ताज्या घडामोडी जून २०२२

निनाद's picture
निनाद in राजकारण
1 Jun 2022 - 7:05 am

मूर्तीची तोडफोड का?

अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.

कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.

प्रतिक्रिया

sunil kachure's picture

14 Jun 2022 - 1:33 pm | sunil kachure

बंगाल,तमिळ nadu, केरळ,आंध्र,तेलंगणा ,राजस्थान,पंजाब, हे कोणी हिंदुत्व चे राजकारण करून जिंकत नाहीत.
हिंदुत्व चे राजकारण आणि पुढील धोका लोकांना जाणवला आहे.
सेने नी पण अयोध्या विसरवी
महाराष्ट्र हीत हेच ध्येय हे ठेवावे.
मराठी लोक ते मनापासून स्वीकारतील.

जी खरेच माणसं आहेत आणि गुलाम नाहीत
त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत पक्ष विसरून जावा.
ह्या महान राष्ट्राचे हीत आणि ह्या महान देशात असलेली महान राज्य व्यवस्था लोकशाही टिकविण्यास आपले सर्वस्व बहाल करावे.
शरद पवार जर राष्ट्रपती पदा साठी उभे राहत असतील तर त्यांना .
पक्षभेद विसरून आणि देशाचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय पक्षातील स्वाभिमानी लोकांनी निवडून द्यावे

निपुर शर्मा विरुद्द निदर्शने करणार्या भारतीय व पाकिस्तानी लोकांच्या विरुद्द कडक कारवाई करत कुवेत सरकारने देशाबाहेर हाकलुन दिलेले आहे. आता ह्या लोकांना कुवेत मध्ये काम करण्यासाठी कधीही परत येता येणार नाही. फुकाचे पाकिस्तानी लोकाम्च्या नादी लागुन काही भारतीय मुसलमान लोकांनी आपली आजिविका गमावलेली आहे. ह्या परदेशी लोकांबरोबरच कुवेतच्या लोकल लोकांवरही कारवाई केली गेलेली आहे.
उगाच प्रॉफेटचा अपमान वैगेरेच्या अफवा पसरवणार्या लोकांवर सर्वत्र कारवाई होत आहे.
कतार सरकारने सुद्दा काही कतारी लोकांच्या प्रति क्रीयावर माफी मागीतलेली आहे. येत्या काही महीन्यात कतार मध्ये फीफा फुटबॉल विश्व चषक स्पर्धा आयोजीत केली जाणार आहे. ऐन अश्या समांरंभाच्या वेळी भारताकडुन अन्न धान्य , फळ पुरवठा रोखुन कतार
देशाला कोंडीत पकडल जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
डच मधले नेते गिर्ट वा ईल्डर ह्यांनी नुपुर शर्माला सपोर्ट करत भारतात तांडव करणार्या लोकांना चांगलेच सुनावले आहे.
https://www.deccanherald.com/national/dont-listen-to-hypocrites-dutch-la...

https://www.onmanorama.com/news/world/2022/06/13/kuwait-to-deport-expats...

रात्रीचे चांदणे's picture

14 Jun 2022 - 6:13 pm | रात्रीचे चांदणे

फुकाचे पाकिस्तानी लोकाम्च्या नादी लागुन काही भारतीय मुसलमान लोकांनी आपली आजिविका गमावलेली आहे.
कदाचित उलटं झालं असण्याची शक्यता जास्त आहे.

शाम भागवत's picture

14 Jun 2022 - 8:12 pm | शाम भागवत

पाकिस्तानची सध्याची दिवाळखोरीची परिस्थिती पाहता, मायदेशी परतणे त्या पाकिस्तानींना फारच त्रासदायक होईल. नाही का?

निनाद's picture

15 Jun 2022 - 4:57 am | निनाद

यांना अटक करून कायद्यानुसार शिक्षा का झाली नाही? भारताने कुवेती राज्य घटने नुसार कारवाईचे प्रयत्न केले पाहिजेत.

