन इराण आणि अन्य पॅलेस्टाईन समर्थक देशांकडुन गाझा पट्टीतील दहशतवाद्यांसाठी तस्करी करुन इजिप्तमध्ये आणलेली शस्त्रास्त्रे आणि पैसा त्यांच्यापर्यंत पोचवला जातो, आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांशी निर्माण झालेल्या बंधुभावापोटी ह्या 'धर्मकार्यासाठी' सिनाईतले बदललेल्या मानसिकतेचे स्थानिक इजिप्शियन लोकं संपुर्ण मदत करतात.
आपल्या भुमीतुन गाझा पट्टीत होणारी ही तस्करी आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांची ये-जा रोखण्यासाठी इजिप्तकडुन प्रामाणिकपणे प्रयत्न सुरु असतात (हे इस्त्रायलसुद्धा मान्य करतो आणि अनेक प्रसंगी हे प्रयत्न ते परस्पर सहकार्याने किंवा संयुक्तपणेही करतात). पण पोलीसांकडुन आणि सुरक्षा दलांकडुन सातत्याने तिथे होणाऱ्या छापेमारीच्या घटना आणि चकमकींच्या परिणामी रस्तेमार्गे प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाल्याने सिनाई द्वीपकल्पाच्या दक्षीणेला असलेल्या 'शर्म अल शेख' ह्या जगभरातील आणि विषेशतः युरोपियन पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या नितांत सुंदर पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या तिनेक दशकांत प्रचंड घट झाल्याने तिथल्या पर्यटनातुन इजिप्तला मिळणारे उत्पन्नही लक्षणीय प्रमाणात घटले. आजही तिथे युरोपियन पर्यटक आवर्जुन जातात पण रस्तेमार्गे जाणे सुरक्षीत नसल्याने विमानप्रवासाचा एकमेव पर्याय उप्लब्ध आहे. अर्थात गेल्या दिडेक दशकात 'हुरघाडा' हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावरील शर्म अल शेखच्या तोडीस तोड असे पर्यटनस्थळ चांगले विकसित आणि लोकप्रिय झाल्याने ह्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई होत आहे आणि सुरक्षेच्या कारणासाठीच माझ्या इजिप्त सफरीत 'शर्म अल शेख' ऐवजी मी 'हुरघाडा'ची निवड केली होती. तसेच त्या सफरीवर सव्वा पाच वर्षांपुर्वी लिहिलेल्या मालिकेच्या पहिल्या भागावर एका मिपा सदस्याने विचारलेल्या इजिप्तमधील सुरक्षेविषयक प्रश्नाला उत्तर देताना त्या प्रतिसादात मी ह्या सिनाई प्रांताचा त्रोटक उल्लेख केला होता. खरंतर वरीलपैकी काही माहिती त्या प्रतिसादात द्यावी असाही विचार त्यावेळी डोक्यात आला होता पण ती अस्थानी ठरेल असे वाटल्याने केवळ सिनाईची काश्मिरसोबत तुलना करुन एका वाक्यात उत्तर देउन आवरते घेतले होते 😀
15 Oct 2023 - 5:00 pm | अमरेंद्र बाहुबली
छान माहीतीपुर्ण प्रतिसाद. इस्रायलने गाझाच्या तीन बाजू आवळल्या आहेत. चौथी बाजूजी इजिप्तच्या बाजूने ऊघडीय तिथे हमासकडून शस्त्रात्रे आयात केली जातात. ही चौथी बाजू इस्रायलने ताब्यात घेऊन हमासच्या नी गाझाच्या चारही बाजूने मूसक्या आवळाव्यात. हळूहळू गाझाची गावेच्या गावे ताब्याच घ्यावीत, गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी. नी गाझा स्वराज्यात (इस्रायलच्या) सामील करावे. सततच्या हल्लांपासूनहा मूक्ती मिळेल नी युध्दावरील खर्चही वाचेल. ह्यावेळेस तशी संधी आलीच आहे. अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत घेऊन गाझा नावाचा काटा कायमचा संपवावा.
15 Oct 2023 - 5:11 pm | Trump
मग कोणत्या तोंडाने होलोकॉस्टच्या नावाने गळे काढुन जगाची सहानुभुती मिळवणार??
15 Oct 2023 - 6:27 pm | अमरेंद्र बाहुबली
जगाची सहानूभूती घेऊन जगायला ज्यू काही लेचेपेचे नाहीत. जर एकही ज्यू गाझांच्या लोकांमूळे मरत असेल तर ज्यूंना पुर्ण अधिकार आहे गाझा संपवायचा.
15 Oct 2023 - 7:47 pm | टर्मीनेटर
श्री श्री श्री Trump महोदय...
धाग्यावरील तुमचे सर्व प्रतिसाद वाचले आणि तुम्हाला ते विध्वत्तापुर्ण वगैरे वाटत असले तरी ते अत्यंत भंपक असुन हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे असा त्यांचा प्रवास होत चालला आहे असे खेदाने नमुद करतो.
तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही आणि तुमचे वैचारीक स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा कोणाला अधिकारही नाही! पण समाज माध्य्मांवर आपले विचार व्यक्त करताना लेखकाने किमान आपण कशाचे आणि कुठ्ल्या पातळीवर जाउन समर्थन करत आहोत ह्याचे तारतम्य बाळगावे इतकी माफक अपेक्षा ठेवण्याचा अधिकार त्या माध्यमाचे वापरकर्ते म्हणुन आम्हाला आहे, आणि हे तुम्हालाही अमान्य नसावे.
इत्यलम.
15 Oct 2023 - 11:09 pm | Trump
श्री टर्मीनेटर,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बर्याच देशात पुराव्याशिवाय कोणावरही हिटलर / नाझीं समर्थकाचा आरोप लावणे हा मोठा अपराध आहे. त्यामुळे जरा जपुन. उगाच आक्रसताळेपणाने आरोप करुन काहीच सिद्ध होत नाही.
मला श्री हिटलर यांच्याबद्दल ना तर प्रेम आणि ना तिरस्कार आहे. तसेच मला ज्युंबद्दल ना प्रेम आहे ना द्वेष. माझी भुमिका तटस्थ आहे. श्री हिटलर यांच्यामुळे भारताचे किंवा हिंदु समाजाचे कोणतेही नुकसान झाल्याचे मला माहिती नाही. (तुम्हाला माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी.) दुसरे महायुध्दात अगोर्याचा फायदाच झाला आहे. त्यामुळे उगाच गोरे सांगतात म्हणुन अगोर्यांनी प्रचारतंत्रात यायची गरज नाही. अजुन तरी भारतीय कायद्यानुसार प्रत्येकाने श्री हिटलर यांचा द्वेष करावा, किंवा सत्य उजेडात आणु नये असा कायदा आला नाही.
