वयाबरोबर पाठीनेही बाक घेतला आहे
प्रकृतीने आजारांनाही लाडावले आहे
आहारा पेक्षा औषधच पोट भरत आहे
धार्मिक क्षेत्रात मन आता विसावत आहे
जेष्ठ नागरीक म्हणून समाजात ठिगळ आहे
देणगी देऊन चबुतर्यावर नाव कोरल आहे
सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे
सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान ठरली आहे
दु:खाचे भोग मी घडलेल्या पापांबरोबर भोगत आहे
नातवंड खेळवण्यात मनोरंजन उरले आहे
मुला-मुलींनी आपाअपले स्वतंत्र संसार थाटले आहेत
इस्टेटीच्या वाट्यात मात्र सगळ्यांचे मन एकत्र आहे
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
प्रतिक्रिया
8 May 2009 - 2:00 pm | मराठी_माणूस
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
व्वा
8 May 2009 - 2:15 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म... वास्तव भीषण.
चुचु
8 May 2009 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll
ह्म्म्म्म... भीषण सत्य.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
8 May 2009 - 2:31 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म्म्म्म्....सत्य कटु.
चुचु
8 May 2009 - 3:24 pm | सँडी
ह्म्म्म्म्म्....कटु सत्य.
देणगी देऊन चबुतर्यावर नाव कोरल आहे
सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे
सह्ही!
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
हे जबरदस्त!
अर्थपुर्ण कविता. खुप आवडली.
-संदीप.
काय'द्याच बोला.
8 May 2009 - 3:31 pm | शाल्मली
वृद्धाचे मनोगत आवडले.
अनेकदा म्हातार्या लोकांशी गप्पा मारताना 'आता काय.. सगळं झालंय, आला दिवस ढकलायचा आणि मरत नाही म्हणून जगायचं' असा उल्लेख ते वारंवार करत असतात..
मृत्युपत्र सजीव होणे ही कल्पना फार आवडली.
--शाल्मली.
8 May 2009 - 7:12 pm | लिखाळ
सहमत आहे.
कविता आवडली.
-- लिखाळ.
8 May 2009 - 6:51 pm | क्रान्ति
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
खूपच कटू सत्य!
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
8 May 2009 - 7:49 pm | चतुरंग
चतुरंग
8 May 2009 - 8:05 pm | प्राजु
कवितेचा शेवट खूप आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 May 2009 - 12:24 am | जागु
मराठी, नेने, पेशवे, सँडी, शाल्मली, लिखाळ, क्रांती, चतुरंग, प्राजू तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.