कारवाई झाली तर कुवेती कारागृहात राहतील. ते तर अजून बरे!

जे रेस मध्येच उ तरणार नसतील मग ते कसे काय राष्ट्रपती होणार ? बाकी शरद पवार राष्ट्रपती होणार किंवा नाही हे बरेचसे भाजपाच्या केंद्र सरकारवर अवलंबुन असेल.

Sharad Pawar Says 'Not In President Race' Amid Opposition .
https://www.ndtv.com/india-news/sharad-pawar-says-not-in-president-race-...
Sharad Pawar rules himself out of the race for next President
https://www.timesnownews.com/india/sharad-pawar-rules-himself-out-of-the...

Sharad Pawar not in Presidential race: NCP - The Indian ...
https://indianexpress.com/article/cities/mumbai/sharad-pawar-not-in-pres...

सुबोध खरे's picture

14 Jun 2022 - 7:17 pm | सुबोध खरे

साहेब काहीही करू शकतात हे त्यांचे गुलाम आणि चमचे कितीही उच्चरवाने बोंबलत असतील तरी
आपण काही निवडून येऊ शकत नाही हे श्री शरद पवार याना माहिती आहे.

तेंव्हा हात दाखवून अवलक्षण करू नये इतकी परिपक्वता आणि अनुभव त्यांना नक्कीच आहे.

हाच अनुभव आणि समाज श्री नितीश कुमार यांनाही असल्याने त्यांनी अगोदरच आपण या स्पर्धेत नाही म्हणून जाहीर करून विरोधकांची गोची करून ठेवली आहे

बाकी शरद पवार यांच्या सारख्या कायमच्या विरोधी असणाऱ्या माणसाला राष्ट्रपती करून आपल्या संसदीय कामकाजात कायमचा अडसर आणू नये इतकी परिपक्वता भाजप नेतृत्वात सुद्धा नक्कीच आहे.

तेंव्हा येणारा राष्ट्रपती हा मूळ भाजपचाच असेल यात शंका नाही.

पवारांनी जसा मविआचे सरकार आणुन महाराष्ट्र वाचवला तसे आता राष्ट्रपती होऊन देश वाचवायला हरकत नाही.
मग मज्जा येईल.

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2022 - 8:11 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रपती पदाची निवडणुक लढण्याआधी राज्यसभा/लोकसभा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. पवार राष्ट्रपती पदाची निवडणुक जिंकण्याची शक्यता शून्य आहे. मोदी त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता शून्य आहे. तरीही हट्टाने उभे राहिले आणि हरले (हरणार आहेतच), तर पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी घटनेची कोणतीही आडकाठी नाही. परंतु मुख्याध्यापक पदाच्या मुलाखतीत निवड न झाल्यास शाळेतील एखाद्या कर्मचारी पदासाठी अर्ज करणे जितके हास्यास्पद ठरेल, तितकेच पुन्हा राज्यसभेत जाणे हास्यास्पद ठरेल.

अर्थात बीसीसीआय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेचे अध्यक्ष अशी सर्वोच्च पदे भूषविल्यानंतरही ते मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावर गेले होते. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणुक हरल्यानंतर सुद्धा जनतेची सेवा करायची आहे अशी मल्लिनाथी करून पुन्हा राज्यसभेत साधा खासदार म्हणून जाणारच नाहीत असे नाही.

निनाद's picture

15 Jun 2022 - 5:01 am | निनाद

पवारांनी 'मी रेस मध्ये नाही' असे म्हणणे हाच पहिला रेड फ्लॅग आहे.
पवार जे बोलतात ते करत नाहीत असे भाऊ तोरसेकर म्हणाले आहेत. म्हणजे ते पुर्ण ताकदीने यात उतरणार आहेत आणि राजकारण करून काही जमते का याचे प्रयत्न करणार आहेत हे नक्की!

