✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एकदाच काय ते बोलून टाकू

म — मित्रहो, Fri, 04/07/2023 - 09:02
होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. मी पुण्यात पूर्वी राहिलो असल्याने माझे संदर्भ आधीचे आहेत. खूप झाले एफसीचे कट्टे आणि वैशालीचे दोसे ते कॉफीत झुरन आणि मनात बोलणं गुडलक मधे बसून स्वतःलाच बॅड लक म्हणणं सारा राग मग पार्किंग नाही म्हणून काढणं सार आता संपवून टाकू तू हिंजवाडीला येते की मी कोथरुडला येऊ ते सांग एकदाच काय ते मनातल सारं बोलून टाकू खूप झाल्या इंस्टाच्या पोस्टी आणि एफबीच्या स्टोऱ्या ते डेटाच संपणं आणि वायफायच गंडणं ते बोलण्यात गाणं आणि गाण्यात बोलणं नेहमीचाच गोंधळ अन नेहमीच्याच कहाण्या साऱ्याचा शेवट आता करुन टाकू तू कात्रजच्या घाटात भेटते की मी सिंहगड चढून येऊ ते सांग एकदाच काय ते मनातल सार बोलून टाकू काय होणार आहे बोलून टाकल एकदाच सारं तर ना खडकवासल्याच धरण फुटनार ना मुळशीच मग कशाला राव उगा तोंड लपवत भ्यायचं आन मनातल्या मनात म्हात्रे पुलावर कुढत बसायचं ना लैला मजनू, ना बाजीरावमस्तानी आपली कहानी आपणच लिहून टाकू मस्तानी पित बोलायच कि काटाकिर खात बोलायच ते सांग एकदाच काय ते मनातलं सारं बोलून टाकू @मित्रहो (https://mitraho.wordpress.com)

प्रतिक्रिया द्या
2499 वाचन

💬 प्रतिसाद (5)

आवडली...

कर्नलतपस्वी
Sat, 04/08/2023 - 10:54 नवीन
आता म्हात्रे पुलावर खुप गर्दी असते. कोथरूड कडून वैकुंठा कडे जाण्यासाठी एकमेव रस्ता. प्रेमवीर आणी वीरांगना साठी झेड ब्रिज ,भिडे पुलावर पालिकेने जागा बनवून दिली आहे. आमच्यावेळी संभाजी पार्क किंवा लाॅ काॅलेजची टेकडी ही ठिकाणे होती.
  • Log in or register to post comments

वीरांगना की वारांगना?

चित्रगुप्त
Tue, 04/11/2023 - 21:55 नवीन
प्रेमवीरांना 'वीरांगना' हव्यात का 'वारांगना' असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मित्रहो
गुरुवार, 04/13/2023 - 20:56 नवीन
धन्यवाद कर्नल तपस्वी आणि चित्रगु्ृृप्त @कर्नल तपस्वी माहितीबद्दल धन्यवाद आता खूप वर्षांनी कोथरुड परिसरात गेलो असताना काही ओळखू येत नव्हते. चालायचेच शहरे बदलतात. @चित्रगुप्त हा हाहा. हल्ली उत्सव चित्रपटाच्या काळातले दिवस राहिले नाही तेंव्हा वीरांगणाच ठिक आहे.
  • Log in or register to post comments

आवडली कविता, हलकीफुलकी,

श्रीगणेशा
Mon, 05/08/2023 - 00:13 नवीन
आवडली कविता, हलकीफुलकी, पुणेरी!
  • Log in or register to post comments

मस्त कविता.

चौथा कोनाडा
Mon, 05/08/2023 - 12:47 नवीन
मस्त कविता. पुण्यातले स्थान सदर्भ गम्मतशीर वाटले. "एकदाच काय ते बोलून टाकू" पण तुमच्या सारखं आम्हाला जमत नाही ना !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा