ताज्या घडामोडी जून २०२२

निनाद's picture
निनाद in राजकारण
1 Jun 2022 - 7:05 am

मूर्तीची तोडफोड का?

अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.

कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.

प्रतिक्रिया

काड्यासारू आगलावे's picture

2 Jun 2022 - 3:16 pm | काड्यासारू आगलावे

आजपासून हार्दिक पटेल देशभक्त.

*मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश*
https://pudhari.news/national/216205/i-am-modis-junior-soldier-hardik-pa...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Jun 2022 - 3:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तुमच्या त्या डिजिटल विश्वात बातम्या/पेजेस गायब करण्याची व्यवस्था आहे का ? अन्यथा ह्या असल्या जुन्या बातम्यांचे काय करायचे?
१)"मोदी केवळ जाहीरातबाजी करतात". हार्दिक पटेल
२)मोदी मुख्य मुद्द्यांपासुन दूर जातात. विकासाच्या नावावर खोटा प्रचार करतात" हार्दिक पटेल
https://www.ndtv.com/india-news/hardik-patel-says-pm-narendra-modi-runni...

काड्यासारू आगलावे's picture

2 Jun 2022 - 5:52 pm | काड्यासारू आगलावे

कश्मीरी पंडीतांचा केंद्र सरकारला अल्टिमेटम.
https://www.bhaskar.com/amp/national/news/kashmiri-pandit-teacher-rajni-...

कश्मिर फाईल्स पाहून गळे काढनारे कुठे गेले?? की २०५० मध्ये सिनेमा बनवण्यासाठी आता मोदी सरकार स्क्रिप्ट तयार करतंय?

मदनबाण's picture

2 Jun 2022 - 7:03 pm | मदनबाण

आधी शाळेतील शिक्षिका आणि आता बॅंक कर्मचारी ठार केला गेला आहे.
P1

जाता जाता :- उध्या सम्राट पृथ्वीराज रिलीज होतोय... असे समजण्यात आले की या चित्रपटाच्या यशासाठी तो अजमेरला मोइनुद्दीन हसन चिश्ती च्या मजारीवर चादर चढवुन आला, हा तोच मोइनुद्दीन हसन चिश्ती आहे ज्याने पृथ्वीराज यांचा पराभव व्हावा म्हणुन घोरीला आशिर्वाद दिला होता. मोदींनी देखील अशीच चादर देऊन हा अपराध केलेला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tadap Tadap Ke Is Dil Se - MTV Unplugged (Full Song) - K K

श्रीगुरुजी's picture

2 Jun 2022 - 7:15 pm | श्रीगुरुजी

अशी चादर देऊन हिंदूंना नक्की काय मिळते ते समजत नाही. ६-७ वर्षांपूर्वी आयपीएल मध्ये कोहली अपयशी ठरत होता. तेव्हा तो सुद्धा चादर देऊन आला होता. परंतु त्यानंतरही त्या वर्षी कोहलीची कामगिरी वाईटच राहिली होती. वाजपेयींनी सुद्धा २००७ मध्ये चादर पाठविली होती. परंतु २००९ मध्ये भाजपची कामगिरी अजून घसरली होती आणि वाजपेयींच्या प्रकृतीच्या तक्रारी सुद्धा वाढल्या होत्या.

आग्या१९९०'s picture

2 Jun 2022 - 7:31 pm | आग्या१९९०

चादरी देऊन यश मिळेल आणि हिंदुत्ववादी सरकार आले की देशाच्या सर्व समस्या दूर होतील ह्या अंधश्रद्धा आहे हो!

प्रसाद_१९८२'s picture

2 Jun 2022 - 8:09 pm | प्रसाद_१९८२

असल्याचे सर्टीफिकेट.

१)राज ठाकरे ना श्री रामाचे दर्शन घेण्यास हिंदू वादी पक्षाने च केलेला विरोध .
ह्याचा अर्थ हिंदुत्व खुर्ची साठी ,सत्तेसाठी वापरले जात आहे.
२) श्री हनुमान जी चा जन्म कुठे झाला ह्यावर
चर्चा करताना साधू संतात घडलेले mike फेकून मारण्याचे कृत्य..
आपले वर्चस्व अबाधित राहवे हीच वृत्ती ह्या मधून दिसून आली धर्म प्रेम नाही.
३) महाराष्ट्र ,बंगाल मध्ये काही ही घडले की CBI लगेच हजर .
राज्याच्या पोलिस ना ओव्हरटेक करण्यात पुढे.
पण काश्मीर मध्ये आता पंडितांची हत्या अतिरेकी करत आहेत
पण सीबीआय काश्मीर मध्ये जावून त्या अतिरेक्यांना पकडायला जात नाही.
Ed, किंवा Ncb कश्मिर मध्ये जावून
काही कारवाई करत नाही.
money
लाऊंड्रिंग ची चोकशी ed करत नाही
ना Ncb तिथे जावून ड्रग माफिया वर कारवाई करत.अतिरेकी कामासाठी ड्रग मधून किंवा आर्थिक घोटाळ्यातील च पैसा वापरला जात असेल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tadap Tadap Ke Is Dil Se - MTV Unplugged (Full Song) - K K

