श्री गजानन महाराज ! भक्तिरचना...

चंद्रशेखर महामुनी's picture
चंद्रशेखर महामुनी in जे न देखे रवी...
28 Apr 2009 - 2:50 pm

मित्रांनो.... आत्ता पर्यन्त तुम्ही माझ्या ' प्रेम कविता ' वाचल्यात... त्यांना खुप छान प्रतिसाद दिलात....
आता मी ... ही भक्तिरचना... तुमच्या पुढे सादर करित आहे.....

|| श्री गजानन महाराज ||

गजानन नाम... ज्याच्या मुखातुन... [२]
चित्ती समाधान.... लाभतसे.... [२]
गजानन नाम .... || धृ. ||

शेगावी प्रगट्ला.. उद्धारण्या जगा
प्रेमरुप झाला... भक्तांसाठी...
मनोभावे, मुखी घ्यावे.. [२] गणी गणात बोतें..
गजानन नाम .... || १ ||

काया-वाचा-मने... चित्त एक झाले
जीव-शिव तत्व ... एकरुप झाले ..
नामा संग, झालो दंग..[२] अंत पार झाला..
गजानन नाम ... || २||

चरणी ठाव द्या हो.. जीव कासावीस
मुक्तिधाम दावा.. हीच एक आस
तुम्हां वीण , आता कोण ?.. [२] स्वामी मज आसरा..
गजानन नाम .... || ३ ||

- चंद्रशेखर

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

28 Apr 2009 - 4:11 pm | चन्द्रशेखर गोखले

सुंदर !

मीनल's picture

28 Apr 2009 - 4:18 pm | मीनल

भक्ति काव्य छान आहे. पण म्हणायच कस?
'हरी मुखे म्हणा' या चाली वर नाही जमले

मीनल.

प्राजु's picture

28 Apr 2009 - 7:18 pm | प्राजु

भक्ती काव्य छान आहे.
:)
आपल्या आवाजात गाऊन धनीफीत इथे चढवावी ही विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

तू हस्तक्षेप करायला सांगते आहेस असं नाही वाटत तुला? ;)

चतुरंग

प्राजु's picture

6 May 2009 - 8:24 am | प्राजु

हस्तक्षेप नाही..
चंद्रशेखर महामुनी हे स्वतः उत्तम गायक आहेत आणि बर्‍याच ठिकाणी जुन्या हिंदी गाण्यांचे कार्यक्रम करतात. शिवाय काही मराठी गाणी त्यांनी स्वतः संगीत बद्ध केली आहेत. म्हणून म्हंटले त्यांना स्वत: गाऊन ध्वनीफीत चढवा.:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

28 Apr 2009 - 7:49 pm | क्रान्ति

भक्तीकाव्य आवडले.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

समिधा's picture

28 Apr 2009 - 9:26 pm | समिधा

खुप छान आहे.खरच आपल्या आवाजात गाऊन धनीफीत इथे चढवावी ही विनंती.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

चंद्रशेखर महामुनी's picture

28 Apr 2009 - 11:14 pm | चंद्रशेखर महामुनी

मित्रांनो... मैत्रिणींनो....
खुप आभारि आहे....
या रचनेला चाल लावलेली आहे.... लवकरच ती रेकॉर्ड करुन मिपा वर लावतो....
प्रतिसादा बद्दल पुन्हा एकदा आभार... !

काळा डॉन's picture

29 Apr 2009 - 10:26 am | काळा डॉन

आम्ही समस्त भोंदू बुवा बाबांना फाट्यावर मारतो.
तुमची कविता तद्दन टूकार आहे.

चंबा मुतनाळ's picture

29 Apr 2009 - 10:34 am | चंबा मुतनाळ

आम्ही समस्त भोंदू बुवा बाबांना फाट्यावर मारतो
ब्लेक डान्याच्या प्रतीसादाशी १००% सहमत

चंबा पेलवान

नितिन थत्ते's picture

1 May 2009 - 6:10 pm | नितिन थत्ते

सहमत
|| भण भण डोक्यात होते ||

खराटा
(रंग माझा वेगळा)

जागु's picture

29 Apr 2009 - 11:16 am | जागु

काव्य छान आहे. माझे पुर्ण घर गजानन महराजांचे भक्त आहे. आम्ही जानेवारीत जाऊन आलो शेगांवला.

चंद्रशेखर महामुनी's picture

30 Apr 2009 - 11:30 pm | चंद्रशेखर महामुनी

क्या बात है..!
खुप सुंदर ठिकाण आहे.... ते..!

