हस्तक्षेप नाही..
चंद्रशेखर महामुनी हे स्वतः उत्तम गायक आहेत आणि बर्याच ठिकाणी जुन्या हिंदी गाण्यांचे कार्यक्रम करतात. शिवाय काही मराठी गाणी त्यांनी स्वतः संगीत बद्ध केली आहेत. म्हणून म्हंटले त्यांना स्वत: गाऊन ध्वनीफीत चढवा.:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मित्रांनो... मैत्रिणींनो....
खुप आभारि आहे....
या रचनेला चाल लावलेली आहे.... लवकरच ती रेकॉर्ड करुन मिपा वर लावतो....
प्रतिसादा बद्दल पुन्हा एकदा आभार... !
>>सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
नसायला काय झालय...तुमच्या टूकार कवितेचे प्रतिसाद वाढतातच त्याने.. हा घ्या आणखी एक...
अशीच प्रगती चालू राहिली तर तुम्ही पण देवबाप्पांच्या सिद्धहस्त कोट्यात एडमिशन मिळवणार... ~X(
म्हणजे नक्की काय? मी लहानपणापासून (तेव्हा हलवा खायला म्हणूनच मंदिरात जायचे) याचा विचार करत आहे.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
अहो ते गण गण गणात बोते असे आहे.
मी एका भक्ताला अर्थ विचारला होता. त्याने मंत्राला अर्थ असण्याची गरजच काय? असे सांगितले होते.
(अवांतरः उत्तरा केळकर यांना विचारून पाहता येईल)
अति अवांतरः तुम्हाला टेक्स्टचा रंग कसा बदलता येतो?
खराटा
चंद्रशेखरजी आपण केलेले काव्य आवडले.:)
मी माझ्या आईच्या गर्भात असल्यापासुन माझी आई गजानन महाराजांची पोथी अगदी नित्य-नियमाने वाचत आहे आणि मी पण ती एकदा वाचली आहे.
हिंदुस्थान ही संताची भुमी आहे हे बहुधा काही जणांना माहित नसावे...असो चालायचेच...हल्ली संताची टिंगल करणे म्हणजे एक फॅशनच झाली आहे !!!
(गजानन भक्त)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
गण गण गणात बोते हे श्री गजानन महाराजांच प्रिय भजन होते. बरेचदा टिचक्या वाजवत बोट रक्त बंबाळ होई पर्यंत महाराज वेगवेगळ्या प्रकारे हे भजन गात असत.
'गिण गिण गिणात बोते' किंवा 'गणी गण गणात बोते' अस असेल अस काहींच मत आहे.
गिण म्हणजे गिणती करणे/ मोजणी करणे किंवा समजणे असेल. गण/गिण म्हणजे जिवात्मा.गण/गिण म्हणजेच ब्रम्ह.
बोते हा शब्द बाते(गोष्ट) याशब्दाचा अपभ्रंश असावा.
प्रत्येक आत्म्यात/ जिवात्म्यात ब्रम्ह आहे.
जिव म्हणजेच ब्रम्ह. ही गोष्ट नीट समजून घ्या अस या भजनाचा अर्थ असेल कदाचित.
पोथीत दिलेल्या ओवींवरून मला समजलेला हा अर्थ दिला आहे.
मीनल.
गिण म्हणजे गिणती करणे/ मोजणी करणे किंवा समजणे असेल.
गण/गिण म्हणजे जिवात्मा.
गण/गिण म्हणजेच ब्रम्ह.
बोते हा शब्द बाते(गोष्ट) याशब्दाचा अपभ्रंश असावा.
बरेचदा टिचक्या वाजवत बोट रक्त बंबाळ होई पर्यंत महाराज वेगवेगळ्या प्रकारे हे भजन गात असत.
हे तर खुपच आवडलं...अजुन काही माहीती असेल तर सांगा!
माझ ज्ञान / समज ती काय हो? जाऊ द्या झाल!
पण माझ्या प्रतिसादाने आपली निदान करमणूक तरी झाली.हे ही नसे थोडके.
महाराजाची कृपा. दुसर काय?