काश्मीर मध्ये हिंदू ना गोळ्या घालून ठार केले जात आहे.
Cbi भारत सरकार पोसत असलेली यंत्रणा काश्मीर मध्ये पूर्ण शक्ती लावत नाहीं
Ncb चे. अतिशय शूर कागदी वाघ काश्मीर मध्ये जात नाहीत
हिंदू चे वाघ,सिंह,असणारे हिंदू वादी पक्षाचे ससे
काश्मीर मध्ये जावून तळ ठोकत नाहीत.
ब्रीज भूषण हा ससा,फडणवीस,येथील हिंदू वाघ ,सिंह कोणी तिथे जात नाही.
स्वतः प्रधान मंत्री आणि गृह मंत्री त्यांचे office श्री नगर लं शिफ्ट करत नाहीत.
काश्मीर भारताच्या ताब्यात आहे तरी भारत सरकार ल फाट्यावर मारून तिथे हत्याकांड होत असतील तर भारत सरकार खूप कमजोर आहे

या न्यायाने, तुमची बडबड चालवून घेणारं मिपा प्रशासन पण खूप कमजोर आहे असं म्हणायला हवं!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2022 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेल्या महिनाभरात काश्मिरी खो-यात जे घडत आहे ते दुर्दैवी आहे. गेल्या बावीस दिवसात नऊ जणांचे प्राण गेले तर पंधरापेक्षा अधिक जखमी झाले आहेत. नुकत्याच एका शिक्षिकेचा आणि बँक मॅनेजरच्या हत्तेने हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपल्या हातात काही नाही. काश्मिरी खो-यातून अनेकांनी आपली घरे दारे सोडली आहेत. गृहमंत्री आणि सुरक्षा सल्लागारांच्या बैठका सुरु आहेत. काश्मिरी फाईल्स पाहुन पेटून उठणारे दुर्दैवाने सध्या गप्प बसलेले आहेत. सरकार कडक भूमिका घेईल, अतिरेकी संघटना आणि देशविघातक शक्तींचा सरकार योग्य बंदोबस्त करील, एक आशादायक वातावरण पुन्हा खो-यात निर्माण होईल अशी अपेक्षा.

-दिलीप बिरुटे

काड्यासारू आगलावे's picture

3 Jun 2022 - 11:16 pm | काड्यासारू आगलावे

परिस्थिती नियंत्रणाबाहेर? १८०० काश्मिरी पंडितांचे स्थलांतर; ३ हजार कर्मचारी जम्मूत दाखल.

https://www.lokmat.com/national/kashmiri-pandits-decide-to-collectively-...
आता काॅंग्रेस विरूध्द बोंबलायचीही सोय नाही.

आग्या१९९०'s picture

4 Jun 2022 - 6:31 am | आग्या१९९०

पूर्वी आर्थिक दुर्बल मारले जायचे,आता ती झळ वरच्या वर्गाला लागल्याने धार्मिक ध्रुवीकरण अंगाशी येऊ लागले हे सुस्त सरकारला जाणवले व हालचाली सुरू झाल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2022 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता काॅंग्रेस विरूध्द बोंबलायचीही सोय नाही.

अहो, काड्यासारू. काड्या सारु नका आणि आगी लाऊ नका. :) ( ह.घ्या)

काँग्रेसबद्दल काहीच बोलू नका, त्यांचा पार्ट संपला. ”घराणेशाही असलेला पक्ष माझ्या विरोधात एकत्र येत आहेत. त्यांच्याशी वैयक्तीक भांडण नाही हे मी त्यांना सांगू इच्छितो. देशात मला मजबूत विरोधी पक्ष हवा आहे. घराणेशाही घेरलेल्या पक्षांनी त्यातून बाहेर पडावे आणि लोकशाही मजबूत करावी” इति @ शेठ उवाच. (मटा. दि.४.६.२०२२.)

