एका वृद्धाचे मनोगत
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वयाबरोबर पाठीनेही बाक घेतला आहे
प्रकृतीने आजारांनाही लाडावले आहे
आहारा पेक्षा औषधच पोट भरत आहे
धार्मिक क्षेत्रात मन आता विसावत आहे
जेष्ठ नागरीक म्हणून समाजात ठिगळ आहे
देणगी देऊन चबुतर्यावर नाव कोरल आहे
सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे
सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान ठरली आहे
दु:खाचे भोग मी घडलेल्या पापांबरोबर भोगत आहे
नातवंड खेळवण्यात मनोरंजन उरले आहे
मुला-मुलींनी आपाअपले स्वतंत्र संसार थाटले आहेत
इस्टेटीच्या वाट्यात मात्र सगळ्यांचे मन एकत्र आहे
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
वाचन
13083
प्रतिक्रिया
0