-
धन्यवाद
--
आता तुमचे प्रतिसादाबद्दल बोलुया. श्री अमरेंद्र बाहुबली गाझामध्ये सरळ सरळ नरसंहार करावा असे सुचवत आहेत. ("गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी." याचा अर्थ न समजण्यासारखे तुम्ही दुधखुळे, ना मी आहे.) त्याचा तुम्ही निषेध/विरोध न करता अप्रत्यक्ष सहमती दाखवुन ते कसे शक्य नाही ते उपप्रतिसादामधुन दाखवत आहात. गाझामधील बहुसंख्य लोक जेहादी कसे आणि सुक्याबरोबर ओलेही करे जळणार ते तुम्हाला मान्य आहे.
म्हणजे थोड्क्यात ज्युंचा नरसहांर झाला, त्याचा तुम्हाला त्रास आहे पण इतरांचा चालतो आहे; ह्या दुटप्पीपणाला/दाभिंकपणाला काय म्हणणार ?
तुम्हाला जर माझ्या "हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे " मुद्द्यांचा प्रतिवाद करणे जमत नसेल तर श्री नेत्यान्याहु यांच्या मुद्द्याचा करा.
मग बघुया.
कधी वेळ भेटला तर जनरल पॅटन युध्दानंतर काय म्हटला ते वाचा, पश्चिम जर्मनीच्या नेतेमंडळीत, अधिकारी वर्गात, गुप्तहेरसंस्थेत कोण होते याची माहिती मिळवा.
15 Oct 2023 - 11:54 pm | कॉमी
15 Oct 2023 - 7:18 pm | टर्मीनेटर
रशीया सध्या स्वतःच युक्रेन युद्धात गुंतलेला आहे आणि मला वाटतं काल कि परवा आता युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवणे शक्य नसल्याचे सांगत अमेरिकेने आपला मदतीचा सगळा ओघ इस्त्रायलकडे वळवला आहे, हि गोष्ट पुतिन ह्यांच्या पथ्यावर पडणारी असल्याने ते आता ह्या संधीचा फायदा घेउन इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाकडे विषेश लक्ष न देता लवकरात लवकर युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही.
आताच्या युद्धात गाझा पट्टीचे जे व्हायचे ते होइलच, तसेही आज तिथले बहुसंख्य लोकं जिहादी मनसिकतेचे आहेत त्यामुळे भरपुर प्रमाणात असलेल्या सुक्या बरोबर थोडे ओलेही जळणे अपरिहार्य आहे, पण युक्रेनच्या फाजिल आत्मविश्वास बाळगणाऱ्या विदुषकाने मात्र नको त्या लोकांच्या नादी लागुन जवळपास गेले पावणेदोन वर्षे सुरु असलेल्या युद्धामुळे तिथल्या लाखो निरपराध नागरिकांचे आयुष्य धोक्यात तर घातले आहेच पण देशालाही कितीतरी वर्षे मागे नेउन ठेवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.
15 Oct 2023 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली
युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही.
मला वाटतंय युक्रेनचा बाजार ऊठवणं रशीयाला कठीण नाही. त्यांनी मुद्दाम प्रश्न चिघळत ठेवलाय.
बाकी ऊत्तर गाझा रिकामं करायला सांगीतलंय इस्रायलने. जितके हल्ले होतील त्याच्या बदल्यात मोठी जमीन इस्राईलने लाटत जावा तेव्हाच हे हमासी अतिरेकी सरळ होतील.
17 Oct 2023 - 11:54 am | सुबोध खरे
गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी.
गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे
त्याचिच पुरवणी म्हणजे काश्मीर खोऱ्यातील ६० लाख मुसलमान मारून टाकून काश्मीर खोरे शुद्ध करून टाकावे असे आपले म्हणणे आहे का?
किंवा
मणिपूर मधील ८ लाख कुकी लोकांना मारून टाकून मणिपूर चा प्रश्न कायमचा सोडवून टाकावा काय?
न रहेगा बांस न बजेगी बांसुरी
17 Oct 2023 - 11:59 am | अमरेंद्र बाहुबली
गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे
सर आपण नीट वाचत नाहीत. आपल्या सोयीने हवं तेवढं वाक्य गाळून वाचलंय का?? पुन्हा वाचा पाहू.17 Oct 2023 - 12:08 pm | सुबोध खरे
गाझाची लोकसंख्या २३ लाख आहे
आता फाटे न फोडता पुढची उत्तरे द्या
17 Oct 2023 - 12:21 pm | अमरेंद्र बाहुबली
गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे
सर हे वाक्य आपण कुठून ऊचलले ते माहीत नाही असो.तरीही ऊत्तर देतो. हमास ही गाझापट्टीतील संस्था आहे ना तिथल्याच लोकांनी तीच्या राजकीय भूमीकेला पाठिंबा देऊन निवडूण दिलंय. म्हणजे गाझाचे लोक बिच्चारे वगैरे नाहीत.
दुसरी गोष्ट इस्रायलने का म्हणून सतत गाझाच्या हल्ल्याच्या भितीने जगत कहावे नी लाखो रूपये खर्च करावेत? गाझात माणसे राहतात तर इस्राईलात जनावरे राहतात का? कि इस्राइलच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही??
जर गाझाच्या हल्ल्यात एकही इस्रायली मरत असेल तर इस्रायल ने संपुर्ण गाझापट्टी बेतिराख करावी. स्वतच्या नागरीकांची सुरक्षीतता महत्वाची.
आता कश्मीर बद्दल, कश्मीर हा भारचाचा भाग आहे. कश्मीरातील मुस्लिमही भारतीय आहेत. ते आंगोलनं करतात राॅकेट वगैरे डागत नाहीत. पण हो सिमेपलिकडून पाकिस्तानातून होणार्या हल्ल्यात जर एकही भारतीय मरत असेल तर भारताला ही अधीकार आहे संपुर्ण पाकिस्तान बेचिराख करायचा.
12 Oct 2023 - 6:12 pm | अमरेंद्र बाहुबली
४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं.
गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.