अहो, शेठ. विरोधी पक्षाच्या मागे चौकशा लावायच्या. विरोधी पक्ष नामशेष करण्याचे जे जे 'असत्याचे प्रयोग' असतात ते ते आपण मनापासून आणि निष्ठेने करीत आहात, त्यात सध्या तरी कोणतीही कसर दिसत नाही. पक्ष नेत्यांचे चारित्र्य हनन, पक्ष बदनाम्या. खोट्या-नाट्या बातम्या पसरविणे यात सध्या आपल्या पक्षाचा आणि त्याबाबत 'दक्ष' असणा-यांचा हात कोणी धरु शकणार नाही. कोणत्या तरी विरोधी पक्षाला समर्थपणे उभे राहण्यासाठी अजून काही काळ जाऊ द्याव लागणार आहे. आपलं कर्तुत्वच विरोधीपक्षांना ताकद देईल. बाकी, विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे वगैरे या बाता आपल्या तोंडून ब-या दिसत नाहीत. विरोधी पक्ष जाऊ द्या खड्ड्यातया. सध्या काश्मिरी जनतेवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल सरकार काय करते, ते आम्हा भारतीयांना नका कळू देऊ. पण आपल्या ’माष्टर ष्ट्रोकद्वारे’ एक आशादायी चित्र काश्मिरी खो-यात दिसू दे, एवढीच माफ़क आणि प्रामाणिक अपेक्षा.

-दिलीप बिरुटे
(शेठच्या माष्टर ष्ट्रोकचा फॅन) :)

काश्मिरी पंडित नी स्वतः लढा द्यायला पण शिकले पाहिजे.काही झाले की केले स्थलांतर हा पळपुटा पना आहे..
सरकार कडे त्यांनी कधी अती उच्च दर्जा ची हत्यार पुरावा.आम्ही आमची लढाई लढू.
अशी मागणी केली नाही

पंडितांनी पण संघटित होवून अतिरेकी लोकांचा विरोध केला पाहिजे.सरकार सर्व मदत करेल च.
पण नाही काही झाले की भरली bag चालले जम्मू किंवा दिल्ली कडे.

काश्मिरी पंडित नी स्वतः लढा द्यायला पण शिकले पाहिजे.काही झाले की केले स्थलांतर हा पळपुटा पना आहे..
सरकार कडे त्यांनी कधी अती उच्च दर्जा ची हत्यार पुरावा.आम्ही आमची लढाई लढू.
अशी मागणी केली नाही

पंडितांनी पण संघटित होवून अतिरेकी लोकांचा विरोध केला पाहिजे.सरकार सर्व मदत करेल च.
पण नाही काही झाले की भरली bag चालले जम्मू किंवा दिल्ली कडे.

रात्रीचे चांदणे's picture

4 Jun 2022 - 7:32 am | रात्रीचे चांदणे

भाजप सत्तेत असल्यामुळे भाजपला याचे उत्तर द्यावेच लागेल, नेहमीप्रमाणे काँग्रेसवर किंवा पाकिस्तानवर ढकलून चालणार नाही.
पण एक गोष्ट नक्की आहे मुस्लिम लोकांना दुसऱ्या धर्माचे लोक चालतच नाहीत, काहितरी कारण सांगून सतत हिंसा करत राहणे हाच एकमेव मार्ग त्यांना माहिती आहे. काल कानपूर मध्येही नामजानंतर अशीच दगडफेक पोलिसांवर करण्यात आली.

आग्या१९९०'s picture

4 Jun 2022 - 9:34 pm | आग्या१९९०

भिवंडीत दंगली कधीपासून थांबल्या? त्यासाठी काय प्रयत्न केले गेले? हे एकदा अभ्यासा. धार्मिक एकोप्यासाठी केंद्र सरकार गंभीरतेने प्रयत्न करत आहे का? असेल तर काय प्रयत्न केले गेले?

काड्यासारू आगलावे's picture

4 Jun 2022 - 7:54 am | काड्यासारू आगलावे

*संघ भाजपाच्या लोकांची खानदानी ईमानदारी*...

विरुद्ध

*नेहरू घराण्याचा महाभ्रष्टाचार(?)*

___________________________

#भ्रष्टाचारी_नक्की_कोण...?

...मेंदू नावाचा अवयव वापरून थोडा सारासार विचार तर कराल?

म्हणजे बघा ना...

*नितीन गडकरी, लुना वरून पिग्मी गोळा करत फिरत होते म्हणतात! पण आज त्यांची वौयक्तिक संपत्ती शेकडो कोटी रुपयांच्या घरात आहेच ना...?*

*देवेंद्र फडणीस यांच्या वडिलांचा राजवाडा नव्हता... अतिशय काष्टातुन त्यांचं नेतृत्व वर आलंय म्हणतात! मग आज त्यांची सांपत्तिक समृद्धता इतकी मोठी कशी?*

*चंद्रकांत दादांचे वडील तर गिरणी कामगार होते म्हणे...*

*अन मुंबईचे आशिष शेलार यांचे वडील कोकणातून मुंबईला नोकरीला आले होते म्हणतात...!*

*पियुष गोयल चे वडील... "आडवाणी-वाजपेयींचा वाढदिवस आहे.. चंदा द्या.." म्हणत, हिंद माता मधल्या कापड व्यापाऱ्यांकडून शंभर दोनशे रुपये गोळा करत होते! तरी आज गोयल यांची सांपत्तिक स्थिती कोणीही पाहावी... वास्तव काय?*

*गोपीनाथ मुंडे यांचे वडील ऊस तोडणी ला जात होते म्हणतात... अन मुंढे साहेबानी तर अख्खे आयुष्य राजकीय जीवनात व्यतीत केलं! मग ...???*

*प्रमोद महाजन यांचे वडील मास्तरकि करत होते! आज त्या घराण्याची संपत्ती मोजलीत कधी??*

.