अरेरे ,जरा विलंब झाला. श्री गजानन महारांजावर मी इ प्रसारण रेडिओवर केलेला कार्यक्रम ऐकला असतात तर माहिती मिळाली असतीच शिवाय अजून करमणूक झाली असती आपली.वाचायचे कष्ट ही करायला नको होते.
असो.
अजून माहिती पाहिजे आहे हे वाचून खूपच आवडलं.
श्री दासगणू महाराज लिखित २१ अध्यायांचा श्री गजानान विजय नावाचा ग्रंथ आहे. त्याला भक्त मंडळी पोथी म्हणतात.ती वाचाल्यास आपल्याला अजून माहिती मिळेल.
त्याच पोथीत ९व्या अध्यायात `गण गण गणात बोते` चा अर्थ श्री दासगणू महाराजांनी दिलेला आहे.बघा वाचून.
श्रवणिय मराठी पोथी ही जलावर उपलब्ध आहे. इंग्रजी ही आहे.ऐकून पहा.
काही अधिक /वेगळ समजल तर नक्की लिहा इथे.
आमच्यासारख्या अज्ञानांच्या ज्ञानात भर होईल जरा.
शिवाय जलावर शोधून बघा. अनेक पेजेस उघडतील समोर.
मग काय ?
करमणूकच करमणूक!
मजा करा.
मीनल.
कशाला "पोथी", "दासगणू महाराज" यांसारखी कोलितं लोकांच्या हातात देत आहात?
प्रतिसादांना ह्पापलेली लोकं टपूनच बसलेली असतात.
ज्यांना खरोखरची जिज्ञासा असेल ते लोक शोध घेतील. ज्यांना टवाळीच करायची आहे ती लोकं काहितरी क्षुद्र शाब्दिक कोट्या करून आपली करमणूक करून घेतील. तुमचे प्रयत्न तसेही फोलच जाणार आहेत.
मेघाने सुपीक जमीनीवर बरसावे. वांझोट्या जमिनीवर किंवा सागरावर बरसून काही फायदा नाही.
सं. स्थळावर गजानन महाराज, साईबाबा यांसंबंधी अनेक वाद वाचले आहेत. तुमचे पुढचे मानसिक क्लेष वाचवण्यासाठी हा आगावू सल्ला.
बागडू, टिऊ.., मीनल, एक..
कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्ये सार्वजनिक ठिकाणी करू नयेत हि विनंती.
हा वाद इथेच थांबवावा. अन्यथा प्रतिक्रिया अप्रकाशित करण्यात येतिळ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
लोकं जेव्हा
"भण भण भणात बोते", "भोंदू बुवा", "मनोरूग्णाची निरर्थक बडबड"
लिहित होते किंवा "मीनल" यांना टिऊ यांचे प्रतिसाद आले.. तेव्हा तुमची प्रतिक्रिया आली नाही.
मी किंवा मिनल यांनी जेव्हा प्रत्युत्तर दिलं तेव्हा लगेच प्रतिक्रिया आली.. असो..
मी तर मीनल यांना फक्त सल्ला दिला. मिपाच्या कुठल्याही सभासदाचा उल्लेखही माझ्या प्रतिसादात नव्हता तेव्हा मी कोणाच्या आणि कश्या भावना दुखावल्या हे जरा सविस्तर सांगाल का? मीनल यांना जर माझ्या सल्ल्यावर आक्षेप असेल तर त्यांना स्वःताला ते सांगू द्याना. मी जाहीर त्यांची क्षमा मागेन.
लोकं जेव्हा "भण भण भणात बोते", "भोंदू बुवा", "मनोरूग्णाची निरर्थक बडबड" लिहित होते ...
ह्यात चुकिचे काय आहे?
आपल्याला जे काही वाटते तेच फक्त बरोबर आणि तसेच सर्वांनी वागले पाहीजे असे जेंव्हा कोणी म्हणू लागतो तेंव्हा तो फॅनॅटीझम असतो. असा फॅनॅटीझम हा केवळ श्रद्धाळू अथवा अंधश्रद्धाळूंचीच मक्तेदारी नसते तर अगदी स्वतःला वैचारीक अश्रद्ध म्हणणारेपण तसे असू शकतात असे वाटते.