चंद्रशेखर महामुनी's picture

30 Apr 2009 - 11:29 pm | चंद्रशेखर महामुनी

सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
आभार...!

काळा डॉन's picture

1 May 2009 - 9:25 pm | काळा डॉन

>>सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

नसायला काय झालय...तुमच्या टूकार कवितेचे प्रतिसाद वाढतातच त्याने.. हा घ्या आणखी एक...

अशीच प्रगती चालू राहिली तर तुम्ही पण देवबाप्पांच्या सिद्धहस्त कोट्यात एडमिशन मिळवणार... ~X(

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2009 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार

मालक अतिशय सुरेख भक्तीकाव्य.
आमच्या मातोश्री गजानन महाराजांच्या परमभक्त असल्याने आज जाताना ह्या काव्याची प्रिंट आउट काढुन घरी नेत आहे.
धन्यवाद.

पराब्रम्ह
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्रशु's picture

5 May 2009 - 3:57 pm | प्रशु

जय गजानन महाराज...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2009 - 4:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गणी गणात बोतें..

म्हणजे नक्की काय? मी लहानपणापासून (तेव्हा हलवा खायला म्हणूनच मंदिरात जायचे) याचा विचार करत आहे.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

नितिन थत्ते's picture

5 May 2009 - 5:29 pm | नितिन थत्ते

अहो ते गण गण गणात बोते असे आहे.
मी एका भक्ताला अर्थ विचारला होता. त्याने मंत्राला अर्थ असण्याची गरजच काय? असे सांगितले होते.

(अवांतरः उत्तरा केळकर यांना विचारून पाहता येईल)
अति अवांतरः तुम्हाला टेक्स्टचा रंग कसा बदलता येतो?

खराटा

मदनबाण's picture

5 May 2009 - 4:40 pm | मदनबाण

चंद्रशेखरजी आपण केलेले काव्य आवडले.:)

मी माझ्या आईच्या गर्भात असल्यापासुन माझी आई गजानन महाराजांची पोथी अगदी नित्य-नियमाने वाचत आहे आणि मी पण ती एकदा वाचली आहे.
हिंदुस्थान ही संताची भुमी आहे हे बहुधा काही जणांना माहित नसावे...असो चालायचेच...हल्ली संताची टिंगल करणे म्हणजे एक फॅशनच झाली आहे !!!

(गजानन भक्त)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

मीनल's picture

5 May 2009 - 10:38 pm | मीनल

गण गण गणात बोते हे श्री गजानन महाराजांच प्रिय भजन होते. बरेचदा टिचक्या वाजवत बोट रक्त बंबाळ होई पर्यंत महाराज वेगवेगळ्या प्रकारे हे भजन गात असत.
'गिण गिण गिणात बोते' किंवा 'गणी गण गणात बोते' अस असेल अस काहींच मत आहे.

गिण म्हणजे गिणती करणे/ मोजणी करणे किंवा समजणे असेल. गण/गिण म्हणजे जिवात्मा.गण/गिण म्हणजेच ब्रम्ह.
बोते हा शब्द बाते(गोष्ट) याशब्दाचा अपभ्रंश असावा.
प्रत्येक आत्म्यात/ जिवात्म्यात ब्रम्ह आहे.
जिव म्हणजेच ब्रम्ह. ही गोष्ट नीट समजून घ्या अस या भजनाचा अर्थ असेल कदाचित.

पोथीत दिलेल्या ओवींवरून मला समजलेला हा अर्थ दिला आहे.

मीनल.

टिउ's picture

6 May 2009 - 12:10 am | टिउ

तुमचा प्रतिसाद वाचुन प्रचंड करमणुक झाली...

गिण म्हणजे गिणती करणे/ मोजणी करणे किंवा समजणे असेल.
गण/गिण म्हणजे जिवात्मा.
गण/गिण म्हणजेच ब्रम्ह.
बोते हा शब्द बाते(गोष्ट) याशब्दाचा अपभ्रंश असावा.
बरेचदा टिचक्या वाजवत बोट रक्त बंबाळ होई पर्यंत महाराज वेगवेगळ्या प्रकारे हे भजन गात असत.

हे तर खुपच आवडलं...अजुन काही माहीती असेल तर सांगा!

मीनल's picture

6 May 2009 - 1:15 am | मीनल

माझ ज्ञान / समज ती काय हो? जाऊ द्या झाल!
पण माझ्या प्रतिसादाने आपली निदान करमणूक तरी झाली.हे ही नसे थोडके.
महाराजाची कृपा. दुसर काय?