.

.

.

*...पण, ज्या राहुल गांधी च्या पणजोबाचं, 1920 साली उत्पन्न महिना 25 हजारच्या घरात होते... त्यांच्या आजोबा, पणजोबांनी स्वतःच्या 200 कोटी मालमत्तेतील अंदाजे तब्बल 196 कोटी म्हणजेच एकूण संपत्तीच्या 98% मालमत्ता "तेव्हाच्या काळात" या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दान केली...जीची आजची किंमत मोजणं केवळ अशक्य! ...तुरुंगवास भोगले...!*

*...इतकंच नाही, तर, इंदिरा, राजीव यांच्या रूपाने 2 बलिदान दिली... त्या राहुल गांधीवर मात्र भ्रष्टाचारचे आरोप होतात...अन आंधळे लोक त्यावर विश्वास पण ठेवतात?*

*...मग या भाजपवाल्या सगळ्यांचे आजचे जे वाडे बंगले मोटारी आहेत, ते महाराष्ट्र राज्य लॉटरी लागल्याने, का मटका लागल्याने मिळाले?*

(एक फेसबुक वरून आलेली पोस्ट.. साभार from Gopal Upadye)

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2022 - 10:14 am | श्रीगुरुजी

नजीकच्या भविष्यकाळात काश्मीरमध्ये मोठी लष्करी कारवाई होईल असा माझा अंदाज आहे.

दिवा विझताना मोठा होतो तसेच काश्मीरमध्ये अचानक हत्यासत्र सुरू झाले आहे. सरकार गेले, ३७० वे कलम गेले, राज्याचे विभाजन झाले, यासीन मलिक बरेच दिवस तुरूंगात पडतोय, हुरियत कॉन्फरन्सचा प्रभाव संपला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिरेक्यांचा शस्त्रे व आर्थिक मदतीचा सर्वात मोठा पुरवठादार पाकिस्तान अत्यंत वाईट अवस्थेत गेलाय. काश्मीर ् मधील दहशतवाद संपविण्याचे व पंडितांना परत आणण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न यशस्वी होताना दिसताहेत. त्या नैराश्यातून व हतबलतेतून काश्मीरमधील उरल्यासुरल्या अतिरेक्यांनी शेवटचा उपाय म्हणून हत्याकांड सुरू केले आहे. त्यांच्यावर आता शेवटचा निर्णायक घाव बसण्याची वेळ अगदी जवळ आली आहे.

पुलवामा हत्याकांडानंतर भारतातील निधर्मांध आनंदाने बेभान होऊन विजयोत्सव साजरा करीत होते कारण त्यामुळे मोदी अडचणीत क्षाले होते. How is the Jaish अशा कुत्सित प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. आताही तसेच सुरू झाले आहे. बालाकोट कारवाईने सर्व निधर्माधांना जोरदार थोबाडीत बसली. आताही तसेच होणार आहे आणि हा घाव निर्णायक असेल.

डँबिस००७'s picture

4 Jun 2022 - 11:30 am | डँबिस००७

१०००००% सहमत !!

काश्मिरचा विकास होतोय. काश्मीरला पर्यटकांचा ओघ वाढत आहे. ह्या सिझन मध्ये हॉटेलची एक रुम रु. ६०,०००/रात्र अश्या विक्रमी कींमतीत गेलेली होती.

पण त्याच बरोबर हुरीयत संपली आहे. यूएई सारख्या देशाने केलेल्या गुंतवणीकी विरुद्ध अतीरेकी कारवाया पाकीस्तानला करता येणार नाहीत.

काड्यासारू आगलावे's picture

4 Jun 2022 - 12:07 pm | काड्यासारू आगलावे

गुरूजी ह्या असल्या थापा ८ वर्षापासून मारल्या जाताहेत. अमूक होनार आहे ढमूक होनार आहे. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. ह्या अश्या थापा भाऊंच्या करमनूत प्रधान तुनळी चॅनलवरच शोभतात.

आग्या१९९०'s picture

4 Jun 2022 - 10:26 am | आग्या१९९०

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, स्मार्ट सिटी, २०२४ पर्यंत ५ ट्रिलियनची इकॉनॉमी सारखी फसलेली मुंगेरेलालची स्वप्ने. पंडित फ्री काश्मिर मात्र नक्कीच करणार.

