एक झलक तुझी पाहता...
एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते
चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते.
रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन
चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण
तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते.
रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे
अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे
उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते.
पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग
पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग
डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.
दिपक भौ कवीता छानच पण
मनःपुर्वक धन्यवाद.
पवारसाहेब,
बाडिस
बाडिस म्हणजे?
बाडीस = बाय डिफॉल्ट सहमत
मनःपुर्वक धन्यवाद.