12 Oct 2023 - 6:15 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्या सगळ्या गदारोळात परशूराम (धनंजय मानेंचे मित्र) इस्राईलात सुरक्षीत आहेत असे कळालेय. :)
12 Oct 2023 - 7:14 pm | कंजूस
दुसरे लेख मागे पडणार (कोकण,गोवा,हिंग-वगैरे,नाईन-इलेवन.) आणि आगामी नेपाळ सुद्धा.
इकडे काय होणार?
भारतातातली चाळीस टक्के जनता हमासच्या बाजूने आहे म्हणे. बॉलिवूड कलाकार निम्मे निम्मे.
निवडणुकीला हा मुद्दा होणार.
(मला वाटते).
12 Oct 2023 - 11:39 pm | टर्मीनेटर
कंकाका आणि राघव,
प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏
हो, तसं होणार आहे खरं 😀 पण हा ताजा विषय मला जास्त महत्वाचा वाटल्याने त्याला आधी हात घातला!
असु शकेल! बाकिच्यांबद्दल काय बोलणार? खुद्द मी पण साधारणपणे दिडेक दशकापुर्वी पर्यंत पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमास सारख्या दह्शतवादी संघटनेचा सहानुभुतीदार होतो, अज्ञानीच होतो म्हणा ना 😀 अर्थात त्या अज्ञानामागे आपल्याकडील माध्यमांतुन चालवला जाणारा इस्त्रायल विरोधी 'इस्लामिक' आणि 'डाव्यांचा' प्रोपगंडा कारणीभुत होता. पण पुढे आंतरजालाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या संघर्षाची दुसरी बाजु समजु लागली, तसेच विविध देशांमध्ये भेटलेल्या मध्यपुर्वेच्या नागरिकांकडुन समजत गेलेली वस्तुस्थिती आणि उत्तरोत्तर विस्तारत गेलेल्या अनुभवविश्वातुन विचार आणि दृष्टिकोन बदलत गेले.
असो, आज ना उद्या जास्तीत जास्त जनतेला सत्यपरिस्थितीची जाणीव झाल्यावर हे प्रमाणही ४० टक्यांवरुन कमी होउन १८ ते २० टक्यांवर येइल अशी अपेक्षा करुयात, अजुन काय!
13 Oct 2023 - 10:46 am | विजुभाऊ
भारतातले तथाकथीत पुरोगामी जर भारत चीन किंवा भारत पाक युद्ध झाले तर कोणाच्या बाजूने बोलतील हे त्यांच्या वर्तनावरून सांगणे कठीण आहे.
त्याना अजूनही गंगाजमुनी तेहजीब चे उमाळे येत असतात.
अमयु तील त्या लोकाना हमास ने केलेले वर्तन दिसले नाही मात्र इस्राईलचा सम्हार दिसला
13 Oct 2023 - 10:55 am | अमरेंद्र बाहुबली
भारतातले पुरोगामी देशप्रेमी आहेत म्हणूनच ते गेल्या २००-२५० वर्षांपासून सनातनींशी लढताहेत. सर्व सुधारणा पुरोगामींनाच करवून घेतल्या त्यामुळेच देश आज इतका प्रगत आहे. पुरोगामी वसतो तर देश आज हिंदू तालिबान असता. त्यामुळे पुरोगामींचं देशप्रेम वादातीत आहे. बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात. ह्या देशात अब्दुल कलाम, अब्दुल हमीद, दलवाई वगैरे लोक झाले हे विसरू नका. त्यामुळे देशप्रेमी पुरोगाम्यांबद्दल नेहमीच वाईट लिहीणे बंदं करावे अशी विनंती करून खाली बसतो. लिहीता आलं तर सनातनी प्रतिगाम्यांबद्दलही लिहीत चला.
13 Oct 2023 - 12:17 pm | सर टोबी
सरसकट मुस्लिम द्वेष करीत नाहीत हे पुरोगम्यांच फारच साधं वैशिष्ठ्य आहे. मुळात देशप्रेम ही बोलण्याची गोष्ट नसते तर चांगलं सहजीवन जगण्याच्या कल्पनेशी एकरूप झालेली गोष्ट असते. कोणताही देशप्रेमी उन्मादी वृत्तीने संस्कृतीचे गोडवे गाणार नाही. दुष्काळ येत्या काही दिवसातच आपलं विक्राळ रूप दाखविणार आहे पण त्याकडे डोळेझाक करून वाघनखं काही दिवस महाराष्ट्रात आणणं याला कोणी देशप्रेम म्हणणार नाही. अप्रिय, वेदनादायक भूतकाळ मागे टाकून अनेक देशांनी अगदी कालच्या शत्रूच्या सहाय्याने प्रगती केलेली दिसेल. आणि हेच कदाचित सुसंस्कृत समाजाचं वैशिष्ठ्य असू शकते.
13 Oct 2023 - 12:25 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
13 Oct 2023 - 12:29 pm | प्रसाद गोडबोले
मला हा वक्प्रचार फार आवडतो =))))
ह्या निमित्ताने सर्जिकल स्ट्राईक वर आधारित उरी ह्या चित्रपटातील गीत आठवले . तो चित्रपट आलेला तेव्हाही लोकांनी त्याला " राष्ट्रभक्तीचे हिडीस प्रदर्शन" असे म्हणले होते ते स्मरते !!
https://www.youtube.com/watch?v=g62J-8nV5FI
15 Oct 2023 - 11:12 pm | Trump
एका बाजुला गाझा पट्टी पुर्ण संपवावी म्हणत आहात, दुसरीकडे "बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात." म्हणत आहात.
कोणती तरी एकच गल्ली पकडा.
15 Oct 2023 - 11:23 pm | अमरेंद्र बाहुबली
गाझा पट्टी संपवावी कारण त्या बाजूने इस्राईलवर भरमसाठ हल्ले होताहेत नी लोक मरताहेत. गाझापट्टीत मुसलमान आहेत म्हणून संपवावी असं मी कुठेही म्हटलेलं नाही. गाझा पट्टीतील लोक कुणीही xyz (खरंतर yz) असो. त्यांना इस्रायली लोक मारायचा काहीही अधिकार नाही नी जर एक जरी इस्रायली मरत असेल तर अख्खं गाझा बेचिराख करावं असं मी पुन्हा सांगतो.