डँबिस००७'s picture

4 Jun 2022 - 12:01 pm | डँबिस००७

With a GDP of $3.1 trillion, India is the world's sixth-largest economy. The country has one of the highest GDP growth rates in the world. India's GDP will likely grow by 8-8.5% in FY22, according to the 2021-22 Economic Survey.09-Feb-2022

India's GDP grew by 4.1% in the fourth quarter of FY22. Meanwhile, the overall growth recorded for the financial year 2021-22 is estimated at 8.7% as against the contraction of 6.6% in FY21. The estimate of 8.7% for FY22 is the highest in 22 years in terms of back series data.

India's economic growth estimated at 8.7% in FY22, Q4 GDP slows to 4.1%

१० जूनला होणार्‍या राज्यसभा निवडणुकांमध्ये मतदानात फाटाफूट व्हायला नको म्हणून महा(भ)विकास आघाडीने आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेले आहे. राजस्थानातही काँग्रेसचे आमदार त्याच कारणाने उदयपूरच्या पंचतारांकित हॉटेलात तीन-चार दिवस राहणार आहेत.

फाटाफूट व्हायला नको म्हणून अशा कुठल्यातरी हॉटेलात नेणे हा प्रकार त्यामानाने कालबाह्य झाला आहे असे वाटते. १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी केशुभाई पटेलांविरोधात बंड केले होते तेव्हा त्यांचे सगळे आमदार खजुराहोला असे एका रिसॉर्टमध्ये राहिले होते. पण त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. आताच्या काळात एखाद्या माणसाशी संपर्क साधायची कित्येक माध्यमे उपलब्ध असताना दुसर्‍या पक्षातील लोकांमध्ये फाटाफूट करायला त्या माणसाला भेटायलाच पाहिजे असे अजिबात नाही. तसेच अशी फाटाफूट व्ह्यायची असेल तर ती मतदानाच्या दोन-तीन दिवस आधीच होते का? ती आधी पण होऊ शकते. मग आपल्या आमदारांना असे किती दिवस हॉटेलात नेऊन ठेवणार? आणि त्यांचे मोबाईल फोन काढून घेणार की त्यांच्याबरोबरच ठेवणार?

काड्यासारू आगलावे's picture

4 Jun 2022 - 12:33 pm | काड्यासारू आगलावे

भामटे बॅंकेतील अतिसुरक्षीत तिजोरीही फोडतात. म्हणून आपण आपल्या घरातील दागीने ऊघडे ठेवत नाही. हा प्रकारही तसाच आहे. भामटे चोरी करनारच, होईल तेवढी सुरक्षा करणे आपले कर्तव्य.

sunil kachure's picture

4 Jun 2022 - 2:33 pm | sunil kachure

तुर्की नी गव्हाची टंचाई असून पण भारतीय गहू परत पाठवला.
आता अशी बातमी वाचली आहे की भारतीय चहा पण अनेक देशांनी परत पाठवला कारण त्या मध्ये कीटक नाशकांची मात्र जास्त आहे.

हापूस आंब्याची अवस्था भारतीय लोकांनी काय केली आहे ते समोर च आहे.
त्या फळाची मूळ चव च गायब झाली आहे.
देशात जी संस्था दर्जा नियंत्रण आणि भेसळ,किंवा बाकी घातक घटक आहेत की नाही ह्याची तपासणी करते ती यंत्रणा तिचे काम योग्य रित्या करत नाही..असेच बाकी देश भारताचे सामान ,अन्न धान्य परत पाठवायला लागले तर अगोदर च एक्सपोर्ट मध्ये पण कमजोर आहे अजून कमजोर होवू.

रात्रीचे चांदणे's picture

4 Jun 2022 - 6:53 pm | रात्रीचे चांदणे

https://www.loksatta.com/pune/indian-mangoes-shipped-to-us-for-first-tim...

भारतीय आंबा प्रथमच समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना, साडेसोळा टन आंब्यांची निर्यात

पुणे: भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शुक्रवारी (ता.3) प्रथमच भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेला पाठवले आहेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले.

डँबिस००७'s picture

4 Jun 2022 - 7:28 pm | डँबिस००७

In a major boost to agricultural products exports, First consignment of Ladakh Apricot exported to Dubai
, 2nd September 2021

In a move which could boost agricultural and food products exports from Ladakh, first commercial shipment of Apricot sourced from region of Union Territory (UT) of Ladakh has been exported to Dubai.

The consignment of Apricot was transhipped from Leh, Ladakh to Mumbai prior to being exported to Dubai. APEDA has been working to establish an export value chain for Ladakh Apricot in association with an importer Group based in Dubai. The shipment was exported by APEDA registered Exporter from Mumbai.

Ladakh Apricots have a unique soothing taste and texture with high sugar contents and total soluble solids. UT of Ladakh produces several varieties of Apricots out of which four to five varieties are taken up for commercial cultivation and export opportunities exist for these varieties.
लडाखच्या जर्दाळुची चव भारतालाच माहीती नव्हती तो आता जगातल्या मोठ्या बाजारपेठेत उपलब्ध होतोय.