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2022 - 12:52 pm | श्रीगुरुजी

पवार यांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, अशी विनंती तृणमूल कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. परंतु मला आणखी काही काळ राजकारणात सक्रीय रहायचे असल्याचे सांगत पवार यांनी ही विनंती फेटाळली.

वय ८१ वर्षे ६ महिने, महाराष्ट्राबाहेर शून्य अस्तित्व, महाराष्ट्रात जेमतेम तीन चार जिल्ह्यात अस्तित्व, एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके खासदार, विधानसभेत कधीही एक चतुर्थांशापेक्षा जास्त आमदार नाहीत, इतर कोणत्याही पक्षाचा यांच्यावर विश्वास नाही . . . पण यांची आशा अमर आहे. गेलाबाजार केंद्रात कृषीमंत्र्यासारखे एखादे मंत्रीपद अजूनही मिळू शकते या आशेवर हे अजूनही आहेत.

विजुभाऊ's picture

15 Jun 2022 - 2:04 pm | विजुभाऊ

हो ना . २०१९ च्या निवडणूकीत ते म्हणाले होते की आम्ही विरोधी बाकावर बसण्यास तयार आहोत.
आणि झाले भलतेच

राष्ट्रपती म्हणून रबर स्टॅम्प च हवा.स्वा बुध्दी ची लोक राष्ट्रपती म्हणून सत्ता धारी पक्षाला नको अस्तात.
एक dr कलाम सोडले तर कोणत्या राष्ट्रपती नी उत्तम काम केले आहे.
पवार ना विरोधी पक्षांनी उभे करावे.
बिनविरोध निवडणूक होता कामा नये.

सुखी's picture

14 Jun 2022 - 11:15 pm | सुखी

तुमचा सप्लायर कोण हो...

सुक्या's picture

14 Jun 2022 - 11:33 pm | सुक्या

काचुरे सायेब! नाव आजाबात सांगायचं नाय ...

डँबिस००७'s picture

14 Jun 2022 - 9:26 pm | डँबिस००७

डॉ कलाम यांना मा वाजपेयींनीच नॉमिनेट केलेले होते. https://www.newindianexpress.com/nation/2018/aug/17/when-vajpayees-nomin...

याचा अर्थ देशाला लाभलेला पहीला चांगला राष्ट्रपती हा सुद्धा भाजपानेच दिलेला होता.

देशाला भाजपाशिवाय पर्याय नाही.

निनाद's picture

15 Jun 2022 - 6:06 am | निनाद

देशाच्या सैन्यात भरतीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी योजना अग्निपथ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सैनिक, एअरमन आणि खलाशी यांची भरती केली जाणार आहे. १७ वर्षांवरील १२वी उत्तीर्ण मुले आणि मुली अग्निपथ योजनेसाठी अर्ज करू शकतात. यांना अग्निवीर म्हंटले जाईल.

प्रत्येक अग्निवीरला भरतीच्या वर्षात तीस हजार महिन्यांचा पगार मिळेल जो पुढे वाढत जाईल. नोकरीत सक्तीची बचतही असणार आहे. चार वर्षांत त्यांची एकूण बचत सुमारे पाच लाख रुपये असेल. त्याच वेळी, तेवढीच रक्कम सरकार जमा करणार आहे. चार वर्षे काम पूर्ण झाल्यानंतर ११ लाखाची ही रक्कम व्याजासह आणि करमुक्त मिळेल!
या अग्निवीरांना सेवानिवृत्तीच्या वेळी सरकारी नोकऱ्यांमध्ये ही प्राधान्य दिले जाईल.

ही फार चांगली कल्पना आहे. यामुळे आपोआप शिस्तबद्ध समाज निर्मिती होईल असे वाटते.

या योजनेची तयारी गेले गेल्या दोन वर्षांपासून चालली होती. पण याचा काहीही सुगावा माध्यमांना नव्हता.

आता भागात भारतीय माध्यमांमध्ये काम करायचे असेल तर ही योजना सक्तीची केली जावी - असे मनापासून वाटते.