अरेरे ,जरा विलंब झाला. श्री गजानन महारांजावर मी इ प्रसारण रेडिओवर केलेला कार्यक्रम ऐकला असतात तर माहिती मिळाली असतीच शिवाय अजून करमणूक झाली असती आपली.वाचायचे कष्ट ही करायला नको होते.

असो.
अजून माहिती पाहिजे आहे हे वाचून खूपच आवडलं.
श्री दासगणू महाराज लिखित २१ अध्यायांचा श्री गजानान विजय नावाचा ग्रंथ आहे. त्याला भक्त मंडळी पोथी म्हणतात.ती वाचाल्यास आपल्याला अजून माहिती मिळेल.
त्याच पोथीत ९व्या अध्यायात `गण गण गणात बोते` चा अर्थ श्री दासगणू महाराजांनी दिलेला आहे.बघा वाचून.
श्रवणिय मराठी पोथी ही जलावर उपलब्ध आहे. इंग्रजी ही आहे.ऐकून पहा.
काही अधिक /वेगळ समजल तर नक्की लिहा इथे.
आमच्यासारख्या अज्ञानांच्या ज्ञानात भर होईल जरा.

शिवाय जलावर शोधून बघा. अनेक पेजेस उघडतील समोर.
मग काय ?
करमणूकच करमणूक!
मजा करा.

मीनल.

एक's picture

6 May 2009 - 1:43 am | एक

कशाला "पोथी", "दासगणू महाराज" यांसारखी कोलितं लोकांच्या हातात देत आहात?
प्रतिसादांना ह्पापलेली लोकं टपूनच बसलेली असतात.

ज्यांना खरोखरची जिज्ञासा असेल ते लोक शोध घेतील. ज्यांना टवाळीच करायची आहे ती लोकं काहितरी क्षुद्र शाब्दिक कोट्या करून आपली करमणूक करून घेतील. तुमचे प्रयत्न तसेही फोलच जाणार आहेत.
मेघाने सुपीक जमीनीवर बरसावे. वांझोट्या जमिनीवर किंवा सागरावर बरसून काही फायदा नाही.

सं. स्थळावर गजानन महाराज, साईबाबा यांसंबंधी अनेक वाद वाचले आहेत. तुमचे पुढचे मानसिक क्लेष वाचवण्यासाठी हा आगावू सल्ला.

टिउ's picture

6 May 2009 - 2:27 am | टिउ

तुमच्या सल्ल्यानुसार जालावर शोधुन बघितलं...बरीच माहिती मिळाली.
सध्या महाराजांचे चमत्कार वाचतोय. खरंच खुप करमणुक होतेय! धन्यवाद...

प्राजु's picture

6 May 2009 - 2:03 am | प्राजु

बागडू, टिऊ.., मीनल, एक..
कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्ये सार्वजनिक ठिकाणी करू नयेत हि विनंती.
हा वाद इथेच थांबवावा. अन्यथा प्रतिक्रिया अप्रकाशित करण्यात येतिळ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लोकं जेव्हा

"भण भण भणात बोते", "भोंदू बुवा", "मनोरूग्णाची निरर्थक बडबड"

लिहित होते किंवा "मीनल" यांना टिऊ यांचे प्रतिसाद आले.. तेव्हा तुमची प्रतिक्रिया आली नाही.

मी किंवा मिनल यांनी जेव्हा प्रत्युत्तर दिलं तेव्हा लगेच प्रतिक्रिया आली.. असो..

मी तर मीनल यांना फक्त सल्ला दिला. मिपाच्या कुठल्याही सभासदाचा उल्लेखही माझ्या प्रतिसादात नव्हता तेव्हा मी कोणाच्या आणि कश्या भावना दुखावल्या हे जरा सविस्तर सांगाल का? मीनल यांना जर माझ्या सल्ल्यावर आक्षेप असेल तर त्यांना स्वःताला ते सांगू द्याना. मी जाहीर त्यांची क्षमा मागेन.

काळा डॉन's picture

6 May 2009 - 7:20 am | काळा डॉन

लोकं जेव्हा "भण भण भणात बोते", "भोंदू बुवा", "मनोरूग्णाची निरर्थक बडबड" लिहित होते ...

ह्यात चुकिचे काय आहे?

आपल्याला जे काही वाटते तेच फक्त बरोबर आणि तसेच सर्वांनी वागले पाहीजे असे जेंव्हा कोणी म्हणू लागतो तेंव्हा तो फॅनॅटीझम असतो. असा फॅनॅटीझम हा केवळ श्रद्धाळू अथवा अंधश्रद्धाळूंचीच मक्तेदारी नसते तर अगदी स्वतःला वैचारीक अश्रद्ध म्हणणारेपण तसे असू शकतात असे वाटते.