तुर्कीने भारताच्या गव्हाची खेप रिजेक्ट केली आणी त्यात भारत सरकारची हार आहे असा कांगावा लोक करत आहेत. मूळात भारत सरकारने अशी कोणतीही डील केलेली नव्हती. जी शिपमेँट टर्कीला पोहोचली ती मुळात नेदरलँड्सला, ITC ह्या कंपनीने पाठवली होती, ती तुर्किला कोणी वळवली ह्याचा शोध भारत सरकार करत आहे.

sunil kachure's picture

4 Jun 2022 - 8:07 pm | sunil kachure

जरदाळू आणि आंबे ह्याची पोस्ट का चिकटवले आहेत इथे..
आंबे तर 16 टन च आहेत..म्हणजे तसे किरकोळ च.

गहू आणि चहा का reject करून परत पाठवला ..त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे.
उगाच काही तरी चिल्लर उदाहरणे देवून प्रसंगाचे गांभीर्य कमी होत नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jun 2022 - 9:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सुनिल, दोन्ही देशांचे राजदूत आंब्यांवर ताव मारत आहेत. आपण कशाला एवढे टेन्शन घ्यायचे?
mango
https://timesofindia.indiatimes.com/world/us/indian-mangoes-return-to-am...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jun 2022 - 9:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याने चहा परत आला.
Both international and domestic buyers have rejected a series of tea consignments due to the presence of pesticides and chemicals beyond permissible limits, Indian Tea Exporters Association (ITEA) chairman Anshuman Kanoria said on Friday
https://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/high-in-pe...
हापूस आंबा मात्र स्वस्त दरात मिळायला लागला त्याची कारणे नक्की माहित नाहीत. ३०० रुपये डझन मिळत होता गेल्या आठवड्यात

sunil kachure's picture

4 Jun 2022 - 10:35 pm | sunil kachure

दुसरे देश गहू,चहा सारख्या वस्तू परत पाठवत आहेत कारण त्या योग्य दर्जा च्या नाहीत.
हा गंभीर प्रकार आहे
जागतिक पातळीवर देशाचे नाव खराब होत च आहे.
जपान ची इलेक्ट्रॉनिक वस्तू असली लोक डोळे झाकून घेत होते.कारण त्यांनी दर्जा राखला होता.
चहा,आणि गहू परत आला कारण त्या मध्ये कीटक नाशकाचे प्रमाण जास्त आहे म्हणजे मानवी शरीरास हानिकारक आहे.
तोच गहू,चहा भारतीय लोक वापरत आहेत म्हणजे भारतातील लोकांना पण चुकीचे अन्न खावे लागत आहेत.
भारतीय बाजारात पण भारतीय उत्पादनाची चाचणी होणे गरजेचे आहे.
दूध खात्री नी शुध्द असेल काही खात्री नाही.
बटर शुध्द असेल की पाम तेला पासून बनवले आहे काही खात्री नाही.
मिरची पावडर मध्ये लाकडाचा भुस्सा आहे की ती शुध्द आहे काही खात्री नाही.
तूर डाळ मध्ये पण बंदी असलेली खासरी(नक्की नाव माहीत नाही यूपी,बिहार,mp मध्ये ही तूर डाळी सारखी दिसणारी च डाळ असते)मिक्स असण्याची शक्यता जास्त
.हापूस आंबा म्हणून कोणता ही आंबा सर्रास विकला जातो.
हापूस आंबा योग्य रित्या पिकवला जात नाहीं

खात्री नी योग्य रीती नी पिकवला गेलेला हापूस मिळणे भारतात पण अवघड जाते.
सरकार नी अशा गोष्टी वर कठोर नियंत्रण ठेवलेच पाहिजे.

सुक्या's picture

5 Jun 2022 - 2:40 am | सुक्या

गेल्या १५-१६ वर्षांत आमच्या कडे (आम्रविका पश्चिम किनारपट्टी) बहुदा ३ ते ४ वेळाच आंबे खाल्ले आहेत. बहुतांश वेळा भारतातुन आलेला आंबा पुर्व किनारपट्टी ला येत असे व तिथेच संंपत असे. कॉस्ट्को सारख्या महाकाय दुकानांनी पण भारतीय आंबे (हापुस) आयात केली होते पण ते पश्चिम किनारपट्टी ला पोहोचलेच नाहीत. शेवटी काही लोकांनी पुढाकार घेउन एक कंटेनर मागवला पण त्यातही बरेच आंबे खराब निघाले. तेव्हापासुन मेक्सिको चे पाणचट आंबे खाउन ताकावर तहान भागवत होतो.