डँबिस००७'s picture

15 Jun 2022 - 11:05 am | डँबिस००७

ही फार चांगली कल्पना आहे. यामुळे आपोआप शिस्तबद्ध समाज निर्मिती होईल असे वाटते.

१००००००००००००% सहमत !!

1) वयाच्या 23 व्यां वर्षी मुलांचे शिक्षणं पूर्ण होते.प्रत्येकाच्या वाटा ठरलेल्या असतात.
2)चार वर्ष सैन्यात रोजंदारी वर भरती करणार आणि नंतर काढून टाकणार.आयुष्यातील ४ वर्ष कोण वाया जावून देईल.
३) अतिशय गरीब कुटुंबातील मुल च हा मार्ग निवडतील.ज्यांना काहीच पर्याय नाही ते.
श्रीमंत आणि बाकी मध्यम वर्गीय जमात फक्त देश प्रेम शिकवतील स्वतः काही त्यांच्या मुलांना पाठवणार नाही.
४)जास्तीतजास्त समाज अतिशय गरीब झाला पाहिजे म्हणजे देशप्रेमी उपलब्ध होतील हे सूत्र सरकार राबवत आहे विविध कंपन्या विकून,मित्रांना देशाचा मालक बनवून.
५) सैन्यात गेले की शिस्त लागते हे कोणी सांगितले . माजी कसब सैनिक खूप बघण्यात आहेत काही शिस्त वैगेरे नाही कायदे तोडण्यात आणि बेशिस्त वागण्यात ते कुठेच कमी नाहीत.
६) हे रोजगार ठेवलेली तरुण मुलं हल्ल्यात मेली तर त्यांचे कुटुंब कसे जगेल.
त्यांना पेन्शन हे देणार नाहीत.विमा तो पण विमा कंपनीचं देईल ४५ लाख ते पण मेल्यावर मिळणार
मरण हे मरण च असते शहीद झाला वैगेरे काही प्रकार नसतो.
शाहिद झाला म्हणजे काय माणसं काही वर्षांनी जिवंत होत नाहीत.
एक तर ह्यांचे भविष्य खराब करणार चार वर्ष वाया घालवून.
आणि मेले तर कुटुंब उध्वस्त होणार.
रोजंदारी वरची माणसं लढतील का?
छत्रपती चे राज्य सर्व लोकांना स्वतःचे वाटायचे लोक खूप प्रेम करायचे.
त्या मुळे मरणाला स्वतःच्या इच्छेने सामोरी जायची..बाजीप्रभू देशपांडे ना माहीत होते ते थांबले तर मारले जाणार तरी ते थांबले कारण त्यांचे राजावर मनापासून प्रेम होते.भूमी वर मनापासून प्रेम .
कारण राजा पण तसाच होता.
आता राजे पण देशप्रेमी नाहीत आणि जनता पण.

सुबोध खरे's picture

15 Jun 2022 - 11:18 am | सुबोध खरे

कचरे बुवा

तुमचा फुटबॉल काही कधी भरणार नाही.

आपल्याला ज्यात काहीही कळत नाही त्यावर सुद्धा विशेषज्ञ असल्याचा भास आणून टिप्पणी करून आपण आपली लायकी परत परत का सिद्ध करताय हे कळत नाही.

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 12:37 pm | sunil kachure

चार वर्ष पोरांचे आयुष्यातील वाया घालवून त्यांना नोकरी वरून काढून टाकणार.
ह्याचे समर्थन तुम्ही कसे काय करता.
ह्याचे उत्तर तुम्ही स्वतः ध्या तुम्ही किती बुद्धिमान आहे ते लोकांना कळू द्या.
दुसऱ्याची बुद्धी काढू नका.
Bjp समर्थक हे आंधळे भक्त आहेत उगाच नाही बोलले जात.
तुम्हाला chalange आहे.
तुम्ही ह्या अग्नी विर चे फायदे सांगावेत.
नाही तर जाहीर माफी मागावी.

