एक झलक तुझी पाहता...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
29 Nov 2022 - 9:04 pm

एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते
चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते.

रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन
चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण
तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते.

रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे
अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे
उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते.

पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग
पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग
डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.

प्रेम कविताकविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

30 Nov 2022 - 9:58 am | कर्नलतपस्वी

दिपक भौ कवीता छानच पण शेवटच्या ओळीतला मजनू कुठेतरी पटत नाही. एकदम खड्ड्यात पडल्या सारखे वाटते.

डोळ्यांचे गहिरेपण मज सुखावून जाते

असे काहीतरी......

Deepak Pawar's picture

30 Nov 2022 - 3:18 pm | Deepak Pawar

कर्नलतपस्वी साहेब मनःपूर्वक धन्यवाद.
काही सुचल्यास बदल करतो.

सुरिया's picture

30 Nov 2022 - 7:51 pm | सुरिया

पवारसाहेब,
मजनूच्या ऐवजी उदय करा.
पहिले म्हणजे उदयास डुबवून घेणे म्हणजे आपलं अ‍ॅज अ सनसेट टाईप होईल. नाही का?
आणि दुसरं म्हणजे वेल्कम मधल्या शेट्टी बंधूंची आठवण काढल्यासारखे होईल. ;)

Bhakti's picture

30 Nov 2022 - 4:54 pm | Bhakti

बाडिस

Deepak Pawar's picture

30 Nov 2022 - 7:37 pm | Deepak Pawar

Bhakti मॅडम,
बाडिस म्हणजे
मला अर्थ कळला नाही.

सुरिया's picture

30 Nov 2022 - 7:52 pm | सुरिया

बाडीस = बाय डिफॉल्ट सहमत

Deepak Pawar's picture

1 Dec 2022 - 9:12 am | Deepak Pawar

काही सुचल्यास बदल करतो.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.