या वर्षी मात्र भारतीय आंबे (हापुस , पायरी, लंगडा, बांगन पल्ली वगेरे) मुबलक प्रमाणात उपलब्द्ब आहेत. त्यांचा खप ही उत्तम आहे. म्हणजे दुकानात आलेला आंबा (१ ते २ पॅलेट) एका दिवसात संपतो. दर्जा सुद्धा उत्तम आहे. ठाणे ईथली केबी एक्सपोर्ट ही संस्था कतार एयरवे मार्गे गेल्या २ महिण्यांपासुन हा बिझिनेस करते आहे. आता तर बरेच अमेरिकन ज्यांना मेक्सिको चे आंबे खायची सवय होती ते पण दर बुधवारी भारतीय मालाच्या दुकानात आंबे घ्यायला दिसतात. माझ्या मते महिन्याला १० - १२ टन आंबा सिअ‍ॅटल भागातच खपत असेल.

माझे सांगायचे तर हापुस आंबा मी जवळ्पास ४ वर्षांनी मनसोक्त खाल्ला. ह्या एक्सपोर्ट चा फायदा भारतिय शेतकर्‍यांना मिळाला असेल अशी आशा आहे. बार्क चे प्रयत्न ही यात उल्लेखणीय आहेत.

काड्यासारू आगलावे's picture

5 Jun 2022 - 11:00 am | काड्यासारू आगलावे

संघाने हिंदूरक्षणार्थ आपले कोट्यवधी स्वयंसेवक काश्मीरमध्ये नेमावेत! कुणाची टाप आहे गोळ्या घालायची?

https://www.aksharnama.com/client/article_detail/6088

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Jun 2022 - 3:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काडुसार्या,
माजी कमीशनर रिबेलो ह्यानी "माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनीनो ' अशी भाषणाची सुरुवात करणार्या हिंदुह्रुदयसम्राटांना विनंती केली होती की काही शिवसैनिक कश्मीरमध्ये पाठवावेत. मोफत ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एकही शिवसैनिक फिरकला नाही रिबेलोंकडे.(१९९०-९१ ची गोष्ट आहे ही) मुंबईत मात्र अमचे शिवसैनिक 'पाकिस्तान मुर्दाबाद'म्हणत पाकिस्तानची प्रतिक्रुती जाळायचे.
सध्याचे नव-हिंदुह्रुदयसम्राट राज ठाकरे ह्यांनाही अशी विनंती करता येईल.

काड्यासारू आगलावे's picture

5 Jun 2022 - 4:05 pm | काड्यासारू आगलावे

काही पुरावा आहे का माई?? की आय टी सेलची ढकलगाडी? बाकी ३ दिवसातं तयार होनार्या आर्मी बद्दल स्वत: भागवतच बोलले होते.

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2022 - 5:02 pm | श्रीगुरुजी

यांचे एक नेते सांगायचे की "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा. चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवितो.". यांचे काश्मीर प्रश्न सोडविण्याचे धोरण म्हणजे पाकिस्तानवर एक अणुबॉम्ब टाकून दिला की सुटला प्रश्न. हे स्वतः घरातून बाहेर न पडता चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडविणार होते.

काड्यासारू आगलावे's picture

5 Jun 2022 - 5:11 pm | काड्यासारू आगलावे

चिनचा हल्ला झेलायला आपली ५६ ईंच छाती आहे वगैरे सांगनारे आज चिनचं नाव घ्यायला ही घाबरतात. ह्यांच्या कडून कश्मिरप्रश्न सोडवण्याची अपेक्षा करनार्याना ७ तोफांची सलामी द्यायला हवी.

देश स्वतंत्र झाला तेव्हा खुप भारत अनेक समस्या नी ग्रस्त होता.
दोन तुकडे झाले च होते.
हिंदू मुस्लिम संघर्ष चालू होता.
गरिबी प्रचंड होती.
राज्य ,वतनदार,जहागीरदार ह्यांचे वेगळेच काही चालले होते.

अशा अनेक गंभीर समस्या देशासमोर असून पण देशाला योग्य दिशा दिली गेली, जहागिरी दार,वतनदार,राज्यातील समस्या शांत डोक्याने सोडवल्या गेल्या
एक संघ भारत राखला गेला
अनेक महत्वाच्या संस्था काहीच वर्षात उभ्या केल्या गेल्या..
एक उत्तम राज्य घटना निर्माण केली गेली..

तेव्हाचे नेते खरेच खुप ग्रेट होते.
आता अनेक positive points असून पण आताच्या नेत्यांना ना राजकीय समस्या सोडवता येत.
ना पर राष्ट्र धोरण नीट ठरवता येत.
फक्त एक दुसऱ्या वर आरोप करणे हे एकमेव काम फक्त उत्तम रीत्या येते.
काश्मीर वर भारत सरकार ची सत्ता आहे आता 370 पण नाही.
भारत सरकार लं कश्मिर मधील कायदा सुव्यवस्था पण इतके सर्व असून राखता येत नसेल तर अवघड आहे

आता जनतेने च तिथे जावून शस्त्र हातात घेवून अतिरेकी लोकांशी लढावे ही अपेक्षा असेल.
तर सरकार काय करणार.
काहीच करणार नसेल तर सरकार हवं च कशाला.
लोक सोडवतील प्रश्न.