बायदवे, आपलं म्हणणं तरी काय आहे गाझात मुस्लिम राहतात म्हणून त्यांच्यावर हल्ले करू नये नी त्यांनी केलेले हल्ले इस्राइलने सहण करावेत? कारण काय तर तुमच्या सारख्या मानवतावाद्यांची मने दुखावू नयेत म्हणून?
19 Oct 2023 - 9:58 pm | टर्मीनेटर
त्याचं उत्तर तसं सोपं आहे! हे लोकं पहिले ज्याने कोणी युद्ध छेडले असेल त्याचा नावापुरता निषेध करतील आणि मग भारताची भूमिका कशी चुकीची होती किंवा आहे ह्यावर तत्वज्ञान झाडत बसतील.
अर्थात ह्याबाबतीत जास्ती बोलणे एका गोष्टीसाठी उचित होणार नाही कारण मिपावर राजकीय चर्चाना मनाई आहे... अन्यथा विद्यमान सरकारच्या आधीच्या भूमिकेविषयी समाधानी असलो तरी (कालांतराने वाजवलेल्या) डबल ढोलकीवर पण भाष्य केले असते..
असो... सगळ्यांचे पाय मातीचे, अजून काय?
थोडक्यात सांगायचे तर भारताचे पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल विषयक धोरण पूर्वी अत्यंत घाणेरडे राहिले आहे असे माझे वैयक्तिक मत, काहींना ते योग्य वाटत असल्याचे त्यांनी खाली प्रतिसादात म्हंटले आहे, त्या प्रतिसादापर्यंत पोचलो की माझे मत मांडतोच!
12 Oct 2023 - 7:38 pm | राघव
उत्सुकता आहेच. वाट बघतोय.
12 Oct 2023 - 8:24 pm | मुक्त विहारि
वाखूसा
आपले केंद्र सरकार, इस्रायलच्या पाठीशी आहेत
काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत
-----
इस्रायल मधील विरोधी पक्ष, त्यांच्या केंद्र सरकारला संपूर्ण पाठिंबा देत आहेत
राष्ट्र भक्ती, म्हणजे नेमके काय? ह्याचे उत्तम उदाहरण, इस्रायल जनता नेहमीच दाखवून देते , मग ते व्योम कप्पुर युद्ध असो किंवा म्युनिक हत्याकांड असो
12 Oct 2023 - 8:35 pm | अमरेंद्र बाहुबली
कोंग्रेस हमासला पाठींबा देतंय ह्याला काही आधार?
12 Oct 2023 - 8:49 pm | मुक्त विहारि
"आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा - Marathi News | Israel-Palestine: First Condemnation of Attack on Israel, Now Congress Supports Palestine | Latest national News at Lokmat.com" https://www.lokmat.com/national/israel-palestine-first-condemnation-of-a...
https://mpcnews.in/congresss-support-for-hamas-remains-decision-against-...
https://www.mahamtb.com/Encyc/2023/10/9/Congress-extends-support-for-Pal...
12 Oct 2023 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली
पॅलेस्टाईनला मोदींनी भेट दिली होती. पडद्यामागून कोणाचा पाठींबा आहे?
12 Oct 2023 - 9:14 pm | टर्मीनेटर
मुविकाका आणि अ.बा.
धागाविषय आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधीत असल्याने कृपया प्रतिसादांत देशी राजकारण (काँगेस, भाजप, गांधी, मोदी वगैरे) आणू नये हि नम्र विनंती 🙏
12 Oct 2023 - 9:19 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत. काकांनी जे खोटं लिहीलं होतं त्याला प्रतिवाद केला फक्त. आता काहीही राजकीय लिहीनार नाही.
12 Oct 2023 - 9:02 pm | अमरेंद्र बाहुबली
इस्राईलवरील हल्ल्याचा निषेध ही केलाय हे सोयास्कररीत्या लिहीलंलं नाहीये मुवीकाका आपण वरील प्रतिसादात. :)
12 Oct 2023 - 9:28 pm | मुक्त विहारि
मग पाठिंबा दिला आहे
बरेच काही लिहिता येईल, पण थांबतो
13 Oct 2023 - 3:11 pm | कॉमी
ह्यात हमासला सपोर्ट कुठे दिसला ? खुद्द भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून त्यानंतर आपला दविराष्ट्र सूचनेला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. मग काय भारत सरकार पण हमासला पाठींबा देते आहे काय ?
12 Oct 2023 - 9:04 pm | अमरेंद्र बाहुबली
काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत
काॅंग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिबा दिलाय हमासला नाही.
हमास ही अतिरेकी संघटना आहे तर पॅलेस्टाईन हा देश आहे. टंकायच्या आधी थोडातरी माहीती घेत चला काका. किती खोटं लिहीनार? :) काॅंग्रेस द्वेषात आपण खोटं लिहीत हे देखील आपल्या लक्षात येत नाही? कठीण आहे.
12 Oct 2023 - 9:26 pm | मुक्त विहारि
पण
टर्मिनेटर यांचा मान राखून थांबतो
12 Oct 2023 - 9:51 pm | धर्मराजमुटके
या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला (आणि बर्याच जणांना न पटलेला ) सिद्धांत पुन्हा उगाळतो. मुळात ज्यूंना पहिल्या / दुसर्या महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत. जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता. पवित्र भुमी च्या गोंडस नावाखाली ज्युंनी गवताचे पाते उगवत नसलेली जमीन आणि आजूबाजूची मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले. गोरे फुकटात सुटले.ज्युंनी फुकटात xxx गाढवं अंगावर घेतली. पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते). तसे पाहिले तर ख्रिश्चन, मुस्लीम आणि ज्यु एकाच देवाला वेगवेगळ्या नावाने भजतात म्हणजे ते धर्मबंधूच आहेत पण सगळ्यात जास्त एकमेकांचे वैरी देखील आहेत. शेवटी भाऊबंदकी काही सुटत नाही. तिन्ही भावांनी मिळून पवित्र भूमी सांभाळली असती तर अजून काय पाहिजे होते.
ब्रिटिशांनी पाचर मारली म्हणता पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये.
असो. पुढील लेखनास शुभेच्छा !
12 Oct 2023 - 11:31 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रतिसाद पटला नाही.
महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत.
फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये. नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता.जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता
ज्यूंचं इस्रायली भूमीवर प्रेम असण्यामागे ती जमीन त्यांच्यासाठी पवित्र आहे हे धार्मीक कारण आहे, जर्मनीचा तूकडा त्यांच्या पवित्र भूमीत मोडला नसता. हिंदूंना रामजन्मभूमावरच मंदीर का हवंय? अख्खा भारत पडून असताना त्याच जागेवर मंदीर का ऊभारायचंय?? ह्याचं जे ऊत्तर आहे तेच पवित्र ईस्रायली नी जेरूसलेमबद्दल ज्यूंचं आहे.
मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले.
मुस्लिम राष्ट्रे असेही नवनवे शत्रू शोधतच असतात. कुणी नसेल तर आपसांत लढतात.इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले).
का करू नये? मूळात आपल्या भूमीसाठी तीनच राष्ट्रे मुस्लिमांशी लढली असं मला वाटतं. पहीलं स्पेन ज्यांनी संपुर्ण भूमी निर्मूस्लिम करून घेतली. दुसरा भारत ज्याने आपला बराचसा भाग गमावून भूमी त्रासापासून मूक्त करून घेतली नी तिसरं इस्राईल जे आजही आपल्या भूमीसाठी अरबी मुस्लिमांशी लढतंय. पाकिस्तानची अणूभट्टी ऊडवायला इस्राइलच्या मोसादने भारताबरोबर प्लान आखला होता. पण आपल्याच पंतप्रधानाच्या चुकीमूळं सर्व एजंट्स मारले गेले.इस्राईल तंत्रन्यानातही प्रगत आहे नी त्याचा भारताला फायदाच होईल पण पॅलेस्टाईन किंवी इतर राष्ट्रांकडून तेल सोडले तर भारताला काहीही फायदा नाही. कश्मीर प्रशनावर किती मुस्लिम राष्ट्रे भारताच्या बाजूने असतात हा मोठा प्रश्नच आहे. तस्मात इस्राइल वाढतच रहावा नी भारतीयांनी नी भारताने होईल तेवढी मदत नी पाठिंबा इस्राईल ला द्यायलाच हवा.
आणी महत्वाचं राहीलं. डायबेटीसवर रामबाण औषध इस्राईलकडेच आहे हे विसरू नका. :)
13 Oct 2023 - 8:02 am | धर्मराजमुटके
काही हरकत नाही. म्हणूनच प्रतिसादाच्या पहिल्या वाक्यात हा ढिसक्लेमर दिलाय ना :)
13 Oct 2023 - 3:09 pm | कॉमी
इतक्या ठामपणे चुकीचे लिहिण्याची कला वाखाणण्याजोगी आहे.
13 Oct 2023 - 3:19 pm | अमरेंद्र बाहुबली
खोटं असेल तर ते पुराव्यानीशी खोडून काढावं लागतं. ऊगाच साप म्हणून भूई थोपटण्याला काहीही अर्थ नाही.
13 Oct 2023 - 4:26 pm | टर्मीनेटर
अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही!
नाझींचा उदय आणि अस्त विसाव्या शतकात झाला, पण खिश्चनांच्या युरोपमधील ज्यू द्वेष / विरोधाला पंधराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. आणि तो जाणून घ्यायचा असेल तर 'Spanish Inquisition' , 'Portuguese Inquisition' हे वाचा. अजुनही बरंच काही आहे, पण मला वाटतं एवढ्याने तुमचे शंका निरसन होइल.
बाकी ख्रिश्चनांच्या ज्यू विरोधाबद्दल म्हणाल तर त्याचा इतिहास पार ख्रिस्ती धर्माच्या जन्मापर्यंत म्हणजे, २००० वर्षांहून थोडा अधिक इतका मागे जातो. ज्यू मध्यपुर्वेतील त्यांच्या मूळ भूमीतून (सोयीसाठी आजचा इस्त्रायल किंवा पॅलेस्टाईन म्हणूयात) विस्थापित होण्यास त्याच काळात सुरुवात झाली होती, पुढे रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर त्याचे प्रमाण आणखीन वाढले आणि सातव्या शतकात इस्लामचा उदय झाल्यावर तर विस्थापनाच्या प्रमाणात विलक्षण वाढ होत गेली.
नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली.
उदाहरणासाठी 'The Times Of Israel' मधला हा लेख वाचा!
"१९१८ ते १९२१ पर्यंत, आताच्या युक्रेन मध्ये ११०० हून अधिक पोग्रोम्स (ज्यू द्वेष्ट्या संघटना/टोळीचे सभासद) १,००,००० ज्यूंना ठार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण युरोपातील साठ लाख ज्यू लोकांच्या जीवाला ह्या ज्यू द्वेषामुळे धोका असल्याची भीती निर्माण झाली होती."
20 years before the Holocaust, pogroms killed 100,000 Jews – then were forgotten
13 Oct 2023 - 4:34 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे. ज्यू विरोध २ हजार वर्षांपासून होताच. पण मी हे दुसर्या महायुध्दाबद्दल लिहीलंय.
13 Oct 2023 - 4:46 pm | कॉमी
आणखी, जर १८७०-९० मध्ये युरोपियन लोकांना विचारले असते की "ज्युंविरुद्ध भलेमोठे शिरकाण कोणत्या देशातले लोक करतील ?" तर लोकांनी फ्रान्स कडे बोट दाखवले असते. जर्मनी, सुशिक्षित आणि सभ्य जर्मनी कोणाच्या डोक्यात सुद्धा आली नसती.
हिटलर येण्याच्या आधी सुद्धा जर्मनीमध्ये आणि एकंदर युरोपात ज्यूंना खूप तिरस्कार सोसावा लागला. हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.
13 Oct 2023 - 5:32 pm | टर्मीनेटर
करेक्टो! त्यासाठीच अबांच्या त्या विधानाशी 'काही प्रमाणात सहमत' असे लिहिले आहे. हिटलरने जर्मनांमध्ये राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग पेटवण्यासाठी आणि Racial hygiene, ज्यावर त्याची गाढ श्रद्धा होती ती संकल्पना जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी ज्युद्वेषाचा वापर एक साधन म्हणुन केला होता. पुढे 'फायनल सोल्युशन' ची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेकडुन पैसे जमा करायला जर्मनीत मुतारी पासुन हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, बागा अशा सर्व ठिकाणी ठेवण्यात आलेल्या भांड्यांमध्ये (कुठलीही पाटी वगैरे लिहीलेली नसतानाही) आपण कशासाठी वर्गणी देत आहोत ह्याची व्यवस्थीत कल्पना असुनही जर्मन लोकं थंडपणे, स्वेच्छेने पैसे टाकत होते ह्यावरुन ते साधन किती प्रभावी ठरले होते ते लक्षात येते.
