वॉल्डनकाठी विचार विहार
लेखक – हेन्री डेव्हिड थोरो
अनुवाद –दुर्गा भागवत.
जगण्याची उच्च प्रेरणा म्हणजे प्रेम ,स्वच्छंदी मुक्त जीवन ,निसर्गाची साथ या सर्व गोष्टी ज्याने मिळवल्या तो १८ व्या शतकातला महान तत्त्वज्ञ थोरो.त्याच्या वॉल्डन
तळ्याच्या काठी एका झोपडीत २ वर्षे ,२ महिने ,२ दिवस विजनवासाचे रम्य चित्रण ,डायरी म्हंजे हे पुस्तक आहे.
खर म्हणजे दुर्गाबाईंचे पुस्तक म्हणून वाचायला घेतले आणि आयुष्याच्या साधेपणाचाही उत्सव करणाऱ्या थोरोची ओळख झाली.
पुस्तकात एकूण १८ प्रकारणे आहेत.पहिलेच प्रकरण ‘मितव्यय’म्हणजे ‘कमी खर्च ‘.कमीत कमी खर्च कसा करावा इत्यादी काटकसरीचे उदाहरणे यात आहेत ,तेव्हा मी हे का वाचतेय याचा काय उपयोग ?आताच्या काळात विसंगती आहे का ? असे वाटून गेले.परंतु जस जसे थोरोचे निसर्गाचे ,जीवन जगण्याचे साधे सूत्र वाचत गेले ,हे पुस्तक उलगडत गेले.समाधानाची व्याख्या सापडत गेली .
मी यातील असंख्य वाक्य अधोरेखित केली आहेत.प्रत्येक पानावर दुर्मिळ भावमंत्र आहेत.
“आपण स्वत: स्थिर ,अचल राहावे,कामा करीत राहावे ,लोकमत पूर्वग्रह ,परंपरा ,क्रांती ,दिखाऊपणा यांच्या चिखलातून आणि भावनांच्या मुळाच्या उद्रेकांतून नदीप्रमाणे खालीखाली जाताच राहावे.,म्हणजे मातीचा सुपीक गाळ पृथ्वीभर पसरेल.”-थोरो
तळ्याकाठचे त्याचे जीवन निसर्गाच्या जवळ जाणारे होते.तळ्याला भेटलेले ऋतू,झाडांच्या वाढीचे,बदलांचे मोहक वर्णनयात आहे.प्राणी पक्ष्यांची त्याच्या झोपडीशी कुजबुज,गोठलेल्या तळ्याचे अभ्यासपूर्ण नोंदी कमाल आहेत.निरर्गाशी तो इतका समरसून गेला आहे की एका खारूताईचे वागणे इतके अप्रतिम टिपले आहे जणू ती त्याची दोस्तच दिसताच आहे.
थोरोवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे .भारतीय भगवद्गीता हा त्याचा आवडता ग्रंथ आहे.त्यातील अनेक दाखले समर्पक ठिकाणी त्याने दिले आहेत .
शेवटचे उपसंहार प्रकरण वाचतांना अरेरे संपले पुस्तक ? अशी भावना होते. आणखीन थोरो विचार विहाराची तृषा निर्माण होते.
Majestic Readers पब्लिशिंग हाऊसने ऑक्टोबर २०२१ ला याची देखणी दुसरी आवृत्ती आणली आहे.ज्याची कागदाची गुणवत्ता ,छपाई उत्तम आहे.
निसर्गप्रेमींनी हे पुस्तक एकदा नक्कीच वाचावे.
आणि ही अक्षरे माझ्या घरामागच्या औदुबराच्या झाडाच्या स्मृतीस ,पुस्तक अर्ध्यावर असतांना तांत्रिक जगाच्या नियामापायी ज्याला कोसळावे लागले.त्याचे पान या पुस्तकाच्या अक्षरात मी जपून ठेवले आहे.
-भक्ती
प्रतिक्रिया
30 Oct 2022 - 10:56 pm | सुखी
ओळख छान वाटली..
औदुंबर बाबत वाईट वाटले.
30 Oct 2022 - 11:11 pm | सुखी
ओळख छान वाटली..
औदुंबर बाबत वाईट वाटले.
31 Oct 2022 - 8:34 am | कुमार१
उत्तम पुस्तक परिचय !
31 Oct 2022 - 11:10 am | Bhakti
धन्यवाद सुखी,कुमार !

@ सुखी
उंबर झाडाचा आधी खुप राग यायचा ,किती ती पानगळ ,ते खराब उंबर पडायचे.पण कोवीडमध्ये ,पुढे पण आवडता सेल्फी कार्नर झाला.तो दाट हिरवा रंग ,त्याची सळसळ, निरनिराळे पक्षी,सावली आवडायला लागलं होतं.
एक आठवण उंबराच्या सावलीत वाढलेली काही झाडं ते रोचशज येणारे पक्षी
माझा पाठीराखा होता !
31 Oct 2022 - 11:56 am | श्वेता व्यास
पुस्तकाची छान ओळख करून दिलीत.
“आपण स्वत: स्थिर ,अचल राहावे,कामा करीत राहावे ,लोकमत पूर्वग्रह ,परंपरा ,क्रांती ,दिखाऊपणा यांच्या चिखलातून आणि भावनांच्या मुळाच्या उद्रेकांतून नदीप्रमाणे खालीखाली जाताच राहावे.,म्हणजे मातीचा सुपीक गाळ पृथ्वीभर पसरेल.”-थोरो
हे खूप आवडलं.
31 Oct 2022 - 3:06 pm | स्वधर्म
अलिकडेच प्रसिध्द झाला होता, तो वाचला आहे. थोरोचे चिंतन अंतर्मुख करायला लावणारे आहे. कशासाठी हे गावात राहणारे लोक इतकं काम करत असतील, असा त्याचा त्या काळातील प्रश्न आजही लागू आहे. महात्मा गांधीनीही थोरोपासून प्रेरणा घेतली होती असे कुठल्यातरी शालेय पुस्तकात वाचले होते. चांगली ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
31 Oct 2022 - 8:30 pm | Bhakti
लोकसत्ता-मीना वैशंपायन यांनी लिहिलेला वाल्डनवर लेख.यात महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग या आंदोलनाची प्रेरणा थोरोच्या निबंधातून घेतली होती हा उल्लेख आहे.
https://www.loksatta.com/lokrang/second-edition-of-book-waldankathi-vich...
धन्यवाद श्वेता ,स्वधर्म.
31 Oct 2022 - 7:36 pm | प्रचेतस
आपले मिपाकर जयंत कुलकर्णी यांनी देखील वॉल्डनचा सुरेख अनुवाद केला आहे.
31 Oct 2022 - 8:21 pm | स्वधर्म
लेखकांचे नांव आठवत नव्हते. धन्यवाद.
31 Oct 2022 - 8:32 pm | Bhakti
अरे वाह!
1 Nov 2022 - 9:27 pm | सागरसाथी
आजपर्यंत या पुस्तकाबद्दल अनेक वेळा वाचले पण पुस्तक वाचायला हवे असे आज प्रथमच वाटले, धन्यवाद
1 Nov 2022 - 9:28 pm | सागरसाथी
आजपर्यंत या पुस्तकाबद्दल अनेक वेळा वाचले पण पुस्तक वाचायला हवे असे आज प्रथमच वाटले, धन्यवाद