सुबोध खरे's picture

15 Jun 2022 - 6:41 pm | सुबोध खरे

तुम्ही ह्या अग्नी विर चे फायदे सांगावेत.

नाही तर जाहीर माफी मागावी.

आपला पगार किती?

आपण बोलता किती?

आपण कोण गोमाजी लागून गेलात कि मी जाहिर माफी मागावी म्हणून सांगताय ?

आपली लायकी काय?

कोव्हीड मुळे माझी स्मरणशक्ती गेलेली आहे. त्यामुळे ह्या घोटाळ्याबाबत काहीच आठवत नाही.
सत्येंद्र जैन , आम आदमी पक्ष

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 12:53 pm | sunil kachure

सरकारी दाव्यांवर बिलकुल विश्वास ठेवायचा गरज नाही.
स्व बुद्धी पण वापरत जा.
नोट बंदी करताना पण मोठमोठ्या थापा सरकार नी मारल्या होत्या.
एक पण नोट बंदी चा फायदा देशाला झाला नाही.
अग्निपथ पण नोट बंदी सारखाच जुमला आहे.
चार वर्ष संपल्यावर काय?
मेल्यावर काय देणार हे सोडा.ते पण देणार नाहीत जे आता थापा मारल्या जात आहेत.
अग्निविर मेला नाही चार वर्षाच्या सेवेत असताना तर त्याच्या पुढच्या आयुष्य चे काय?
उत्तर असतील तर ध्या.
फक्त थापा मारू नका.

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 1:20 pm | sunil kachure

वार्षिक साडेतीन लाख साठी ह्या देशातील गरीब कुटुंबातील जन्म घेतलेल्या मुलांनी त्यांचे प्राण पणाला lavayche.
आणि इथले भ्रष्ट,लबाड, बँक बुडवे आरामात आयुष्य जागून देश लुटणार.
आणि पुढे हे bjp सरकार आले तर
हळू हळू सैनिक भरतीच कॉन्ट्रॅक्ट वर करतील.
मित्र आहेत च कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी.
D

विजुभाऊ's picture

15 Jun 2022 - 2:06 pm | विजुभाऊ

काहिही

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 2:33 pm | sunil kachure

अग्नी पथ वर तुम्ही उत्तर देणार आहात विसरू नका.
सरकारी भाषा तुम्हीच सत्य माना.
मला फायद्या सहित डिटेल उत्तर हवं आहे..नाही तर जाहीर माफी मागा.

सुबोध खरे's picture

15 Jun 2022 - 6:42 pm | सुबोध खरे

मला फायद्या सहित डिटेल उत्तर हवं आहे

आपण कोण गोमाजी लागून गेलात

मी जाहिर माफी मागावी म्हणून सांगताय ?

आपली लायकी काय?

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 4:53 pm | sunil kachure

अग्नी पथ वर तुमचे काही तर मत व्यक्त करा .कोणाची गुलामी करत असाल तर स्व मालकाचे गुणगान तरी गा. वाट बघत आहे

सुबोध खरे's picture

15 Jun 2022 - 6:43 pm | सुबोध खरे

आपण कोण गोमाजी लागून गेलात?

sunil kachure's picture

16 Jun 2022 - 12:52 pm | sunil kachure

अग्निपथ चे गुणगान गाणारे डोके ,आणि डोळे दोन्ही गहाण ठेवून समर्थन देणारे...अग्निपथ वर काही तरी बोला .
कसे ही योजना देशातील तरुणांना फायदेशीर आहे.
सैन्याचा दर्जा वाढण्यास उपयुक्त आहे.
एक अतिरेकी पन्नास जणांना भारी पडू नये म्हणजे झाले.
Mr खरे अग्निपथ चे महत्व लोकांना सांगा.

sunil kachure's picture

16 Jun 2022 - 12:52 pm | sunil kachure

अग्निपथ चे गुणगान गाणारे डोके ,आणि डोळे दोन्ही गहाण ठेवून समर्थन देणारे...अग्निपथ वर काही तरी बोला .
कसे ही योजना देशातील तरुणांना फायदेशीर आहे.
सैन्याचा दर्जा वाढण्यास उपयुक्त आहे.
एक अतिरेकी पन्नास जणांना भारी पडू नये म्हणजे झाले.
Mr खरे अग्निपथ चे महत्व लोकांना सांगा.