13 Oct 2023 - 10:24 pm | Trump
खरे तर हे विधान पुर्णतः खरे नाही. श्री हिटलर यांचा ज्यु लोकांच्या वृत्तीचा / वर्तनाचा तिरस्कार होता. जर्मन सैन्यात किती तरी अर्ध-ज्यु लोकांना श्री हिटलर यांनी आणि मंत्रीमडळातील इतर लोकांनी सहभागी करुन घेतले होते.
श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.
13 Oct 2023 - 10:37 pm | कॉमी
सहा मिलियन ज्यू लोकांना मारले ते काय प्रत्येकाच्या स्वभावाची चाचणी करून का ?
13 Oct 2023 - 10:44 pm | रंगीला रतन
तुम्ही या आयडीला गंभीर पने घेता???
14 Oct 2023 - 5:02 pm | Trump
श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे, मुळ मुद्दा श्री हिटलर वंशद्वेषी होते का हा आहे. श्री हिटलर यांना ज्युंना न मारता मदागास्कार येथे पाठवायचे होते. पण त्या योजनेला युध्द सुरु झाल्यामुळे आणि विरोधी लढणार्याचा पाठींबा न मिळाल्याने ज्यु मेले. तुम्ही त्याच हत्याकांडात मेलेले रोमी, समलिंगी, साम्यवादी इ. यांना सोयीस्कररीत्या विसरलात. कधीतरी अगोरे आणि इतर लोकांसाठीही भांडा.
नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे.
१. एक देश मिळाला.
२. पाश्चिमात्य देशांची आर्थिक मदत मिळाली, लुटलेली संपत्ती परत मिळाली.
३. जगभरात कोठेही ज्यु विरोधात काही लिहु आणि बोलु शकत नाही.
४. कोठेही ज्यु कार्ड दाखवले की लगेच सहानुभुती मिळते.
14 Oct 2023 - 6:15 pm | कॉमी
श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे.
१. ज्यूंना उचलून हलवणे हा वंशव्देश नाही ?
२. समलिंगी आणि सम्यावाद्यांना मारले म्हणजे काय वंशद्वेश नाही असे सिद्ध होते का ?
३. इथे कोणी कोणासाठी भांडत नाहीये. तुम्हीच मध्ये येऊन हिटलर कसा वंशव्देशी नव्हता असे मांडणे चालू केले. तुम्ही उगाच निर्दयी हत्याकांड करणाऱ्यांची तळी उचल थांबवा.
४.
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले.
मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.
14 Oct 2023 - 7:27 pm | रात्रीचे चांदणे
हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल.
14 Oct 2023 - 7:29 pm | अमरेंद्र बाहुबली
हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल.
हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती. हिटलरची म्हणून जी कवटी सांभाळून ठेवली होती ती एका स्त्रीची निघाली असं कुठेतरा वाचलं होतं.
- मूळ धाग्याला फाटे फोडू संघटना.
14 Oct 2023 - 7:42 pm | अहिरावण
त्याच्या बायकुची असेल... आता बायका नवर्याची कवटी कधी जागेवर ठेवतात काय?
- फाट्यांना अजुन फाटे फोडू संघटना
14 Oct 2023 - 11:44 pm | Trump
तुमच्या भावना मी समजु शकतो. श्री हिटलर यांचे कोणतेही समर्थन येथे होत नाही.
फक्त त्या घटनांकडे एक तटस्थ भावनेतुन बघावे अशी अपेक्षा आहे.
पण श्री हिटलर यांना आताचे मानवी हक्कांच्या अर्हता लावत आहात. त्या काळात जर जाऊन तुम्ही तुलनात्मक विचार केलात तर श्री हिटलर हे सर्वसामान्य युरोपियन होते असे जाणवेल. (फळ हे झाडापासुन खुप दुर पडत नाही.)
ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच आहे. श्री हिटलर हे स्वत:च ज्युचे वंशज होते का ह्याबद्दल अजुन प्रवाद आहेत.
https://www.history.com/news/study-suggests-adolf-hitler-had-jewish-and-...
ते फक्त मते मिळण्यासाठी होते. जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. वंश ह्या जन्मतः मिळतो. जर नाझी जर वंशभेदी असतील तर त्यांनी ज्यु, पुर्व युरोपियन मुलांचे अपहरण करुन जर्मनीत का आणले असते ?
https://www.dw.com/en/the-children-the-nazis-stole-in-poland-forgotten-v...
https://warfarehistorynetwork.com/article/hitlers-lebensborn-children-ki...
https://topdocumentaryfilms.com/stolen-children-kidnapping-campaign-nazi...
सगळेच ज्यु श्री नाझीच्या विरोधात नव्हते. उदा.
https://en.wikipedia.org/wiki/More_German_than_the_Germans
https://en.wikipedia.org/wiki/Association_of_German_National_Jews
https://www.tabletmag.com/sections/arts-letters/articles/ellen-feldman-n...
हा आक्रोश फक्त गोरे मेले म्हणुन आहे. जर हेच अगोरे असते तर सगळे युरोपियन श्री हिटलर यांचे गुणगाण कसत बसले असते.
जवळपास तेवढेच लोक भारतात कृत्रिम दुष्काळ पाडुन मेलेत, त्याबद्दल काही लोकांना काहीच वाटत नाही.
15 Oct 2023 - 12:05 am | Trump
श्री नेत्यान्याहु श्री हिटलर यांच्याबद्दल म्हणत आहेत ते पहा.
Netanyahu says Hitler didn't want to kill the Jews, but a Muslim convinced him to do it
https://www.youtube.com/watch?v=f9HmkRYlVZw
आता गेला बाजार, श्री नेत्यान्याहुवर ज्युद्वेषी किंवा नाझी असल्याचा आरोप करु नका म्हणजे झाले.
17 Nov 2023 - 3:11 am | Trump
जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही.
श्री हिटलर आणि तात्कालिन जर्मन सैन्याचे बहुविधतेला असलेले प्राधान्य आणि त्याचा एक आढावा येथे दिसते आहे.
https://www.goodreads.com/book/show/56417885-triumph-of-diversity
Triumph of Diversity: A New Look at Hitler's Armed Forces
23 Feb 2024 - 11:07 pm | Trump
अजुन एक उदाहरण.