इति विकास
माझ्याच प्रतिसादानंतर प्राजूचा (भावना दुखावण्याचा) प्रतिसाद लगेच आला त्यावर माझा आक्षेप होता. ज्याचा तिने ख. व. मधे मला निरोप ठेवून निराकरण केलं.
माझ्या लेखी आता विषय संपला. तुम्ही भण भण म्हणा नाहीतर झण झण म्हणा. आय डोण्ट इव्हन गिव्ह रॅट्स ऍस!
मी स्वतः नास्तिक असल्याने काही प्रमाणात थट्टा मस्करी केली. त्यावर दुसर्या बाजूने काही आक्रस्ताळा प्रतिसाद आला नाही. मीनल यांनी त्यांच्या परीने अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. तो अर्थातच पटला नसला तरी मग या धाग्यावर बुवा-देव्-नास्तिक हा वाद घालू नये असे वाटून 'भावना दुखवू नये' असे कुणाला तरी प्रतिसादात लिहिले.
पण आता हा वाद चिघळलेला दिसला. माझी सर्व नास्तिकांना विनंती की हा वाद या धाग्यावर घालू नये.
(अवांतरः माझ्या नास्तिकपणानुसार गजानन महाराजांचे स्तोत्र आणि गणपतीचे स्तोत्र सारखेच वंदनीय्/निंदनीय आहेत)
खराटा
(रंग माझा वेगळा)
रचना छानच आहे.
तुमच्या आवाजातिल ध्वनिफितिचि प्रतिक्षा आहे.
टिपः जगात असंख्य लोक आहेत. त्यामुळे कोणत्याहि गोष्टिला चांगले/वाईट बरोबर्/चुक म्हणणारे लोकही असणारच.
तात्पर्य: कोणितरी चुक म्हणाले,म्हणुन जे मला चांगले वाटते ते मी का सोडायचे? (जेव्हा माझ्या मते त्याचा कोणाला त्रास होत नाहि तेव्हा :) )
- शारंगरव
मिपा वर मी हे काव्य प्रकाशित केले.. त्या वर एवढा उहापोह होइल असे मला मुळीच वाटले नव्हते.
आस्तिक - नास्तिक हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला एखादि गोष्ट जर नसेल पटत तर किमान समोरच्या व्यक्तिच्या भावनांचा
आदर करावा असे मला मनापासुन वाटते.
नाहि तर मिपा वर काही व्यक्त करावे का नाही ? असा प्रश्न आमच्या सारख्या नवोदित सभासदांना पडेल...
सर्व मित्र -मैत्रिणिंचे.... मनापासुन आभार..!
-चंद्रशेखर.
>>>नाहि तर मिपा वर काही व्यक्त करावे का नाही ? असा प्रश्न आमच्या सारख्या नवोदित सभासदांना पडेल...
आपले विचार अवश्य व्यक्त करा. आपल्या भावना असलेले लेख पण अवश्य लिहा. मात्र थोडीफार थट्टा मस्करी होऊ शकते - मिपाच कशाला कुठेही, हे मनात ठेवावे ही विनंती. तसेच थोडेफार वैचारीक वाद झाले म्हणून देखील काही हरकत नसावी. (तसे आपले प्रतिसाद हे नक्कीच समतोल वाटले). मात्र मस्करीची कुस्करी आणि चेष्टेची कुचेष्टा होऊ लागल्यास संपादकांच्या कानावर घालायला काहीच हरकत नाही.
जय गजानन..!
छान
हेच म्हणते.
प्राजू, चाल लावायला सांगून देवकाकांच्या राखीव कुरणात
नाही हो..
छान.
खुप छान
आभार !
आम्ही
आम्ही
सहमत
छान.
आभार !
आभार !
>>सगळ्या
मालक अतिशय
खुप छान
गणी गणात
अहो ते गण
चंद्रशेखर
गण गण गणात बोते
भारी
माहिती
नवीन आहात का?
धन्यवाद
बागडू,
मी कोणाच्या भावना दुखावल्या?
बरं मग?
चुकीच काहीच नाही.
वा ! सुरेख
अरेरे
छान
हा वाद आता आपण संपवु या....
अवश्य करा...
खरे आहे...