सुबोध खरे's picture

16 Jun 2022 - 6:53 pm | सुबोध खरे

आपण कोण गोमाजी लागून गेलात?

श्रीगुरुजी's picture

16 Jun 2022 - 10:04 am | श्रीगुरुजी

Internet Explorer या वेब ब्राऊझरचा सपोर्ट मायक्रोसॉफ्टने बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हा पहिलाच ब्राऊझर असे काही वृत्तपत्रात लिहिले आहे. प्रत्यक्षात Netscape हा पहिला ब्राऊझर होता. इंटरनेट एक्स्प्लोरर नंतर आला. मायक्रोसॉफ्टने विंडोज बरोबर इंटरनेट एक्स्प्लोरर फुकट द्यायला सुरूवात केल्यानंतर नेटस्केपला गाशा गुंडाळावा लागला. मायक्रोसॉफ्टच्या मोनोपॉलीविरूद्ध नेटस्केपने न्यायालयात खटला दाखल केला होता. तेव्हा तडजोड म्हणून मायक्रोसॉफ्टने विंडोजची दोन वेगवेगळी व्हर्जन्स बाजारात आणण्याचे मान्य केले होते. एकात इंटरनेट एक्स्प्लोरर असायचा व दुसऱ्यात नसायचा. परंतु त्याचा नेटस्केपला फायदा झाला नाही व नेटस्केप लवकरच कालबाह्य झाला.

नंतरच्या काळात इंटरनेट एक्स्प्लोररला फायरफॉक्स व क्रोमशी स्पर्धा करता आली नाही. अगदी Edge आणून सुद्धा हे दोन्ही ब्राऊझर आघाडीवर राहिले.

धर्मराजमुटके's picture

16 Jun 2022 - 1:11 pm | धर्मराजमुटके

अगदी आजच्या पिढीला इंटरनेट एक्स्प्लोरर आणि Edge याचा वापर सर्फिंग करता करता येतो हे देखील माहित नाही. गुगल क्रोम हाच पर्याय बरेच जण वापरतात. मात्र बर्‍याच सीसीटीव्ही चे प्लगीन अजूनही फक्त आणि फक्त इंटरनेट एक्स्प्लोरर मधेच चालतात त्यामुळे आमच्यासारख्या व्यावसायिकांना अजूनही ते वापरावे लागते. बाकी मी सध्या क्रोम आणि फायरफॉक्स पेक्षा Brave आणि Vivaldi हेच ब्राऊजर वापरतो. दोघांचा अनुभव उत्तम आहे.

https://www.youtube.com/watch?v=epoTWoQ0eKI&t=1201s
टीप: बीबीसी म्हणजे भाऊंचे चॅनेल किंवा अदानी, अंबानी वा सुभाष चंद्रा यांचे चॅनेल नसल्याने वेगवेगळ्या बाजू समजू शकतील.

Nitin Palkar's picture

16 Jun 2022 - 8:57 pm | Nitin Palkar

बीबीसी म्हणजे..... भारत विरोधी चानेल....

sunil kachure's picture

16 Jun 2022 - 3:33 pm | sunil kachure

तुमची तीव्र बुध्दीमत्ता दाखवा.अग्निपथ विषयी.
मूव्ही तर गायब च झाले आहेत..
निवृत्त डांबिस,बिनडोक नाविक भैया माजी सैनिकाची बाजू घेणारे .
अग्निपथ वर गायब झाले आहेत.