श्री हिटलर यांनी जनरल एरीक हॉंपनेर यांना १९४२ मध्ये सैन्यामध्ये काढुन टाकले, त्यांची पेन्शनचा हक्क बंद केला. जनरल एरीक हॉंपनेर यांनी जर्मनीविरोधात खटला भरला; आणि तो जिकंला सुध्दा. कोर्टाने श्री हिटलर यांचा निर्णय श्री हिटलर यांच्या राज्यात बदलला.
27 Oct 2023 - 2:01 pm | Trump
श्री हॅरी ट्रुमन, अमेरीकेचे युध्दकालीन राष्ट्राध्यक्ष.
17 Oct 2023 - 7:29 pm | रामचंद्र
ख्रिश्चनांच्या आत्यंतिक द्वेषामुळे वेळोवेळी ज्यूंना राहता देश सोडून स्थलांतर करावे लागले असेच वाचायला मिळते. अगदी शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमधलंही खलपात्र हे ज्यूच आहे. आणि सावकारी करणाऱ्या अथवा धनिक पण अल्पसंख्य वर्गाबद्दल लोकभावना ही सर्वसाधारणपणे नकारात्मकच असते. खुद्द अमेरिकेतही अगदी दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्यूंबद्दल कशी भावना होती याबद्दलचा किस्सा अभिनेता कर्क डग्लसच्या आठवणींत वाचायला मिळतो. पूर्व युरोप आणि रशियातही त्यांची स्थिती काही बरी नव्हतीच. आज अमेरिका इस्राईलच्या पाठीशी आहे याचं कारण तिथल्या ज्यूंची (मुख्यतः आर्थिक आणि राजकीय) ताकद आणि एकजूट. स्वकष्टाने प्राप्त केलेली जबरदस्त क्षमता आणि जशास तसे या धोरणाचा पुरेपूर अवलंब यामुळे तिथल्या त्यातल्या त्यात मवाळ मताच्या लोकांना तिथले जहाल लोक थेट वर पोहोचवतात त्यामुळे सतत युद्धाच्या तयारीत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि आपलंही काही (बरंच!) चुकलं आहे हे मानण्याची दोन्ही बाजूंची तयारी नाही.
15 Oct 2023 - 12:16 am | Trump
श्री हिटलर यांना व्यकिशः रिलिजनबरोबर काही देणे घेणे नव्हते. त्यांनी युरोपियन लोकांमध्ये असलेल्या ज्युद्वेषाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर करुन घेतला. श्री हिटलर यांना फार तर सेक्युलर हुमॅनिस्ट असे म्हणता येतील.
ज्युद्वेष हे युरोपियन समाजाचे अंग आहे, फक्त श्री हिटलर यांनी त्याच्यावर फुंकर घातली. पोलंड, फ्रान्स, पुर्व युरोप मधील नाझी पक्षाबरोबर काही संबध नसलेले लोक ज्युंच्या छळाला जबाबदार होते.
13 Oct 2023 - 4:07 pm | टर्मीनेटर
कोणाला पटो किंवा न पटो, पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी "दिल को बहलाने को ये ख्याल अच्छा है..." 😀
वरील वाक्यातील ठळक केलेल्या मजकुराशी संपुर्णपणे सहमत आहे. त्यांच्या ह्या 'बिझनेस फर्स्ट' विषयी मागे परदेशात ऐकलेली (भारतातील २६/११ हल्ल्याशी संबधीत) एक कहाणी आहे, ती नंतर फुरसत मध्ये टंकतो. अनेक लोकांच्या ती पचनी पडणे अवघड असले तरी मनोमन विचार करायला लावणारी नक्की आहे!
अर्थातच, ह्यात वावगे काहीच नाही! त्यांच्या तेलाच्या राजकारणातुन त्यांनी मध्यपुर्वेचे अतोनात नुकसान केले आहे हे जगजाहिर आहे. मध्यंतरी अपघाताने कुठल्यातरी न्युज पोर्टलवर एका माजी वरिष्ठ सी.आय.ए. अधिकाऱ्याची मुलाखत बघितली होती त्यात त्याने सांगितलेली एक गोष्ट चांगलीच लक्षात राहिली आहे. तो म्हणाला होता "मध्यपुर्वेतीलच नाही तर जगातील एकही दहशतवादी संघटना अशी नाहीये कि जीचा वापर सी.आय.ए. ने पैसा पुरवुन किंवा हत्यारे पुरवुन कुठे ना कुठे केला नाही!"
13 Oct 2023 - 11:26 pm | धर्मराजमुटके
सिद्धांत प्रॅक्टीकल आहेच पण जगातील बरेच लोक प्रॅक्टीकल विचार न करता भावनातिरेकाने विचार करतात हेच खरे. सिद्धांत तपासून पाहायचा तर जगातील ज्यूंची एकूण लोकसंख्या कोणत्या देशात जास्त आहे याचा अभ्यास करावा लागेल. आता याचे एकदम सोपे उत्तर म्हणजे "इस्त्रायल'. मात्र जगातील एकूण ज्यूं पैकी (४५-४७ %) इस्त्रायल मधे राहतात तर साधारण तेवढेच (४५-४७%) अमेरीकेत राहतात. कॅनडा, फ्रान्सच्या जवळपास २ ते २% लोकसंख्या ज्यूं ची आहे तर इंग्लंड आणि जर्मनीमधे साधारण २% ते १.७५% टक्याच्या आसपास आहे. जर ४०-४५% टक्के ज्यू इस्त्रायल ऐवजी अमेरीकेत राहत असेल तर पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.
ख्रिश्चन काही कमी धर्मांध आहेत असे नाही पण त्यांच्या चुकांना विरोध करणारे धर्मबंधू त्यांच्यात शेकड्याने / हजारोने / लाखोने सापडतील मात्र मुस्लिम धर्माबद्दल तसे म्हणता येत नाही. तिथे आपले धर्मांध बांधव चूकताहेत हे कदाचित काहिंना माहित असेल देखील पण त्याचा विरोध करणारे पुढे येत नाहीत.
“A known devil is better than an unknown angel” अशी एक म्हण आहे तिला अनुसरुन ज्युंना नवीन शत्रुपेक्षा जुने शत्रू परवडले असते असा विचार करणे नक्कीच प्रॅक्टीकल आहे.
असो. माझ्याच प्रतिसादांचे समर्थन करण्यासाठी कळफलक बडविण्याचा मला कंटाळा येतो.
13 Oct 2023 - 11:55 pm | अमरेंद्र बाहुबली
पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.