इति विकास

एक's picture

6 May 2009 - 11:19 am | एक

माझ्याच प्रतिसादानंतर प्राजूचा (भावना दुखावण्याचा) प्रतिसाद लगेच आला त्यावर माझा आक्षेप होता. ज्याचा तिने ख. व. मधे मला निरोप ठेवून निराकरण केलं.

माझ्या लेखी आता विषय संपला. तुम्ही भण भण म्हणा नाहीतर झण झण म्हणा. आय डोण्ट इव्हन गिव्ह रॅट्स ऍस!

अवलिया's picture

6 May 2009 - 6:58 am | अवलिया

वा !
सुरेख भक्तिकाव्य !!

जियो ! येवु द्या अजुन अशाच सुंदर भक्तीरसपुर्ण रचना !! :)

--अवलिया

नितिन थत्ते's picture

6 May 2009 - 10:51 am | नितिन थत्ते

मी स्वतः नास्तिक असल्याने काही प्रमाणात थट्टा मस्करी केली. त्यावर दुसर्‍या बाजूने काही आक्रस्ताळा प्रतिसाद आला नाही. मीनल यांनी त्यांच्या परीने अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. तो अर्थातच पटला नसला तरी मग या धाग्यावर बुवा-देव्-नास्तिक हा वाद घालू नये असे वाटून 'भावना दुखवू नये' असे कुणाला तरी प्रतिसादात लिहिले.

पण आता हा वाद चिघळलेला दिसला. माझी सर्व नास्तिकांना विनंती की हा वाद या धाग्यावर घालू नये.
(अवांतरः माझ्या नास्तिकपणानुसार गजानन महाराजांचे स्तोत्र आणि गणपतीचे स्तोत्र सारखेच वंदनीय्/निंदनीय आहेत)

खराटा
(रंग माझा वेगळा)

शारंगरव's picture

6 May 2009 - 11:09 am | शारंगरव

रचना छानच आहे.

तुमच्या आवाजातिल ध्वनिफितिचि प्रतिक्षा आहे.

टिपः जगात असंख्य लोक आहेत. त्यामुळे कोणत्याहि गोष्टिला चांगले/वाईट बरोबर्/चुक म्हणणारे लोकही असणारच.

तात्पर्य: कोणितरी चुक म्हणाले,म्हणुन जे मला चांगले वाटते ते मी का सोडायचे? (जेव्हा माझ्या मते त्याचा कोणाला त्रास होत नाहि तेव्हा :) )

- शारंगरव

चंद्रशेखर महामुनी's picture

7 May 2009 - 12:05 am | चंद्रशेखर महामुनी

मिपा वर मी हे काव्य प्रकाशित केले.. त्या वर एवढा उहापोह होइल असे मला मुळीच वाटले नव्हते.
आस्तिक - नास्तिक हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला एखादि गोष्ट जर नसेल पटत तर किमान समोरच्या व्यक्तिच्या भावनांचा
आदर करावा असे मला मनापासुन वाटते.
नाहि तर मिपा वर काही व्यक्त करावे का नाही ? असा प्रश्न आमच्या सारख्या नवोदित सभासदांना पडेल...
सर्व मित्र -मैत्रिणिंचे.... मनापासुन आभार..!
-चंद्रशेखर.

विकास's picture

7 May 2009 - 12:12 am | विकास

>>>नाहि तर मिपा वर काही व्यक्त करावे का नाही ? असा प्रश्न आमच्या सारख्या नवोदित सभासदांना पडेल...

आपले विचार अवश्य व्यक्त करा. आपल्या भावना असलेले लेख पण अवश्य लिहा. मात्र थोडीफार थट्टा मस्करी होऊ शकते - मिपाच कशाला कुठेही, हे मनात ठेवावे ही विनंती. तसेच थोडेफार वैचारीक वाद झाले म्हणून देखील काही हरकत नसावी. (तसे आपले प्रतिसाद हे नक्कीच समतोल वाटले). मात्र मस्करीची कुस्करी आणि चेष्टेची कुचेष्टा होऊ लागल्यास संपादकांच्या कानावर घालायला काहीच हरकत नाही.

चंद्रशेखर महामुनी's picture

8 May 2009 - 12:15 am | चंद्रशेखर महामुनी

विकास... तुमचे म्हणणे खरे आहे.... !
आभार...!