सुबोध खरे's picture

16 Jun 2022 - 6:58 pm | सुबोध खरे

कचरे बुवा

लष्करात short service commission नावाची योजना गेली ६० वर्षे तरी चालू आहे.

ज्यात कोणतेही निवृत्ती वेतन न देता अधिकारी ५ वर्षे नोकरी करून निवृत्त होत आले आहेत. आता तीच योजना १० + ४ वर्षे नोकरी साठी लागू आहे.

काहीही माहिती न करून घेता दावा उजवा मेंदूचा समन्वय न करता नेट फुकट आहे म्हणून मिपाची बॅण्डविड्थ कशाला अडकवून ठेवताय?

जरा तरी स्वतः माहिती काढत जा.

मिपा फुकट आहे म्हणून लोकांचा किती छळ करताय?

CAA. मुस्लिम लोकांना समजला नाही.

Gst कायदा व्यापारी लोकांना समजला नाही.

शेती विषयक कायदे शेतकऱ्यांना समजले नाहीत.

आता अग्निपथ तरुण मुलांना समजत नाही.

नोट बंदी देशाला समजली नाही.
..लोक खूप च अडाणी आहेत आणि मोदी सरकार प्रचंड हुशार त्यांची कोणतीच धोरणे लोकांना आणि देशाला पण समजत नाहीत..
बौद्धिक गॅप खूप मोठा आहे.
देशाला प्रथमच अतिशय हुशार सरकार लाभले आहे .
लोकांनीच आपल्या मानगुटीवर असे हुशार सरकार बसवले आहे.

सुबोध खरे's picture

17 Jun 2022 - 10:11 am | सुबोध खरे

लष्करात short service commission नावाची योजना वाचली का ?

का नुसते जिकडे तिकडे पो टाकत फिरताय?

स्वधर्म's picture

17 Jun 2022 - 12:01 pm | स्वधर्म

सध्याची short service commission अंतर्गत नियुक्ती कमीत कमी १० वर्षांची असून त्या आणखी चार वर्षांची वाढ करता येते. तसेच या योजनेअंतर्गत सैनिकांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळतात. त्याची ‘अग्निदिव्य’ योजनेशी तुलना होऊ शकत नाही. उगीच काहीच्या काही समर्थन कशाला?

सुबोध खरे's picture

18 Jun 2022 - 11:55 pm | सुबोध खरे

@स्वधर्म

कचरेबुवांच्या नादाला लागून तुम्ही पण धड न वाचता प्रतिसाद द्यायला लागलात ?

वर मी अगोदर ५ वर्षे असलेले शॉर्ट सर्व्हिस असेस्पष्टपणे लिहिलेले आहे ते निदान नीट वाचायचे तरी

सुबोध खरे's picture

18 Jun 2022 - 11:56 pm | सुबोध खरे

आणि आता सुद्धा असलेल्या १० + ४ योजनेत निवृत्तीवेतन नाही

स्वधर्म's picture

20 Jun 2022 - 2:25 pm | स्वधर्म

अधिक वाचन केले. १० + ४ योजनेत निवृत्तीवेतन नाही, हे बरोबर आहे. त्या योजनेत काम केलेले काही लोकही 'चूक केली' असे म्हणत आहेत.
There are scores of other things hence it's not worthwhile to join armed forces as SSC officer and serve as a second class citizen. Join as permanent commision or do not join at all. संदर्भः https://www.quora.com/What-are-the-benefits-that-a-Short-Service-Commiss...

कारण ३१-३२ व्या वर्षी निवृत्तीवेतन नाही आणि खाजगी नोकरीतही संघर्ष, स्पर्धा वगैरे. तर मगा ४ वर्षांच्या अग्निपथ योजनेची भलावण का? हा मूळ प्रश्न आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2022 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखाद्या माणसाच्या हाताचा गुणच असा असतो की ज्याला हात लावतील त्याची माती करतील. असंच, आपल्या पदरी पडलेलं सॉरी आपल्याला लाभलेलं एक व्यक्तीमत्व म्हणजे पंतप्रधान मोदी. सरकारी कंपन्या विकल्या, लशीकरणाच्या नावावर थाळ्या टाळ्याचा शिमगा केला. आजरात्री आठवाजेपासून सगळं अचानक बंद करुन असंख्य भारतीयांचा जीवन-मरणाचा खेळ केला. नोटबंदी, जीएसटीने वाटोळं केलं. पेट्रोल-डिझेलची नसबंदी करुन अव्वाच्या सव्वा लुटमार सुरु केली. भारतीयांच्या रोजगारी- बेरोजगारीचे हाल केले. महागाईला दम नाही. सरकारी नौक-या घालवल्या, खासगी नौकरी करणा-यांची वाताहात केली आणि कृषीकायद्याच्या निमित्ताने माघार घ्यावी लागली. नूपुर शर्माच्या निमित्ताने जगभर नाचक्की झाली. आता या विश्वगुरुंची नजर सैन्य दलावर पडली, आता त्यांची नजर सैन्यदलावर पडली. आता त्याची माती करणे बाकी आहे.

सैन्यभरतीसाठी जाहीर झालेली सरकारची अग्नीपथ योजना. सैन्यदलात भरती करुन चार वर्षात त्यांचं काम झालं की त्यांना 'अग्नीवीर' पुरस्कार देऊन कंडोमप्रमाणे फेकून द्यायची ही अग्नीपथ नावाची केंद्रसरकार योजना. मुळात यांच्याकडे मेंदू नावाची व्यवस्थाच नसल्यामुळे अशा एकेक मातीत घालणा-या योजना सुचत असतात. सध्या आठ राज्यांमधे उत्तरप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, मध्यप्रदेश, हिमाचल आणि हरयानात सध्या तरुण रस्त्यावर उतरून अग्नीपथ योजनेला निदर्शने करुन, तीव आंदोलन करुन विरोध करीत आहेत. एकदा कृषीकायद्यावर लाज-लज्जा गेल्यानंतर या निर्णयातही सरकार माती खाण्याची चिन्ह दिसत आहे. सरकारला नेहमीप्रमाणे उशीरा अक्कल आल्यानंतर त्यांनी काल सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. शंका आणि वस्तूस्थितीचं एक पत्रक काल काढावे लागले. चार वर्षानंतर या अग्नीवीरांना लष्करी सेवेनंतर काय काय मिळेल त्याची लाडीगोडीचं निमंत्रण द्यावे लागले. व्यवसाय करायचा असल्यास वित्तीय सहाय्य दिले जाईल, बँक कर्ज दिले जाईल, ज्यांना नौकरी करायची त्यांना केंद्रीय सशस्त्र दलात प्राध्यान्य दिले जाईल वगैरे. अरे पण एक चांगली व्यवस्था सुरु होती. तिचं वाटोळं करायचं सांगितलं कोणी तुम्हाला ? लुटमार करुन येणा-या पैशातून सल्लागार तर नीट ठेवाम्हणावं.

बाकी, मुळात कोणतीही एक चांगली व्यवस्था मोडकळीस कशी आणायची हे सरकारकडून शिकलं पाहिजे. अंध अनुयायी लोक, सरकार जे काही सांगत नाहीत ते आयटीसेलच्या माध्यमातून वाट्सॅप आणि इतर सोशीयल मिडियावर सांगत आहे. बाकी सरकार निवडून दिलंय, फळ तर भोगावीच लागतील. सर्वांना अच्छे दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. :)

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

17 Jun 2022 - 10:36 am | सुबोध खरे

बिरुटे सर

तुमच्या द्वेषाची पातळी इतकी खाली जाईल असे वाटले नव्हते

असो.

आपले भले होवो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2022 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> आपले भले होवो.

सेम टू यू डियर डॉ.अंकल.

-दिलीप बिरुटे