धर्मराजसाहेब, तुमच्या मते पवित्र शहर, पवित्र भूमी सोडून जिवाचा भितीने ज्यूंनी अमेरीका वगैरे सुरक्षीत स्थळ गाठावं. माझ्या मते ज्यू इतके बुळचट नाहीत आणी राहूही नये. आपल्या मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांनी लढायला हवे. पवित्र भूमी नाहीतरी त्यांनी लढून जिंकलीच आहे. थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे.आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.
14 Oct 2023 - 5:08 pm | Trump
तुमच्या सारख्या पुरोगामीकडुन ही अपेक्षा नव्हती.
14 Oct 2023 - 7:16 pm | अहिरावण
>>>आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.
अखेर पुरोगामित्वाचा बुरखा फाटलाच म्हणायचा ! मजा आहे... चालू द्या!
14 Oct 2023 - 7:18 pm | अमरेंद्र बाहुबली
बुरखा? कधी घातला? कुणी? कसा फाटला?
धर्मासाठी लढावं, नी धर्माच्या नावाखाली तुंबडी भरनार्यांशी जास्त लढावे.
14 Oct 2023 - 7:22 pm | अहिरावण
हो का ? अरे वा ! छानच की !!
14 Oct 2023 - 5:03 pm | Trump
ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.
14 Oct 2023 - 5:42 pm | अमरेंद्र बाहुबली
मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही नाही. ज्या वेळी जे योग्य
त्याची बाजू घेतो. पण सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो.
14 Oct 2023 - 7:17 pm | अहिरावण
>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो.
आणि पुरोगाम्यांचा सनातनी द्वेष उफाळून आला की मुग गिळून गप्प बसता !! मजा आहे... चालु द्या !!!
14 Oct 2023 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली
पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड असतात. सनातनींसारखे आम्हीच ग्रेट असं पोथी पुरानांचे दाखले देत पुरोगामी फिरत नाहीत.
14 Oct 2023 - 7:30 pm | अहिरावण
अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते.
दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात.
बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)
14 Oct 2023 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली
अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात.
पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का?त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते.
असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात.दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात.
पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात.बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)
पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?14 Oct 2023 - 7:49 pm | अहिरावण
>>> पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का?
अच्छा सगळे क्रेडीत पुरोगाम्यांचे का? बर बर
>>सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का?
>>>चळवळ एवढी फोफावली असती का?
>>>भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का?
हिंदू तालीबान ? अक्कल गहाण आहे का तुमची? असेल असेल अनेक पुरोगाम्यांची असते हे आम्ही स्वत: पाहिले आहे
>>काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात.
काहींच्या ना? मग सगळे सनातनी का पुरोगाम्यंना डिवचतात?
>>मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?
हेच सनातन्याने विचारले तर??
14 Oct 2023 - 7:51 pm | अहिरावण
ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ
14 Oct 2023 - 8:40 pm | मुक्त विहारि
मान्य.....
-------
ज्यू धर्मीयांना, असे म्हणायचे आहे का?
कारण, इस्रायल म्हणजेच ज्यू , आणि पाकिस्तान म्हणजेच मुस्लिम, अशी माझी विचारसरणी आहे .
पाकिस्तानला, इतर धर्मीय मान्य नाहीत....
14 Oct 2023 - 9:02 pm | अमरेंद्र बाहुबली
ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ
आमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.
14 Oct 2023 - 9:07 pm | कॉमी
पन्नास लाख लोकांना बेघर करून मारण्याची भाषा करताय आणि स्वताला पुरोगामी समजताय... तुम्ही पण सनातनी लोकांच्यात बसले तर सुत जुळेल.
14 Oct 2023 - 9:19 pm | अमरेंद्र बाहुबली
तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू कशी घेतली नाही “त्यांची.”
काॅमी साहेब, त्या पन्नास लाखांमूळे इस्राईलचा एकही माणूस मरत असेल तर पन्नासलाखच काय एक कोटी मारावेत इस्राइलने.
बाकी तुम्ही हमास वाल्यांसोबत कींवा जिहादींसोबत बसल्यास चांगले सूत जुळेल. (तसे जुळलेही असावे म्हणा. )
14 Oct 2023 - 9:22 pm | कॉमी
तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीच आहे. बालवडीतल्या मुलासारखी समज आहे तुमची. तोंड दिले आहे त्यामुळे मत द्यायला का जाते होय की नाही ? :)
14 Oct 2023 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली
पळ काढायचा चांगला मार्ग शोधलात. इस्राइलची बाजू घेणार्यांची बुध्दी बालवाडी सारखी असते नी अतिरेक्यांची बाजू घेणार्यांची ग्रॅज्यएटची असावी. हो की नाही ग्रॅज्यूएट काॅमी सर? :)
14 Oct 2023 - 9:28 pm | कॉमी
छे छे गैरसमज झाला बाहुबली साहेब. मी इस्त्राईल समर्थकांच्या बुद्धीबाबत नाही बोललो. तुमच्या बुद्धी बद्दल स्पेसिफिकली बोलत होतो. गैरसमज नसावा :)
14 Oct 2023 - 9:32 pm | अमरेंद्र बाहुबली
असो. तुम्ही कितीही काहीही कुणालाही बोला. इस्राईल काही सूट्टी देत नाही गाझाला. तुमच्या दुखात मी सहभागी नाही हे आधीच सांगून ठेवतो. :)
15 Oct 2023 - 11:29 pm | Trump
+१
काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा माणुस काहीही किंमत देतो नसो.
12 Oct 2023 - 10:21 pm | कर्नलतपस्वी
तुमचा प्रतिसाद म्हणजे साध्या सोप्या भाषेतील प्रतिसाद थोडक्यात व सटिक वाटला.
टर्मिनेटर भौ नी सुद्धा सोप्या शब्दात सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.
माझ्या मते IMEC वर फारसा परीणाम होईल असे वाटत नाही कारण हे धर्मयुद्ध बरेच वर्षापासून चालू आहे व चालू रहाणार आहे.
13 Oct 2023 - 7:53 am | कुमार१
अभ्यासपूर्ण लेख व चर्चा.
15 Oct 2023 - 9:58 pm | अथांग आकाश
+१
अभ्यासपूर्ण लेख! प्रतिसादांतुन पण चांगली माहिती मिळत आहे!! imecच्या माहितीची प्रतिक्षा करतोय!!!