एकदाच काय ते बोलून टाकू

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
7 Apr 2023 - 9:02 am

होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. मी पुण्यात पूर्वी राहिलो असल्याने माझे संदर्भ आधीचे आहेत.

खूप झाले एफसीचे कट्टे आणि वैशालीचे दोसे
ते कॉफीत झुरन आणि मनात बोलणं
गुडलक मधे बसून स्वतःलाच बॅड लक म्हणणं
सारा राग मग पार्किंग नाही म्हणून काढणं
सार आता संपवून टाकू
तू हिंजवाडीला येते की मी कोथरुडला येऊ ते सांग
एकदाच काय ते मनातल सारं बोलून टाकू

खूप झाल्या इंस्टाच्या पोस्टी आणि एफबीच्या स्टोऱ्या
ते डेटाच संपणं आणि वायफायच गंडणं
ते बोलण्यात गाणं आणि गाण्यात बोलणं
नेहमीचाच गोंधळ अन नेहमीच्याच कहाण्या
साऱ्याचा शेवट आता करुन टाकू
तू कात्रजच्या घाटात भेटते की मी सिंहगड चढून येऊ ते सांग
एकदाच काय ते मनातल सार बोलून टाकू

काय होणार आहे बोलून टाकल एकदाच सारं तर
ना खडकवासल्याच धरण फुटनार ना मुळशीच
मग कशाला राव उगा तोंड लपवत भ्यायचं
आन मनातल्या मनात म्हात्रे पुलावर कुढत बसायचं
ना लैला मजनू, ना बाजीरावमस्तानी
आपली कहानी आपणच लिहून टाकू
मस्तानी पित बोलायच कि काटाकिर खात बोलायच ते सांग
एकदाच काय ते मनातलं सारं बोलून टाकू

@मित्रहो (https://mitraho.wordpress.com)

जिलबीमाझी कवितामुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

8 Apr 2023 - 10:54 am | कर्नलतपस्वी

आता म्हात्रे पुलावर खुप गर्दी असते. कोथरूड कडून वैकुंठा कडे जाण्यासाठी एकमेव रस्ता.

प्रेमवीर आणी वीरांगना साठी झेड ब्रिज ,भिडे पुलावर पालिकेने जागा बनवून दिली आहे.

आमच्यावेळी संभाजी पार्क किंवा लाॅ काॅलेजची टेकडी ही ठिकाणे होती.

चित्रगुप्त's picture

11 Apr 2023 - 9:55 pm | चित्रगुप्त

प्रेमवीरांना 'वीरांगना' हव्यात का 'वारांगना' असा प्रश्न पडला आहे.

मित्रहो's picture

13 Apr 2023 - 8:56 pm | मित्रहो

धन्यवाद कर्नल तपस्वी आणि चित्रगु्ृृप्त
@कर्नल तपस्वी माहितीबद्दल धन्यवाद आता खूप वर्षांनी कोथरुड परिसरात गेलो असताना काही ओळखू येत नव्हते. चालायचेच शहरे बदलतात.

@चित्रगुप्त हा हाहा. हल्ली उत्सव चित्रपटाच्या काळातले दिवस राहिले नाही तेंव्हा वीरांगणाच ठिक आहे.

श्रीगणेशा's picture

8 May 2023 - 12:13 am | श्रीगणेशा

आवडली कविता, हलकीफुलकी, पुणेरी!

चौथा कोनाडा's picture

8 May 2023 - 12:47 pm | चौथा कोनाडा

मस्त कविता.
पुण्यातले स्थान सदर्भ गम्मतशीर वाटले.

"एकदाच काय ते बोलून टाकू"
पण तुमच्या सारखं आम्हाला जमत नाही ना !