दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला
दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला.
दिस मेघापरी झरुन चालले
दिस वाळूपरी सुटून चालले
दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला.
दिस गंधापरी विरून चालले
दिस रंगापरी पुसून चालले
दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला.
दिस आले कधी सोबती घेउनी
दिस गेले कधी एकटा सोडुनी
दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला.
दीपक पवार.
प्रतिक्रिया
25 Dec 2022 - 10:26 pm | चित्रगुप्त
वा वा वा. अतिशय सुंदर, अर्थघन, व्याकुळ आर्ततेचे अस्तर असलेली रचना.
आपल्या आयुष्यातून काहीतरी कायमचे सरून चालले आहे, ही अस्वस्थ करणारी जाणीव ओळीओळीतून झिरपते आहे.
सुबह होती है शाम होती है .. उम्र यूंही तमाम होती है.... (मुन्शी अमीरुल्लाह तस्लीम) हे आठवले.
26 Dec 2022 - 8:24 am | Deepak Pawar
चित्रगुप्त सर खूप खूप धन्यवाद.
26 Dec 2022 - 2:11 pm | कर्नलतपस्वी
दिस चार झाले मन पाखरू होऊन.
कविवर्य सौमित्र यांची कवीता आठवली.
26 Dec 2022 - 5:38 pm | Deepak Pawar
कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक आभार.
26 Dec 2022 - 8:04 pm | भागो
चित्रगुप्त +१
मला चित्रगुप्त ह्यांच्या प्रमाणे लिहिता येत नाही. पण त्यांच्या भावनांशी पूर्ण सहमत.
मनातले भाव शब्दात व्यक्त करण्याची दैवी देणगी मिळाली आहे तुम्हाला.
27 Dec 2022 - 9:15 am | Deepak Pawar
भागोसर आपले मनःपूर्वक आभार.