काड्यासारू आगलावे's picture

5 Jun 2022 - 9:03 pm | काड्यासारू आगलावे

पैगबरावर टिपण्णी केली म्हणून भाजप प्रवत्ता सस्पेंड.

https://www.aajtak.in/amp/india/politics/story/bjp-spokesperson-nupur-sh...

युरोपिअन विषयावर असंबद्ध बडबड करून IT सेल द्वारे आपल्याला जणू आधुनिक हेन्री किंसिग्नर बतावणारे श्री जयशंकर आणि त्यांचे धनी माप्रमंश्रीनमोजी ह्यांनी कतार सारख्या देशाच्या निव्वळ पत्रावर पूर्णपणे लोटांगण घातले. त्याचे मला आश्चर्य वाटत नाही दोन्ही व्यक्ती प्रसिद्धीलोलुप आणि तोंड जास्त चालविणारे आहेत हे मला ठाऊक होते. मजेची गोष्ट म्हणजे अगदी काल पर्यंत नुपूर ह्यांची बाजू घेऊन "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" नावाने बोंब मारणारे IT सेल वाले हि शरणागती कशी भारताच्या आर्थिक आणि त्या देशामध्ये मजुरी करणाऱ्या भारतीयांच्या हितासाठी आहे हे अचानक पोट तिडकीने जगाला समजावून सांगत आहे. ह्या मंडळींचा अबाऊट टर्न जास्त मजेशीर आणि मनोरंजक आहे.

आग्या१९९०'s picture

5 Jun 2022 - 9:37 pm | आग्या१९९०

शेतकरी आंदोलकांना वर्षभर तंगवणाऱ्या सरकारला आखाती देशांनी भारतीय मालावर बहिष्कार टाकून नमवले. बीजेपीने दोन प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. व्वा रे विश्र्वगुरु!

नाही उगाच अफवा पसरवू नका. बहिष्कार सुद्धा घालायची गरज पडली नाही. एक साधे पत्र कतार ने पाठवले होते आणि विश्वगुरू आणि ५६ छाती वाल्यानी थेट "घालीन लोटांगण वंदीन चरण" केले. युरोपिअन देशांना जाऊन कुणीही विचारले नसताना भारत कसा कणखर आणि स्वतःचे हित पाहणारा देश आहे वगैरे आपल्या झकास इंग्रजीत सांगणाऱ्यांची तोंडे फुटकळ कतार सारख्या देशाच्या एका निव्वळ चिट्टीवरून वाचाविरहित झाली.

sunil kachure's picture

6 Jun 2022 - 1:52 pm | sunil kachure

कतार,ओमान, ह्या देशात अमेरिका पासून अनेक देशांचे हीत संबंध आहेत.
अमेरिका पण ह्या देशात काही बाह्य आक्रमण होतील असे वाटले की सावध होते.
लाडक्या उद्योगपती चे कल्याण हेच देश करत आहेत

त्याला फुटकळ देश म्हणू नका.

sunil kachure's picture

5 Jun 2022 - 10:05 pm | sunil kachure

Bjp ची प्रवक्ते आहे.तिने खूप जबाबदारी नी मीडिया समोर बोलले पाहिजे.bjp सत्ता धारी पक्ष.
प्रवक्त्या चे वक्तव्य हे सरकार चे अधिकृत वक्तव्य समजले जावू शकतं.
हे प्रकरण अंगलट येईल म्हणून bjp नी कारवाई केली आहे
सामान्य लोक किंवा सामान्य कार्यकर्ते हे काही ही बोलले तरी चालते.पण प्रवक्त्या ने ते पण सत्ताधारी खूप विचार करून बोलवे लागते.
काँग्रेस चे जुने जाणते लोक bjp मध्ये घ्या आणि त्यांना प्रवक्ते बनवा असा सल्ला देता येईल.
म्हणजे अशी वेळ येणार नाही.

काड्यासारू आगलावे's picture

6 Jun 2022 - 12:02 pm | काड्यासारू आगलावे

केतकी चितळे वेळी बोलण्याचं स्वातंत्र्य वगैरे म्हणून गळे काढनारे ईथले काही मिपाआयडी आता नूपूर शर्मा प्रकरणावर तोंड बंद करून बसलेत.

आग्या१९९०'s picture

5 Jun 2022 - 10:18 pm | आग्या१९९०

आता भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि अब्दुल कलाम ह्यांचे वॉटर मार्क किंवा चित्र छापले छापणार. आता महात्मा गांधी हळू हळू चलनी नोटांवरून हटवले जाणार.